तिच्या कोरड्या डोळ्यात
आता नुरला विश्वास
शांत घरातली भासे
खिन्न ओसरी उदास
झाले कवाड पोरके
नाही अंगणाची साथ
चुडा भरल्या हातात
बूजगावण्याचा हात
अश्वत्थाच्या झाडावर
किती पक्ष्यांची घरटी
पारावर हिंडणारी
बघ साळुंकी एकटी
खोली भरून दाटला
खुळा अंधाराचा जीव
बाहेरचा कव डसा
शोधी जमिनीचा ठाव
वारा झपाटून आला
होई क्षणात बेभान
स ळ स ळू न उठते
पिंपळाचे पान पान
प्रतिक्रिया
24 Jun 2009 - 3:30 pm | यशोधरा
सुरेख!
24 Jun 2009 - 4:20 pm | श्रावण मोडक
प्रत्येक कडवे सु रे ख!!!
24 Jun 2009 - 5:28 pm | विसोबा खेचर
दत्ता,
सुरेख कविता रे! फारा आवडली..
तुझा,
(फ्यॅन) तात्या.
24 Jun 2009 - 6:35 pm | मनीषा
खोली भरून दाटला
खुळा अंधाराचा जीव
बाहेरचा कव डसा
शोधी जमिनीचा ठाव ... सुंदर !
24 Jun 2009 - 7:28 pm | क्रान्ति
वारा झपाटून आला
होई क्षणात बेभान
स ळ स ळू न उठते
पिंपळाचे पान पान
खास!
क्रान्ति
ध्यानम् मूलम् गुरुमूर्ति, पूजामूलम् गुरु पदम्
मंत्र मूलम् गुरुवाक्यम्, मोक्षमूलम् गुरुकृपा
अग्निसखा
24 Jun 2009 - 7:58 pm | प्राजु
सुरेख!! अतिशय सुंदर!!!
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
24 Jun 2009 - 11:25 pm | धनंजय
कविता आवडली.
25 Jun 2009 - 3:58 am | बेसनलाडू
(सहमत)बेसनलाडू
26 Jun 2009 - 12:45 am | राघव
सुंदर लिहिलंत.
पण अश्वत्थ(पिंपळ) हा उदास वृत्ती दर्शवत नाही असं मला वाटतं.. :)
कसं कुठेही उठतं
रोप पिंपळाचं थोर..
उभा जन्म एकलाच
कुठे मिळतो आधार?
आज पिंपळ बोलतो
नको जगणे उदास
माझं अश्वत्थाचं रूप
पुन्हा देईल विश्वास
राघव
( आधीचे नाव - मुमुक्षु )
27 Jun 2009 - 8:38 am | चन्द्रशेखर गोखले
मनाला हुरहुर लावणारं काव्य !
27 Jun 2009 - 9:14 pm | रामदास
कविता.आवडली.
27 Jun 2009 - 10:36 pm | लिखाळ
अश्वत्थाच्या झाडावर
किती पक्ष्यांची घरटी
पारावर हिंडणारी
बघ साळुंकी एकटी
वा .. फार छान कविता !
-- लिखाळ.
या प्रतिसादासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत !!! - लिखाळ जोशी :)
28 Jun 2009 - 12:45 am | चतुरंग
आवडली!
(अश्वत्थ)चतुरंग