आठवड्याभराच्या भरपूर कामानंतर बाहेर पडायचा कंटाळा, बाहेर धुवांधार पाऊस, आणि सॅटेलाईट टीव्हीचा गायब सिग्नल, या सर्वांचा परिपाक म्हणजे आंतर्जालावर भटकणं, आणि भटकतांना सापडली ही दोन रत्नं!
सुरूवात बहुतेक बालपणापासून केली असणारे हे दोघं आता कुमारवयाचे आहेत.
पहिली स्मरणिका (ही बहुधा दिल्लीच्या पब्लिक स्कूल मधली विद्यार्थिनी असावी, व्हिडीओज् चे tags पहाता). हिचे, तिच्या वय वर्षे ९ ते १२ या कालावधीतले, यू ट्यूब वरचे instrumental वादनाचे व्हिडिओज सापडले. स्मरणिका सगळीच काही जुनी गाणी वाजवत नाही, थोडा आधिक शोध घेतलात तर तिचे तिच्या काळातल्या सिनेमांच्या गाण्यांचेही व्हिडीओज सापडतील, मी आपली माझ्या परिचयाची (आणि हो, माझ्या काळातली ) गाणी इथे देतोय.
वंदे मातरम् - आनंदमठ, लता, हेमंतकुमार
जीना यहां मरना यहां - मेरा नाम जोकर, मुकेश, शंकर-जयकिशन
तेरे बिना आग ये चांदनी आणि घर आया मेरा परदेसी - आग, शमशाद बेगम, राम गांगुली
गुलाबी आंखे, जो तेरी देखे - The Train, महंमद रफी, आर डी बर्मन
तू ही रे - BOMBAY, हरिहरन, ए आर रेहमान
ये जो मुहब्बत है - कटी पतंग, किशोर, आर डी बर्मन
प्यार हुआ इकरार हुआ है - श्री ४२०, लता-मन्ना डे, शंकर-जयकिशन
आणि मला वाटलं (कीबोर्डवरची हातांची आणि बोटांची धावपळ बघता) यांपैकी हे सर्वात कठीण असावं:
पल पल दिल के पास - ब्लॅकमेल, किशोर, कल्याणजी-आनंदजी
आणि आता मला आवडलेला दुसरा बाल कलाकार, रोचित. हा अनिवासी भारतीय आहे, कॅलिफोर्नियातील फ्रीमाँट चा असावा.
त्याने वाजवलेली गाणी:
मैं अगर कहुं- ओम शांती ओम, सोनू निगम, विशाल-शेखर
मां - तारे जमीं पर, शंकर महादेवन, शंकर-एहसान-लॉय
जश़ने बहारा - जोधा अकबर, जावेद अली, ए आर रहेमान
याच रोचित चे काही शास्त्रीय आणि उपशास्त्रीय गायनाचे व्हिडीओज् ही सापडले, तो किती तयारीचा आहे वगैरे इथल्या जाणकारांनी ठरवावं:
राग मिया की मल्हार
राग जोग
उड जायेगा हंस अकेला - पंडित कुमार गंधर्व, संत कबीरांचं भजन
आपल्याला हे व्हिडीओज् आवडतील अशी आशा आहे.
- बहुगुणी
प्रतिक्रिया
16 Aug 2009 - 5:21 am | प्राजु
________/\_______
दोघांनाही साष्टांग दंडवत. :)
खरोखर ही दैवी देणगी आहे..दोघांनाही उत्तम यश मिळो..
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
16 Aug 2009 - 7:42 am | लवंगी
'ये जो मुहोब्बत' आणि 'पल पल' तर अतिशय सुरेख..
16 Aug 2009 - 7:52 am | अनामिक
व्वा, खरंच रत्न आहेत दोघेही.... दुव्या बद्द्ल धन्यवाद!
-अनामिक
16 Aug 2009 - 8:02 am | विसोबा खेचर
मुलीनं छान वाजवलं आहे..
मुलाचा मल्हार ऐकला. तो मात्र माझ्या मते अजून गाण्यात बराच म्हणजे बराच कच्चा आहे.
तात्या.
16 Aug 2009 - 8:19 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मुलगी काय सराईतपणे बोटे फिरवते वाद्यावरुन...सुप्पर !
वंदे मातरम, घर आया परदेशी, पल-पल दिलके पास ऐकायला मजा आली.
शास्त्रीय गायन कळत नसल्यामुळे रोचितच्या तयारीबद्दल बोलण्याचा काही अधिकार आम्हाला नाही.
मात्र, दोघांनाही मोठ्या भरारीसाठी शुभेच्छा...!
दुव्याबद्दल बहुगुणींचे आभार...!
-दिलीप बिरुटे
16 Aug 2009 - 8:45 am | प्रमोद देव
दोघांचेही भवितव्य उज्वल आहे ह्याबाबत शंका नाही.
16 Aug 2009 - 10:13 am | मदनबाण
सगळीच गाणी मस्त वाजवली आहे... मला अवडलेली गाणी...
प्यार हुआ इकरार हुआ है,पल पल दिल के पास
चट्यागो चझीमा चवडतीआ चलिकामा चतिहो. :)
16 Aug 2009 - 3:00 pm | क्रान्ति
दोन्ही कलाकारांना मानलं! दुव्यांबद्दल बहुगुणींना शतशः धन्यवाद.
क्रान्ति
दिव्यत्वाची जेथ प्रचीती | तेथे कर माझे जुळती
अग्निसखा
रूह की शायरी
16 Aug 2009 - 5:06 pm | चतुरंग
ज्या सराईतपणे ती दोनदोन कीबोर्डस वरुन पटापट उड्या मारते ते केवळ थक्क करणारं. फक्त गाणंच नव्हे तर मध्यल्या सगळ्या वाद्यमेळाच्या सुरावटी तिनं अप्रतिम घेतल्यान. 'ये जो मोहोब्बत है' मला फार फार आवडलं. आणि एवढं सुरेख वाजवत असूनही अगदी साधी वाटते, कुठेही गर्व वाटत नाही. तिचं भविष्य उज्ज्वल आहे. रोचितही छान वाजवतो. पण स्मरणिकाचं वादन जास्त आवडलं.
दोघांना अनेक शुभेच्छा!
एक छान धागा काढल्याबद्दल बहुगुणींचे आभार.
चतुरंग