आज आंतरजालावर बरीच मराठी संस्थळं भरभराटीला येत आहेत, मराठी युनिकोडसुविधेमुळे मराठी टंकन सुलभ झाले आणि ब्लॉग्जचे पेव फुटले... त्यामुळे ज्या लोकांनी आयुष्यात आपण कधी लिहू असे कल्पिलेही नसेल असे लोक लिहू लागले, मराठी वाचन कमी झाले म्हणता म्हणता या नवीन तंत्राविष्कारामुळे मराठी वाचनच नव्हे तर लेखनही वाढते आहे. एकूणातच... एक नवीन जग आकारास येत आहे. आणि आपण आजचे नेटकर या विश्वाचे सुरूवातीचे दिवस आणि वाढ अगदी पहिल्या रांगेत बसून बघतो आहोत.
तर जालिय दिवस असे सुखासमाधानात जात असताना, साधारण तीनेक आठवड्यांपूर्वी अचानक रामदासांचा व्यनि आला. एखाद्या सदस्याचे सगळे लेखन बघायचे असेल तर काय करायचे? म्हणलं एकदम काय झालं या बाबाला... पण काही काम असेल म्हणून त्यांना युक्ति सांगितली. परत दोनतीन दिवसांनी दुसरा व्यनि. तुमचे लेखन एखाद्या दिवाळी अंकात प्रसिद्ध करायचे झाले तर तुमची काही हरकत आहे का? मी एकदम उडालोच. काहीच कळेना. मग सरळ फोनच लावला. तेव्हा कुठे सगळी भानगड कळली.
रामदासांच्या विश्वसंचारादरम्यान त्यांना जे काही लोक भेटत असतात त्यापैकी एका प्रसिध्द दिवाळीअंकाचे संपादक एक होते. सहज ओळख झाली आणि त्यांच्या गप्पांदरम्यान मराठी आंतरजालविश्वाची ओळख रामदासांनी त्यांना करून दिली. परंपरागत मासिकं आणी दिवाळी अंकांच्या जगातील या लोकांना आपल्या या जालिय विश्वाची ओळखच नव्हती... किंबहुना असे काही आहे ही पुसटशी कल्पनाही नव्हती. जालावर होणारे मराठी लेखन बघून या मुरब्बी संपादकांच्या तोंडाला पाणी न सुटते तर नवलच. त्यांची ऑफर आली... लेखकांची परवानगी असेल तर त्यातले काही लेखन दिवाळी अंकातून प्रसिद्ध करू. तो दिवाळी अंक म्हणजे ग. का. रायकर यांनी चालू केलेला 'श्रीदिपलक्ष्मी' आणि आता संपादक आहेत श्री. हेमंत रायकर.
रामदासांनी त्यांना आवडलेल्या लेखांची आणि इतर साहित्याचे दुवे रायकरांना दिले. त्यापैकी काही रायकरांनी निवडले आणि तेव्हा मला रामदासांचा तिसरा व्यनि आला. खोबार रायकरांना आवडले आहे आणि प्रसिध्द करायचे झाले तर तुमच्या काय अपेक्षा आहेत? मी काय बोलणार? मग म्हणलं आपल्या मोडकाला विचारावं... तो यातलाच माणूस आणि आपला दोस्त. मग त्याच्या सल्ल्याने, संमती देणारे मेल केले. लेखाच्या खाली मिसळपावचा श्रेयोल्लेख करायची सूचना त्याचीच. तर अशा प्रकारे हे सगळं घडलं. एकीकडे रामदासांचे धातुकोष आणि शिंपिणीचं घरटं हे लेखही अंकात समाविष्ट झाले होते. रामदासांनी मराठी आंतरजाल आणि मायबोली, मनोगत, उपक्रम इत्यादी सगळ्याच संस्थळांवर एखादा लेख यावा अशी कल्पना मांडली. तसे नीलकांतशी बोलणेही झाले. त्याने लेखन सुरूही केले पण काही वैयक्तिक अडचणींमुळे जमले नाही ते त्याला.
