सूचना १) कृपया एकमेकांना खरड पाठवताना, त्या खरडी आडून कुठल्याही सभासदाची टिंगलटवाळी होणार नाही याची काळजी प्रत्येकाने घेतली पाहिजे. एकमेकांशी अगदी सहजच संवाद साधण्याकरता, काही महत्वाचा निरोप देण्याकरता, नैमित्तिक 'हाय, हॅलो' करण्याकरताच केवळ खरडीचा उपयोग व्हावा.
आडूनआडून, कधी नाव घेऊन तर कधी नाव न घेता इतर सभासदांबद्दल गॉसिपिंग करण्याकरता खरडींचा वापर करू नये. अन्यथा संबंधित सभासदाची खरडवहीची आणि व्यक्तिगत निरोपाची सोय बंद करण्यात येईल. प्रसंगी संबंधित सभासदाचे मिपावरील सभासदत्वही रद्द करण्यात येईल.
अलिकडे काही सभासदांच्या खरडींवरून असे गॉसिपिंगचे प्रकार वारंवार पाहण्यात आले, म्हणून ही 'समज'वजा सूचना!
सूचना २) मिपाच्या ध्येयधोरणांविषयी देखील एकमेकांना खरडी पाठवू नयेत कारण त्याचा काहीच उपयोग होणार नाही! मिपासंबंधी कुणाचे काही निवेदन/तक्रार असेल तर त्यांनी थेट आमच्याशी व्यक्तिगत निरोपाद्वारे संपर्क साधावा. इष्ट व व्यवहार्य सूचनांचा नक्कीच विचार केला जाईल.
कृपया सहकार्य करावे,
कळावे,
आपला नम्र,
तात्या अभ्यंकर,
मालक, मुख्य व्यवस्थापकीय अधिकारी,
मिसळपाव डॉट कॉम.
प्रतिक्रिया
15 Jul 2009 - 5:23 pm | नितिन थत्ते
मान्य.
नितिन थत्ते
(पूर्वीचा खराटा)
15 Jul 2009 - 5:29 pm | विनायक प्रभू
असेच बोल्तो.
15 Jul 2009 - 6:01 pm | अवलिया
असेच बोल्तो
15 Jul 2009 - 5:37 pm | नीलकांत
तात्या,
ही अतिशय उत्तम सूचना केलेली आहे. कुणा एकाचं मत नाही पटलं तर त्याच्याशी वैचारीक वाद विवाद करण्यासाठी आणि पटलं तर त्याचं समर्थन करण्यासाठी मिपा आहे. विषय सोडून लिहीण्यासाठी आणि प्रसंगी समोरासमोर वाद करण्यासाठी कधी खरडवहीचा वापर आपण समजू शकतो.
मात्र आपल्या न आवडणार्या विचाराच्या व्यक्तींना मुद्दाम टारगेट करून त्यांविषयी अनावश्यक आणि कधीकधी चुकिच्या सुध्दा चर्चा करण्यास बंधन असावेच.
मी यापुढे अश्या लोकांवर लक्ष ठेवेन.
या लोकांची खरडवहीची सुविधा तात्काळ बंद करण्याची सुविधा तुम्हाला तात्काळ करून देतो.
- ( मिपा तांत्रीक :) ) नीलकांत
15 Jul 2009 - 5:51 pm | विकास
तात्यांनी एकदम योग्य सुचना केली आहे.
>>>"कुणा एकाचं मत नाही पटलं तर त्याच्याशी वैचारीक वाद विवाद करण्यासाठी आणि पटलं तर त्याचं समर्थन करण्यासाठी मिपा आहे."
असेच म्हणतो. :-)
15 Jul 2009 - 7:03 pm | चतुरंग
घाऊक स्वरुपात खरडी उडवण्यासाठी काही तरी सोय दे रे. पानंच्या पानं खरडी एकेक करुन उडवत बसायचं म्हणजे ना माशा मारत बसल्यासारखं वाटतं! ;)
(खुद के साथ बातां : मिपाचं निम्मं विदागार ह्या खरडवह्यांनीच गार झालं असेल का रे रंगा? :? )
(खरडउडवोत्सुक)चतुरंग
15 Jul 2009 - 5:43 pm | शरदिनी
हे खूप छान झाले धन्यवाद.
असे प्रकार लक्षात आले होते माझ्याही...
