खग्रास (पुर्ण) सुर्यग्रहण फक्त ३.४० मिनीट चालले.
यानंतर सुमार १५० वर्षांनंतरच खग्रास (पुर्ण) सुर्यग्रहण भारतात होणार आहे. (चु.भू.दे.घे.)
डिस्के. खालील छाया. बघतांना गॉगल वैग्रे लावावा. डोळ्यांना ईजा झाल्यास धागालेखक जबाबदार नाही. :B
छाया. १ सुर्यग्रहण सुरु होतांना
छाया. २
छाया. ३
छाया. ४
छाया. ५
छाया. ६
छाया. ७
छाया. ७ सुर्यग्रहण सुटतांना
प्रतिक्रिया
22 Jul 2009 - 7:02 am | विकास
मस्त छायाचित्रे आहेत!
22 Jul 2009 - 7:47 am | प्राजु
मस्त!! :)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
22 Jul 2009 - 8:44 am | नीलकांत
पुण्यात पाऊस असल्यामुळे सुर्याचे दर्शनच झाले नाही :(
ही चित्रे दिल्याबद्दल धन्यवाद.
- नीलकांत
22 Jul 2009 - 9:32 am | दशानन
हाच हाल दिल्लीचा पण !
:(
सुरेख छायचित्रे !
+++++++++++++++++++++++++++++
काय ? देवाला गंध, फुल वहाणे, देवळाला पैशाची वगैरे मदत करणे म्हणजे भ्रष्टाचार वाटतो तुम्हाला? वा ! आनंद वाटला आपल्याला भेटुन. ;)
22 Jul 2009 - 9:40 am | छोटा डॉन
आम्ही पण आज खास ५.१५ ला उठलो होतो पण ढगाळ हवामान असल्याने ग्रहण सोडा पण सुर्यदर्शनही झाले नाही.
असो, छायाचित्रे आवडली.
धन्यवाद ...
------
छोटा डॉन
आम्ही आमच्या आंतरजालीय दुश्मनांना काही वेळा क्षमाही करतो, मात्र त्यांचे नाव आणि आयपी अॅड्रेस कधीही विसरत नाही .. ;)
22 Jul 2009 - 9:53 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
दिवाणावरूनच पावसाचा आवाज ऐकला आणि पुन्हा झोपले.
९५ सालचं खग्रास ग्रहण पाहिलं. ९९ साली ढगांच्या मागूनसुद्धा चंद्राची प्रचंड सावली कच्छच्या वाळवंटात अंगावर धावून आलेली आणि परत गेलेली पाहिली, अनुभवली. एवढं मोठं, जवळजवळ ४ मिनीटांची खग्रास स्थिती, आणि ती भर पावसाळ्यात, फारच वाईट वाटलं याचा विचार करून!
अजून कंकणाकृती ग्रहण पाहिलं नाही आहे. तेव्हा पुढच्या वर्षी जानेवारीत "चलो कन्याकुमारी"!
22 Jul 2009 - 10:16 am | निखिल देशपांडे
आम्ही पण आज खास लवकर ऊठलो... पाउसा मुळे टी व्ही वरच ग्रहण पाहिले ;)
निखिल
================================
22 Jul 2009 - 10:18 am | पाषाणभेद
सुर्यग्रहणात काही तिक्ष्ण किरणे येतात का?
शास्रज्ञ सुर्यग्रहणाचा काय अभ्यास करतात? ईतर वेळी तो अभ्यास होवू शकत नाही काय?
(बाकी सुर्यग्रहणात का उपास केला पाहीजे, गर्भारणींनी का काळजी घ्यावी, कपडे का दान करावे असले ईंडिया टिवी प्रश्न विचारत नाही.)
पुरोगामी बिहारचा पाठीराखा व झारखंड, उत्तरप्रदेशचा काही भाग, मध्य प्रदेश चा काही भाग, ओरीसाचा काही भाग, प. बंगालचा काही भाग, नेपाळचा काही भाग मिळून संयुक्त बिहार झाला पाहीजे ही मागणी करणारा पासानभेद उर्फ पथ्थरफोड
22 Jul 2009 - 10:37 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
नाही, उलट नेहेमी येणारे तीव्र किरण चंद्रामुळे अडवले जातात. चंद्र परप्रकाशित आहे त्यामुळे चंद्रामुळे तीव्र किरण येऊ शकत नाहीत. जे किरण, ऊर्जा येते ती सूर्यामुळे, ती अडते त्यामुळे ग्रहणकाल (रात्रीप्रमाणेच आणि रात्रीएवढाच) सुरक्षित आहे.
