बैलपोळ्याच्या शुभेच्छा !!

लिखाळ's picture
लिखाळ in जनातलं, मनातलं
20 Aug 2009 - 1:05 am

रामराम मंडळी !
आज बैलपोळा ! सर्व नवरोंबांसाठी आज धुणी-भांडी, केर-वारे या पासून विश्रांतीचा दिवस.
मस्त पुरणपोळी खाऊन लोळत पडण्याचा दिवस ;)

समस्तांना बैलपोळ्याच्या शुभेच्छा :)

आज आपण दिवस कसा घालवणार ते (सांगण्यासारखे असेल ;) तर) सांगा.
आणि बैलपोळ्याला बैलाला सजवतात तर आपण काही खास नट्टापट्टा केला असेल तर ते सुद्धा सांगावे :)

--लिखाळोबा

संस्कृतीमौजमजाशुभेच्छाविरंगुळा

प्रतिक्रिया

घोषणा केलीच होती, आता तुम्ही हा धागा काढल्याने मला एक दिवस सर्व कामांपासून मुक्ती मिळवण्याचे नैतिक बळ प्राप्त झाले आहे! तुम्हालाही शुभेच्छा!! B)

सध्या इथे उन्हाळा जोरात असल्याने मी झूल वापरणार नाहीये, फार उकडेल हो! #:S
संध्याकाळी इथल्या तरणतलावात जाऊन डुंबत पडण्याचा विचार आहे. 8>
कारभारणीशी होणार्‍या शाब्दिक मारामारीत (आम्ही बोलू शकतच नाही पण) चुकून कधी आम्ही रागाने मानेला हिसडा दिला तर शिंगे लागू नयेत म्हणून सध्या शिंगे कलम केली आहेत. >:)
पुरणपोळी जेवून मस्त ताणून देऊ ह्यात काही शंका नाही!

बाकी वरच्या चित्रात तुम्ही अंमळ उग्र दिसता आहात! :P

(नंदी)चतुरंग

हरकाम्या's picture

20 Aug 2009 - 1:33 am | हरकाम्या

लिखाळराव तुमचा फोटु लई झ्याक आलाय बगा. त्येला फ्रेम करुन
त्या इडियट बॉक्सवर ठिवतो बगा.

मदनबाण's picture

20 Aug 2009 - 5:37 am | मदनबाण

वरील फोटोसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत !!! ;)

मदन जोशी..... ;)
चट्यागो चझीमा चवडतीआ चलिकामा चतीहो. :)
http://www.youtube.com/watch?v=z3z6limgwMo

काळा डॉन's picture

20 Aug 2009 - 6:47 am | काळा डॉन

लिखाळा वेळ जात नाहीये का?

काळू

*सदर प्रतिसाद टारूला अर्पण

दिनेश५७'s picture

20 Aug 2009 - 8:40 am | दिनेश५७

=D> दिवस सुगीचे सुरू जाहले
ओला चारा बैल माजले...
कसला विचार करताय (बैलोबा)?

दशानन's picture

20 Aug 2009 - 8:40 am | दशानन

अरे आज नानाचा वाढदिवस !

विसरलोच होतो.... !

नाना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

;)

टारझन's picture

20 Aug 2009 - 9:24 am | टारझन

खि खि खि खि खि !!!
खि खि खि खि खि !!!

बाकी ह्या धाग्याची अपेक्षा णाणा कडून होती ... काळा डॉण नं आधीच प्रतिसादवून टाकलं ;)

असो .. सर्व बैलांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!
हैपी बैल पौळा !!

- (सांड) टारझन

अनामिक's picture

20 Aug 2009 - 9:33 am | अनामिक

पोळ्याला शहरी भागात पोळा न म्हणता बैलपोळा का म्हणतात तेच कळत नाही. मला बैलपोळा म्हणने म्हणजे वॉटरबॅगला 'पाण्याची वॉटरबॅग' म्हंटल्यासारखे वाट्ते. पोळा हा बैलांचाच असतो तेव्हा बैलपोळा म्हणायची काय गरज?

बाकी सगळ्या बैलांना पोळ्याच्या शुभेच्छा!

-अनामिक

शैलेन्द्र's picture

20 Aug 2009 - 9:45 am | शैलेन्द्र

लिखाळराव, हा तुमचा फोटो का?

