शेटजी, बेटा तुला कशी बायको पाहिजे? बेटा, चांदसा मुखडे वाली बायको पाहिजे. शेठजीने खूप शोध घेतला. अखेर शेटजीला चांदसे मुखडे वाली मुलगी सापडली. मोठ्या धूम धडाक्यात त्यांनी मुलाचे लग्न केले. सोबत त्यांना भरपूर दहेज ही मिळाले. शेठजी खुश होते, मुलाने सुहागरातच्या दिवशी बायकोचा घुंगट वर केला आणि दगा-दगा ओरडत शेटजी जवळ आला. तो शेटजीला म्हणाला "बाबा तुम्ही मला दगा दिला, मुलीचा चेहरा चंद्रमा सारखा सुंदर नाही. शेठजीने चंद्रयान ने काढलेला चंद्रमाचा फोटो मुलाला दाखवत विचारले, बघ असाच चेहरा आहे की नाही, की काही उणीव आहे. चंद्रमाचा फोटो पाहून मुलाने कपाळावर हात मारला आणि तेंव्हापासून तो एकच गाणे गुणगुणत राहतो. चाँद सी बायको हो मेरी ऐसा मैंने क्यों सोचा था.
२
आजोबांनी एका प्लॉटवर एक चंद्रमौळी झोपडी बांधली. आजोबांच्या मृत्यूच्या साठ वर्षानंतर त्याच्या नातवाने तिथेच एक उंच गगनचुंबी इमारत बांधली. नातू खुश झाला. आपण ही गगनचुंबी इमारत कशी बांधली सर्वांना सांगू लागला. पण त्या इमारतीची प्रशंसा करत नातेवाईकांनी त्याला म्हंटले या गगनचुंबी इमारतीचे श्रेय तुला नाही फक्त तुझ्या आजोबांना आहे.
प्रतिक्रिया
27 Aug 2023 - 12:18 pm | अहिरावण
तुमचा (पेनचा) ब्रँड कोणता ?
तुमचे लेखन वाचून https://misalpav.com/node/9875 हे नेहमी आठवते
29 Aug 2023 - 8:54 am | विवेकपटाईत
विवेक पटाईतच्या सर्व लेखनाचे श्रेय माकडांनाच आहे - महर्षि डार्विन
28 Aug 2023 - 11:04 am | विजुभाऊ
बरोबर आहे. आजोबानी लग्नच केले नसते तर नातवाने श्रेय घ्यायचा प्रश्न आलाच नसता.
28 Aug 2023 - 2:32 pm | भागो
विजुभाऊ
दे धमाल!
28 Aug 2023 - 3:14 pm | सुरिया
चळ आहे फक्त
28 Aug 2023 - 3:19 pm | गवि
कौतुक आहे.
नातू जन्मला त्याच दिवशी आजोबा निजाधामास गेले होते का?
28 Aug 2023 - 5:09 pm | भागो
माझ्या आजोबांनी एक उत्तुंग इमारत बांधली.
मी आता भाड्याच्या झोपडीत रहात आहे!
28 Aug 2023 - 9:47 pm | चित्रगुप्त
आजोबांनी भरपूर मोठी जागा घेऊन त्यात मोठा वाडा बांधला, अंगणात खूप फळझाडे लावली... माझ्या वडिलांचे, माझे बालपण त्यात गेले... भरपूर फळे खाली, बागेत हुंदडलो .... आता मुलाने सगळी झाडे तोडून लाकडे विकली, वाडा पाडून चाळीस फ्लॅट बनवून विकले.... त्यापैकी एका फ्लॅटच्या एका लहानश्या खोलीत आता आम्ही उभयता रहातो ...
--- असे चित्र हल्ली दिसते.
28 Aug 2023 - 5:19 pm | भागो
चला. माझ्या आजोबांनी... नावाची एक सेरीज बनवायला पाहिजे. पण त्या आधी
कीर्ती सांगे आजोबांची तो एक पद्धतमूर्ख
29 Aug 2023 - 11:52 am | विजुभाऊ
मूळ श्लोकात कीर्ती सांगे वडीलांची तो येक मूर्ख असे आहे.
( याचा कोणताही राजकीय संदर्भ लावू नये)
29 Aug 2023 - 1:20 pm | भागो
दासबोधाच्या एका समासात पढतमुर्खांची लक्षणे सांगितली आहेत.
तुम्ही म्हणता ते अगदी सत्य आहे. केवळ स्पेशल इफेक्ट्स साठी वडिलांचे आजोब केले आहे. पटाईत ह्यांचा दासबोधाचा गाढा व्यासंग आहे, त्यांना हे सहज पटावे.
श्री समर्थ रामदास स्वामी महाराजांची क्षमा मागतो. ते माझे पण कुलदैवत आहे.