(अवांतर माहिती: न्यूट्रीनो नावाचे भूतसमान कण चंद्राचा उपयोग करून शोधण्याचा विचार सुरू आहे, पण त्याची माहीती विस्तारभयास्तव इथे देत नाही.)
सूर्यग्रहणातून वेगवेगळ्या प्रकारचा अभ्यास होऊ शकतो. उदा:
१. अॅस्ट्रोमेट्री: चंद्राचं अंतर मोजणे.
किंवा, सूर्याचे वस्तुमान मोजणे. (हा प्रकार त्यामानाने नवीन आहे, १९२०पासून सुरू झाला.) सूर्याच्या पाठी असलेले तारे ग्रहणकाळात दिसू शकतात आणि त्यावरून सूर्याचं वस्तूमान मोजता येईल.
२. सूर्याच्या वातावरणाचा अभ्यास: खग्रास स्थितीमधे सूर्याभोवती जो किरीट (corona) दिसतो ते सूर्याचं वातावरण आहे. हा किरीट इत:पर दिसत नाही, किंवा विशिष्ट उपकरणांची गरज पडते. सूर्याच्या चुंबकीय बलाचा परिणाम या किरीटाच्या अभ्यासातून समजतो. जेव्हा हा किरीट जास्तीतजास्त गोलाकार असतो तेव्हा चुंबकीय क्षेत्र खूप जास्त प्रमाणात आणि कार्यरत असतं आणि किरीट लंबवर्तुळाकार असतो तेव्हा चुंबकीय क्षेत्र कमी आणि अशक्त असतं.
३. सूर्यामधे लोखंड, निकल असे जड धातू आहेत हे ग्रहणकाळात केलेल्या स्पेक्ट्रोस्कोपीमधून जोसेफ फ्राऊनहॉफर याने शोधलं होतं.
विजयदुर्ग येथून दिसलेल्या ग्रहणाच्या वेळी हेलियम या अणुक्रमांक दोन असणार्या मूलद्रव्याचा शोध लागला होता. त्याआधी हे मूलद्रव्य असेल याची कल्पना असली तरीही ते निसर्गात सापडलं नव्हतं. सूर्यात ऊर्जा कशी तयार होत असेल याचं कोडं त्यादिवशी संपूर्णतया सुटलं.
22 Jul 2009 - 11:44 am | पाषाणभेद
हेलियम शिवाय हैड्रोजन पण ऊर्जानिर्मीतीत मदत करतो का? की फक्त हेलियमच सगळी ऊर्जानिर्मीती करतो?
सुर्यावर हौसकिपींगच्या कामांची टेंडरे भरण्यासाठी लाच देणारा पासानभेद मिस्रा
व
झारखंड, उत्तरप्रदेशचा काही भाग, मध्य प्रदेश चा काही भाग, ओरीसाचा काही भाग, प. बंगालचा काही भाग, नेपाळचा काही भाग मिळून संयुक्त बिहार झाला पाहीजे ही मागणी करणारा पासानभेद उर्फ पथ्थरफोड
22 Jul 2009 - 12:00 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
साधारणपणे चार हायड्रोजनचे अणू एकत्र येऊन एक हेलियमचा अणू बनतो व त्यातून ऊर्जानिर्मिती होते. जोपर्यंत हेलियमचा शोध लागत नव्हता तोपर्यंत हे कोडं पूर्णपणे सुटलं नव्हतं.
22 Jul 2009 - 12:05 pm | पाषाणभेद
म्हणजे हैड्रोजनच मेन आहे नाही का?
हेलियम हे मुलद्रव्य की उपमुलद्रव्य ?
माफ करा माझ्या प्रश्नाबद्दल पण १० वी १२ वी चे आठवत नाही आता.
