सुनीता देशपांडे यांचे निधन...

विद्याधर३१'s picture
विद्याधर३१ in जनातलं, मनातलं
7 Nov 2009 - 9:10 pm

अत्ताच म्.टा. मध्ये वाचलेल्या बातमी नुसार श्रीमती सुनिता देशपांडे यांचे पुण्यात निधन झाले.
"आहे मनोहर तरी" या आत्मचरित्राने प्रसिध्द झालेल्या सुनिताबाईना आदरांजली.

कलासंस्कृतीनाट्यमुक्तक

प्रतिक्रिया

मस्तानी's picture

7 Nov 2009 - 9:16 pm | मस्तानी

आदरांजली ... पु लंच्या सहचरिणीला ... आणि एका संपन्न व्यक्तिमत्वाला ...

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

7 Nov 2009 - 9:45 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आदरांजली ... पु लंच्या सहचरिणीला ... आणि एका संपन्न व्यक्तिमत्वाला ...

अशाच भावना....!

-दिलीप बिरुटे

बिपिन कार्यकर्ते's picture

7 Nov 2009 - 9:16 pm | बिपिन कार्यकर्ते

ही बातमी चुकणार नव्हतीच. पण अचानक झाले बहुतेक. मराठी कला / साहित्यक्षेत्रातली एक खूप मोठी अधिकारी व्यक्ति हरपली. गेल्या साठ-सत्तर वर्षातल्या घाडामोडींच्या त्या अगदी फ्रंटसीटमधल्या अश्या साक्षीदार होत्या, किंबहुना सहभागी होत्या असेच म्हणावे लागेल. खूप वाईट वाटले. असो. त्यांना माझी श्रध्दांजली.

बिपिन कार्यकर्ते

लवंगी's picture

7 Nov 2009 - 9:26 pm | लवंगी

आदरांजली पु लंच्या सहचरिणीला

चिरोटा's picture

7 Nov 2009 - 9:37 pm | चिरोटा

सुनिताबाईंना माझी श्रध्दांजली
भेंडी
P = NP

टुकुल's picture

7 Nov 2009 - 9:52 pm | टुकुल

आदरांजली !!!

--टुकुल

अभिज्ञ's picture

7 Nov 2009 - 10:07 pm | अभिज्ञ

उद्याच पुल ह्यांचा वाढदिवस. अन आजच हि बातमी यावी हे दुर्दैवच.
सुनिताबाईंना भावपुर्ण श्रध्दांजली.

अभिज्ञ.

सुनीताबाईंनी त्याच्या वाढदिवसाच्या आदल्या दिवशी तिथे पोचावं हा काय दैवयोग म्हणायचा?!
पुलंसारख्या एका महान व्यक्तिमत्त्वाची काळजी घेणारं तितकंच महान व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेलं. कल्पिताहून सत्य विदारक असते ते असे.

मराठी साहित्य, कला, नाटक, संगीत, समाजकारण यातला एक मोठा कालखंड बघितलेल्या, अनुभवलेल्या, त्यात सहभागी असलेल्या सुनीताबाई आपल्यात आता नाहीत हे सत्य पचवणे अवघड आहे.
त्यांना माझी विनम्र आदरांजली.

(खिन्न)चतुरंग

विशाल कुलकर्णी's picture

8 Nov 2009 - 11:37 am | विशाल कुलकर्णी

असेच म्हणतो. आमचीही विनम्र श्रद्धांजली ! :-(

(उदास) विशाल

विकास's picture

10 Nov 2009 - 12:56 am | विकास

माझीपण श्रद्धांजली...

सुनीताबाईंनी त्याच्या वाढदिवसाच्या आदल्या दिवशी तिथे पोचावं हा काय दैवयोग म्हणायचा?!

पुलंचे निधन हे त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसाला झाले होते, हे आठवले...

मदनबाण's picture

7 Nov 2009 - 10:20 pm | मदनबाण

सुनिताबाईंना भावपुर्ण श्रध्दांजली...

केशवराव's picture

7 Nov 2009 - 10:40 pm | केशवराव

एक पर्व संपले !

अवलिया's picture

8 Nov 2009 - 12:35 pm | अवलिया

एक पर्व संपले !

Nile's picture

7 Nov 2009 - 11:37 pm | Nile

माझीही भावपुर्ण आदरांजली!

ऋषिकेश's picture

7 Nov 2009 - 11:39 pm | ऋषिकेश

अरेरे!
खूप वाईट वाटलं. सुनीताबाईंना आदरांजली.
एक संपन्न अभिनेत्री, उत्तम अभिवाचक, एक लेखिका, एका हिमालयाएवढ्या माणसाची अर्धांगिनी आणि एक समाजसेविका गेल्याने आपल्याकडील खूप मोठा ठेवा अचानक हरवल्यासारखं वाटतंय.
आता काहि मनोहर (वाटतच) नाहि आहे. उरली आहे उदासिनता

ऋषिकेश
------------------

वाटाड्या...'s picture

7 Nov 2009 - 11:42 pm | वाटाड्या...

अशी माणसं आता होणे नाही...
पुलंचा एवढा मोठा पसारा सांभाळणे हे सोप्प काम नाही..

