ताजा कलम. खालील लेख लिहून एक दिवस व्हायच्या आतच विमान अपघातांच्या कहाण्या ऊर्फ एअर क्रॅशेस, या लेखांचं पुस्तक "गोईंग डाऊन" हेही किंडलवर आलं आहे. अनेक वाचक गेली काही वर्षे या लेखांचं काय झालं असं विचारत होते. आता ते पुन्हा सर्वांना वाचायला किंडलवर प्रकाशित झाले आहेत.
लिंक

.........
तुम्ही सर्वजण वेळोवेळी मी लिहीलेल्या कथा वाचत आला आहात. गोष्टी सांगणे ऊर्फ स्टोरी टेलिंग हा माझा आवडता छंद आणि त्याहूनही जास्त काहीतरी. मनुष्य कोणत्याही प्रकारचा का असेना, म्हणजे उत्साहाने नाचणारे कारंजे जणू.. इथपासून ते भलताच विक्षिप्त किंवा गप्प.. विहिरीतला काळोख जणू.. असा कोणीही असो. त्याला गोष्ट ऐकायला नक्कीच आवडते.
तर माझ्या काही कथा, "छोटीसी बात" या किंडल बुकात एकत्र आल्या आहेत. त्यातल्या काही येथील अनेकांनी स्वतंत्रपणे वाचल्याही असतील. पण अनेकांसाठी त्यातल्या काही नवीन असतील.
यापुढेही छापील पुस्तकाऐवजी हा नव्या युगाचा पुस्तक अवतार धारण करून माझ्या गोष्टी तुमच्याकडे येत राहतील. त्या वाचा. वाचताना तुम्हाला तुम्ही वाचत आहात याचा नक्की विसर पडेल आणि त्या ऐकू यायला लागतील.

लिंक:
जागतिक लिंक: "अमेझॉन डॉट कॉम"वाली.. डॉलर मागत्यात..!!
भारतीय लिंक: अमेझॉन डॉट इन.. भारतीय रुपयांत आणि स्वस्त.. !!
ललित साहित्य, कथा वगैरे विकत घेऊन वाचणारे वाचक आजच्या काळात मिळणे म्हणजे अतिशय महान घटना. तसं कोणी केल्यास खूपच मोठी गोष्ट असेल माझ्यासाठी. म्हणजे सॉलिड कौतुकाची पावतीच..
पण पूर्ण खरेदी नको असेल त्यांना किंडल अनलिमिटेड ऑप्शनमधेही हे पुस्तक उपलब्ध आहे. म्हणजे ती सबस्क्रिप्शन ज्यांनी घेतले असेल त्यांना काहीही रक्कम न मोजताही हे पुस्तक किंडलवर वाचता येईल.
सर्व वाचकांचा मी ऋणी आहेच. आता काही वाचक मला अल्पशा धनाचा धनी देखील करतील ही शक्यता नाकारता येत नाही.
या किंडल बुकची माहिती मिपाकरांना व्हावी म्हणून हा छोटासा लेख. या पुस्तकांशी मिसळपाव वेबसाईट किंवा व्यवस्थापन यांचा काही संबंध नाही. अनेक कथा वाचकांनी विनामूल्य इथे वाचलेल्या असल्याने अर्थार्जन हा मूळ हेतूही नाही. तरीही एक डिस्क्लेमर लिहिणं माझं कर्तव्य आहे की या सर्वामध्ये मिसळपाव वेबसाईट किंवा व्यवस्थापन जबाबदार नाही.
या पुस्तकाची छापील आवृत्ती नसल्याने तिचे बुकिंग किंवा विक्री असा कोणताही ऑप्शन किंवा उद्देश नाही.
केवळ किंडल वापरकर्त्या मिपाकरांना आपलं पुस्तक आल्याचं कळावं म्हणून ही रिक्षा फिरवली झालं..
प्रतिक्रिया
3 Dec 2025 - 1:08 pm | कॉमी
छानच. घेणार.
3 Dec 2025 - 2:55 pm | गवि
धन्यवाद..
3 Dec 2025 - 2:52 pm | सोत्रि
किंडल अनलिमिटेडवर लगेच डाउनलोड करून टाकले. संध्याकाळी हापिसच काम संपल की वाचून संपवणार आज!!
- (गवीपंखा) सोकाजी
3 Dec 2025 - 2:54 pm | गवि
आभारी आहे हो सोकाजीनाना..
3 Dec 2025 - 3:31 pm | राजेंद्र मेहेंदळे
अभिनंदन!!
लगेच डाउनलोडवले आणि पहीली कथा वाचली पण!!
कॅची वाटली एकदम. आता निवांत वाचतो.