शंकेखोर व झारखंड, उत्तरप्रदेशचा काही भाग, मध्य प्रदेश चा काही भाग, ओरीसाचा काही भाग, प. बंगालचा काही भाग, नेपाळचा काही भाग मिळून संयुक्त बिहार झाला पाहीजे ही मागणी करणारा पासानभेद उर्फ पथ्थरफोड
22 Jul 2009 - 12:11 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
हॅ हॅ हॅ ;-) एक लेख लिहायला हवा स्वतंत्र ... वेळ झाल्यावर जरूर लिहेन!
हायड्रोजनचा अणूक्रमांक आहे एक आणि हेलियमचा दोन. दोन्ही मूलद्रव्य आहेत. आपल्या विश्वात हायड्रोजन साधारण ७५% आहे आणि हेलियम २४% (साधारण). सगळ्या तार्यांमधे हायड्रोजन हाच ऊर्जेचा मुख्य स्रोत आहे, हायड्रोजनचा हेलियम होऊन ऊर्जा तयार होते. हायड्रोजन संपला की मगच हेलियम "जाळायला" सुरूवात होते. .... असो. फारच अवांतर होत आहे.
23 Jul 2009 - 6:02 pm | लक्ष्मणसुत
जरूर !!!
लक्ष्मणसुत उवाच्
22 Jul 2009 - 9:06 am | क्रान्ति
सुरेख आहेत छायाचित्रे.
क्रान्ति
ध्यानम् मूलम् गुरुमूर्ति, पूजामूलम् गुरु पदम्
मंत्र मूलम् गुरुवाक्यम्, मोक्षमूलम् गुरुकृपा
अग्निसखा
रूह की शायरी
22 Jul 2009 - 9:21 am | विसोबा खेचर
मस्त चित्र..!
तात्या.
22 Jul 2009 - 9:32 am | बेसनलाडू
(आस्वादक)बेसनलाडू
22 Jul 2009 - 9:58 am | आशिष सुर्वे
नेहमीप्रमाणे आमची सकाळ उशीराच झाल्याने आम्हाला 'जिवंत' चित्रे पहायला मिळाली नाहीत.. तेव्हा धन्यवाद
-
कोकणी फणस
22 Jul 2009 - 10:03 am | विनायक प्रभू
पाभेभौ,
तुमचे फ्टु पण गॉगल लावुन बघितले. आय्ला फुकट राडा नको.
आता १५० वर्षाने येणारे पण बघीन.
22 Jul 2009 - 10:11 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
झकास क्षणचित्रे...!
एक बातमी : मातृभाषेतून शिक्षणाची सक्ती नको- सर्वोच्च न्यायालय.
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
22 Jul 2009 - 2:40 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
कृपया आपसांतल्या गप्पा-टप्पा, प्रासंगिक चर्चा यांसाठी खरडवह्या, खरडफळ्याचा वापर करावा ही विनंती.
-- ग्रहणकालातील प्रतिसादकर्ती
सहमत आहे. अवांतर प्रतिसाद अप्रकाशित केले आहेत. कृपया प्रत्येकच ठिकाणी अवांतर चर्चा करून मूळ विषय भरकटवू नये.
-- तात्या अभ्यंकर.
22 Jul 2009 - 12:09 pm | स्वाती दिनेश
प्रकाशचित्रे आवडली.
स्वाती
22 Jul 2009 - 5:53 pm | सागर
यातील मला काशी ला घेतलेले आणि पाटण्याची डायमंड रिंग (हिर्याची अंगठी ;) ) ही छायाचित्रे विशेष आवडलीत.
शेवटी चीनपेक्षा भारत सरस हेच खरे :)
खुलासा : ही छायाचित्रे मी घेतलेली नाहीत. मायाजालावर मिळाली आणि आवडली म्हणून देत आहे...
१. काशीला गंगा नदीच्या किनारी घेतलेले हे सुंदर छायाचित्र
२. पाटणा - बिहार येथील सुंदर डायमंड रिंग
From Solar Eclip 22-July-2009 5 AM to 7.41 AM
३. डायमंड रिंग - १ (चीन मधे घेतलेले छायाचित्र)
From Solar Eclip 22-July-2009 5 AM to 7.41 AM
४. डायमंड रिंग - २
From Solar Eclip 22-July-2009 5 AM to 7.41 AM
(खगोलप्रेमी) सागर
22 Jul 2009 - 4:03 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
आत्ताच एक छोटीशी गोष्ट लक्षात आली, आजच्या दिवसाला "पाय"चा दुसरा दिवस म्हणता येईल: २२/७
(दिनांक लिहीण्याच्या अमेरिकन पद्धतीने पाहिल्यास, १४ मार्चला पहिला म्हणता येईल.)
