गेले काही महिने, खरं तर फेब्रुवारी ०९ पासून, आपल्याला येणार्या बँक किंवा विक्रेत्यांच्या मोबाईल लघु संदेशात पाठवणार्याच्या नावात २ ठराविक प्रकारची अक्षरे देऊन मग पाठवणार्याचे नाव लिहिले असते. एवढा अंदाज होता की TRAI च्या आदेशानुसार सर्व कंपन्यांना असे करणे बंधनकारक असेल. पण त्या अक्षरांचे अर्थ कळत नव्हते. मला आलेल्या संदेशांमध्ये मुख्य:त्वे TM, TA असे लिहिलेले असायचे. त्याचा मी लावलेला अर्थ TM=Telemarketing आणि TA=Transaction Alert असा होता. :D लवकरच, नंतर आलेल्या विविध संदेशांमधून, कळले की मी काढलेले अर्थ चुकीचे आहेत. पण कामात व्यग्र असल्याने नंतर त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला नाही.
जून मध्ये थोडाफार शोध घेतल्यावर कळले की , TRAI ने सांगितल्याप्रमाणे अयाचित व्यापारविषयक लघुसंदेशांमध्ये (Unsolicited Commercial SMS) ही दोन अक्षरे लिहिणे गरजेचे आहेत. त्या दोन अक्षरांमधील पहिले अक्षर हे संदेश पाठवणार्या कंपनीकरीता ठरविलेले संकेताक्षर व दुसरे अक्षर हे ते सेवा देत असलेल्या विभागाकरीता ठरलेले संकेताक्षर आहे.
आता पुन्हा लिहिण्याकरीता वेळ मिळाल्यानंतर ह्याकरीता वापरण्यात येणार्या दोन संकेताक्षरांची माहिती मी येथे देत आहे. ह्याचे स्त्रोत आणि अधिक/पूर्ण माहिती येथे मिळेल.
मोबाईल कंपन्यांची यादी
कंपनीसंकेताक्षरएअरसेल लि.
एअरसेल सेल्युलर लि.
डिशनेट वायरलेस लि.Dभारती एअरटेल लि.
भारती हेक्झाकॉम लि.Aभारत संचार निगम लि.Bबीपीएल मोबाईल कम्युनिकेशन्स लि.
लूप टेलिकॉम प्रा. लि.Lडेटाकॉम सोल्युशन्स प्रा. लि.Cएच एफ सी एल इन्फोटेल लि.Hआयडिया सेल्युलर लि.
आदित्य बिर्ला टेलिकॉम लि.Iमहानगर टेलिफोन निगम लि.Mरिलायंस कम्युनिकेशन्स लि.Rरिलायंस टेलिकॉम लि.Eएस. टेल लि.Sश्याम टेलिकॉम लि.Yस्पाईस कम्युनिकेशन्स लि.Pस्वॅन टेलिकॉम प्रा. लि.Wटाटा टेलिसर्विसेस लि.
टाटा टेलिसर्विसेस (महा.) लि.Tयुनिटेक ग्रुप ऑफ कंपनीUवोडाफोन ग्रुप ऑफ कंपनीV
विभागांची यादी
विभाग
संकेताक्षरआंध्र प्रदेश
A
आसामS
बिहारB
दिल्लीD
गुजरातG
हरियाणाH
हिमाचल प्रदेशI
जम्मू आणि काश्मिर
J
कर्नाटकX
केरळ
L
कोलकाताK
मध्य प्रदेश
Y
महाराष्ट्रZ
मुंबईM
उत्तर पूर्व
N
ओरिसाO
पंजाबP
राजस्थानR
तामिळनाडू (चेन्नई सह)
T
उत्तर प्रदेश - पूर्व
E
उत्तर प्रदेश - पश्चिमW
पश्चिम बंगाल
V
त्यामुळे मला आलेल्या संदेशातील TM म्हणजे T=टाटा टेलिसर्विसेस व M=मुंबई विभाग. म्हणजेच टाटा सर्विसेसच्या मुंबई विभागातून हा संदेश पाठवण्यात आला. TRAI च्या मतानुसार ह्या संकेताक्षराचा वापर करून विनाकारण संदेश पाठवणायांना आटोक्यात आणता येईल. पण मी NDNC करिता ऑगस्ट २००८ मध्येच नोंदणी केली आहे. त्यामुळे मला जे न मागता आलेले संदेश आलेत त्यांबद्दल मी जूनमध्येच तक्रार केली.
