डिसक्लेमर : मला कविता, मुक्तक , विडंबन ही फक्त नावे माहीत आहेत. त्या कशाशी खातात मला माहीत नाही. तर त्यामुळे खालील लेख (????) सॉरी...कविता स्वतःच्या जबाबदारीवर वाचावी. ह्यातील एक ओळ तात्यांच्या गुरूजींची आहे ती साभार ऊचललीय.
लेखन मिपाच्या धोरणात बसत नसेल तर संपादकांनी काढून टाकायला हरकत नाही
पूर्वाध
जिवनाच्या ह्या वाटेवर, साथ हवीय कुणाची तरी |
दिसते रोज पण का मिळत नाही, ती स्वप्नातली परी ||
रोज रात्री डोळा लागतो, तिचीच स्वप्ने बघण्यासाठी |
मिळाली नाही तर तयार आहे, मरण्या मारण्यासाठी ||
तू तिथे मी ईथे, असा कसा हा न्याय |
तुझ्यापासून मला तोडणारा, आजून जन्मलाच नाय ||
राणी जगू कसं मी तुझ्याशिवाय, हे जरा सांग |
झुलवत ठेवून तू मला, नको हं देऊस टांग ||
आठवतात का गं तुला, ते दिवस समुद्रकिनारीचे |
जिवनात आलेल्या लाटेचे, ओथंबलेल्या श्वासांचे ||
पुढे काय झालं, ते कुणालाच कळालं नाही |
पाहिलेल्या चंद्रावर, आमचं यान कधी ऊतरलचं नाही ||
राणी म्हणाली, तुला सांगितलचं नाही का कोणी |
अरे वेड्या ..बोळा निघाला, आणी केंव्हाच वाहतं झालं पाणी || (ओळ तात्यांच्या गुरूजींकडून साभार)
ऊत्तरार्ध
गेलो होतो फिरत, असचं जूहूच्या किनार्याला |
लायनी मारलेल्या ज्यांच्यावर, त्या आलेल्या पोरं बाळं फिरवायला ||
म्हणालो स्वत:शीच, प्रेमात रहिला नाही काही राम |
आता बनुया किशन कन्हैया, दुसरे नाही काम ||
अशीच एके दिवशी, भरली "ती" मनात |
डोळे फिरले श्वास अडकला, धडकी भरली ऊरात ||
टाकला खोडा एक दिवस, करून थोडी हिंम्मत |
ती आणी तिचा बाप आले वसकन, काय रे तुझी किंमत ||
त्या दिवशी परत चालू झाले, पहिले पाढे पंचावन्न |
अश्वथाम्या सारखा भटकतोय इकडे तिकडे, वणवण वणवण वणवण ||
प्रतिक्रिया
17 Sep 2009 - 7:51 pm | दशानन
छान प्रयत्न !
कविता उत्तम आहे...
काही ओळी तर अती सुरेख... जसे एखाद्या प्रेमीने तुला अगदी समोर बसवून आपली व्यथा सांगितली असावी व तु टंकली असावी असे.... प्रचंड आवडले !
वरील कवितेमुळे काही नतद्रष्ट लोकांना माझी आठवण येऊ शकते पण येऊ दे हरकत नाही....
त्यांना ह्या ओळी समजल्या असतील असेच समजतो..
पुढे काय झालं, ते कुणालाच कळालं नाही |
पाहिलेल्या चंद्रावर, आमचं यान कधी ऊतरलचं नाही ||
काही जागी लय बिघडली आहे.. पण हरकत नाही शिकत आहेस... चांगले लिहतो आहेस .. त्यामुळे त्या बद्दल काही बोलत नाही, पण कविता कशी लिहावी ह्याचा एक शॉर्ट टर्म कोर्स तु नक्की करावा भडमडकर गुर्जी (भुर्जी नाही) ह्यांच्या कडे जा.. जर एखाद दुसरा मित्र बकरा म्हनून घेऊन गेलास तर डिस्काउंट मिळेल ह्याची खात्री मी देतो माझे सिफारस पत्र पण जवळ ठेव...
