जागतिक तापमानवाढ - सर्वेक्षण

मिसळपाव's picture
मिसळपाव in जनातलं, मनातलं
16 Mar 2024 - 6:41 am

(हा लेख मी ऐसीवरच्या दिप्ती हिंगमिरे आणि संहिता जोशी यांच्या वतीने, त्यांच्या विनंतीनुसार ईथे देत आहे कारण काही तांत्रिक समस्येमुळे त्याना ईथे वितरीत करता आला नाहीये)
----------------------------------------------------------------------
नमस्कार!

आम्ही, दिप्ती हिंगमिरे आणि संहिता जोशी मिळून हे सर्वेक्षण करत आहोत. दिप्ती वायुमंडलीय विज्ञान (atmospheric science) या विषयात संशोधन करते. संहिताची पार्श्वभूमी खगोलशास्त्राची आहे; ती आता विदावैज्ञानिक (data scientist) म्हणून काम करते. जागरुक नागरिक म्हणून आम्हांला जागतिक हवामानबदलाच्या सद्यस्थितीबद्दल चिंता वाटते. जागतिक तापमानवाढीच्या भारतावर होणाऱ्या संभाव्य परिणामांची आम्हांला विशेष काळजी वाटते.

एक देश म्हणून भारताची या हवामानविषयक बाबींमध्ये महत्त्वाची भूमिका आहे. एकीकडे आपण जागतिक तापमानवाढीमुळे होणाऱ्या हवामानबदलाच्या गंभीर परिणामांना तोंड देतोय आणि त्याचवेळी दुसरीकडे आपण लोकसंख्येमुळे प्रदूषण करणाऱ्या सर्वांत मोठ्या देशांपैकी एक आहोत. जागतिक तापमानवाढीबद्दल भारतीय लोकांमध्ये किती माहिती आहे आणि या समस्येला सामोरे जाण्याच्या विविध मार्गांबद्दल आपण काय विचार करतो याबद्दल आम्हांला उत्सुकता आहे. म्हणून हे सर्वेक्षण. तसेच आम्हाला किंवा भारतातील हवामान बदल क्षेत्रात काम करणाऱ्या कोणत्याही लोकांना प्रभावी धोरण ठरवण्यात याचा उपयोग होईल. सर्वेक्षणाचे निकाल (बहुदा) इथेच जाहीर केले जातील.

हे सर्वेक्षण पूर्ण भरण्यासाठी अंदाजे ५-१० मिनिटे लागतील. हे पूर्णपणे निनावी सर्वेक्षण आहे. ह्या सर्वेक्षणातल्या माहितीचा कुठल्याही प्रकारे व्यावसायिक वापर होणार नाही. तुम्हाला पुढील तपशीलवार सर्वेक्षणात भाग घ्यायचा असेल किंवा आमच्याशी संपर्क साधायचा असेल तर तुम्ही तुमचा ईमेल शेवटच्या पर्यायी प्रश्नात देऊ शकता.

या दुव्याचा वापर करून तुम्ही सर्वेक्षणात भाग घेवू शकता. आपल्या ओळखीच्या भारतीयांना याचा दुवा पाठवा अशी विनंती. जितक्या वेगवेगळ्या विचारांच्या, पार्श्वभूमीच्या, वयाच्या लोकांकडून उत्तरं मिळतील तेवढं उत्तम. ३१ मार्चपर्यंत सर्वेक्षणात भाग घेता येईल.

धन्यवाद.
दिप्ती आणि संहिता
-------------------------------------------------------------
टिपः माझा आयडी 'मिसळपाव' असला, मिपाच्या बाल्यावस्थेत तत्कालीन चालकांच्या संमतीने घेतलेला, तरी मी एक सामान्य सभासद आहे. या आयडीचा आणि या संस्थळाच्या चालकांचा / संपादकांचा काहीही संबंध नाही.

समाजजीवनमानप्रश्नोत्तरे

प्रतिक्रिया

अहिरावण's picture

16 Mar 2024 - 7:53 am | अहिरावण

छान ! छान !! छान !!!

नाही म्हणजे कसे आहे की भारताबद्दल कणव असणा-या पण भारताबाहेर राहणा-या लोकांचे मनापासून कौतुक करण्याची पद्धत आहे ती आम्ही पार पाडली.

तुम्हाला जागरुक नागरीक म्हणून चिंता वाटते की चिंता वाटते असे दाखवले की जागरुक नागरीक म्हणून मिरवता येते हे तुमचे तुम्हाला नक्की माहित असणारच. कुणी तरी म्हटले आहेच तोरा मन दर्पन कहलाए !! वगैरे

त्यातही भारताबद्दल फार काळजी वाटते सांगितले की अजूनच भारी. मग आपल्या आईबापांना, सासुसास-यांना, नव-याला वा बायकोला, पोरांना वा पोरींना प्रसंगी फाट्यावर मारुन त्यांची काळजी न करता करिअरच्या नावाखाली देश सोडून गेल्याची अपराधगंड भावना थोडी कमी व्हायला मदत होते. निदान चारचौघांत तोंड दाखवायला जागा उरते. अर्थात ज्याची त्याची जाण समज इत्यादी