15 Jul 2009 - 5:49 pm | प्रकाश घाटपांडे
ध्येय धोरणा विषयी मिपाची स्पष्टता आहेच तरी संभ्रम असल्यास व्यनि ऐवजी खरड वापरल्यास इतरांनाही ते समजेल.(अर्थात इतरांना समजु न अये असे असल्यास मात्र व्यनी) बाकी मान्य. खरडवहीतुन असलेला संवाद हा सुसंवाद असावा. पुरक माहिती , व्यक्तिगत स्नेह, शिळोप्याच्या गप्पा यासाठी उत्तम 'जवळीक' साधण्याचे हत्यार.( अर्थात परस्पर सहमती असल्यास )सदस्यात मतभिन्नता असली तरी परस्परांविषयी आदर असावा.किमान अनादर तरी असु नये. आपण मिपा या कुटुंबातील सदस्य आहोत. किमान शब्दात कमाल आदर व्यक्त करण्यासाठी खव उत्तम. आमच्या मते याचा वापर माणसे झोडण्यापेक्षा माणसे जोडण्यासाठी असावा
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
15 Jul 2009 - 7:55 pm | चित्रा
असेच म्हणते.
नक्की याचे कारण कळले नाही, पण काहीतरी तसेच असावे :(
15 Jul 2009 - 8:05 pm | प्रकाश घाटपांडे
देवा सर्वांना सदबुद्धी दे ही इच्छा!;) ;-)
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
15 Jul 2009 - 5:54 pm | यशोधरा
नीलकांत, तात्या हे उत्तम. धन्यवाद.
15 Jul 2009 - 6:21 pm | टारझन
समर्थन आहे :)
15 Jul 2009 - 7:05 pm | चतुरंग
जिथे तुझं लक्ष जावं असं वाटत होतं ते झालेलं पाहून बरं वाटलं! :)
पूर्ण समर्थन!
चतुरंग
15 Jul 2009 - 7:11 pm | बाकरवडी
येथे समर्थन देणारेच नियमांचे उल्लंघन करतात.
:B :B :B बाकरवडी :B :B :B
15 Jul 2009 - 7:21 pm | नितिन थत्ते
हे ही मान्य.
नितिन थत्ते
(पूर्वीचा खराटा)
15 Jul 2009 - 7:35 pm | सहज
नक्की झाले काय, असा निर्णय का घ्यावा लागला?
15 Jul 2009 - 7:39 pm | चतुरंग
(खुद के साथ बातां : रंगा, ह्यांचं नाव 'सहज' असलं तरी प्रश्न मात्र अजिबात सहज नसतात हं! :B )
(साधासरळ)चतुरंग
15 Jul 2009 - 8:11 pm | धनंजय
("या धांदरटाचे कुठे लक्षच नसते" - इति माझी एक मावशी.)
काय झाले त्याबाबत लक्ष नव्हते. पण खरडवही नामक खेळकर-टवाळकीचे साधन कोणी नासवले याबद्दल वाईट वाटते.
15 Jul 2009 - 7:37 pm | सूहास (not verified)
समर्थन आहे...
अवा॑तर : व्य. नी . आहेच की ;)
सुहास
15 Jul 2009 - 8:02 pm | परिकथेतील राजकुमार
चला म्हणजे आता आम्हाल खव अभ्यास मंडळाचा गाशा गुंडाळावा लागणार तर !
आले तात्याजीच्या मना.... ;)
आता दिवसभर काहितरी नविन उद्योग शोधावा लागणार बॉ !
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
'अनीवे' शिवाजी विद्यापिठातुन मिपा आणि मिपाकर 'यांछ्यावर' पी एच डी करण्याच्या विचारात असलेला.
आमचे राज्य
15 Jul 2009 - 9:24 pm | टारझन
हे वाक्य काळजाला भिडले भावा .. हृदयाचं पाणीपाणी करून गेले रे !!
चल आपण "झटपट सुतकी चेहरे करून कसे बसावे ? " ह्यावर प्रशिक्षण वर्ग काढूया भडकमकरांच्या मदतीने !
-- (.........)
आता ओरिजिनल नाव नाही तर एखाद्या संताचं नाव घ्यावं म्हणतोय ..
15 Jul 2009 - 8:22 pm | वेताळ
जो निर्णय घ्याल तो योग्य असेलच.
तशी मिपावर अजुन आणीबाणी अजुन सुरुच आहे तरी हा प्रकार म्हणजे बडंखोर खुपच हुशार आहेत.