असो.
लिहीत रहा असेच लिहतो.
धन्यवाद.
18 Sep 2009 - 12:00 am | प्रभो
तुझ्याकडे नाय का शिकवणी?? फी वाचली असती ना लेका..
--प्रभो
----------------------------------------------------------------------------------
काय संगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
18 Sep 2009 - 11:56 am | विशाल कुलकर्णी
राजेसायेब लै चालु हैत परबुदेवा !
तुमी इचारायच्या आदीच तुमास्नी मास्तरांकडं पाटवलं. त्येस्नी म्हायित व्हतं तुमी पैसं वाचवाया त्येंच्याकडंच येनार. म्हुन आदीच कटवलं.
तुमचं चालुद्या लिकान !
सस्नेह
विशाल
*************************************************************
आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
17 Sep 2009 - 8:32 pm | सूहास (not verified)
छान कविता!
प्रयत्न उत्तम आहे...
काही बोळे तर अती सुरेख... जसे एखाद्या "राजे"ने तुला अगदी समोर किंवा खवत बसवून आपली रडकथा सांगितली असावी व तु थुंकली असावी असे.... प्रचंड आवडले !
वरील प्रयत्नामुळे काही नतद्रष्ट लोकांना सौताचीच आठवण येऊ शकते पण येऊ दे हरकत नाही....
त्यांना ह्या ओळी समजल्या असतील असेच समजतो..
पुढे काय झालं, ते कुणालाच कळालं नाही |
आर्याच्या मम्मीला, आम्ही कधीच पाहील नाही ||
काही जागी ती लैच बिघडली आहे.. पण हरकत नाही ती शिकती आहे अजुन ... चांगले पेटवतो आहेस .. त्यामुळे त्या बद्दल काही बोलत नाही, पण कविता कशी पटवावी ह्याचा एक शॉर्ट टर्म कोर्स तु नक्की करावा भडमडकर गुर्जी (भुर्जी नाही) ह्यांच्या कडे जा.. जर एखाद दुसरा मित्र बकरा(नानुड्यासारखा) म्हनून घेऊन गेलास तर डिस्काउंट मिळेल ह्याची खात्री विप्र देतीलच, माझे सिफारस पत्र पण जवळ ठेव...
नसो.
लिहीत रहा असेच लिहतो.
राज्यवाद.
अवांतर : प्रभ्या, ऊच्च हाणलास...बाकी कविता करायला लागलास ? परत परातीत,सॉरी ,प्रेमात पडलास की काय ?
सू हा स...
17 Sep 2009 - 11:58 pm | प्रभो
लै वेळा पडलो रे प्रेमात....पण काय पहिले पाढे पंचावन्न.. :)
--प्रभो
----------------------------------------------------------------------------------
काय संगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
18 Sep 2009 - 1:33 pm | प्रशांत उदय मनोहर
आपला,
(मिपाकर) प्रशांत
---------
प्रशांत म्हणे, होता यमकांचे अतिसार
काव्यपंक्ती पडती एकावर एक टुकार
:?
माझा ब्लॉग - लेखणीतली शाई
17 Sep 2009 - 9:29 pm | प्राजु
चांगला प्रयत्न आहे.
पुढे काय झालं, ते कुणालाच कळालं नाही |
पाहिलेल्या चंद्रावर, आमचं यान कधी ऊतरलचं नाही ||
ही कल्पना छान आहे.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
18 Sep 2009 - 12:07 am | विसोबा खेचर
ही ओळ माझी नसून माझ्या गुरुजींची (पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे) आहे. (संदर्भ - सख्या गटणे)
धन्यवाद,
तात्या.
18 Sep 2009 - 12:15 am | प्रभो
संपादन केले आहे..माहीती बद्दल धन्यु..
-प्रभो
18 Sep 2009 - 10:35 am | सुबक ठेंगणी
असाच प्रेमात धडत पडत रहा ;)