बाकी ते सर्वेक्षण का काय ते करा ! त्याचा भारताला वा भारतीयांना काहीही उपयोग होणार नाही. साधे सरळ आहे. तपमान वाढते म्हणून मी फ्रीज वापरु नये, माझ्या गरीब बहिणीनी चुल पेटवू नये म्हणून तुम्ही सांगणार आणि तुमच्या सर्वे साठी २४ तास चालू असलेले गुगलचे वा तत्सम सर्वर वापरणार, सर्वेचे निकाल आलयाबर त्यवर भाषण ठोक्ण्यासाठी पाक्च सातशे मैल कार चालवत, वीज जाळत माईकवर ठणाणा करणार. त्या भाषणातुन मिळालेले पैसे गुंतवणूक म्हणून बीटकॉईनमधे टाकणार. आणि दणादण बीटकॉईनच्या माईनिंगवर तपमान वाढ करणारे सर्वर जाळणार. लोका सांगे ब्रह्मज्ञान... दुसरे काय.

हांं.. तुमचे प्रमोशन, पगारवाढ, सजगता म्हणून चार पुरस्कार उदहरनार्थ वगैरे मिळतील.. त्याची कवतिक फेबु, इन्स्टा, ऐसी ...जमलंच तर मिपा इथे टाकाच. तोंड भरुन कवतुक करु हो आम्ही त्यांच. नाव काढलं हो...परदेशात जाऊन. इथे काळं कुत्रं विचारत नव्हतं !!!

बाकी तापमान वाढ ही समस्या पाश्चिमात्यांनी देण आहे. आणि भारतातील लोकसंख्येमुळे प्रदूषण जितके होते त्यापेक्षा अधिक प्रदुषण पाश्चिमात्यांनी कमी लोकसंख्येत करुन दाखवले आहे, दाखवत आहेत आणि दाखवतील यात शंका नाही.

बाकी तुम्हाला शुभेच्छा !!

टीप : वरती तुम्ही असला उल्लेख असला तरी तो लेखक/लेखिका यांना वैयक्तिक उद्देशून नाही. इतकी समज लेखकांची असावी. नसेल तर देव (असलेला/नसलेला) त्यांचे कल्याण करो !!

अनेकानेक क्षेत्रात माजलेल्या अनागोंदीचा, ढोंगीपणाचा नेमका आलेख मांडला आहे.
---रच्याकने, भारतीय, ग्रीक, इजिप्शियन, चिनी, मेक्सिकन वगैरे संस्कृतींच्या प्राचीन ग्रंथातून हवामान बदल वगैरेंचे उल्लेख सापडतात का? - - उदाहरणार्थ, भीष्म पितामह अभिमन्यूला म्हणतात - "आमच्या लहानपणी एवढा उन्हाळा नसायचा बुवा" ... वगैरे??

वामन देशमुख's picture

16 Mar 2024 - 3:19 pm | वामन देशमुख

@अहिरावण

भारतातील भारतीय / भारताबाहेरील भारतीय हा संदर्भ वगळता प्रतिसादाच्या इतर आशयाशी सहमत

अहिरावण's picture

17 Mar 2024 - 12:04 pm | अहिरावण

सदरहू सर्वेक्षकांच्या वैयक्तिक आणि जालीय इतिहासाचा तसेच त्यांच्या सर्व मित्रमंडळींचा पूर्ण अभ्यास असल्याने ते विधान केले होते.

वामन देशमुख's picture

18 Mar 2024 - 8:06 am | वामन देशमुख

>>> सदरहू सर्वेक्षकांच्या वैयक्तिक आणि जालीय...

>>> (खालील प्रतिसादांमध्ये काही संदर्भ)...

अगदी अगदी.

१. दुसऱ्या एका धाग्यावर भारतवासी भारतीय / भारत अनिवासी भारतीय असा वाद काही समाजकंटक घालत होते तो संदर्भ मनात होता.

२. असल्या विक्षिप्त लोकांची काम करण्याची संहिता कशी असते ते सर्वज्ञात आहेच.

खूप छान काम करत आहात.सर्वेक्षण अहवाल भरला आहे.याबाबत आणखी माहिती घ्यायला आवडेल.
ग्लोबल वार्मिंग ही समस्या खुप भयानक आहे.पृथ्वीचे सरसकट २ डिग्रीने तापमान वाढता कामा नये ते खाली यावे यासाठी सर्व जगाचे एकत्रित खूप प्रयत्न सुरू आहेत.

चित्रगुप्त's picture

16 Mar 2024 - 2:05 pm | चित्रगुप्त

जागतिक तापमानवाढीमुळे भारतावर होणारे हवामान बदलाचे परिणाम तुम्हाला जाणून घ्यायचे आहेत का?

फॉर्म मध्ये वरील प्रश्न आहे.

याचे विस्तृत उत्तर आधी इथे द्यावे त्यावरुन या सर्वेक्षणात भाग घ्यायचा का हे ठरवता येईल.