वेताळ
15 Jul 2009 - 9:23 pm | Nile
सहज म्हणतातः
धनंजय म्हणतातः
मी ही हेच म्हणतो!
स्वगतः
छ्या! बर्याच जणांच्या की जणींच्या 'म्जय्शी म्य्त्री क्रन्रार' का च्या खरडी आल्या होत्या, आता उत्तर पण देता येणार नाही. :(
'कोण रे तो ख. व. गॉसीपींगसाठी वापरत होता? गधड्याला कळत नाही ख.व. लोकांना दिसते म्हणुन?'
;)
एक बालीश प्रश्नः म्हणजे आता टिंगलटवाळी फक्त धाग्यांवरच करायची ना?
15 Jul 2009 - 11:28 pm | बिपिन कार्यकर्ते
पण यामुळे खरडवहीतल्या टवाळकीला मुकावे लागू नये. कित्येक तणावाचे क्षण, केवळ या खरडवहीतल्या टवाळकीमुळेच हलके झाले आहेत. लिमिट मधे रहा, पण टवाळकी सोडू नये. असेच वाटते.
बिपिन कार्यकर्ते
16 Jul 2009 - 1:00 am | विसोबा खेचर
हो, पण दिलेल्या मोकळीकीचा काही जण गैरफायदा घेताना आढळले म्हणून हे पाऊल उचलावे लागले.
परंतु काही जण एकमेकात सतत एखाद्याची/एखादीची टिंगलटवाळी करताना आढळले, तश्या तक्रारी माझ्याकडे आल्या म्हणून या पुढे कडक कारवाई करायचं ठरवलं आहे. त्यामुळे ही मंडळी मिपा सोडून गेली तरी बेहत्तर! फार फार तर काय मिपा बंद पडेल ना?
फिकीर नाही...!
तात्या.
16 Jul 2009 - 1:25 am | वजीर
तुमचे तणावाचे क्षण टवाळक्या करुन हलके करायला तात्यांनी नाही म्हंटलेले नाही. तुमच्या ह्या टवाळी मधे तिसरा माणूस कशाला लागतो तुम्हाला? काय करायचीय ती टवाळी तोंडावर करा ना. मागाहुन हा चुगल्यांचा सोहळा कशाला?
माफ करा पण तुमच्या खरडवहीतही अनेकदा विनाकारण (प्रत्यक्ष/अप्रत्यक्षपणे) तिर्हाइत लोकांची टवाळी चाललेली मी पाहीली आहे म्हणून बोललो. तुमचे तणावाचे क्षण हलके करण्याचा हा कसला अघोरी उपाय?
वजीर
15 Jul 2009 - 11:29 pm | अभिज्ञ
तात्या,
एकदम योग्य निर्णय.
अभिज्ञ.
--------------------------------------------------------
पॉझिटिव्ह थिंकिंग....? अजिबात जमणार नाहि.
16 Jul 2009 - 12:16 am | ऋषिकेश
मला हा निर्णय असा अचानक का घ्यावा लागला हे कळले नाहि. असो. नियमच आहे म्हटल्यावर मान्यता/पाठिंबा काय देणार.. फारतर पालन होईल अशी ग्वाही देतो. (आधीही होतच होतं म्हणा)
( :( )ऋषिकेश
------------------
बुद्धीसाठी लोह वाढवणारी औषध घ्यायला लागल्यापासून "डोकं गंजलं तर!" ही भिती वाढली आहे
16 Jul 2009 - 12:19 am | शक्तिमान
एकमेकांच्या खरडवही मध्ये कोणी काहीही का लिहीना... बाकीच्यांना त्याचा त्रास व्हायचे काय कारण?
उलट मला असे वाटते की उठसूट कुणाच्याही खरडवह्या चाळणे लोकांनी बंद करावे...
विनाकारण खरडवह्या चाळणा-यांवर कारवाई व्हावी..
सूचना क्रमांक १ ने मुक्त संभाषणाच्या हक्कावर गदा येते.
ह्या सूचना देण्याची पाळी का आली त्याबद्दल मला काही माहिती नाही.. परंतु माझे मत मी येथे मांडले आहे !
16 Jul 2009 - 1:18 am | वजीर
तात्यांच्या धोरणाशी सहमत आहे. खरडवह्या ह्या सार्वजनिक असतात त्या विरंगुळा म्हणुन चाळल्या जातातच. अश्यावेळी काही लोकांच्या खरडवहीत मुद्दाम एखाद्याला घालुन पाडून बोललेले पाहिले आहे. काय ती चेष्टामस्करी तोंडावर करावी. असला पाठीमागुन चहाड्या चुगल्यांचा कार्यक्रम बरा नव्हे.