परमेश्वर त्यांना सदगती देवो...हीच प्रार्थना..

एक काळ सरला...

- वाटाड्या...

सुनिताबाईंना भावपुर्ण श्रध्दांजली

-
कोकणी फणस

अन्वय's picture

8 Nov 2009 - 12:34 am | अन्वय

हिमालयाची सावली काळाच्या पडद्या आड गेलीय
नि:शब्द

सनविवि's picture

8 Nov 2009 - 12:52 am | सनविवि

फारच वाईट बातमी. माझी त्यांना आदरांजली.

विसोबा खेचर's picture

8 Nov 2009 - 1:24 am | विसोबा खेचर

खूप भरून आलं, डोळ्यात पाणी आलं!

तात्या.

निमीत्त मात्र's picture

8 Nov 2009 - 2:07 am | निमीत्त मात्र

सुनिताबाईंना भावपुर्ण श्रध्दांजली...

स्वाती२'s picture

8 Nov 2009 - 4:03 am | स्वाती२

भावपूर्ण श्रद्धांजली.

सुनील's picture

8 Nov 2009 - 7:27 am | सुनील

आदरांजली.

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

प्रदीप's picture

8 Nov 2009 - 8:27 am | प्रदीप

लागले गळाया, का मज येतसे रडाया?

JAGOMOHANPYARE's picture

8 Nov 2009 - 8:47 am | JAGOMOHANPYARE

आदरांजली... पण आता पुलंची काळजी करायला नको.. त्या तिथेही त्यांची काळजी घेतील.

***************************
प्रातरग्निं प्रातरिंद्रं हवामहे प्रातर्मित्रावरुणा प्रातरश्विना: l
प्रातर्भगं पूषणं ब्रह्मणस्पतिं प्रातः सोममुत रुद्रं हुवेम ll

JAGOMOHANPYARE's picture

8 Nov 2009 - 9:37 am | JAGOMOHANPYARE

आताच हा एक लेख वाचला.. http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=216...

***************************
प्रातरग्निं प्रातरिंद्रं हवामहे प्रातर्मित्रावरुणा प्रातरश्विना: l
प्रातर्भगं पूषणं ब्रह्मणस्पतिं प्रातः सोममुत रुद्रं हुवेम ll

देवदत्त's picture

8 Nov 2009 - 9:39 am | देवदत्त

माझीही आदरांजली.

ज्ञानेश...'s picture

8 Nov 2009 - 10:07 am | ज्ञानेश...

:(

असे दांपत्य आपल्या महाराष्ट्राला लाभले, हे केवढे भाग्य..
मराठी माणूस भाईकाका आणि सुनीताबाईंना कधीही विसरणार नाही.

अनामिका's picture

8 Nov 2009 - 11:07 am | अनामिका

आदर्श सहजीवनाची ओळख अवघ्या महाराष्ट्राला करुन देणार्‍या पुलंच्या सहचरणीला भावपुर्ण आदरांजली........
नि:शब्द!
"अनामिका"
जो करी कर्म अहेतु,वेद तयास कळो न कळो रे।
ओळख पटली ज्यास स्वतःची,देव तयास मिळो न मिळो रे।

मी_ओंकार's picture

8 Nov 2009 - 11:23 am | मी_ओंकार

अत्यंत तरल आणि संवेदनशील मन हरपले. सुनीताबाईंचे कवितांचे अभिवाचन पाहताना आणि ऐकताना हे कायमच जाणवायचं. कविता कशी अनुभवावी हे तेंव्हा पहिल्यांदा कळाले. तसेच त्यांच्या जीएंना लिहिलेल्या पत्रातून ही हे कळतं. 'आहे मनोहर तरी' मध्ये त्यांनी लिहिलयं की भाईचं जसं पहिलं प्रेम संगीत तर सुनीताबाईंचं पहिलं प्रेम कविता. खूप वाईट वाटले बातमी ऐकून.
- ओंकार

रामदास's picture

8 Nov 2009 - 11:37 am | रामदास

सुनिताबाईंना भावपुर्ण श्रध्दांजली.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

8 Nov 2009 - 11:48 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

काही लोकं शरीराने गेली तरी आपल्यातच राहतात. पुलं असोत वा सुनीताबाई, आपल्याला सोडून जाणं त्यांना जमणारच नाही.

अदिती

विसोबा खेचर's picture

8 Nov 2009 - 1:33 pm | विसोबा खेचर

आपल्याला सोडून जाणं त्यांना जमणारच नाही.

लाख मोलाचे बोल..!