3 Dec 2025 - 3:38 pm | कंजूस
गगन विहारी सर, माझ्या नावाला स्मरून पुस्तकाचं सांपल वाचलं.
गोष्ट एकदम फ्लाइट फास्ट आहे. नायकाचं सुंदरींवर बारिक लक्ष आहे. असू द्या.
तरुणांना आवडतील कथा.
3 Dec 2025 - 3:53 pm | टर्मीनेटर
मला UPI आणि credit card दोन्ही वरून पेमेंट करताना समस्या येत आहे त्यामूळे डाउनलोड करता येत नाहीये... ;(
काय कारण असावे? मी सेव्ह कार्ड ऑप्शन सिलेक्ट करत नाही हे कारण असावे काय?
3 Dec 2025 - 4:16 pm | गवि
UPI मध्ये तर सरळच प्रक्रिया आहे. त्यात सेव्ह काही करावे लागत नाहीच. किंडल किंवा अमेझॉन मोबाईल ॲपमध्ये मात्र थेट कोणतेही किंडल संबंधित पेमेंट केले किंवा घेतले जात नाही. काहीतरी पॉलिसी आहे.
वेब ब्राउझरवर किंडल किंवा अमेझॉन वेबसाईट ओपन करूनच ते करावं लागतं.
3 Dec 2025 - 4:24 pm | टर्मीनेटर
येस सर... मी तुम्ही दिलेल्या amazon च्या लिंक वरूनच प्रयत्न करत होतो... फक्त ज्या फोन वरून UPI पेमेंट करण्याचा प्रयत्न केला त्यात माझे UPI अकाउंट नाही पण मला ज्यावर ते आहे त्यावर पेमेंट रिक्वेस्ट आली नाही... म्हणून क्रेडिट कार्ड वरून पेमेंट करण्याचा प्रयत्न केला पण ते ही प्रोसेस होत नाहिये...
आता थोड्या वेळानी घरी पोचल्यावर वेब ब्राउझर वरून प्रयत्न करतो...
3 Dec 2025 - 4:32 pm | गवि
लोड घेऊ नका. :-)) होईल यथावकाश. प्रयत्न केलात यातच पावती मिळाली. धन्यवाद..
3 Dec 2025 - 5:08 pm | टर्मीनेटर
"प्रयत्ने वाळूचे कण रगडीता" काय काय गळे... वगैरे म्हणतात ना... त्यावर विश्वास आहे 😀
त्यामुळे प्रयत्न करत रहाणे हे माझे इतिकर्तव्यच आहे हो...
3 Dec 2025 - 5:12 pm | गवि
अश्लील अश्लील..
3 Dec 2025 - 5:24 pm | टर्मीनेटर
माझ्यासारख्या अत्यंत सोज्वळ माणसाचा अतिशय "सात्विक' प्रतिसादही अश्लील वगैरे वाटत असेल तर पुढे काय बोलायचे?
भलाई का जमानाच नहीं रहा सेठ 😀
3 Dec 2025 - 7:44 pm | टर्मीनेटर
वेब ब्राउझर वर पेमेंट झालं हो गवि शेठ...
आता वाचतो.... (वाचतो कसला मजा घेतो... तुमचे लेखन वाचणे हा कायमच मजेदार अनुभव असतो 😍)
3 Dec 2025 - 4:36 pm | कुमार१
अभिनंदन!!
3 Dec 2025 - 5:30 pm | हणमंतअण्णा शंकर...
गविंचे पुस्तक खरेदी करतो.
या वीकेंडला वाचून अभिप्राय देखिल कळवतो.
- एक गविफॅन
(गवि मिसळपाववर नसतील तर माझीही पावले इथे वळणार नाहीत. एवढे गवि आणि मिसळपाव यांचे माझ्या मनात साटेलोटे आहे. कोणत्याही प्रतिसादावरुन गवि एक मायाळू, केअरिंग, समंजस आणि ऐकुन घेणारे पण नेमकं, महत्वाचे, क्वचित तीक्ष्ण, शक्यतो आबदार पुढच्याला न दुखावता, बोलणारे, तरिही ऐसपैस आणि रिलॅक्स्ड व्यक्ती वाटतात. अशी माणसे क्रियेटिव्ह असतील तर मला अशा माणसांचा स्नेह खूप भावतो हवाहवासा वाटतो. त्यांचा जर कुणी पॅट्रोनस प्राणी असेल तर तो हत्ती असे वाटते. (त्याच्या शांत समंजस पवित्र वृत्तीमुळे) )
आणि गवि चा लाँग फॉर्म गगन विहारी आहे हे मला पहिल्यांदा कळले.
गविजी, वाचेन, सांगेन.
खूप धन्यवाद.
3 Dec 2025 - 6:33 pm | धर्मराजमुटके
चुक. डॉगेश भाई त्यांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे.