दिप्ती हिंगमिरे आणि संहिता जोशी, यांना मिपाचे सदस्यत्व घेऊन स्वतःच इथे लेख टाकून सर्वेक्षण करता येईल की. काही तांत्रिक समस्या असल्यास मिपामालक हैतच सोडवायला.
नुस्ता फॉर्म भरून पाठवण्यापेक्षा मिपावर होऊन जाऊ द्या की चर्चा आणि काथ्याकूट. फॉर्ममधल्या प्रश्नांपेक्षाही भारी माहिती देणारे, प्रश्न उपस्थित करणारे इथे भेटतील. त्यातून सर्वेक्षणाला मदतच होईल.
---- की त्यांना हे नकोच आहे, म्हणून कुबड्या घेऊन सर्वेक्षण करायचे आहे ? नेमकी तांत्रिक समस्या आहे तरी काय ?
अगदी वय, लिंग, शिक्षण, काम-धंदा, रहाती/कामाची जागा, सामाजिक्/आर्थिक वर्ग, ईमेल आयडी वगैरे माहिती भरून फॉर्ममधील फुसक्या प्रश्नांची उत्तरे द्यायची, त्यापेक्षा इथेच काथ्याकूट करा ना.

"माझे खाते तिकडे register होत नाहीय."

- दिप्तीची समस्या.
मी जरी त्यांच्यातर्फे वितरीत केला ईथे तरी ईथल्या प्रश्णोत्तरांचं काही करता येणार नाही ही कमतरता लक्षात आली होती. पण निदान कोणी माहीती तरी भरू शकेल म्हणून लिहिला ईथे.

वामन देशमुख's picture

16 Mar 2024 - 3:32 pm | वामन देशमुख

जागतिक तापमानवाढ हा मुद्दा खरंच काळजीचा आहे का?
असेल तर अग्रक्रमाने कुणी पावले उचलायला हवीत?
आजवरच्या तापमानवाढीची जबाबदारी कुणाची?
त्यान्वर काय कारवाई करणार?

---

calling @साहना, @अरुण जोशी

---

जागतिक तापमान वाढीची चिंता, पर्यावरणावरील संकट, औद्योगिक प्रकल्पांचे सामाजिक दुष्परिणाम, विभिन्न समाजघटकांचे आंदोलने अशा बाबींना माध्यमांतून लावून धरणारी मंडळी, त्यांची कार्यप्रणाली व त्यांचे हेतू हे नेहमीच संशयास्पद राहिले आहेत. अनेक वेळी त्यांची विघातक हेतूने केलेली दुष्कृत्ये उघडकीसही आली आहेत.

या उपरोल्लेखित बाबींशी संबंधित केले जाणारे तथाकथीत निष्पक्ष सर्वे, त्यातून गोळा केला जाणारा विदा व त्या विद्याचे केले जाणारे manipulation या बाबी आता लपून राहिल्या नाहीत.

---

तस्मात, अशी सर्व्हेत सहभागी होण्याची आवाहने होत राहतात, आपण चिल मारावे!

---

ते जाऊ द्या, सध्या उकाडा फार वाढलाय; थंडगार बिअर आणि हलीम मारुयात, कोण कोण येतंय?

beers

haleem

अहिरावण's picture

17 Mar 2024 - 12:07 pm | अहिरावण

जागतिक तापमान वाढीची चिंता, पर्यावरणावरील संकट, औद्योगिक प्रकल्पांचे सामाजिक दुष्परिणाम, विभिन्न समाजघटकांचे आंदोलने अशा बाबींना माध्यमांतून लावून धरणारी मंडळी, त्यांची कार्यप्रणाली व त्यांचे हेतू हे नेहमीच संशयास्पद राहिले आहेत. अनेक वेळी त्यांची विघातक हेतूने केलेली दुष्कृत्ये उघडकीसही आली आहेत.

या उपरोल्लेखित बाबींशी संबंधित केले जाणारे तथाकथीत निष्पक्ष सर्वे, त्यातून गोळा केला जाणारा विदा व त्या विद्याचे केले जाणारे manipulation या बाबी आता लपून राहिल्या नाहीत.

नेमके.

एक धरणवाली बै आणि तिचे "भलते" उद्योग आठवले. हीच मोडस ओपरंडी.

वामन देशमुख's picture

16 Mar 2024 - 3:35 pm | वामन देशमुख

हा सर्वे फॉर्म म्हणजे loaded questions कसे असावेत याचा एक उत्तम नमुना आहे!

कर्नलतपस्वी's picture

16 Mar 2024 - 6:01 pm | कर्नलतपस्वी

मला अहिरावण यांचा प्रतिसाद व सांप्रत लेख
वाचल्यावर गोंधळ उडाला म्हणून पुढे जाऊन प्रश्नावली वाचून उत्तर द्यावे असे वाटले.

प्रश्न क्रमांक १- वय आणी तापमान याचा काही संबंध आहे का?मार्तंड पन्नास डिग्री आग ओकत असेल तर वयोमानानुसार काही फरक पडतो का?

प्रश्न क्रमांक २- शिक्षण आणी तापमान याचा परस्परांशी काय संबंध? अशिक्षित माणसांना मार्तंड जास्त जाळतो का किवां मॅट्रिक, पदवीधर किवां विद्यावाचस्पती असल्यास काही कन्सेशन मिळते का?

प्रश्न क्रमांक ३- महिलादिनी बायकांना काही विशेष सुट मिळते का? व्हॅलेंटाइन दिनी प्रेम करणाऱ्यांवर मार्तंड काही ......लिंगभेदा नुसार तापमानात वाढ घट होते का?

