आणि मी डीझायनर झालो!

विनायक पाचलग's picture
विनायक पाचलग in जनातलं, मनातलं
17 Sep 2009 - 9:54 pm

माझ्या संस्थळाच्या ओपनिंगच्या निमित्ताने माझ्या ब्लॉगवर लिहिलेला हा लेख.... जसाच्या तसा इथे!

स्वतःची वेबसाईट असावी अशी प्रत्येकाची इच्छा असती, माझीदेखील होती,त्यामुळे ११वीत गेल्यावर जेव्हा घरी संगणक आला तेव्हा साईट कशी करता येईल हाच विचार मनात होता. मात्र ,मी १६ वर्षाचा असल्याने आणि कमाईचा कोणताही मार्ग नसल्याने जे काही करायचे ते फु़कटच करावे लागणार होते. अशातच मग हुडकाहुडकी सुरु झाली आणि एक साईट सापडली ,मग काय माझ्या परीक्षेसाठी बनवलेल्या फाईलमध्ये त्या साईटचे नाव दिमाखात विराजमान झाले. लोकांना मी माझी साईट बघा असे ओरडुन ओरडुन सांगु लागलो, एव्हाना माझे ऑर्कुटींगही सुरु झालेले होते, तेव्हा चारी बाजुंनी मी या साईटचा डंका वाजवला आणि मग ती फेमस करायचा प्रयत्न केला. तर ही झाली माझ्या पहिल्या साईटची गोष्ट.

पण नंतर लक्षात आले की अरे आपली साईट तर फारच बाळबोध आहे, नवीन काही केले पाहिजे, मग काय पुन्हा नवी साईट हुडका जिथे हे सगळे मोफत करता येईल. झाले नवीन साईट सुरु ,इतके दिवस गमभनही माहित नव्हते ,त्यामुळे ब्लॉगर ,बराहा मध्ये लिहायचे आणि साईटवर टाकत बसायचे ,पुन्हा पुन्हा तेच चक्र,अशा मी किती साईट सुरु केल्या माझे मलाच माहित. दरवेळेला जाहिरात करायची आणि पुन्हा काही चांगले बघितले कि जुनी साईट बंद करुन नवीन काढायची, नेटवर बसले की तोच उद्योग ,त्यात माझे डायल अप होते त्यामुळे फोन एंगेज राहिला म्हणून वर घरातल्यांच्या शिव्या,आणि हो नवीन काहितरी करायचे ही खाज मात्र प्रचंड त्यामुळे अगदी दिवाळीत एक नवा उपक्रमही सुरु केला होता. अगदी सहजच .कॉम वाल्या पिळणकरांपासुन सगळ्यांना मेल केला आणि सगळ्यांनी मदतीचे हातही पुढे केले मात्र काही कारणानी ते सगळे तिथेच राहिले. एव्हाना मी आता कागदावर लिहिलेले ब्लॉगवर उतरवायला लागलो होतो ,बर्‍यापैकी ब्लॉगरही बनलो होतो. मग सारखे तेच , ब्लॉगवर जाऊन किती नव्या हिट्स आल्या ,कुणी नवीन काही कॉमेंट लिहिला का? सारखी धुकधुक .तो कडेचा आकडा कसा आणि किती वाढेल एवढाच फक्त विचार मनात होता. आणि एक गंमत झाली.

