जर्द पिवळी विजार

वामन देशमुख's picture
वामन देशमुख in जे न देखे रवी...
20 Apr 2025 - 2:45 pm

जर्द पिवळी विजार, तीतून
द्वार ठोठावत आलेले
आतड्यांतुनी साठलेले
पोटी आवळून धरलेले

संधी मिळाली नाही तेंव्हा
आडोशाला बसण्याची
जे त्याज्य ते त्याग करूनी
मोकलाया दाही दिश्यांची

आधी असं झालं नाही
कधी पिवळं झालं नाही
त्या कातर वेळी मात्र
रोखून धरणं झालं नाही

मग जनाची ना मनाची
कसली लाज कुणाची
निसर्ग-हाकेला ओ देऊन
क्लांत शांत होण्याची

- (साधी सुती विजार घालणारा) द्येस्मुक् राव्

विडम्बनवृत्तबद्धवृत्तबद्ध कविताहे ठिकाणवावरकविताविडंबनभाषा

प्रतिक्रिया

वामन देशमुख's picture

20 Apr 2025 - 2:52 pm | वामन देशमुख

सदर विडंबनाची मूळ प्रेरणा "जर्द पिवळी दुपार" इथे आहे.

अथांग आकाश's picture

21 Apr 2025 - 9:30 am | अथांग आकाश

हा हा! जमलय विडंबन!!

चित्रगुप्त's picture

23 Apr 2025 - 10:51 pm | चित्रगुप्त

जब्बरदस्त... (हास्यजत्राफेम कातिल प्रभाकर मोरे ष्टाईलने म्हटलेले)

कर्नलतपस्वी's picture

26 Apr 2025 - 12:14 pm | कर्नलतपस्वी

विडंबन आवडले .