मला हा सगळाच नवीन प्रकार होता. प्रथमच असं काही तरी छापून वगैरे येणार होतं. त्यामुळे वाट बघत होतो. तो अंक आज हाती आला. अंकाच्या संपादकियात रायकरांनी मराठी आंतरजालाचा उल्लेख करून इथे चाललेल्या लेखनाची दखल घेतली आहे. तसेच, अनुक्रमणिकेत तात्या अभ्यंकरांचा आणि आपल्या मिपाचा उल्लेख करून विशेष आभार मानले आहेत.
माझा लेख आहे म्हणुन नव्हे पण एकंदरीतच कोणत्याही प्रकारे प्रथितयश लेखक नसणार्यांसाठी ही दखल म्हणजे एक सन्मान आहे असे मला वाटते. अशा लोकांसाठी आता हे एक दार उघडले गेले आहे असे वाटते. उत्तमोत्तम लिहिले जावे, वाचायला मिळावे हीच मनोमन इच्छा. त्यायोगे मराठी भाषेलाच एक नवीन संजीवन मिळेल हे नक्की.
या अंकातील काही पानं स्कॅन केली आहेत... बाकी अंकातच वाचा. :)
संपादकिय...
अनुक्रमणिका पान क्रमांक १ वरील मिसळपावचा श्रेयोल्लेख.
अनुक्रमणिका पान क्रमांक २.
शिंपिणीचं घरटं.
धातुकोष.
खोबारकथा.
प्रतिक्रिया
17 Oct 2009 - 10:16 pm | निखिल देशपांडे
बिपिनदा रामदास ह्यांचे अभिनंदन...
तात्या आणि मिपाचे सुद्धा अभिनंदन...
निखिल
================================
रात्री अडीच वाजता जाग आल्यावरसुद्धा तुम्ही खरडवही चेक करूनच झोपता?? तर तुम्हाला नक्कीच मिपाज्वर झाला आहे!!!!!
17 Oct 2009 - 10:37 pm | मस्त कलंदर
बिका नि रामदास यांचे मनःपूर्वक अभिनंदन!!!
मस्त कलंदर..
नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!
18 Oct 2009 - 12:13 am | टारझन
अभिनंदन
-- ख्रिस्त कॅलेंडर
निट आवरलेला क्युबिकल ही ऑफिसात कामं नसल्याची खुण आहे !!!!!
18 Oct 2009 - 3:42 am | गणपा
दोघांच अभिनंदन.
निट आवरलेला किचन ही बायको माहेरी गेल्याची खुण आहे !!!!!
18 Oct 2009 - 7:10 pm | प्रसन्न केसकर
बिपिन कार्यकर्ते, रामदास दोघांचही अभिनंदन. तात्या अभ्यंकर आणि मिसळपाव यांचं सुद्धा अभिनंदन.
18 Oct 2009 - 9:30 pm | पिवळा डांबिस
बिका आणि रामदास यांचे अभिनंदन!!
-तृप्त बिलंदर
नीट आवरलेले किचन ही घरात कोणीही सुगरण नसल्याची खूण आहे!!!!!!
17 Oct 2009 - 10:17 pm | वल्लरी
अभिनंदन
तुमचे लेखन ही दखल्पात्र आहे :)
---वल्लरी
18 Oct 2009 - 12:05 pm | सायली पानसे
अभिनंदन!!!
17 Oct 2009 - 10:35 pm | संदीप चित्रे
रामदास आणि बिपिन ह्यांचे हार्दिक अभिनंदन !
लिखते रहो !!
18 Oct 2009 - 7:17 pm | लवंगी
असेच लिहित रहा
19 Oct 2009 - 6:39 pm | चित्रा
असेच म्हणते!
अभिनंदन.
17 Oct 2009 - 10:50 pm | सुधीर काळे
रामदास व बिपिन,
हे आपल्या 'व्हर्चुअल' टोपीत एक 'व्हर्चुअल' पीसच आहे.
जीते रहो.