थोड्याच दिवसात मला मिसळपाव या संस्थळाचा शोध लागला आणि माझे लेख मी तेथे प्रकशित करु लागलो तेथे ही गलथानपणा केला खरा !पण लोकाना माझे लिखाण बर्‍यापैकी आवडले,मग काय्,तिथे आणखी काही ब्लॉगर भेटले त्यांनी ब्लॉग किती भारी सजवला आहे ते पाहिले आणि आपणही तसेच करायच्या पाठिमागे लागलो. मग काय कोठेतरी जा ,नवीन टेंप्लेट डाऊनलोड कर. ते आवडले नाही तर पुन्हा तिसरे, त्यात एच टी एम एल मधले ओ का ठो कळत नव्हते त्यामुळे मग आणखीनच प्रॉब्लेम व्हायचा ,पण माझा आपला प्रयत्न चालुच होता, एव्हाना नवा उपक्रम चालु करायचे पुन्हा डोक्यात आले होते आणि अशातच 110mb.com चा वापर करुन मी जुन्या लेखकांचे लिखाण एकत्र करायचा प्रयत्न चालु केला. तो बर्‍यापैकी चालला. पण जसे जसे माझे ज्ञान वाढत होते तसे तसे मला अधिकाधिक काही करावेसे वाटु लागले मग काय नवनवीन विजेट हुडक किंवा मग नवीन सद्स्य मिळवण्यासाठी माझ्या साईटचे मेंबर व्हा असे जगाला ओरडुन सांगणे ,हे सगळे करण्यासाठी मी किती ई मेल अकाउंटस काढले असतील ते मलादेखील माहित नाही. पण अगदी घरातल्याना सांगुन मीच नेट बंद केल्यावर देखील माझे हे व्यसन जात न्हवते त्यामुळे मग मी यात पुढे जायचे ठरवले ,आपले आपण मराठी टायपींग शिकलो आणि लिहायला लागलो आणि मीच माझा प्रायोगीक डीझायनर बनत गेलो. काय चालले होते काही कळत नव्हते पण काहीतरी चांगले करत होतो इतके मात्र नक्की . आणि याच काळात मी अनेकाना भेटत गेलो माझ्या स्वतःच्यात अनेक वैचारीक बदल होत गेले मी चारीबाजुनी प्रगल्भ होत गेलो आजही होत आहे.
आणि या सगळ्यात माझी एक सुप्त इच्छा होती की माझी अशी एक वेबसाईट हवी होती की ज्यात लोकाना सदस्य होता येईल आणि मलाही समाधान लाभेल म्हणून मी छानसे वाचलेले हे माझे जुने संस्थळ नव्या जागी हलवले आणि तेथे सद्स्यनोंदणी ची सोय घेतली ,पण हा मात्र माझा प्रयोग फसला आणि येथे मला काही प्रतिसाद मिळाला नाही .सांगायची गोष्ट म्हणजे प्रत्येक वेळी डीझाईन,मराठी लिखाण ,लोगो डीझायनिंग सगळे माझे मीच करत होतो ,आणि त्यात मला आनंददेखील मिळत होता आणि हो या सगळ्या वेळी माझे .tk हेच डोमेन असायचे कारण फ्री मिळणार्‍या पैकी सर्वात छोटे तेच होते हे वेगळे सांगणे न लगे. आणि हो माझ्या अजुन काही गोष्टी लक्षात येऊ लागल्या त्या अशा की मराठीत एकही पुर्णवेळ ओपन फोरम नव्हता. मग काय हुडकली जागा आणि सुरु केला फोरम .चर्चा नावाचा आणि हो मध्ये सांगायचेच विसरलो ते हे की डीसेंबर महिन्यात माझ्या घरी ब्रॉडबँड आले होते त्यामुळे तसा प्रॉब्लेम नव्हता पण ते मशीन पण फॉल्टी त्यामुळे अजुन दंगा, पण या सगळ्यातुन मार्ग काढत साईट काढली .आणि याचे हळू हळू मेंबरही वाढत गेले .पण हा आकडा १५ च्या वर गेला नाही .असे झाले तरी या सगळ्या साईटसाठी मी केलेले वर्क आजही जसेच्या तसे मी जपुन ठेवलेले आहे आठवण म्हणून.

आणि अशातच मी एक मोठा निर्णय घेतला. माझ्या अभ्यासावर या नेटचा मोठा परिणाम होऊ लागला. आणि अभ्यास ही माझी पहिली प्रायोरीटी होती त्यामुळे ३१ मार्च रोजी मी पुर्णपणे नेटसन्यास घेतला. माझे लिखाण बंद केले.ब्लॉग उडवला आणि साईट लोकांच्या स्वाधीन करुन टाकल्या. अर्थातच कागदावर लिहिणे चालु होतेच. मग मी महिन्यातुन एखादा लेख मिसळपाववर टाकु लागलो आणि त्याचवेळी वेगवेगळ्या साईट पाहु लागलो ,खुप शिकलो आणि ३ महिन्यांच्या गॅप नंतर पहिल्यांदा मी माझी नवीन ईग्रजी साईट www.pvinayak.tk सुरु केली .त्याची जास्त पब्लिसिटी केली नाही . पण ज्यांनी पाहिली त्याना ती प्रचंड आवडली आणि मग मी माझा ब्लॉगही माझे मनाच्या कुपितले हे जुने नाव टाकुन देऊन वॉंट टु टॉक या नव्या नावाने सुरु केला आणि पुन्हा काही प्रमाणात नेटीझन झालो.

