तात्यांनी दर्शनी पानावर यु-ट्युब वरच्या त्याच्यांच सदस्यत्वात अपलोड केलेल्या तेलगु गाण्याची माहिती दिली. सहज उत्सुकता म्हणुन तात्यांनी अजुन काय यु-ट्युबवर ठेवले आहे पाहीले तर " बिहाग " रागातली " लट उलझी .. " ही तात्यांनी गायलेली अफाट लोकप्रिय बंदिश सापडली... क्या बात है..!! मग काय आजच्या दिवसाचे तरी खाद्य मिळाले मेंदुला..
बिहाग हा एक शृंगारीक राग..
तो फार दिवसांनी घरी परततोय..
"ती आतुरतेने वाट पाहात असेल" लवकर पोहचावे म्हणून तो आडमार्गाने जाणारी पायवाट पकडतो..
झाडी-झुडपातून जाणारी वाट.. मधे एक छोटासा ओढा लागतो.. अन तो थबकतोच . कारण पलीकडे ती उभी आहे.. तिलाही उमजतं की तो याच वाटेने येणार मग ती सुद्धा इथवर येउन त्याची वाट पाहात असते..
पैलतीरावरच्या त्याला/तिला पाहील्यावर जे भाव मनात येतात , ते भाव म्हणजे बिहाग..
मग दिवसभर जालावरुन अधाश्यासारखा सगळ्या दिग्गज गायकांचा बिहाग शोधला अन ऎकला .. अमीर खांसाहेब , पं.जसराज , गंगुबाई हनगल , कुमारजी , बालगंर्धव , भीमसेनजी यांच्या एकापेक्षा एक सुंदर रचना.. त्याच बरोबर रवीशंकर यांनी थिरकवासाहेबांच्या साथीने सादर केलेला बिहाग... बस्स.. दिन बन गया आजका !!
त्यातल्या त्यात.. जसराजजीं , भीमसेनजीं गायलेली " लट उलझी " ह्या चीजेची तर पारायणे केली .. ( जसराजजींचे "देखो मोरी रंगमे" पण त्यातचं आहे )
"लट उलझी सुलझा जा बालमा,
हाथ में मेरे मेहेंदी लगी है,
माथे पे बिंदिया बिखर गयी है,
अपने हाथ सजा जा बालमा! "
शब्द तर स्त्रीपात्राचे आहेत.. प्रियकराला आर्जव करण्यारया प्रेयसीच्या मनातले भाव आहेत.. जसराजजीं / भीमसेनजीं च्या भारदस्त , वजनदार आवाजात ही त्या शब्दांतले मार्दव, अवखळपणा , शृंगारीक छटा थेट मनाला भिडतात.. हीच बिहागची खासियत..
( ही चीज शमशाद बेगम व नुरजहांने पण गायली आहे , पण त्या चाली बिहाग मधे नाहीयेत बहुधा ? चु.भु.द्या.घ्या )
काही दुवे..
१)
http://ww.smashits.com/music/n-ind-classical/play/songs/506/PT-BHIMSEN-J...
२) http://www.esnips.com/doc/02d3a692-296f-4ba8-8ad6-c4433d2b3956/Bihag---L...
३) http://www.sawf.org/newedit/edit11042002/musicarts.asp - मस्त संग्रह आहे..
४) http://www.esnips.com/doc/3688b4f2-ec96-4cc0-9019-c4e20928ed53/Mama-Atma...
५) http://www.esnips.com/doc/e2788c87-f126-4fe5-b968-dcc319d2513a/Amir-Khan...
६) http://www.musicindiaonline.com/music/hindustani_vocal/s/raag.300
जाता-जाता:- रेहमानने 'युवराज' मधे 'लट उलझी' खास रेहमान ट्च ने सादर केले.. पण " हाथ में मेरे मेहेंदी लगी है," ही ओळ का काटली काय माहिती ??
प्रतिक्रिया
4 Aug 2009 - 9:39 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
'लट उलझी सुलझा जा बालमा' रेहमानचे टच ऐकायला मलाही मजा आली होती. त्याचे रसग्रहणीही सुबक ठेंगणी यांनी केले होते, हे वाचले का?
-दिलीप बिरुटे
4 Aug 2009 - 9:45 am | बामनाचं पोर
व्वा !! मस्त रसग्रहण केले आहे .. आत्ता वाचले पण मी :(
4 Aug 2009 - 9:52 am | विसोबा खेचर
क्या बात है...!
तात्या.
4 Aug 2009 - 5:51 pm | अन्वय
तात्या बामणाच्या पोराने बिहागचा भाव पोचवला; पण स्वरांचा खेळ काही त्याला रंगवता आला नाही.
मग होऊन जाऊदेत "लट उलझी सुलझा...' सुरेल रसग्रहण.
4 Aug 2009 - 9:56 am | JAGOMOHANPYARE
रहमानचे लट उलझे भीम पलास मधे आहे....
मी नेट वर यु टुब मध्ये हे बिहाग मधील लट उलझे शोधत होतो. पण मला ते मिळाले नाही... पाकिस्तान मधील जुन्या काळातील एक गाने मिळाले... लट उलझी सुलझा जा रे बालम... पुढचे गाणे पूर्ण वेगळे आहे... पण सुन्दर आहे... बागेश्री मध्ये आहे. टिपिकल शमशाद बेगम स्टाईल..
ओर्कुट वर गजानन कागलकर या माझ्या अकाउन्टमध्ये विडिओ मध्ये ते आहे...
4 Aug 2009 - 4:13 pm | भडकमकर मास्तर
लै भारी दुवे...
असा एखादा दिवस एका रागाचा करून सोडला की मजा येते...
_____________________________
हल्ली प्रातःसमयी ओ सजना बरखा बहार आयी ऐकतो... जय बालाजी
5 Aug 2009 - 6:15 pm | चेतन
http://www.youtube.com/watch?v=jW12Fpz4WXs
हे गाण वेगळ आहे पण पहिलि ओळ सारखिच आहे
चेतन