तसेच अन्य प्रश्न सर्वेक्षण करण्यात फारसे मदत करणार नसून ते फक्त वाचकांचे सामान्य ज्ञान किती आहे हे कळण्यास मदत करतील.

सर्वच प्रश्नांमधे एक ओमनीबस प्रश्न आहे तो कशासाठी हे पण समजले नाही. जसे,माला काही माहीत नाही, माला काही ठाऊक नाही,माला काही सांगायचे नाही इत्यादी.

सर्वेक्षकांनी सर्वेक्षणाची पार्श्वभूमी व आपली माहीती गोपनीय ठेवल्याचे प्रतीत झाले.

तसेही ग्लोबल वाॅर्मींग आणी उर्वरित आयुष्य याचे व्यस्त प्रमाण असल्याने माला व्यक्तीगत काहीच फरक पडेल असे वाटत नाही.

आपली प्रश्नावली पुन्हा एकदा तपासून बघा असेच म्हणेन.....

अंतत: अहिरावण, चित्रगुप्त यांचे प्रतिसाद बरोबरच आहेत असेच म्हणेन.

हा सर्व्हे माझा नाहीये, परंतु दोन मुद्दे कुठल्याही सर्व्हेशी संबंधित आहेत म्हणून ही थोडी माहीती.

- वय / शिक्षण / लिंग याचा सर्वेक्षणाच्या मुद्द्याशी (जसा की ईथे जागतिक तपमानवाढ) थेट सबंध असेलच असं नाही. पण याबाबत "स्त्रियांमधे पुरूषांपेक्षा जास्त सजगता आहे का?", किंवा "कमी शिक्षित लोकांमधे एखाद्या गोष्टिचा जास्त प्रादुर्भाव असेल वाटलं होतं. पण सर्वेक्षणाने दाखवलं की प्रत्यक्षात हे उलटं आहे" अशी काही माहीती मिळवण्याच्या दृष्टीने या गोष्टी विचारलेल्या असतात.

- बर्‍याचदा प्रश्णाला एकच पर्याय प्रतिसादकर्त्याने निवडणं अपेक्षित असतं. सर्वेक्षण करणारा सगळ्या शक्यतांचा विचार करून पर्याय देतो. पण त्यात कमतरता असू शकतात. असं झालं की प्रतिसादकर्त्याला एकतर त्यातल्या त्यात बरा पर्याय निवडावा लागतो (म्हणजे त्रुटी आली. आणि "त्यातल्या त्यात बरा" पर्याय पण उपलब्ध नसला म्हणून कुठलातरी निवडला तर नुसतीच त्रुटी नव्हे, साफ चूकीचीच मोजणी झाली) किंवा प्रश्णाला उत्तर देणं टाळायला लागतं (म्हणजे "ईथे उत्तर हवंच आहे" अशा स्वरूपाचा प्रश्ण असला तर प्रतिसादकर्ता सर्वेक्षण पुरंच न करण्याची शक्यता आली). तसं होऊ नये म्हणून "मला माहित नाही", "मला उत्तर द्यायचं नाहीये" असे पर्याय दिलेले असतात. प्रतिसादांचं जेव्हा संख्याशास्त्राच्या पद्धती वापरून विश्लेषण केलं जातं, तेव्हा त्यात अशा प्रतिसादांचा - अंतिम निर्णयावर विपरित परिणाम न होऊ देता - कसा वापर करावा याच्या पद्धती उपलब्ध असतात.

-------------------------------------------------------------
टिपः माझा आयडी 'मिसळपाव' असला, मिपाच्या बाल्यावस्थेत तत्कालीन चालकांच्या संमतीने घेतलेला, तरी मी एक सामान्य सभासद आहे. या आयडीचा आणि या संस्थळाच्या चालकांचा / संपादकांचा काहीही संबंध नाही.

कर्नलतपस्वी's picture

16 Mar 2024 - 8:47 pm | कर्नलतपस्वी

म्हणजे प्रश्नच संपला. इथे फक्त विदा गोळा करण्यासाठी लेख डकवला आहे. शंका विचारून काही उपयोग नाही कारण शंका समाधान होणार नाही.

ईतकं वाचूनही हे सरकारी दस्ताऐवज अजिबात नजरेखालून गेलेले नाहीयेत. हे म्हणजे "हिंदुस्थानाचा सगळा भूगोल पाठ करकरूनसुद्धा, तळेगाव दाभाड्याला न जाता तळेगाव ढमढेर्‍याला कसं जायचं हे आम्हाला माहीत नाही" सारखं झालं!!

काहिही हं श्री...

हे दस्तावेज सामान्य माणूस का वाचेल,वाचले तरी राजकारणी,बिल्डर लाॅबी बरोबर पंगा घेऊ शकतो का? संबंधित लोकच वाचणार. दिलेला तर्क तर्कसंगत नाही.

बाकी, स्त्री पुरुषांपेक्षा जास्त सजग,शिक्षीत पेक्षा अशिक्षित जास्त सजग याने काय फरक पडतो.

त्यापेक्षा,पर्यावरण संवर्धन करण्यासाठी वैयक्तिक पातळीवर काय करता विचारले असते तर जास्त सुसंगत वाटले असते.

जाऊ द्यात, नका उत्तर देण्याच्या भानगडीत पडू.कारण सर्वेक्षण तुमचे नाहीच मुळी.