आणि हो मी देवल क्लब या संस्थेतर्फे नाटकाना म्युझीक देतो हे तर तुम्हाला माहितच आहे ,आणि त्यामुळेच मी पुर्ण रंगकर्मी झालेलो आहे ,अशातच साधारण जुलै महिन्यात लोकसत्तात नाटकावर काही लेख आले. आणि नेहमीप्रमाणे ते पुणे/ मुंबई केंद्रबिंदु धरुन लिहिलेले होते ,अर्थात त्याला मी खणखणीत उत्तर पाठवले पण ते काही छापुन आले नाही.आणि यातुनच आमच्या काही जेष्ठ लोकांच्या मनात नाटकावर एखादे संस्थळ का असु नये अशी कल्पना आली , आणि त्यांनी मध्यंतरी झालेल्या एका कार्यक्रमात ती सांगितल्यावर सुरु कराच असे अनेक लोकानी सांगितले अर्थातच आमच्या गृपमध्ये वेब साईट काढायला जमणारा मी एकटाच त्यामुळे मी ते शिवधनुष्य उचलले ,आणी ब्लॉगरवर साईट करायचे ठरवले आणि मग वेगवेगळी टेंप्लेट धुंडाळुन ,थोडेफार HTML शिकुन एक साईट बनवली www.rangkarmi.com अर्थातच यावेळी साईट पुर्ण प्रोफेशनल असल्याने आम्ही मंदार वैद्य(www.onlinekolhapur.com) यांच्या मदतीने डोमेन तर मयुर कुलकर्णी यांच्या मदतीने लोगो तयार केला व एक उत्तम संस्थळ जन्माला आले.

कळसाध्याय म्हणजे एका विशेष कार्यक्रमात मा .डॉ गिरिष ओक यानी त्या संस्थळाचे उद्घाटन केले आणि आज ते जोमात सुरु आहे. योगायोग असा की मला अभ्यासासाठी अनेक बक्षिसे मिळाली पण सातवीत राज्यात चौथा आल्यावर मला पहिल्यांदा मोठ्या हस्तीकडुन बक्षीस मिळाले आणि ते होते गिरीष ओक.आणि या प्रयोगाचे उद्घाटकही तेच. आता मी या संस्थळाचा टेक्नीकल ऍडव्हायजर म्हणून कम पाहत आहे. अर्थातच संपादक व लेखक दुसरे आहेत. अशारीतीने माझा हा डीझायनींग प्रवास मध्यावरच सुफळ झाला आहे. अजुन अनेक विषय डोक्यात आहेत पण ते काही दिवसानी ..मग खरा तो संपुर्ण होईल. पण शेवटी काही का होईना.... मी डीझायनर झालो...................
विनायक
www.rangkarmi.com (अपडेटेड)

साहित्यिकप्रकटनलेखअनुभव

प्रतिक्रिया

संदीप चित्रे's picture

17 Sep 2009 - 10:02 pm | संदीप चित्रे

करत राहण्यासाठी आणि जास्तीत जास्त यशस्वी होण्यासाठी तुला अंतस्थः ऊर्जा मिळत राहो या शुभेच्छा !

प्राजु's picture

17 Sep 2009 - 10:10 pm | प्राजु

अभिनंदन. धडपड आवडली.
किप इट अप!! :)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

टारझन's picture

17 Sep 2009 - 10:29 pm | टारझन

आणि हो .... विरामचिन्हांचा अगदी अगदी सुयोग्य वापर केलायस हो :) साईटचं कोडिंग(केलं असल्यास) असंच केलं आहे काय ?