अदिती
22 Jul 2009 - 5:50 pm | सागर
खरेच की आदितीताई...
२२/७ = ३.१४ = पाय
जगातल्या शास्त्रज्ञांना हे अजून सुचल्याचे ऐकले नाही...
हाडाच्या शास्त्रज्ञ शोभता तुम्ही :)
(खगोलप्रेमी) सागर
22 Jul 2009 - 6:03 pm | दत्ता काळे
मला सूर्यग्रहणाची एवढी शास्रीय माहिती माहित नव्हती. ती मला ह्या धाग्याच्या निमित्ताने कळाली. धन्यवाद.
22 Jul 2009 - 6:49 pm | सागर
खग्रास सूर्यग्रहण केव्हा होते?
चंद्र पृथ्वीच्या जास्तीत जास्त जवळ (म्हणजे सूर्याला पूर्णपणे झाकू शकेल एवढा) आला की होणार्या सूर्यग्रहणाला खग्रास म्हणतात
कंकणाकृती सूर्यग्रहण केव्हा होते?
चंद्र पृथ्वीच्या जास्तीत जास्त लांब (म्हणजे सूर्यबिंबा मध्ये पूर्णपणे मावू शकेल एवढा) आला की होणार्या सूर्यग्रहणाला कंकणाकृती म्हणतात
खंड-ग्रास सूर्यग्रहण केव्हा होते?
याचा चंद्र पृथ्वीपासून किती अंतरावर आहे याच्याशी संबंध नसतो.
थोडक्यात ज्या सूर्यग्रहणात चंद्र हा सूर्याला पूर्णपणे व्यापू शकत नाही त्या सूर्यग्रहणाला खंड-ग्रास म्हणतात. (कंकणाकृती हे देखील खंडग्रासच आहे. फक्त यात संपूर्ण रिंग दिसते म्हणून हा प्रकार वेगळा गृहीत धरला जातो.)
22 Jul 2009 - 10:29 pm | नितिन थत्ते
चंद्राची सावली पृथ्वीवर पडते. त्या सावलीच्या आत उभे असलेल्यांनाच खग्रास सूर्यग्रहण दिसू शकते. बाकीच्यांना खंडग्रास दिसते.
हा पृथ्वीवरच्या चंद्राच्या सावलीचा फोटो (आजचा नाहीये).

(सावलीला घाबरणारा) नितिन थत्ते
23 Jul 2009 - 5:13 pm | सागर
धन्यवाद नितिन,
बेसिक माहिती देताना सावलीची गोष्ट ध्यानात राहिली नाही ;)
तुमच्या वाक्यात थोडी सुधारणा :
चंद्राची सावली पृथ्वीवर पडते. त्या सावलीच्या आत उभे असलेल्यांनाच खग्रास सूर्यग्रहण दिसू शकते. बाकीच्यांना खंडग्रास दिसते.
फक्त चंद्राच्या सावलीत येणार्या ठिकाणांहूनच सूर्यग्रहण दिसते.
http://www.mreclipse.com/Special/SEprimer.html
ह्या दुव्यावरुन ही गोष्ट स्पष्ट होईन. म्हणजे पृथ्वीवर असे ठिकाण असते की जेथून खग्रास सूर्यग्रहण दिसते. तर काही ठिकाणांहून तेच ग्रहण खंडग्रास दिसते...
माझी माहिती चुकीची असल्यास कृपया दुरुस्त करावी...
धन्यवाद
सागर
22 Jul 2009 - 11:22 pm | भाग्यश्री
http://www.boston.com/bigpicture/2009/07/the_longest_solar_eclipse_of_t....
23 Jul 2009 - 12:01 am | Nile
आहाहाहा! सुरेख चित्रं! थॅंक्स!
23 Jul 2009 - 6:37 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
झकास दुवा....! थँक्स !
23 Jul 2009 - 6:15 pm | mahalkshmi
वाहवा वाहवा.मस्तच.सुरेख चित्र आहेत.आभार.