3 Dec 2025 - 8:19 pm | हणमंतअण्णा शंकर...
पॅट्रोनस हे वृत्ती आणि प्रकृतिवर ठरत असतो त्यांना चॉइस नाही तो आपोआप निवडला जातो. मला तरी ते डॉगेश भाऊ नाही वाटत.
3 Dec 2025 - 8:36 pm | कंजूस
गवि म्हणजे कुणी गजानन विरकर नावाचा मिपाकर असावा असं बारा वर्षांपूर्वी वाटलेलं.
3 Dec 2025 - 6:11 pm | कर्नलतपस्वी
गवी भौ हार्दिक अभिनंदन .
3 Dec 2025 - 6:34 pm | गवि
ताजा कलम. खालील लेख लिहून एक दिवस व्हायच्या आतच विमान अपघातांच्या कहाण्या ऊर्फ एअर क्रॅशेस, या लेखांचं पुस्तक "गोईंग डाऊन" हेही किंडलवर आलं आहे. अनेक वाचक गेली काही वर्षे या लेखांचं काय झालं असं विचारत होते. आता ते पुन्हा सर्वांना वाचायला किंडलवर प्रकाशित झाले आहेत.
लिंक
https://amzn.in/d/fmxMFvV
3 Dec 2025 - 8:17 pm | हणमंतअण्णा शंकर...
गविजी हे पुस्तक छापायला कुणीही तयार झाले असते. तुम्ही प्रयत्न केले का तसे?
(अजून एक म्हणजे चॅटजीपीटी आणि इतर मंडळी यांचा चित्रांचा सेन्स पूर्ण गंडला आहे, वरील मुखपृष्ट अजून आकर्षक करता आले असते. तुम्ही इथे एक स्पर्धा घ्यायला हवी होती, अभ्याभाऊ, मी, चित्रगुप्त इत्यादींनी हात/ प्रॉम्प्ट आजमावून पाहिला असता)
3 Dec 2025 - 9:06 pm | गवि
धन्यवाद अण्णा..
खरं आहे. आता यापुढील भाग येईलच. तेव्हा इथून आयडियाज घेईन. डन..
3 Dec 2025 - 6:59 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अभिनंदन आणि शुभेच्छा..!
-दिलीप बिरुटे
4 Dec 2025 - 4:37 am | गामा पैलवान
गवि,
तुमची लेखणी सिद्धहस्त आहे याचा अनुभव इथे घेतलाय. आता परत एकता पुस्तक वाचून घेईन.
आ.न.,
-गा.पै.
4 Dec 2025 - 5:36 am | गवि
@ राजेंद्र मेहेंदळे
@ कंकाका
@ डॉ कुमारेक काका
@ धर्मराजमुटके
@ कर्नल तपस्वी
@ प्रा डॉ सर
@ आन गा पै
प्रत्येकाला खूप खूप धन्यवाद.. स्वतंत्र प्रतिसाद देऊन धागा पुन्हा पुन्हा वर आणणे होऊ नये म्हणून एकत्रच.. _/\_
4 Dec 2025 - 11:34 am | सुबोध खरे
दोन्ही पुस्तकं किंडल वर डाऊन लोड केली आहेत ( अनलिमिटेड सब्स्क्रिप्शन असल्याने फुकट वाचता येतं)
सवडीने वाचेन.
5 Dec 2025 - 9:36 pm | अकिलिज
एका सिद्धहस्त लेखकाने आपले पुस्तक प्रकाशित करावे ही खरंतर आमच्यासारख्या वाचनकर्त्यासाठी मोठी गोष्ट आहे.
पण त्यांचा नम्रपणा पहा. छोटीसी बात म्हणून सोडून दिली. गवि गवि, किती शिकण्यासारखे आहे तुमच्याकडून.
हणमंतअण्णा शंकरांच्या मताशी बाडीस.
5 Dec 2025 - 10:01 pm | स्वधर्म
तुंम्ही लिहिताच इतकं सुंदर की .... नक्की वाचतो. अभिनंदन.
5 Dec 2025 - 11:41 pm | गवि
डॉ खरे, अकिलिज आणि स्वधर्म.. तुम्हाला खूप खूप धन्यवाद..
5 Dec 2025 - 10:45 pm | श्रीरंग_जोशी
दोन्ही पुस्तकांच्या प्रकाशनाबद्दल मनःपूर्वक अभिनंदन, गवि.
अॅमेझॉनवरुन दोन्ही विकत घेतली आहेत.
पुनर्वाचनाचा आनंद घेतो.
5 Dec 2025 - 11:40 pm | गवि
धन्स श्रीरंग..