आणि हो नवीन काहितरी करायचे ही खाज मात्र प्रचंड त्यामुळे अगदी दिवाळीत एक नवा उपक्रमही सुरु केला.

आणि हो ,, आपल्याला खाज आहे हे इथे कोणी ही अमान्य करणार नाही ;)

आपलाच,
(इतकी नाटके करणारा की आमच्याकडे लेख मागितल्यास हजार सर्व्हर अपुरे पडणारा, तेव्हा कुठे अचानक नातलगांच्या जाचातुन सुटलेला) टारझन

अवलिया's picture

17 Sep 2009 - 10:43 pm | अवलिया

आणि हो नवीन काहितरी करायचे ही खाज मात्र प्रचंड त्यामुळे अगदी दिवाळीत एक नवा उपक्रमही सुरु केला.

घाबरलोच की... काय आहे उपक्रम आणि दिवाळी हे दोन शब्द एकत्र पाहुन घाबरायलाच होते हल्ली ;)

--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.

विनायक पाचलग's picture

18 Sep 2009 - 10:41 pm | विनायक पाचलग

आभारी आहे.
स्वगत- १७- ५३ च्या ऐवजी २६- ३४ प्रगती आहे राव!!!!!!!!!!!!!
(लईच खाज असणारा)
आपलाच
विनायक

विकास's picture

17 Sep 2009 - 10:42 pm | विकास

चिकाटीबद्दल अभिनंदन विनायक! बाकी अभ्यास विसरू नकोस म्हणजे झाले! ;)

फक्त एकच प्रश्नः हा चर्चा विषय टा़कणारी व्यक्ती वेगळी की आय डी वेगळे? :)

विनायक पाचलग's picture

17 Sep 2009 - 10:51 pm | विनायक पाचलग

तो आय डी मीच काढलेला आहे.
त्या आय डी द्वारे रंगकर्मी या संस्थळावरील काही उत्कृष्ठ लेख इथे प्रकाशित करायचा विचार आहे .यासाठी तो आय डी काढलेला आहे.
आपला
(आभारी) विनायक

चतुरंग's picture

17 Sep 2009 - 10:56 pm | चतुरंग

बरीच धडपड करतो आहेस विनायका! तुझ्या ह्या नवीन उपक्रमाला अनेक शुभेच्छा! :)
बाकी १२ वीचा अभ्यास नेटाने कर ह्या 'नेटा'चा त्या नेटावर परिणाम होऊ देऊ नकोस! ;)

(नेटका)चतुरंग

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

17 Sep 2009 - 10:59 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

विनायका, धडपड आवडली.
डीझायनींग प्रवासाला आणि बारावीच्या अभ्यासाला शुभेच्छा...!

-दिलीप बिरुटे

शाहरुख's picture

17 Sep 2009 - 11:10 pm | शाहरुख

खूप शिक मोठा हो !!

(१२-१३ वर्षांपूर्वी आणलेले "लर्न एच.टी.एम.एल. इन २४ अवर्स" हे पुस्तक अजुनही न पूर्ण केलेला) शाहरुख

चतुरंग's picture

17 Sep 2009 - 11:16 pm | चतुरंग

पुस्तकाच्या नावात टायपो असेल,
"लर्न एच.टी.एम.एल. इन २४ इयर्स" :P

चतुरंग

दिपाली पाटिल's picture

18 Sep 2009 - 2:13 am | दिपाली पाटिल

हे एक्दम भारी =))

माझ्याकडेही २-४ वर्षांपूर्वी घेतलेले Learn HTML in 7 Days आहे... त्यात खरंच HTML आहे कां तेही माहीत नाही... :D

दिपाली :)

भडकमकर मास्तर's picture

18 Sep 2009 - 12:22 am | भडकमकर मास्तर

तू जाम धडपड्या माणूस आहेस..
विविध अडचणींमधून मार्ग काढत शिकण्याची प्रोसेस छान लिहिली आहेस...
शुभेच्छा...