"परंतु दोन मुद्दे कुठल्याही सर्व्हेशी संबंधित आहेत म्हणून ही थोडी माहीती."

असो - एव्हढंच पुरे!

-------------------------------------------------------------
टिपः माझा आयडी 'मिसळपाव' असला, मिपाच्या बाल्यावस्थेत तत्कालीन चालकांच्या संमतीने घेतलेला, तरी मी एक सामान्य सभासद आहे. या आयडीचा आणि या संस्थळाच्या चालकांचा / संपादकांचा काहीही संबंध नाही.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

16 Mar 2024 - 6:40 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

जागतिक तापमानवाढीबद्दल भारतीय लोकांमध्ये किती माहिती आहे आणि समस्यांच्या निमित्ताने आपण केलेल्या आवहनानुसार प्रश्नावली भरुन दिली. पण, दुर्दैवाने प्रश्नांचे स्वरुप अजिबात विषयाशी संबंधित वाटले नाही. इंग्रजी प्रश्नांचे मराठी भाषेतून अनुवाद करण्याच्या गडबडीत म्हणा की अन्य काही म्हणा आपल्याला प्रश्नावली नीट करता आलीच नाही. एखाद्या प्रश्नाने उत्तराचा शोध घेवून काही नवी माहिती मिळवून एक विदा तयार करता येईल असे प्रश्नाचे स्वरुप वाटले नाही.

असो, जशी असेल तशी प्रश्नावली भरुन दिली आहे.

-दिलीप बिरुटे

अहिरावण's picture

18 Mar 2024 - 10:15 am | अहिरावण

>>>असो, जशी असेल तशी प्रश्नावली भरुन दिली आहे.

याला म्हणतात आज्ञाधारक विद्यार्थी.

प्रश्नावली बद्दल अनेक मुद्दे जाणवले. वर इतरांनी उल्लेख केला आहेच. पण त्यातही अनेक प्रश्न असे आहेत की अमुक रिपोर्ट, तमुक रिपोर्ट, सरकारी दस्तऐवज, कोणतातरी क्ष अहवाल.. हे सर्व तुम्ही वाचले आहेत का?

जे बहुतांश सामान्य नागरिकांनी वाचले असण्याची काडीमात्र शक्यता नाही असेच दिसते आहे. त्यामुळे बहुसंख्य लोकांना या विषयाबद्दल अनास्था आहे किंवा हे सर्व रिपोर्ट्स बनवून देखील लोकांपर्यंत पोचण्याच्या दृष्टीने कुचकामी ठरत आहेत हे सिद्ध करणे हे साध्य होईल. निकाल पाहणे रोचक असेल.

कदाचित "...हे जाणून घेणं हे साध्य होईल..." जास्त योग्य ठरेल का? सर्वेक्षण मी केलेलं नाही. तू म्हणतोस त्याप्रमाणे लेखिकेला हे माहीती आहे आणि ते सिद्ध करण्याचा उद्देश असेल.

मला काय जाणवलं, तर या विषयाबद्दल ईतकं वाचूनही हे सरकारी दस्ताऐवज अजिबात नजरेखालून गेलेले नाहीयेत. हे म्हणजे "हिंदुस्थानाचा सगळा भूगोल पाठ करकरूनसुद्धा, तळेगाव दाभाड्याला न जाता तळेगाव ढमढेर्‍याला कसं जायचं हे आम्हाला माहीत नाही" सारखं झालं!!

-------------------------------------------------------------
टिपः माझा आयडी 'मिसळपाव' असला, मिपाच्या बाल्यावस्थेत तत्कालीन चालकांच्या संमतीने घेतलेला, तरी मी एक सामान्य सभासद आहे. या आयडीचा आणि या संस्थळाच्या चालकांचा / संपादकांचा काहीही संबंध नाही.

सर्वच प्रश्नांमधे एक ओमनीबस प्रश्न आहे तो कशासाठी हे पण समजले नाही. जसे,माला काही माहीत नाही, माला काही ठाऊक नाही,माला काही सांगायचे नाही इत्यादी.
सर्वेक्षकांनी सर्वेक्षणाची पार्श्वभूमी व आपली माहीती गोपनीय ठेवल्याचे प्रतीत झाले.

एकंदरित त्या फॉर्मातील प्रश्न बघता या सर्वेक्षणाचे उद्दिष्ट भारतियांची या विषयीची अनास्थाच अधोरेखित करणे हा आहे की काय असे वाटले. म्हणजे मग भारताच्या लोकसंख्येवर, संस्कृतीवर, सरकारवर खापर फोडता येणे सोपे. 'कर्ता - करविता'च जाणे खरे काय ते.

कृपया माझा कर्नलतपस्वीना दिलेला प्रतिसाद पहा

https://misalpav.com/comment/1177057#comment-1177057

अहिरावण's picture

17 Mar 2024 - 12:10 pm | अहिरावण

>>> म्हणजे मग भारताच्या लोकसंख्येवर, संस्कृतीवर, सरकारवर खापर फोडता येणे सोपे. 'कर्ता - करविता'च जाणे खरे काय ते.

थोडक्यात काय ... टुमी हिंडू लोकं *ते आहात. हेच सिद्ध करायचे आहेत.

