श्रीमद्भगवद्गीतेत भगवंत म्हणतात" कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन". माझ्या एक जिवलग मित्र या श्लोकावर टिप्पणी करत म्हणाला, तुम्ही मनुवादी लोक ( तो नेहमीच मला प्रेमाने मनुवादी म्हणतो) श्रमिकांचे शोषण करीत आला आहात. आम्हाला म्हणतात, कर्म करा पण फळ मागू नका. का मागू नये आम्ही कर्माची फळे. मी त्याला म्हणालो, कर्म केल्यावर त्याचे फळ हे मिळतेच. पण आपल्या कर्मांवर बाह्य जगाचा प्रभाव ही पडतो. या बाह्य प्रभावांमुळे उत्तम कर्म केले तरी फळे मिळत नाही, आपण दुःखी आणि निराश होतो. ह्यालाच समर्थांनी आधिभौतिक ताप म्हटले आहे. आधिभौतिक ताप दैवीय आणि आसुरी असतात.
एक शेतकरी उत्तम बियाणे शेतात पेरतो. शेताची उत्तम निगा राखतो. उत्तम पीक ही येते. पण पीक कापणीच्या पूर्वी अचानक वादळ वारे, येतात गारपीट होते आणि सर्व पीक हातातून जाते. कधी पेरणी नंतर पाऊस दगा देतो. शेतकऱ्याला दैवी आपदांमुळे कर्माचे फळ मिळत नाही. वादळ वारे भूकंप सारख्या दैवी आपदा आपल्या कर्मावर पाणी फिरवितात. नुकतेच हिमाचल राज्यात हजारो घरे, हॉटेल्स, शेती पर्वत ढासळत्या मुळे नष्ट झाली. इजराईल आणि गाझा मध्ये ही आतंकवाद्यांची संबंध नसलेल्या हजारो लोकांना त्यांच्या आसुरी कृत्यांची फळे भोगावी लागली. हजारो मृत्युमुखी पडले, हजारो लोकांचे उद्योग धन्दे बुडाले, घरे नष्ट झाली. अचानक लागलेल्या किंवा कुणी लावलेल्या आगी दर वर्षी हजारो घर, दुकान, फेक्ट्रीज नष्ट करतात. असे शेकडो उदाहरणे आपल्याला नेहमीच दिसतात. तात्पर्य उत्तम कर्म केले तरी त्या कर्माची अनुरूप फळे अनेकदा मिळत नाही.
श्रीमद्भगवत गीतेत बहुतेक आधिभौतिक तापांचा प्रभावामुळे कर्म फळांवर आपला अधिकार नसतो, हे समजविण्यासाठी भगवंतांनी अर्जुनाला या श्लोकाचा उपदेश दिला. तू क्षत्रिय आहे, युद्धातून पलायन करण्याचा विचार करू नको. परिणाम काय होईल याचाही विचार करू नको. फक्त तू आपले कर्तव्य कर. क्षत्रिय धर्माचे पालन कर. धर्म रक्षणासाठी युद्ध कर.
शेती असो, उद्योग धंधा असो, व्यापार असो किंवा नौकरी, नेहमीच कर्माच्या अनुरूप फळे मिळणे शक्य नाही. तरीही शेतकरी हजारो वर्षांपासून सतत शेती करतो. उद्योजक आणि व्यापारी आपापले धंदे करत राहतात. चाकरी करणारा चाकरी करत राहतो. असो.
प्रतिक्रिया
20 Dec 2023 - 6:33 pm | मुक्त विहारि
आणि
समाजासाठी किंवा मित्रांसाठी किंवा नातेवाईकांसाठी केलेले कर्म वेगळे...
------
नौकरी करत असताना, उत्तम बॉस असेल आणि उत्तम सहाचारी असेल तर, कर्माचे फळ मिळतेच मिळते.
पण, बॉस किंवा सहचारी साथ देत नसतील तर शिकायचे आणि नौकरी सोडून द्यायची.
-------
सध्या वृद्धाश्रमात सेवा देत असल्याने, वृद्ध माणसांना उत्तम सेवा दिली की उत्तम फळ मिळतेच, ह्याचे खुप चांगले अनुभव आले आहेत.
------
27 Dec 2023 - 12:01 pm | विवेकपटाईत
प्रतिसाद आवडला. निःस्वार्थ सेवेचे फळ नेहमीच मिळते.
28 Dec 2023 - 7:40 pm | Nitin Palkar
+१
21 Dec 2023 - 4:25 am | कंजूस
फळाच्या वेळी नशीब झोपतं
28 Dec 2023 - 7:50 pm | Nitin Palkar
'यही पे करना है यही पे भरना है..' आणि 'जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर' यावर विश्वास ठेवून आचरण ठेवावे.
29 Dec 2023 - 11:17 am | श्वेता व्यास
तुम्ही व्यक्त केलेल्या विचारांशी सहमत आहे.
आपण एखादे उद्दिष्ट ठेवून कर्म केले तर आपल्या इप्सिताप्रमाणेच फळ मिळेल असं काही नाही. पण त्यातून आपण काहीतरी शिकू जे कुठेतरी उपयोगीच पडेल, किंवा वेगळे काहीतरी फळ मिळेल. म्हणून फळ मिळणार नाहीये तर कर्मच कशाला करा अशी वृत्ती असू नये, असा अर्थ मी नेहमी घेते.