मला तत्काळ ऑनलाईन मते हवी आहेत

limbutimbu's picture
limbutimbu in जनातलं, मनातलं
15 Jul 2009 - 2:52 pm

मी हिन्दुस्तान मोटर्स लिमिटेड द्वारा आयोजित ग्रेट ड्रायव्हिन्ग चॅलेन्जमधे सहभाग घेतो आहे. निवडलेल्या स्पर्धकाने १० दिवसात ३००० किमी चा प्रवास जोडीने (कपल) करणे असे प्राथमिक स्वरुप आहे. स्पर्धकान्ची आवेदनपत्रे इन्टरनेटवरुन मागवलेली आहेत
स्पर्धेच्या नियमाप्रमाणे, पहिल्या १०० जणात निवड होण्यासाठी मला तुमच्या मतान्ची आवश्यकता आहे! १७ जुलै मतदानाची शेवटची तारीख आहे
तुम्ही फक्त इतकेच करायचे
कृपया खालिल लिन्कवर जाऊन, माझ्याकरता १७ जुलैचे आत, जरुर वोट करावे व टेस्टिमोनिअल ही लिहावे ही अत्याग्रहाची विनन्ती तसेच वोट कन्फर्मेशनसाठी मेल आल्यावर तीवर देखिल क्लिक करावे म्हणजेच वोट निश्चित होईल.
http://www.greatdrivingchallenge.com/application/1247283900781251/

तेथे मी माझ्या फ्लिकर अकाऊण्ट मार्फत आमच्या प्रवासासम्बन्धी काही फोटो टाकले आहेत, (स्लाईड शो) ते देखिल जरुर बघावेत अशी विनन्ती
वोटिन्गसाठी शेवटची तारीख १७ जुलै आहे, तेव्हा घाई करा!

ज्यान्नी आधीच वोट केल आहे, त्यास मनःपुर्वक धन्यवाद

सरपन्च, मला मतान्ची आवश्यकता आहे, व मिपाकर भरभरुन प्रतिसाद देतिल अशी खात्री आहे, मात्र, हा धागा इथे सुरू करणे योग्य वा अयोग्य यावरील तुमचा निर्णय अन्तिम असेल! :)
आपणही मतदान करावे ही विनन्ती

प्रवासक्रीडाशुभेच्छाशिफारसमदत

प्रतिक्रिया

जागु's picture

15 Jul 2009 - 3:07 pm | जागु

लिंबुजी तुम्हाला मदत केली आहे.

अभिज्ञ's picture

15 Jul 2009 - 3:11 pm | अभिज्ञ

स्पर्धेनिमित्त आपल्याला शुभेच्छा.

अभिज्ञ.

--------------------------------------------------------
पॉझिटिव्ह थिंकिंग....? अजिबात जमणार नाहि.

नितिन थत्ते's picture

15 Jul 2009 - 3:15 pm | नितिन थत्ते

आम्बेसेडरने ३००० किमी प्रवास करणार का? :)

नितिन थत्ते

limbutimbu's picture

15 Jul 2009 - 3:23 pm | limbutimbu

माहित नाही हो गाड्या कोणत्या असतील, पण गाड्या त्यान्च्याकडून पुरवल्या जाणार!
टॉप १०० मधुन ९ निवडणार, त्यातुन ३, ते ३ गाडी चालविणार
अर्थात वाहतुकीचे सर्व नियम पाळत दिवसात दिलेल्या वेळेत ३०० ते ३५० किमी प्रवास करायचा, वाटेत फोटो-शुटिन्ग वगैरे करायचे व वेळेत सुखरुप पोचायचे, काढलेले फोटो-शुटिन्ग व वृत्तान्त नेटवर ज्या त्या दिवशी अपलोड करायचे! असे काहीसे स्वरुप आहे!
मुम्बैहून निघुन मुम्बैस परत यायचे आहे!
ही रेस नव्हे की रॅली देखिल नाही, एक रिअल इव्हेण्ट असणार आहे ज्यात प्रत्येक अ‍ॅक्टिव्हीटीवर बारकाईने नजर ठेवली जाईल, गाड्ञान्ना जीपीएस बसवलेले असणार व इतरही बरेच नियम आहेत

आपला, लिम्बुटिम्बु (मायबोलीवरुन विनाभार ट्रान्स्फर)

सहज's picture

15 Jul 2009 - 3:38 pm | सहज

अहो जयंतकाका दिले बर का मत.
Total Votes received by Jayant Gopinath Nitsure is 86

काका (वय ४६) नाव लिंबुटिंबू लै भारी!!!!