_____________________________
हल्ली प्रातःसमयी ओ सजना बरखा बहार आयी ऐकतो... जय बालाजी

mahalkshmi's picture

18 Sep 2009 - 1:00 am | mahalkshmi

खूप शुभेच्छा आणि खूप खूप आशिर्वाद.

स्वाती२'s picture

18 Sep 2009 - 1:30 am | स्वाती२

विनायक, तुझी धडपड कौतुकास्पद आहे. पुढील वाटचालीसाठी अनेक शुभेच्छा!

बिपिन कार्यकर्ते's picture

18 Sep 2009 - 1:46 am | बिपिन कार्यकर्ते

बरीच धडपड करतो आहेस रे... त्याबद्दल नक्कीच कौतुक वाटते तुझे. पण अभ्यासाकडे लक्ष ठेव.

बिपिन कार्यकर्ते

धडपड आवडली.

आणि हो जाताजाता अशीच माहीती, नवशिक्यांना एचटीएमएल शिकायला जो बार्टा यांचे हे एक उत्तम संकेतस्थळ आहे हो.

निमीत्त मात्र's picture

18 Sep 2009 - 7:16 am | निमीत्त मात्र

अहो काय कसली साईट आहे ही? नशीब घरीच उघडले..कामाच्या ठीकाणी हे चित्र आले असते तर मला नोकरीसाठी मिपा मालकांना अर्ज द्यावा लागला असता :)

सहज's picture

18 Sep 2009 - 7:31 am | सहज

माननीय निमित्त मात्र, आपली फावल्यावेळातील वाटचाल पाहून गुगलने तुमच्या पसंतीच्या जाहीरती लावल्या तर संकेतस्थळाला दोष देउ नका ;-)

अवांतर, ब्राउझर मधे टेक्स्ट ओन्ली सेटींग करुन बघता येइल. तेथील माहीती खरच छान, सोपी आहे. कुठलेही सॉफ्टवेयर वापरुन एचटीएमएल पेज शिकण्याआधी नोटपॅड व बेसीक टॅग्ज शिकले की मग सॉफ्टवेयर वापरुन बनवलेल्या पानामधले दोष पटकन हुडकून काढता येतात.

निमीत्त मात्र's picture

18 Sep 2009 - 7:45 am | निमीत्त मात्र

माननीय निमित्त मात्र, आपली फावल्यावेळातील वाटचाल पाहून गुगलने तुमच्या पसंतीच्या जाहीरती लावल्या तर संकेतस्थळाला दोष देउ नका

गुगलला तेवढे कळत असते तर सकाळच्या साईटवर असल्या जाहिराती असल्या नसत्या हो. फुकटचे आम्ही मात्र बदनाम झालो! हाहाहा

टेक्स्ट ओन्ली सेटिंग करुन नक्की बघेन.

निमीत्त मात्र's picture

18 Sep 2009 - 7:19 am | निमीत्त मात्र

छान खटपट रे!

तुझी फारशी पब्लिसीटी नसलेली पण सर्वांना आवडलेली साईट बघीतली...तिथे तुझा फोटो आणि इंग्रजीतल्या ढीगभर चुका असणारे लेखन सोडून काहीच आढळले नाही. :(

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

18 Sep 2009 - 12:54 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

खटपट बरीच केलेली दिसतेस.
थोडी (खरंतर बरीच) मेहेनत इंग्लीशवरही घे रे ... मला काही इंग्लीश फारसं येत नाही पण तरीही तुझ्या साईटवर अगदी भयंकर इंग्लीश दिसलं.
वेबसाईटवर फॅन्सी एचटीएमेल कोड वापरले की वेब्साईट प्रसिद्ध होते असं नाही, उत्तम उदाहरण मिपाचंच! उलट त्यामुळे कंप्यूटरची रॅम वापरली जाते आणि आमच्यासारखे लोकं पुन्हा अशा वेब्साईट्स उघडत नाहीत.

निमा, भयंकर जाहीराती मलातरी दिसल्या नाहीत. फायरफॉक्स+अ‍ॅडब्लॉक वापरा, भलसलत्या चित्रांपासून मुक्ती मिळवा.