धर्मराजमुटके's picture

16 Mar 2024 - 9:39 pm | धर्मराजमुटके

सर्वेक्षणात भाग घेऊन विचारलेल्या प्रश्नांची प्रामाणिकपणे उत्तरे देण्याचा प्रयत्न केला आहे. बहुतांश सामान्यांप्रमाणे मला ही जागतिक तापमानवाढ संज्ञा माहित आहे मात्र त्याबद्द्ल अगदी कळकळीची चिंता वाटत नाही हे सत्य आहे त्याचे कारण 'अ़ज्ञानात सुख असते' असेही असू शकतो किंवा त्याबद्द्ल काय करता येईल याची सुस्पष्ट कल्पना नाहिये. वस्तूंचा पुर्नवापर (रिसायकलींग) केल्याने तापमानवाढीची समस्या कमी होईल अशा विचारातून काही वस्तूंचा वापर करतो मात्र तो उपाय कितपत प्रभावी आहे याची कल्यना नाही.

बाकी मिपाकरांच्या प्रतिसादांविषयी थोडेसे :
मिपावर फार पुर्वी राजकिय चर्चा नावाचा शाब्दिक हाणामारीचा प्रकार असायचा. होळीला बोंबा मारायला किंवा रंगपंचमीला त्वेषाने समोरच्याचे तोंड रंगवायला जेवढी मज्जा येते तश्शीच किंबहुना त्यापेक्षा काकणभर मजा तिथे चर्चा करताना यायची.
तो विषय म्हणजे कुकरची शिट्टीच म्हणा ना एक प्रकारची.
मात्र शिट्टीमार्गे जास्तची वाफ बाहेर पडू लागल्यामुळे मुळ पदार्थ शिजेनासा झाल्यावर मिपा मालकांनी कुकरची शिट्टीच बंद करुन टाकली. त्याचाच परिणाम म्हणून असे विषय आले की मिपाकर भसाभसा मनातील वाफ सोडून देतात.

विषय मांडणार्‍या मिसळपाववर पाहुण्या म्हणून आल्यात, त्यांना निदान सयंत नकार दिले असते तर मिपाप्रतिमावर्धनास हातभार लागला असता असे उगीचच वाटून गेले.
असो.
आपणास आपल्या भावी कार्यास शुभेच्छा !
सवेक्षणाचे निकाल इथे नक्की येऊ द्या हि विनंती.

अहिरावण's picture

17 Mar 2024 - 12:12 pm | अहिरावण

किंचित माहिती.
>>विषय मांडणार्‍या मिसळपाववर पाहुण्या म्हणून आल्यात,

सदर विषय मांडणा-यांपैकी एक येथीलच होत्या हे जुने जाणते मिपाकर ओळखून असतील. त्या पाहुण्या नाहीत.

पुर्वी मिपावर अश्या लोकांसाठी उच्चभ्रु, विचारजंती असे शब्द प्रचलीत होते.

अहिरावण's picture

18 Mar 2024 - 7:06 pm | अहिरावण

हल्ली आम्ही त्यांना नवफुरोगामीवाममार्गीवमनप्रवीणबद्धकोष्टीहिंदूद्वेष्टेश्मश्रूप्रेमीवराहवंशीश्वानवृत्तीविचारवंत असे म्हणतो.

नठ्यारा's picture

17 Mar 2024 - 12:08 am | नठ्यारा

जगदोष्मन म्हणजे ग्लोबल वॉर्मिंग नैसर्गिक प्रक्रिया आहे. हिचा मानवी हस्ताक्षेपाशी कवडीमात्र संबंध नाही. ७५ मिनिटं वेळ असेल तर कृपया हे इंग्रजी चलचित्र पहा : https://www.youtube.com/watch?v=oYhCQv5tNsQ

अन्यथा ते पाहून मी काढलेले अल्पसे मुद्दे खाली पहा :

१. जगदोष्मन सैराट जागतिक तापमान वाढीसाठी मानवी जीवनास जबाबदार धरतात. त्यांतही कर्बवायूस ( CO2 ) हाच केवळ जबाबदार आहे असा यांचा दावा आहे. कर्बवायू हा हरितवायू असल्याने त्याच्यामुळे सूर्याचा उष्मा हवेत अडकून राहतो असा यांचा दावा आहे. यांत समस्या अशी की कर्बवायूसोबत पाण्याचे बाष्प हेही एक अतिशय प्रभावशाली हरितगृह वायू आहे. ९५ % उष्मा बाष्पामुळे धरून ठेवला जातो आणि फक्त ५ % उष्मा कर्बवायू धरून ठेवतो. बाष्प हवेत मिसळू नये म्हणून सैराट समुद्रावर झाकण बसवणार का?

२. हवेतल्या कर्बवायूचा माणूस हा निश्चितपणे एक स्रोत आहे. मात्र तो अत्यंत मामुली स्रोत आहे. खरा स्रोत समुद्र व ज्वालामुखी हे आहेत. सैराट समुद्रावर झाकण घालणार आहेत. त्याचप्रमाणे ज्वालामुखीही थंड करून सोडावेत इतकीच त्यांना विनंती.

सध्या इतकेच मुद्दे पुरेत. अमेरिकी राजकारणी अल गोर ला पैसे छापता यावेत म्हणून हा तमाशा चालू आहेत. त्यावर अधिक वेळ घालवायची माझी इच्छा नाही.