अनेक शुभेच्छा!!

limbutimbu's picture

15 Jul 2009 - 5:28 pm | limbutimbu

सहज, मनःपुर्वक धन्यवाद
अन काय करणार बाबा? कुणीस म्हणूनच गेलय ना, "लहानपण देगा देवा" तर मी म्हणल देवाला कशाला त्रास द्यायचा?
स्वतःच स्वतःला लिम्बुटिम्बू समजुन घेतल की झाल काम! हाय काय अन नाय काय त्यात! :D बरोबर ना?

विशाल कुलकर्णी's picture

15 Jul 2009 - 3:54 pm | विशाल कुलकर्णी

लिंबुदा आमचं पण मत दिलं आहे. बाकी तुम्हाला इथे पाहिल्यावर माहेरच्या माणसाला भेटल्याचा आनंद झाला. ;-)

सस्नेह
विशाल
*************************************************************
मज पिसे लागलेले सुखांचे
गे हलकेच धुके ओसरते आहे...

limbutimbu's picture

15 Jul 2009 - 5:31 pm | limbutimbu

विशाल, मिळाले मत, मनःपुर्वक धन्यवाद
>>>>> तुम्हाला इथे पाहिल्यावर माहेरच्या माणसाला भेटल्याचा आनंद झाला. :D :))
ओह ओह ओह, तुम्ही म्हणजे लईच भारी बोवा! :/-

limbutimbu's picture

15 Jul 2009 - 5:31 pm | limbutimbu

विशाल, मिळाले मत, मनःपुर्वक धन्यवाद
>>>>> तुम्हाला इथे पाहिल्यावर माहेरच्या माणसाला भेटल्याचा आनंद झाला. :D :))
ओह ओह ओह, तुम्ही म्हणजे लईच भारी बोवा! :/-

सुनील's picture

15 Jul 2009 - 3:59 pm | सुनील

मत दिले. शुभेच्छा!

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

limbutimbu's picture

15 Jul 2009 - 5:42 pm | limbutimbu

सुनिल, मनःपुर्वक धन्यवाद :)
तिथे टेस्टिमोनिअल मधे मिसळपाव चा उल्लेख करुन काही खरडल की नाही?

प्रमोद देव's picture

15 Jul 2009 - 4:35 pm | प्रमोद देव

मात्र अजून त्यांच्याकडून मेल आलेली नाहीये.
वाट पाहतोय.

हाती नाही येणे,हाती नाही जाणे,हसत जगावे,हसत मरावे, हे तर माझे गाणे!

योगी९००'s picture

15 Jul 2009 - 4:38 pm | योगी९००

लिंबुदादा आमचं पण मत दिलं आहे.

खादाडमाऊ
(योगेश)

ज्ञानोबाचे पैजार's picture

15 Jul 2009 - 4:40 pm | ज्ञानोबाचे पैजार

मत दिले आहे, स्पर्धे साठी मनापासुन शुभेच्छा, निकाल जरुर कळवा
_______________________
बोला पुंड्लीक वरदे हारी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम,
बोला पंढरीनाथ महाराजकी जय

सखाराम_गटणे™'s picture

15 Jul 2009 - 4:40 pm | सखाराम_गटणे™

डन

----
आता आम्ही सभ्य आणि सज्जन व्हायचे ठरवले आहे तसेच अशा अर्थाच्या खरडी सुद्धा करु नये, उत्तर मिळणार नाही. त्याबद्दल आधीच क्षमस्व.
-नाना साभार

विकास's picture

15 Jul 2009 - 4:54 pm | विकास

आत्ताच मतदान केले.

स्पर्धेसाठी शुभेच्छा!

तिथे लिंबूटिंबू आहात म्हणून सांगू नका नाहीतर (हे काही खरे स्पर्धक नाहीत, हे तर लिंबूटींबू असे म्हणत) जिंकल्यावरपण बक्षिस जायचे :-)

धमाल मुलगा's picture

15 Jul 2009 - 5:00 pm | धमाल मुलगा

मत नोंदवलं आहे शेठ!
स्पर्धेसाठी हार्दिक शुभेच्छा! :)

अवांतरः जिंकल्यावर शेलिब्रेशन कुनीकडं करायचं? :)

----------------------------------------------------------------------------------------
एक गदारोळ प्रसवे ती स्वाक्षरी | गदारोळाचे कारण ते एक स्वाक्षरी ||
रे मना ऐसा खेळ ना करी | ज्या योगे वितंड मुळ धरी ||
ऐश्या कारणे रे धमु ना करावी स्वाक्षरी || सच्चिदानंद ! सच्चिदानंद !!

नितिन थत्ते's picture

15 Jul 2009 - 5:16 pm | नितिन थत्ते

मत दिले आणि कन्फर्मपण झाले.