सुधीर
"उत्तम कथा"च्या २००९च्या दिवाळी अंकात माझा "अमेरिकेच्या अण्वस्त्रप्रसारांबाबतच्या दुटप्पीपणा"वर रिच बार्लोने केलेल्या पर्दाफाशवरचा लेख प्रसिद्ध झाला आहे. जरूर वाचा. इंडोनेशियातील अतिरेकी 'नूरदिन एम. टॉप'बद्दलच्या अटकेबद्दलचा माझा लेख दक्षताच्या दिवाळी अंकात वाचा.
सुधीर
------------------------
देवा, ज्या गोष्टी मी बदलू शकतो त्या बदलायची व ज्या गोष्टी मी बदलू शकत नाही त्या स्वीकारण्याची शक्ती व या दोन्हीतला फरक समजण्याइतकी विवेकबुद्धी मला दे!
18 Oct 2009 - 1:51 am | नंदन
बिपिनदा व रामदास यांचे हार्दिक अभिनंदन!
नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी
18 Oct 2009 - 2:20 am | Nile
असेच म्हणतो.
हार्दीक अभिनंदन.
अवांतर: काळे साहेब टॅग बंद करायला विसरले वाटतं! =))
18 Oct 2009 - 11:24 am | टारझन
आहो , त्यांनी देवाकडून टॅग बंद करण्याच्या शक्तीच्या बदल्यात विविध शक्त्यांमधला फरक समजण्याची विवेकबुद्धी घेतली आहे ;)
- अधीर गोरे
18 Oct 2009 - 6:47 am | मेघना भुस्कुटे
असेच म्हणते.
पोरी सुस्थळी पडल्या!
18 Oct 2009 - 5:47 am | धनंजय
दोघांचे हार्दिक अभिनंदन आणि पुढील लेखनासाठी शुभेच्छा.
18 Oct 2009 - 6:57 am | सहज
वर उल्लेख केलेले दोन्ही लेख खरोखरच दिवाळी अंकात* यायच्या लायकीचे आहेत यात वाद नाहीच!
अभिनंदन!!!
* (जालीय फाजीलीय वगैरे नाही, प्रिन्ट मेडीया हो!)
18 Oct 2009 - 8:09 am | आण्णा चिंबोरी
हा हा ... हा हा .. हा हा.. हा हा
सहज का रे ही विनाकारण जळजळ. आपलं मिसळपाव प्रिंट मेडिया आहे की जालीय /फाजीलीय?
18 Oct 2009 - 7:28 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
रामदास आणि बिका यांचे अभिनंदन...!!!
छापील दिवाळी अंक काढणार्या संपादकांना, यापुढे उत्तम लेखन शोधण्यासाठी आंतरजालीय लेखकाची मदत घ्यावीच लागणार आहे. ही तर सुरुवात आहे.
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
18 Oct 2009 - 7:33 am | रेवती
अरे वा!!
छान बातमी! बिपिनभाऊ, रामदास यांचे अभिनंदन!
तात्यांचेही अभिनंदन!
रेवती
18 Oct 2009 - 8:04 am | सुबक ठेंगणी
बिका रामदासकाका आणि तात्यांचे अभिनंदन...
ह्यामुळे अनेक हात लिहिते होतील/लिहित रहातील! :)
18 Oct 2009 - 1:15 pm | मदनबाण
हेच म्हणतो... :)
मदनबाण.....
सुसंगति सदा घडो, सुजनवाक्य कानी पडो | कलंक मतीचा झडो, विषय सर्वथा नावडो |
Gripen Offers Complete Technology Transfer In Bid To Win Indian Air Force MRCA Contract
http://www.india-defence.com/reports/3391
18 Oct 2009 - 7:54 am | llपुण्याचे पेशवेll
सुप्रसिद्ध लेखक बिका व रामदास यांचे अभिनंदन. :)
पुण्याचे पेशवे
आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे.
Since 1984
18 Oct 2009 - 8:09 am | प्रमोद देव
रामदास ,बिका आणि काळेसाहेब....आपणा तिघांचे अभिनंदन!
18 Oct 2009 - 8:11 am | आण्णा चिंबोरी
मराठीतील जगप्रसिद्ध लेखकांचे हार्दिक अभिनंदन.