पण अजून तरी त्यात काहीच फरक पडलेला दिसत नाही. माझ्यासारखे आणखी जण असतीलच.
तसेच हे टेलिमार्केटर्स फक्त अशाप्रकारचे लघुसंदेश पाठवत नाहीत तर वेगवेगळी संकेतस्थळे वापरून, इमेल ते मोबाईल अशाप्रकारेही हे लघुसंदेश पाठवत आहेत.
ह्या गोष्टींबाबत TRAI किंवा मोबाईल कंपनी काय उत्तर देणार आहे माहित नाही.
प्रतिक्रिया
28 Sep 2009 - 11:12 pm | टारझन
आर्र्तिच्या ... आस्सा झोल आहे होय ?
धन्यवाद देवदत्त , पण हे असले वांझोटे एसेमेस येतात आणि डोक्याचा पुचक्रम होतो राव :) हे थांबवण्यासाठी काही उपाय ?
- टारझनार्थ
28 Sep 2009 - 11:25 pm | वेताळ
धन्यवाद,पन ही कोष्टक कशी लक्षात ठेवणार? मला सगळे एसएमएस TM वरुन येतात.
वेताळ
29 Sep 2009 - 6:16 am | पाषाणभेद
फारच उत्तम माहिती. आपली चिकाटी दाद देण्यासारखी आहे.
आपण आपली तक्रार ग्राहक न्यायालयात का देत नाही?
-----------------------------------
ईलेक्शन दरम्यान कोणी पुढारी स्पष्ट बोलत नाही. गुळूगूळू बोलतात. यंदा स्पष्ट बोलणार्यालाच मत द्या.
- पाषाणभेद उर्फ दगडफोडीची सजा मिळालेला दगडफोड्या
29 Sep 2009 - 9:15 pm | देवदत्त
टारझन, SMS माहित असते तर मी नक्कीच सांगितले असते. :)
वेताळ, कोष्टक लक्षात ठेवणे तसे कठिणच आहे. पण लक्षात ठेवूनही आपण करणार काय? जेव्हा एकगट्ठा तक्रार करायची तेव्हा पाहून घ्या :D
पाषाणभेद, ग्राहक न्यायालयात मी केलेल्या तक्रारींची एकत्र तक्रार करेन असा विचार चालू आहे ;)
29 Sep 2009 - 10:01 pm | पाषाणभेद
मंग माह्यावाला लंबर बी त्याच्यात टाका बरका. लई वैताग आनत्यात बगा त्ये ऐसेमेस. आव आपन त्येंचा फोन घ्येतला म्हंजे त्येंच्या संगती जनू लगीन क्येल हाय आशेच वागतात पगा त्ये फोन कंपनीवाले. माह्याकडे पन लई तक्रारी हायेत त्येंच्याबद्दल. तुमची तारीख लागली कोर्टात तर माला सांगा. म्या पन येतू त्येंची तासायला.
-----------------------------------
- पाषाणभेद उर्फ दगडफोडीच्या सजेतही मोबाईल, टिव्ही असली ऐश करणारा दगडफोड्या
30 Sep 2009 - 1:12 am | हरकाम्या
अगदी हिच माहिती मी काल दुसर्या एका मराठी संकेतस्थळावर वाचली
मला त्या संकेत स्थळाचे नांव लक्षात नाही.
माहितीबद्दल धन्यवाद.