नितिन थत्ते
(पूर्वीचा खराटा)

limbutimbu's picture

15 Jul 2009 - 5:47 pm | limbutimbu

खादाडभाऊ, ज्ञानोबान्चे पैजार, सखाराम गटणे, विकास, धमाल मुलगा, नितिन थत्ते, आपणा सर्वान्चे मनःपुर्वक आभार :)

वेताळ's picture

15 Jul 2009 - 7:21 pm | वेताळ

स्पर्धेसाठी शुभेच्छा.
वेताळ

अनेक शुभेच्छा! :)

(रेसर)चतुरंग

llपुण्याचे पेशवेll's picture

15 Jul 2009 - 8:48 pm | llपुण्याचे पेशवेll

मत दिले आहे.
-(युआन श्वांग)
पुण्याचे पेशवे
एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते.
Since 1984

स्वाती२'s picture

15 Jul 2009 - 9:31 pm | स्वाती२

लिंबूदा मत दिलेय. स्पर्धेसाठी शुभेच्छा.

दिपाली पाटिल's picture

16 Jul 2009 - 12:20 am | दिपाली पाटिल

मत दिले आहे. स्पर्धेसाठी शुभेच्छा.
दिपाली :)

ऋषिकेश's picture

16 Jul 2009 - 12:36 am | ऋषिकेश

माझ्या २ एमेल आयडीज वरून दोन मते दिली आहेत ;)
तुम्हाला डब्बल शुभेच्छा!

ऋषिकेश
------------------
बुद्धीसाठी लोह वाढवणारी औषध घ्यायला लागल्यापासून "डोकं गंजलं तर!" ही भिती वाढली आहे

Nile's picture

16 Jul 2009 - 12:51 am | Nile

@ लिंबुटिंबू, मत दिले आहे, शुभेच्छा! :)

@इतरः एकाच एमेल आय.डी वरुन तुम्ही रोज एक मत नोंदवु शकता. :)

हा हा हा! @ सहजराव आणि विकासराव. ;)

limbutimbu's picture

16 Jul 2009 - 3:13 pm | limbutimbu

>>>>> @इतरः एकाच एमेल आय.डी वरुन तुम्ही रोज एक मत नोंदवु शकता.
होय, एका दिवशी कोणाही एकासच मतदान करता येते
तसेच, एका मेल आयडीवरुन एखाद्या कोणास देखिल , एकदाच मतदान करता येते! :)

प्राजु's picture

16 Jul 2009 - 1:16 am | प्राजु

व्होटेड!! शुभेच्छा! :)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

limbutimbu's picture

16 Jul 2009 - 8:48 am | limbutimbu

वेताळ, चतुरन्ग, पुण्याचे पेशवे, स्वाती२, दिपाली पाटील, ऋषिकेश, निळे (की निले? ) प्राजू, कर्क, आपणा सर्वान्चे मनःपुर्वक आभार :)

मिपाकरान्कडून (जे ऑनलाईन आहेत) अपेक्षेपेक्षा कितीतरी जास्त प्रमाणात व अतिशय सकारात्मक प्रतिसाद मिळतोय.
वोट दिलय पण इथे लिहिले नाहीये अशान्चे देखिल मनःपुर्वक आभार :)

उद्याचा शेवटचा दिवस आहे, आपली आपल्या मित्र/मैत्रिणिन्ची जास्तीत जास्त मते मिळावित ही अपेक्षा
पुनःश्च, सर्व मिपाकरान्ना हार्दिक धन्यवाद :)

सहज's picture

16 Jul 2009 - 8:50 am | सहज

तुमचे नाव limbutimbu हे देवनागरीतुन लिंबुटिंबु केलेत तर मी अजुन एका वेगळ्या इमेलने मत देईन.

सदस्य नाम कसे बदलावे?

विकास's picture

16 Jul 2009 - 9:13 am | विकास

मी अजुन एका वेगळ्या इमेलने मत देईन.

सकाळी मी जेंव्हा पहील्यांदा केले तेंव्हा मेसेज आला की तुम्हाला खात्री करून घेण्यासाठी इमेल येईल म्हणून. पण ती अजून पर्यंत आली नाही. मग मी माझ्या औपचारीक नावाने आणि दुसर्‍या इमेल आयडीचा वापर करून इमेल केली तर तात्काळ त्यांची इमेल आली आणि मग मी उत्तरही दिले.

मला वाटते की कदाचीत एखादे नाव परत परत आले असेल तर काहीतरी गडबड केली जात असावी..

आशिष सुर्वे's picture

16 Jul 2009 - 9:44 am | आशिष सुर्वे

लिंबुटिंबू-भाऊ
आमचे मत तुम्हालाच बर्र का!

सुसाट चालवा!!

-
कोकणी फणस

विदेश's picture

16 Jul 2009 - 2:17 pm | विदेश

मतदान केले. पुढील प्रवास सुखद होवो , ही शुभेच्छा !

टुकुल's picture

17 Jul 2009 - 3:54 am | टुकुल

तुमची मत १६९ दाखवत होती..
पुढील प्रवासा साठी शुभेच्छा..