18 Oct 2009 - 8:36 am | चतुरंग
ही आंतरजालीय मराठी साहित्य आणि छापील मराठी साहित्य (प्रिंट मेडिया ह्या अर्थी) ह्यातला पूल घातला जाण्याची सुरुवात व्हावी.
आंतरजालावर उत्तम दर्जाचं साहित्य निर्माण होतं किंबहुना मराठी आंतरजाल असं काही आहे ह्याची मराठी साहित्य/संपादन विश्वाला खबरबातही नसावी ह्याचं मात्र खरंच आश्चर्य वाटतं!
रामदासांनी श्री. हेमंत रायकरांशी ह्या सर्व प्रकाराची रुजवात करुन द्यावी ह्यात त्यांचे द्रष्टेपण आहे असं मला वाटतं.
वेळ जात नाही म्हणून किंवा उगीच कळफलक हातात आहे म्हणून जालावर काहीच्याबाही लेखन पाडले जाते ह्या समजाला धक्का लावण्याचे महत्त्वाचे काम ह्या निमित्ताने घडेल अशी आशा आहे. ह्याचा दुसरा परिणाम म्हणजे जालावर लिहिणारे लेखक हे जास्त सजगतेने लक्षवेधी लिहिण्याचा प्रयत्न करु लागतील असे वाटते. आपले लेखन हे जास्तितजास्त लोकांपर्यंत चांगल्या दर्जाचे लेखन म्हणून पोचावे ह्याची आस त्यांना आता लागून राहील. असे झाले तर मराठी साहित्यासाठी तो एक उत्तम योग ठरेल ह्यात शंका नाही.
चतुरंग
19 Oct 2009 - 10:48 pm | बेसनलाडू
(सहमत)बेसनलाडू
18 Oct 2009 - 8:57 am | विसोबा खेचर
रामदासभौ आणि बिपिनदा यांच्या मिपावरील उत्तम लेखनाची दखल दीपलक्ष्मी दिवाळी अंकाने घ्यावी याचा खूप आनंद वाटला..
रामदासभौ, बिपिनदा आणि अजूनही अनेक जण येथे भरभरून लिहितात, उत्तम लिहितात आणि त्यामुळेच केवळ मिपा अधिकाधिक समृद्ध होत आहे आणि होत राहील..!
'मिपाचा दिवाळी अंक का काढत नाही?' असं अनेकजण विचारतात.. तो निघेल किंवा नाही हे आत्ता सांगू शकत नाही.. परंतु मिपावर बारमाही जे लेखन येतं ते एखाद्या उत्तम दिवाळी अंकात शोभून दिसावं अश्याच दर्जाचं असतं असं मी नेहमी म्हणत आलेला आहे. दीपलक्ष्मीच्या निमित्ताने त्याचाच प्रत्यय आलेला आहे!
रामदासभौ आणि बिपिनदाचे मन:पूर्वक अभिनंदन..! आणि दिवाळी अंकाकरता मिपातील लेखांची दखल घेण्यासाठी आणि निवडीसाठी रायकरांचेही आभार..
ज्या चार दिग्गजांच्या आशीर्वादामुळेच केवळ मिपाची वाटचाल उत्तमरित्या सुरू आहे अशी मिपाची धारणा आहे, त्या चार दिग्गजांना - कुसुमाग्रज, भाईकाका, भीमण्णा आणि बाबूजी यांना वंदन करून प्रतिसाद संपवतो...
आपला,
(कृतार्थ आणि कृतज्ञ) तात्या.
19 Oct 2009 - 10:06 pm | मिसळभोक्ता
रामदास, बिकाशेठ ह्यांचे हार्दिक अभिनंदन.
तात्या अभ्यंकरांचेदेखील.
(तात्याशेट, पार्टी कधी ? आता तुम्ही लय फेमस झालात "साहित्यविश्वात" ! पार्टी पायजेल !)
-- मिसळभोक्ता
(आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)
18 Oct 2009 - 9:11 am | अवलिया
बिपीन भौ.. रामदास शेट...आणि इतर सर्व जणांचे मनापासुन अभिनंदन.. :)
--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
18 Oct 2009 - 10:04 am | बाकरवडी
अभिनंदन!!!!