6 Dec 2025 - 5:15 am | श्रीरंग_जोशी
प्रथम मला वाटले की माझा अॅमेझॉनचा नो-रश रिवॉर्डमुळे मला शुन्य डॉलरला मिळाले आहे. परंतु नो रश रिवॉर्डचे मूल्य पूर्वीइतकेच आहे.
दोन्ही पुस्तकं विनामुल्य उपलब्ध करून दिल्याबद्दल धन्यवाद!!
5 Dec 2025 - 11:39 pm | गवि
आज आणि उद्या हे पुस्तक पूर्ण मोफत, शून्य किंमतीत घेता येईल असे केले आहे. पुस्तक आवडलं तर इतरांना शिफारस करणे, परीक्षण करणे, रेटिंग देणे वगैरे मार्गांनी पुस्तकाच्या प्रसारात मदत करावी अशी मिपाकरांना विनंती.
6 Dec 2025 - 5:24 am | कंजूस
दोन्ही पुस्तकं किंडलवर घेतली, ॲपच्या लायब्रीत आली. वाचून प्रतिसाद लिहितो तिकडे.
विमान, बोट किंवा रेल्वेमध्ये कामानिमित्त संबंध आलेले मराठी लोक बरेच असतील परंतू ते आवर्जून मराठीमध्ये तांत्रिक माहिती लिहीत नाहीत. तुम्ही इकडे मिसळपाव साईटवर लिहीत होतात ते मिसळपावचे वाचक वाचत होते. परंतू आता तुम्ही ही पुस्तके किंडलवर आणल्याने जगात सर्व ठिकाणी पोहोचतील. आभार.
6 Dec 2025 - 3:02 pm | कंजूस
छोटीसी बात वाचले. पहिल्या दोन कथा मानसिक आघात आणि विरहावर आहेत. एरपोर्टचे वातावरण बरोबर पकडले आहे. पण विरह धक्का आहे. दुसऱ्या कथेत दारूच्या नशेत विरहदु:ख विसरू पाहणारा तरूण आहे. तिसरी 'आज' ही कथा चॅटिंग करण्याच्या व्यसनात अडकलेल्या मुलांची आहे. आभासी जग खरे वाटणारी पिढी आहे. चौथी कथा ही कौटुंबिक प्रेम आणि सुखदुःखाची आहे. पाचवी कथा 'तुलपा' ही एक गूढ गोष्टीत रमलेल्या नायकाची आहे. शेवटची बी.पी.ओ. ही याच प्रकारच्या सॉफ्टवेअर सर्विस देणाऱ्या उद्योगातील वातावरण, त्रास मांडते. त्यातील कर्मचाऱ्यांचे स्वभाव , आवडनिवड आणि अपेक्षा उलगडत जातात.
एअरपोर्ट असो वा बी.पी.ओ. गविंनी निरीक्षणांचा कथांमध्ये चांगला उपयोग करून घेतला आहे. शिवाय कथा चटपटीत ठेवून कोणताही संदेश न देता करमणूक केली आहे.
7 Dec 2025 - 11:42 am | गवि
कंकाका, "गोईंग डाऊन" या पुस्तकाला तुम्ही अमेझॉन पेजवर दिलेला सुंदर अभिप्राय वाचून मनापासून आनंद झाला. विमान अपघातांच्या मीमांसेत सर्व क्षेत्रातल्या वाचकांनी रस दाखवावा, समजून घ्यावं, आणि तांत्रिक गोष्टी सोप्या भाषेत पोचाव्या यासाठीच हे पुस्तक लिहीलं.. खूप आभारी आहे !
7 Dec 2025 - 11:29 am | गवि
धन्यवाद वाचकहो !
अमेझॉन डॉट इन, संपूर्ण किंडल कलेक्शनमध्ये:
गोईंग डाऊन – Travel Writing मध्ये #2 रँक
गोईंग डाऊन – Hot New Releases मध्ये #1 स्थान
छोटीसी बात – Fiction (Suburban Literature) मध्ये #7 रँक
विक्री किंवा मानधन यांच्यावर ही रँक अवलंबून नाही. वाचकांच्या प्रतिसादावर आहे.
त्यामुळे वाचकांचे ऋण पुन्हा एकदा मानतो.
8 Dec 2025 - 12:37 pm | राजेंद्र मेहेंदळे
पूर्ण वाचले आणि अर्थातच आवडले. लगे रहो!!
काही कथा (पॅन अॅम/के एल एम ची) एअर क्रॅश इन्वेस्टिगेशनमध्ये मालिकेत बघितल्या होत्या ते आठवले. मधेच "सली" या नितांतसुंदर चित्रपटाची आठवणही झाली.
अवांतर-टॉम हॅन्क्स तसाही फॉरेस्ट गंप मुळे आवडतोच. त्यावर एकदा लिहायचे आहे. बघुया.