-नाठाळ नठ्या

अहिरावण's picture

17 Mar 2024 - 12:17 pm | अहिरावण

आणि शाळा सोडून भलते आंदोलन करुन भ्रम पसरवणारी डाव्यांना प्रिय असणारी मुलगी विसरलात?

डाव्यांना प्रिय असलेल्या या मंदबुद्धी मुलीबद्दल बोलताय काय?
0

अहिरावण's picture

18 Mar 2024 - 7:06 pm | अहिरावण

येस्सार...

चित्रगुप्त's picture

17 Mar 2024 - 3:48 am | चित्रगुप्त

आत्तापावेतोच्या प्रतिसादांवरून आणखी काही नाही, तरी सगळे मिपाकर लई मंजे लईच चॅप्टर बोxचे आहेत, हे सर्वेक्षणकर्त्या विदुषिंच्या ध्यानात आले असेल ... अर्थात त्या मिपावर येऊन वाचण्याचे श्रम घेत असतील तर.
एकाद्या गलबतावरून संशोधकांचा लहानसा चमू समुद्रपर्यटन करत असावा, आणि सुंदर वनराजीने नटलेले एकादे रमणीय द्वीप बघून त्यांनी नांगर टाकून त्या द्वीपात प्रविष्ट व्हावे, तोच तिथल्या नतद्रष्ट, सैराट आदिवासींनी त्यांच्यावर दगडांचा अखंड वर्षाव सुरू करावा, तद्वत हे झाले.

अहिरावण's picture

17 Mar 2024 - 12:16 pm | अहिरावण

संशोधकांची की बंदूकधारी चाच्यांचा चमु याबद्दल चर्चा होऊ शकते.

वामन देशमुख's picture

18 Mar 2024 - 12:55 pm | वामन देशमुख

संशोधकांची की बंदूकधारी चाच्यांचा चमु याबद्दल चर्चा होऊ शकते.

बंदूकधारी चाच्यांचा चमुच! दुसरं काय?

जागतिक तापमानवाढीमुळे भारतावर होणारे हवामान बदलाचे परिणाम ( -- तुम्हाला जाणून घ्यायचे आहेत का?)
-- असे नुस्ते सर्वेक्षणात विचारण्याऐवजी सर्वेक्षणकर्त्या विदुषींनी ते परिणाम इथे मिपावर सविस्तर लिहील्यास जनतेचे प्रबोधन होऊन चर्चेला योग्य वळण मिळू शकेल. (अन्यथा चर्चा हळूहळू --- अल गोर - ट्रंप - मोदी - प.रम पू.जनीय - डावे - अंधभक्त --- असे वळण घेईल आणि मूळ हेतु बाजूलाच राहील)
म्हणूनच मी माझ्या आधीच्या प्रतिसादातून तशी विनंती केली होती. असे प्रबोधन करण्यात त्यांना कितपत रुचि आहे ? हे तरी निदान सांगावे.

त्या विदूशी कट्टर डाव्या आहेत.

वामन देशमुख's picture

18 Mar 2024 - 9:22 pm | वामन देशमुख

त्या विदूशी कट्टर डाव्या आहेत.

विदुषी या शब्दप्रयोगातील उपरोध कळला!

चामुंडराय's picture

19 Mar 2024 - 3:42 am | चामुंडराय

विदाषी ??

ह्या शब्दासारखा सतत, उगीचच, अर्थहीन वाद घालणाऱ्याला "वादश्री" संबोधण्यात यावे का?

जागतिक तापमानाचे ठावूक नाही, परंतु आमच्या ठाण्याचे तापमान मात्र वाढले आहे इतक नक्की ! सगळीकडे काँक्रीटीकरण, प्रचंड प्रदुषण आणि झाडांची तोड ही मुख्य कारणे मला दिसतात. ज्या ठिकाणी पुर्वी हवेत गारवा जाणवण्यास सुरुवात व्ह्यायची तो भाग आता साधारण ३ किलोमीटर पुढे सरकल्याचे मला जाणवलेले आहे.

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Dharala Prabhu - Title Track Video | Harish Kalyan | Anirudh Ravichander | Tanya Hope

तुमच्या ठाण्यात ३५ अंशाच्या वर तपमान जात नव्हते तेव्हा आमच्या अमरावतीत तापमान ४५-४६ असायचे. आजही आहे. झाडी तेव्हा होती आजही आहे.

अवांतर :

जगातले समस्त ज्वालामुखी थंड करण्यासाठी उष्मासैराट दादोबा धरणभरे यांच्याकडून प्रेरणा घेऊ शकतात.

-ना.न.

अहिरावण's picture

18 Mar 2024 - 10:42 am | अहिरावण

भारतातील लोक सरपण जाळतात त्यामुळे तपमानवाढते, पर्यावरण बिघडते - एक महान अमेरिकन

भारतातील लोक वर्षभरात सरपणामुळे जेवढा धूर करतात तेवढा रशियाने एक दिवसात युक्रेनमधे, इस्त्रायलने हमासमधे, अमेरीकेने सिरियामधे केला.

या तिघांनी वर्षभरात जितका धूर केला तितका आईसलँडमधील ज्वालामुखीने एक दिवसात केला *

बोला ! आता काय करायचे नेमके? किती सर्व्हे करायचे या समस्येवर मात करायला?