=D> =D> =D> =D> =D> =D> =D> =D>
=D> =D> =D> =D> =D> =D> =D> =D>
=D> =D> =D> =D> =D> =D> =D> =D>
:B :B :B बाकरवडी :B :B :B
माझा ब्लॉग बघा :- बाकरवडी
18 Oct 2009 - 11:11 am | दशानन
बिपिन आणि रामदास यांचे अभिनंदन व पुढील लेखनास शुभेच्छा.
पार्टी.... पार्टी .... पार्टी कधी :?
***
"हज़ारों ख्वाहिशें ऐसी की हर ख्वाहिश पे दम निकले,
बहुत निकले मेरे अरमान लेकिन फिर भी कम निकले । "
राज दरबार.....
18 Oct 2009 - 11:16 am | ब्रिटिश टिंग्या
रामदासकाका, बिकाकाका, सुधीर काळेसाहेब अन् तात्या यांचे मन:पुर्वक अभिनंदन!
18 Oct 2009 - 11:32 am | मुक्तसुनीत
रामदासकाका, बिकाकाका, सुधीर काळेसाहेब अन् तात्या यांचे मन:पुर्वक अभिनंदन!
18 Oct 2009 - 5:22 pm | स्वाती२
रामदास, बिपिन, काळेसाहेब, तात्या,
हार्दीक आभिनंदन.
18 Oct 2009 - 7:03 pm | अजय भागवत
सर्वांचे अभिनंदन!
18 Oct 2009 - 9:03 pm | संजय अभ्यंकर
संजय अभ्यंकर
http://smabhyan.blogspot.com/
19 Oct 2009 - 7:38 am | प्राजु
बिपिनदा, रामदास आणि रायरीकर यांचे अभिनंदन!!
एकदम सह्ही!
दिपलक्ष्मी चा अंक कुठून तरी मिळवेनच.
- प्राजक्ता पटवर्धन
http://praaju.blogspot.com/
19 Oct 2009 - 12:21 pm | हर्षद आनंदी
<:P <:P <:P <:P <:P <:P <:P <:P <:P <:P <:P <:P
=D> =D> =D> =D> =D>
<:P <:P <:P <:P <:P <:P
रामदास, बिका आणि मिपा ह्यांचे हार्दीक अभिनंदन
O:) O:) O:) O:) O:) O:) O:)
तात्या, यातुन तुमच्या मराठी वाढविण्याच्या प्रयत्नांना यश आले. आम्हा सर्वांना लेखनासाठी, वाचनासाठी एवढा भव्य फळा उपलब्ध करुन दिल्याबद्दल धन्यवाद !!
19 Oct 2009 - 12:50 pm | विनायक प्रभू
अभिनंदन स्विकारा.
20 Oct 2009 - 9:53 am | सुनील
रामदास आणि बिका यांचे हार्दीक अभिनंदन!
लगे रहो!!
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
20 Oct 2009 - 10:17 am | टुकुल
हेच म्हणतो..
बिका, आता मातीचे पुढचे भाग येवु द्या जरा.
--टुकुल
22 Oct 2009 - 1:20 am | आनंदयात्री
अहो आपला नसला दिवाळी अंक तरी आपले लेखक इतके दर्जेदार आहेत की दिवाळीत प्रसिद्ध होणार्या साहित्याला मिपावरच्या साहित्याची दखल घ्यावी लागली .. याहुन अजुन काय आनंददायी असावे. असाच वारंवार अटकेपार झेंडा फडकलेला पहायला आवडेल !!
सर्वांना शुभेच्छा !!
अवांतरः मिपाचा दिवाळी अंक निघाला कधी तर त्याला मिपावली असे नाव शोभुन दिसेल असे उगाच मनी आले.
22 Oct 2009 - 1:24 am | शेखर
वेलकम बॅक प्रसाद.... तुझी दिवाळी छान झाली असेलच..
शेखर
22 Oct 2009 - 7:28 am | डॉ.प्रसाद दाढे
रामदास, बिका आणि तात्यांचे मनापासून अभिनंदन आणि दीपलक्ष्मीच्या रायकरांचे आभार.