नाही, वेसण दिसत नाहीये, आजच्या दिवस काढलीय का? तसे असल्यास स्वातंत्र्य दीनाच्याही शुभेच्छा..

विसोबा खेचर's picture

20 Aug 2009 - 9:49 am | विसोबा खेचर

मस्त धागा! :)

लिखाळराव तुमचा फोटूही छान आला आहे! :)

आपला,
(कुठल्याही गायीशी बांधिल नसलेला मोकाट सांड) तात्या.

ब्रिटिश टिंग्या's picture

20 Aug 2009 - 10:00 am | ब्रिटिश टिंग्या

लिखाळरावांना वाढदिवसाच्या शुभेच्छा! :)

अवलिया's picture

20 Aug 2009 - 10:08 am | अवलिया

लिखाळराव तुमचा फोटू छान आला आहे!

*आज माझा वाढदिवस आहे हे लक्षात ठेवल्याबद्दल राजेला वाढदिवसाच्या शुभेच्छा ! :)

--अवलिया

छोटा डॉन's picture

20 Aug 2009 - 10:32 am | छोटा डॉन

लिखाळराव, तुम्हाला एक म्हण माहित आहे का हो ?
" आ बैल मुझे मार ...."

असो, तुम्हाला "बैल"पोळ्याच्या शुभेच्छा ....
फोटो चांगला आला आहे हे वे.सा. न. ल.

------
(मोकाट सांड) छोटा डॉन

बाकरवडी's picture

20 Aug 2009 - 10:33 am | बाकरवडी

माझ्यातर्फे शुभेछा !

:B :B :B बाकरवडी :B :B :B

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

20 Aug 2009 - 10:34 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

लिखाळराव, आपल्याकडे पोळा असतो तसाच पश्चिमी देशांमधे 'विमन्स डे' असतो का हो? असो, तुम्हाला आणि तुमच्या सर्व कम्युनिटीला तुमच्या दिवसाच्या हार्दीक शुभेच्छा!

(गायीसारखी गरीब) अदिती

योगी९००'s picture

20 Aug 2009 - 11:13 am | योगी९००

सर्वांना "बैल"पोळ्याच्या शुभेच्छा ....

लिखाळराव, आपल्याकडे पोळा असतो तसाच पश्चिमी देशांमधे 'विमन्स डे' असतो का हो?
मी रहात असलेल्या देशात "विमन्स डे" रोजच असतो. खुपच विमन्स आहेत येथे. कधी कधी मी एकटाच पुरूष बस/ट्राम मध्ये असतो. बाकी सर्व बायका (ड्रायवरसकट)....

खादाडबैल
(हम्मा ....)

ब्रिटिश टिंग्या's picture

20 Aug 2009 - 12:02 pm | ब्रिटिश टिंग्या

मज्जा आहे बॉ तुमची!

विजुभाऊ's picture

20 Aug 2009 - 4:00 pm | विजुभाऊ

(गायीसारखी गरीब) अदिती
अरे बापरे !
गुजराथी भाषेत एक म्हण आहे
दिकरी अने गाय्..माथु मारीने खाय
( मुलगी (कन्या) आणि गाय ह्या तुमचे डोके ऊठवतातच /डोके खातात)

पास हा शब्द जर इंग्रजी असेल तर नापास हा शब्द कोणत्या भाषेतला आहे

आशिष सुर्वे's picture

20 Aug 2009 - 11:49 am | आशिष सुर्वे

आज मी माझ्या 'बॉस'ला शुभेच्छा देण्याचा विचार करतो आहे!

जय हो!!
-
कोकणी फणस

''आयुष्य ही देवाच्या हातची मिसळच जणू.. सुख-दु:खाची!''

प्रकाश घाटपांडे's picture

20 Aug 2009 - 12:18 pm | प्रकाश घाटपांडे

लिखाळ शेठ,चित्रातील बैला कडे पाहिल्यावर जर कुणी 'जवळीक' साधण्याचा प्रयत्न केला तर त्याची गत आ बैल मुझे मार अशीच होईल हे भाकित सांगायला ज्योतिषाची गरज नाही. ;)
आमच्या शेतात अनेक गायी होत्या. एक गाय अशी होती कि तिच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला तर अचानक अंगावर धावुन आलि. मग आमचा शंकर गडी म्हन्ला,"पर्कास, माजाव आल्याव गरीब गाय बी यड्यावानी कर्तीया. जास्ती जौळीक नको"
शंकरनी जीवनाविषयक तत्त्वज्ञानच सांगितले होते. असो बैलपोळ्याच्या यानिमित्तानी अनेक स्मृती ठळक पुसट झाल्या.
(नॉस्टल्जिक)
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

कराडकर's picture

20 Aug 2009 - 12:43 pm | कराडकर

माझ्या पण सर्व बैलांना पोळ्याच्या शुभेच्छा ... ;)

ऋषिकेश's picture

20 Aug 2009 - 1:46 pm | ऋषिकेश

सर्व बैलांना पोळ्याच्या शुभेच्छा!