तात्या.

प्रशांत उदय मनोहर's picture

8 Nov 2009 - 1:31 pm | प्रशांत उदय मनोहर

सुनिताबाई देशपांडे यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

-प्रशांत

जयमोल's picture

8 Nov 2009 - 8:01 pm | जयमोल

विनम्र आदरान्जली

चित्रा's picture

8 Nov 2009 - 11:33 pm | चित्रा

विनम्र श्रद्धांजली माझ्याकडूनही.

सुनीताबाईंच्या परखड आत्ममग्न लेखनाबाबतीत त्यांचा हात धरणार्‍या मराठी लेखक-लेखिका फारच कमी सापडतील. खूप धीराची बाई.

llपुण्याचे पेशवेll's picture

9 Nov 2009 - 8:51 am | llपुण्याचे पेशवेll

:(
पुण्याचे पेशवे
आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे.
Since 1984

प्रमोद्_पुणे's picture

9 Nov 2009 - 11:44 am | प्रमोद्_पुणे

भावपूर्ण आदरांजली......

प्रकाश घाटपांडे's picture

9 Nov 2009 - 12:24 pm | प्रकाश घाटपांडे

सुनि/नीता बाई (नी र्‍हस्व कि दीर्घ हा मुद्दा गौण) या पुलंच्या खर्‍या सहचारिनी होत्या. पुलंचे अशक्त बिंदु त्यांन्ला चांगले माहित होते. त्याचा गैरफायदा कोनी घेउ नये म्हनुन त्या नीट काळजी घ्यायच्या. प्रकाशकांनी गळ घातल्यावर मानधन वगैरे बाबी त्याच पहायच्या. हा भोळा सांब कधी कुणाला हो म्हणुन जाईल याचा नेम/नियम नसायचा.
कधी प्रा दत्ता दंङगे लिखित सोहम कोहम च्या गोष्टी हे नाटक लागले तर जरुर पहा. पुल सुनिती जीए यांच्या व्यकिरेखा त्यात आहेत. हे श्रीराम लागुंना आवडलेले नाटक म्हणून आम्ही पाहिले.
सुनीताबाई या पुर्णांकात नसल्या तरी अपुर्णांकात विक्षिप्त होत्या असे बरेच लोक सांगतात. मागील वर्षी आम्ही त्याच्या निवासस्थानी थेट धडकुन गप्पा मारुन आलो. (किमान) आम्हाला तरी त्यांचा विक्षिप्तपणा जाणवला नाही. आणि असलाच तरी तीच त्यांची ताकद होती म्हणुनच पुलंच नीभावलं.
सुनीताबाईंच्या स्मृतीला मनःपुर्वक अभिवादन
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

भाग्यश्री कुलकर्णी's picture

9 Nov 2009 - 2:12 pm | भाग्यश्री कुलकर्णी

आदरांजली माझीही.

समंजस's picture

9 Nov 2009 - 4:22 pm | समंजस

सुनिताबाईंना माझी विनम्र श्रध्दांजली!

sneharani's picture

9 Nov 2009 - 4:39 pm | sneharani

सुनिताबाईंना भावपुर्ण श्रध्दांजली...!!!

स्वाती राजेश's picture

9 Nov 2009 - 5:18 pm | स्वाती राजेश

भावपुर्ण आदरांजली!
आज बातमी वाचली....वाईट वाटले...
त्यांचे आहे मनोहर तरी हे पुस्तक वाचले आहे...

हुप्प्या's picture

10 Nov 2009 - 4:43 am | हुप्प्या

माझी सुनीता देशपांड्यांना मनःपूर्वक श्रद्धांजली.
माझ्या मनात ह्यांच्या विषयी पुलं इतकाच आदर आहे. सुनीताबाईंनी वळण लावल्यामुळे पुल नावाचा धबधबा इतकी सकस निर्मिती करू शकला. त्यांच्या साहित्यामुळे त्यांना भरपूर पैसे मिळवून दिले आणि अफाट पण कुठलाही गाजावाजा न करता दानधर्म करू शकले. इतक्या प्रचंड रकमेची विविध संस्थांना मदत करूनही त्याविषयी चकार शब्द बोलायला नकार देणार्‍या ह्या महान जोडप्याच्या आठवणीनेच माझे हात जोडले जातात. साहित्याची विशेषतः कवितेची जाण. संगीत, नाटक, सिनेमा ह्या सगळ्या क्षेत्रात वावर. आपण ज्याला संस्कृती म्हणतो त्या वास्तूचे हे चिरे. ह्यांच्या उल्लेखाशिवाय आपली संस्कृती अपुरी वाटेल.

एक पर्व संपले.

प्रभो's picture

10 Nov 2009 - 4:50 am | प्रभो

माझीपण श्रद्धांजली...

--प्रभो
----------------------------------------------------------------------------------
काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!