-- टुकुल.

limbutimbu's picture

17 Jul 2009 - 8:59 am | limbutimbu

विकास, मराठा, विदेश, टुकुल आणि इथे लिहिले नाहीये, पण व्होट दिले आहे अशा सर्वान्चे मनःपुर्वक धन्यवाद
आपल्या तसेच मायबोली व ऑर्कुटवरील सभासदान्नी मते दिली त्याबद्दल सर्वान्च्रेच आभार.
या मतान्मुळे एकुणात ४०० पेक्षा पुढे नम्बर असलेल्या मला २७० च्या आत आणुन बसविले आहे.
आता मी प्रोफाईलवर शेवटचा हात फिरवतो आहे, बरेचसे फोटो अपलोड केले आहेत, ते जरुर बघावे
माझ्या उशिरा लक्षात आले की, तेथिल "टेस्टिमोनियल" हेच एक आपल्यातल्या "सन्वादाचे" साधन बनवता आले असते, म्हणजे जे आपण इथे व अन्य बीबी वर लिहीतो, त्यास मी जे उत्तर देतो , ते सगळे त्या टेस्टिमोनियल विन्डोलाच डिस्कशन फोरम करुन करता आले असते! अर्थात आता खुपच उशिर झाला आहे, अन हे मला फारच उशिरा सुचलेले शहाणपण आहे!
असो.
आज शेवटचा दिवस. अजुनही ज्यान्चे मतदान झाले नसेल, त्यान्नी
शेवटच्या क्षणापर्यन्त स्वतः मतदान करा, मित्रमैत्रिणी यान्चेकडून करवुन घ्या ही नम्र विनन्ती!

हा धागा इथे राहू दिल्याबद्दल सरपन्च तात्यान्चे देखिल आभार

मोहन's picture

17 Jul 2009 - 10:08 am | मोहन

लिंबूजी

मत दिले. ई- मेल कन्फरमेशन पाठवले. टेस्टीमोनीयल पाठवले. १७१ म ते दिसत होती.

स्पर्धेकरता शुभेच्छा.

मोहन

limbutimbu's picture

18 Jul 2009 - 10:59 am | limbutimbu

मतदान सम्पताना मी १९८ मते घेऊन साधारणपणे २६० ते २७० दरम्यानच्या क्रमान्कावर होतो
अजुन दोन दिवसान्नी (सोमवार सकाळपर्यन्त) कळेल की टॉप १०० मधे निवड झाली आहे की नाही!
ते काहीही असले तरी, वरील १९८ मतान्मध्ये व्यक्ती म्हणून माझ्या प्रत्यक्ष नातेवाईक्/मित्रान्ची केवळ २५ च्या आसपास मते मी गोळा करू शकलो आहे, बाकी सर्व मते, इन्टरनेटवरील जालातील "लिम्बुटिम्बु" या आयडीला ओळखणार्‍यान्नी दिलेली मते आहेत! मग ते मायबोलीकर आहेत वा मिसळपावकर वा ऑर्कुटवरील कोब्राकट्ट्याचे सभासद
झालेले हे सर्व मतदान विस्मयकारक आहे व खरे सान्गायचे तर मी येवढ्या सन्ख्येची अपेक्षाच करत नव्हतो. पन्नाससाठवर मजल जाईल, अगदीच काही विशेष घडले तरच तिन आकडी १०० गाठता येईल असे वाटत असतानाच, वरील तिन्ही ठिकाणच्या सभासदान्नी आपुलकीने, व कोणाताही विपु वा मेल द्वारे वैयक्तिक निरोप मिळालेला नसताना केवळ येथिल प्रकटन वाचून स्वतःहून त्या त्या फोरमवरील "लिम्बुटिम्बु" या सभासदावरील प्रेमापोटी म्हणा वा जवळिकीपोटी म्हणा, मतदान केले, त्यास तोड नाही.
सर्व मिसळपावकर मतदारान्चे मी आभार मानतो.

जमल्यास, येथे काही फोटोन्च्या लिन्कसही येत्या काही दिवसात देईन

limbutimbu's picture

21 Jul 2009 - 10:22 am | limbutimbu

फेसबुक सारख्या ४ पब्लिक ब्लॉगवर माझे खाते नसल्यामुळे माझा अर्ज ८०% च भरला गेला होता, (बहुधा) या कारणाने माझी पहिल्या १०० मधे निवड होऊ शकली नाही
तरीदेखिल, आपण सर्वान्नी दाखविलेला विश्वास, व आपल्याशी या निमित्ताने झालेला सन्वाद ही मोठीच कमाई आहे!
भविष्यातही आपल्या सम्पर्कात असू शकेन अशी प्रार्थना करतो.
मिपाकरान्चे मनःपुर्वक आभार :)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

21 Jul 2009 - 10:32 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

:(