वजीर
16 Jul 2009 - 1:45 am | टारझन
ज्या लोकांना दुर दुर पर्यंत लाईमलाईट नाही,कधी कोणाच्या बोलण्यात त्यांचं काय त्यांच्या नात्यापणत्यांचं पण नाव नाही, त्यांनाच जास्त तावातावाने बोलताना पाहून आणि पुळका आल्याचं पाहून गंमत वाटली !!
बाकी मिसळपाव वर आमचं निस्सिमप्रेम आहे, आणि मालकांना जर हितासाठी काही बदल सुचवायचे असतील तर त्याला आम्ही पाठिंबा देऊच !!
बाकी ड्यूप्लिकेट आय.डींनी लुडबुड करणे थांबवाने , अन्यथा आमचे उगाच मनोरंजन होते !!
- टारझन
16 Jul 2009 - 2:38 am | शक्तिमान
मतं मांडण्यासाठी लाईमलाईटमध्ये असण्याची आवश्यकता नाही असे वाटते बुवा आपल्याला. काही लोकांना याची गम्मत वाटते याची आम्हाला गम्मत वाटते.
बाकी मिसळपाव वर आमचंही निस्सिमप्रेम आहे, आणि मालकांना जर हितासाठी काही बदल सुचवायचे असतील तर त्याला आम्हीही पाठिंबा देऊच !!
बाकी ख-या आय.डीं.ना डुप्लीकेट समजणे थांबवावे, अन्यथा आमचे उगाच मनोरंजन होते !!
- शक्तिमान
16 Jul 2009 - 2:46 am | प्रियाली
त्या काही लोकांच्या खरडवह्या बंद करून टेश्टींग करून टाकू. त्यानिमित्ताने इतरांनाही कळेल की असे निर्णय घेण्यास भाग पाडणारे महाभाग कोण आहेत ते. ;)
16 Jul 2009 - 3:20 pm | धमाल मुलगा
उत्तम विचार!
त्या निमित्ताने कळेल की नक्की काय केलं तर खव बंद होईल. :)
बाकी,
शक्तिमान म्हणतात तेही अत्यंत मुद्याचं आहे. दिसली खरडवही म्हणुन खुपसलं तोंड असं केलं तर जे प्रकार आपल्याला नाही आवडत ते दिसल्यावर नापसंतीची भावना होणं सहाजिकच आहे. तेच टाळलं तर बराचसा त्रास आपोआप मिटेल :)
(स्वगतः लय बोल्लास बे धम्या...फोकलीच्या आधी ब्लॅकलिश्टमध्ये तुझं नाव नाहीय्ये ना ते कन्फर्म केलंयस का? नायतर उद्या आल्याआल्या बघावं तर खरडवही बंद! मग बस बोंबलत :T )
----------------------------------------------------------------------------------------
एक गदारोळ प्रसवे ती स्वाक्षरी | गदारोळाचे कारण ते एक स्वाक्षरी ||
रे मना ऐसा खेळ ना करी | ज्या योगे वितंड मुळ धरी ||
ऐश्या कारणे रे धमु ना करावी स्वाक्षरी || सच्चिदानंद ! सच्चिदानंद !!
16 Jul 2009 - 3:53 am | शाहरुख
आमी आब्यास कराया सुरुवात केली नाही तेवड्यात परीक्शाच कॅन्सल ??
16 Jul 2009 - 2:52 pm | हर्षद बर्वे
एकदम योग्य सुचना/आदेश ....... १००% सहमत..
एच.बी.
16 Jul 2009 - 4:00 pm | छोटा डॉन
खास लोकाग्रहास्तव,
"उत्तम निर्णय, आमचा पाठिंबा आहे" ...
बाकी वरची चर्चा आवडली, बरेच नवे ज्ञान मिळाले.
काही का असेना, ह्या निमित्ताने आम्ही ज्ञानमार्गी झालो हे काय कमी आहे ???
व्यवस्थापनाचे अभिनंदन ....
------
(सन्यस्त )छोटा डॉन
आम्ही आमच्या आंतरजालीय दुश्मनांना काही वेळा क्षमाही करतो, मात्र त्यांचे नाव आणि आयपी अॅड्रेस कधीही विसरत नाही .. ;)