अदिती

शाहरुख's picture

18 Sep 2009 - 10:24 pm | शाहरुख

वेबसाईटवर फॅन्सी एचटीएमेल कोड वापरले की वेब्साईट प्रसिद्ध होते असं नाही, उत्तम उदाहरण मिपाचंच!

आणि एक उदाहरण म्हणजे गुगल...

गुगल जेंव्हा "गुगल" नव्हते तेंव्हा त्यांच्या टीमला अधुन-मधुन एक ई-मेल यायचं ज्यात फक्त एक आकडा लिहिलेला असायचा..बरेच डोकं खाजवल्यावर त्यांना कळालं की तो आकडा म्हणजे मुखपृष्ठावरील शब्दांची संख्या आहे....लोकांना काय पाहिजे ते त्यांनी त्यातून जाणले.आजही त्यांचे मुखपृष्ठ अत्यंत साधं आहे.हे मी "द गुगल स्टोरी" या पुस्तकात वाचले आहे.

मिपावर गुगल अ‍ॅनॅलेटिक्सचा कोड आहे की ;-)

मदनबाण's picture

18 Sep 2009 - 8:23 am | मदनबाण

५लगराव नविन नविन प्रयोग करत जाणे हेच महत्वाचे आहे, आणि ते तू करतोयस... :)
माझ्या अभ्यासावर या नेटचा मोठा परिणाम होऊ लागला.
हे तुझ्या लक्षात आलेल आहे तेव्हा कुठल्या गोष्टीला केव्हा आणि किती महत्व ध्यायचे हे नेहमी लक्षात ठेव.

मदनबाण.....

तुम्ही किती जगलात ह्यापेक्षा कसं जगलात याला जास्त महत्त्व आहे.

योगी९००'s picture

18 Sep 2009 - 12:13 pm | योगी९००

मला तुझी धडपड आवडली. लोकांनी टिका केली म्हणून तू तुझ्या निश्चयापासून ढळला नाहीस म्हणून कौतूक..!!!!

मलाही आता तुझे लेख वाचावेसे वाटतात. असेच नवे नवे लेख लिहीत रहा.

खादाडमाऊ

श्रावण मोडक's picture

18 Sep 2009 - 12:35 pm | श्रावण मोडक

छान. धडपडींना शुभेच्छा!

विनायक पाचलग's picture

18 Sep 2009 - 1:33 pm | विनायक पाचलग

सर्वांचे मनापासुन आभार.
ती जी इंग्रजी साईट आहे ,ती मध्येच उघडते मध्येच बंद पडते.
त्यामुळे त्यावर जास्त काही ठेवले नव्हते.
आणि हो त्याचा अ‍ॅक्सेस मी मध्ये माझ्या एका मित्राला दिलेला होता.
अजुनही तो आहे त्याच्याकडे
त्यामुळे कोणी घोळ केला आहे आहित नाही
तरी एकदा चेकतो आणि ईंग्रजी (योग्य ) लिहुन टाकतो.
आपला,
( तर्खडकर ईंग्लीश तिसरा भाग पुर्ण करत बसलेला) विनायक

वेताळ's picture

19 Sep 2009 - 10:51 am | वेताळ

अभिनंदन.
वेताळ

नीधप's picture

19 Sep 2009 - 10:56 am | नीधप

धडपड चांगली आहे.
पण आपण जे करता आहात त्याला टेक्निकल गोष्टींवर उत्तम पकड असं म्हणता येईल. 'डिझायनर' झालो म्हणायला वेळ आहे.
इतक्या लहानपणी आणि इतक्या सुरूवातीला 'झालो','बनलो' च्या आवर्तनात जाऊ नये ही काळजीवजा सूचना.

- नी
http://saaneedhapa.googlepages.com/home

आकडा's picture

19 Sep 2009 - 11:30 pm | आकडा

मोजक्या शब्दांत योग्य प्रतिसाद/सूचना.

विनायक पाचलग's picture

19 Sep 2009 - 7:39 pm | विनायक पाचलग

पण आपण जे करता आहात त्याला टेक्निकल गोष्टींवर उत्तम पकड असं म्हणता येईल. 'डिझायनर' झालो म्हणायला वेळ आहे.

सहमत
प्रयत्न करीन