(वासरू ;) ) ऋषिकेश
------------------
दूपारचे १ वाजून ३० मिनीटे झालेली आहेत. चला आता ऐकूया एक गीत "आरं ढवळ्या रं माझ्या पवळ्या रं ...."

लिखाळ's picture

20 Aug 2009 - 3:37 pm | लिखाळ

सर्वांनी शुभेच्छांची देवाणघेवाण केल्याचे पाहून अगदी जोरात हंबरावेसे वाटले.

आजच्या दिवशी झूल पांघरणे, शिंगाला बेगड लावणे, अंगावर निरनिराळ्या रंगांनी छाप उठवून घेणे आणि मग संध्याकाळी गावभर चक्कर टाकून येणे असा कार्यक्रम साधारण भाग्यवान बैलांच्या नशिबी येताना दिसतो. भारतीय संस्कृतीमध्ये मध्ये प्रत्येक कौटुंबीक घटकाचा जो विचार होतो आणि त्याच्यासाठी जो राखीव दिवस ठेवला जातो त्याचे मी मनापासून कौतुक करतो. (पाश्चात्यांकडे असे पाहायला मिळते की नाही कोण जाणे.)

आज का कोण जाणे पण पुरणपोळी जेवल्यावर दुपारी पडी टाकता येईल..भांडी घासायला लागणार नाहीत याचे स्मरण होऊन डोळ्याच्या कडा ओलावल्या. सुख सुख म्हणतात ते हेच ! (हे वाक्य म्हणजे साहित्यिक हंबरणे आहे ;) )

वरील छायाचित्र मागच्या पोळ्याच्या वेळी घेतले आहे. त्याबद्दल पुन्हाकधीतरी.... असे लिहिणार होतो. पण आज फुरसत आहे तर आताच लिहितो.
मागच्या वर्षीच्या पोळ्याला मला आंघोळीसाठी तळ्यावर नेताना माझ्या एकदम लक्षात आले की आज पोळा आहे. आज आपल्या मानेवर जू नाही. आज आपण स्वतंत्र आहोत. त्या आनंदात मी जोरात स्वातंत्र्याचा हुंकार (गर्जनाच म्हणा ना !) दिला. तो नेमका क्षण छायचित्रकार मित्राने टिपला. तो अविवाहित असल्याने तो पोळ्याच्या दिवशी असलेच उद्योग करत मजा घेत फिरतो. त्याच्या बद्दल खरेतर एक वेगळा लेखच होईल..पण ते पुन्हा कधीतरी....

-- लिखाळ.

प्रमोद देव's picture

20 Aug 2009 - 3:45 pm | प्रमोद देव

बाबा ’लिखाळ’बर्वे ह्यांचे मनोगत वाचले. हृदय उचंबळून आले. :)

माझे जीवनगाणे,व्यथा असो आनंद असू दे......
गात पुढे मज जाणे

श्रावण मोडक's picture

20 Aug 2009 - 3:46 pm | श्रावण मोडक

=D> =D> =D> =D> =D> =D>

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

20 Aug 2009 - 3:57 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

लिखाळशेट, हहपुवा झाली ...

=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))

घ्या, आजचा दिवस हंबरून घ्या! उद्यापासून पुन्हा जू आहेच ...

अदिती

अभिज्ञ's picture

20 Aug 2009 - 5:18 pm | अभिज्ञ

महाराष्ट्रातील सर्व बैलांना पोळ्याच्या शुभेच्छा.
भरपुर पाउस पडून दुष्काळ दुर होवो व सर्व बैल शेतात पुन्हा एकदा काम करत राहोत हिच अपेक्षा.

अभिज्ञ.

--------------------------------------------------------
पॉझिटिव्ह थिंकिंग....? अजिबात जमणार नाहि.