१६ व्या शतकात अचानक कमी तपमान का झाले होते?

११ हजार ते १५ हजार वर्षांपूर्वी कुठलेही औद्योगिक कारखाने नसतांना, भारतीय लोक सरपण जाळत नसतांना ( तेव्हा गव्हाचा शोध नव्हता, पोळी, भाकर्री नव्हती तवा नव्हता, त्यामुळे चुल नव्हती) कसा काय कार्बन डाय ऑक्साईड वाढला?

* वरवरची तुलनात्मक मांडणी. नेमके आकडे वेगळे, अधिक भयावह असू शकतात.

साप समजून दोरी तुडवली जात आहे का?

वामन देशमुख's picture

18 Mar 2024 - 12:58 pm | वामन देशमुख

साप समजून दोरी तुडवली जात आहे का?

साप कोणता, दोरी कोणती, हे बडवणार्‍यांना स्पष्ट माहीत आहेच; त्यांच्या उद्दीष्टपुर्तीसाठी सापाला सोडून दोरी बडवणे आवश्यक आहे, इतकेच!

नगरी's picture

30 Mar 2024 - 7:44 pm | नगरी

माणसाचा उगम माकडा पासून झाला असे डार्विन म्हणतो.
असेल, पण काही लोकांची उत्क्रन्तीत गेलेली शेपटी वाकडी ते वाकडीच राहिली.
आश्चर्य याचे वाटते कि सिनिअर लोक त्यात आहेत!
आता या ज्या कोणी आहेत त्यांचा चांगला दृष्टीकोन आणि कार्य बघायचे सोडून कुरापती काढणे काय योग्य आहे का?

अहिरावण's picture

31 Mar 2024 - 10:40 am | अहिरावण

>>आता या ज्या कोणी आहेत त्यांचा चांगला दृष्टीकोन आणि कार्य बघायचे सोडून कुरापती काढणे काय योग्य आहे का?

या ज्या कोणी आहेत त्यांचे "कार्य" शिनिअर लोकांना माहित नसेल असे तुम्हाला वाटते का?

अहिरावण's picture

12 May 2024 - 7:51 pm | अहिरावण

झालं का सर्वेक्षण आणि त्यावरचं विश्लेषण का काय ते? काय ठरलं मग?
की लोकांनी जो फार्म भरल्या त्यानुसार तुम्हाला हवे ते निकाला मिळालेच नाहीत म्हणून बारगळलं सगळं?
की ऐन वेळेस पायथान गंडलं? की पांडा, चार्ट हवे तसे वळवता आले नाहीत?
की मार्च एंडच्या अप्रेझल मधे आम्ही यंव केलं आम्ही त्यंव केलं म्हणून टाकलं आणि काम झालं?

एकंदर आनंदच दिसत आहे. =))

बाकी आमच्या विदर्भात सध्या मस्त वळवाचा पाऊस येत आहे, गारा पडत आहेत... तापमान कमी झालं आहे.. =))

अरेरे !! सर्वे बारगळला वाटते. का जमले नाही का निष्कर्ष काढायला?

आव तर फार मोठा आणला होता.. आम्हाला कित्ती काळजी अन काय काय... नुसतीच हवा ! ढुस्स.... !! =))

चक चक चक... पुढील सर्वे साठी शुभेच्छा !

विषय घ्या -
१) २०२९ मधे बीजेपी हरणार का?
२) मिडटर्म मोदी राजीनामा देणार का?
३) बीजेपी फुटणार का?
४) कॉग्रेस फुटणार का?
५) योगी पीएम होणार का?
६) फडणवीस महाराष्ट्राच्या राजकारणातून संपणार का?
७) शरदपवार अजून ७ ८ इलेक्शन लढवणार का?
८) वगैरे इत्यादी

हे तपामान वाढ वगैरे तुम्हाला काही झेपणार नाही.. उगा असले अर्धवट सर्वे करुन हसं मात्र करुन घ्याल !
तशी करुन घ्यायला आमची हरकत नाही.. आम्हाला काय हसायला आम्हाला काही कारण थोडीच लागते !!
हि हि ही

नठ्यारा's picture

1 Sep 2024 - 12:03 am | नठ्यारा

लोकहो,

महाराष्ट्रात इतकी कर्तुमअकर्तुम शक्ती आहे की विचारायची सोय नाही. हेच बघा ना दादोबा धरणभऱ्यांनी समस्त ज्वालामुखी थंड करून सोडले आणि झाकणझुल्याने समुद्रावर झाकणं बशीवली. मग काय अटलांटिक महासागर थंड होऊ लागला. पण अज्ञ लोकांना महाराष्ट्राची प्रसिद्धीपराङ्मुख ताकद कधी समजणार !

बातम्यांचे दुवे ( इंग्रजी ) :

१. https://www.newscientist.com/article/2444394-part-of-the-atlantic-is-coo...

२. https://www.msn.com/en-ie/weather/topstories/large-patch-of-the-atlantic...

दिल्लीचेही तख्त राखतो
सागरासही मस्त झाकतो
लाव्हारसास खस्त टाकतो
महाराष्ट्र माझा !

आपला नम्र,
-नाठाळ नठ्या