एक दिवस इथल्या मॉलमध्ये खरेदीला गेलो होतो...एकतर अवाढव्य मॉल असतात. खरेदीच्या आनंदापेक्षा 'हरवू आपण' ही भीतीच वाटते. 'ग्रोसरी स्टोअर्स' मध्ये केवळ खाण्यापिण्याच्या गोष्टी असल्याने ते थोडं आपल्या सरावाचं वाटतं. भारतात पण डी मार्ट सारख्या ठिकाणी भाज्या, फळं, दूध इत्यादी विभाग आपण पाहिलेला असतो. त्यामुळे थोडसं 'घरेलू' फिलिंग येत. अशीच काहीशी खरेदी करायला आम्ही गेलो. डॉलर्स गुणिले ८० हा मनातील कॅल्क्युलेटर 'सायलेंट मोड'ला टाकला कारण खरंच इथे 'लेकीच्या बापाचं' काही जाणार नव्हतं ! तरीही इथे वस्तू सापळ्याचे दर्शन घडलेच. इथे सॅन्टा क्लॅराजवळ 'आपना बजार' नावाचा एक बजार आहे. तिथे 'मोफत तयार चहा हवा तितका मिळतो' म्हणूनही असेल पण आमच्यासारखे काहीजण मोफत चहाप्रेमी इथे येतात. या मॉल बाहेर पाणीपुरी स्टॉल पण होता आणि भारतातल्या पाणीपुरीला 'मिस' करणारे खवय्ये पण होते. पाणीपुरीला 'गोल गप्पा' हे नाव सूट होतं. पण 'पुचका' नाव मात्र मला अजिबात आवडलेलं नाहीये. अहो, पश्चिम बंगालमध्ये पाणीपुरीला 'पुचका' म्हणतात. नावात काय आहे असं म्हणणाऱ्यांसाठी नावात काहीतरी नक्कीच आहे, 'उगीच का आम्ही नाव ठेवतो!' असं म्हणावसं वाटतं. इथे अमेरिकेत Rotten Robbies नावामध्ये Rotten म्हणजे चक्क 'कुजकं' असा अर्थ असणारा पेट्रोल पंप पाहिलाय. पाणीपुरीकडे दुर्लक्षून भाजी खरेदीला आत गेलो. आपल्या फ्लॉवर सारखी दिसणारी आणि आता आपल्याकडेही मिळणारी ब्रोकोली... कोबीसारखे दिसणारे लेट्युस.. सेलरी, झुकीनी अशी विदेशी नावं धारण केलेल्या विदेशी भाज्या समोर येतात तर 'बेलपेपर' म्हणून आपली ढब्बू मिरची किंवा भोंगी मिरची, 'एगप्लांट' म्हणजे वांग 'ओकरा' म्हणजे भेंडी अशा साक्षात्काराने नावाला भुलू नये हे ही समजतं.
इथल्या बहुतांशी सर्व भाज्या, फळं ह्या प्रचंड अतिरेकी मोठ्या साईजमध्ये असतात. भली मोठी केळी, डाळिंब पाहून आपलंच बाळ असं कशानं सुजलं बरं? अशी भीती वाटते. ढमाले कांदे, लसुणाच्या कुड्या बघून 'पिटुकल ग बाई आमचं कांदा बाळ !' असं वाटतं. भारतीय रेसिपीत 3-4 कांदे, 5-6 लसणाच्या पाकळ्या असं लिहिलेलं वाचून कुण्या काळ्या गोऱ्या मडमेन किंवा साहेबानं रेसिपी केली तर 'मॅड रेसिपी' तयार होईल. दोन जणांच्या पोह्याला चतकोर कांदा इथे भरपूर होतो. आकाराकडे दुर्लक्षून भाजी, फळं, दूध खरेदी करेपर्यंत तर आपण पहिल्या सापळ्यात अडकलेलो असतो.
आम्ही मागं एक छोटसं नाटुकलं केलं होतं. त्यात नुसता 'चहा कसा करू?' या एका प्रश्नासाठी एक मैत्रीण दुसऱ्या मैत्रिणीला गोड की अगोड, साखरेचा की गुळाचा, खऱ्या साखरेचा की झिरो कॅलरीचा, दुधाचा की बिन दुधाचा, दूध गाईचं की म्हशीचं, चहा कडक की फिका, फ्लेवर्ड की अन फ्लेवर्ड असे कैक प्रश्न विचारून भंडावते. ती इतके प्रश्न विचारते की चहा पिणारीने माफी मागून पळ काढावा. तसंच काहीस इथे होतं. आपल्याकडे किराणा दुकानात जाऊन '10 चा बिस्किट पुडा द्या' किंवा शेजाऱ्याकडच्या आईस्क्रीमकडे बोट दाखवून 'मला पण तसलं द्या' असं सांगता येतं आणि मिळतं सुद्धा! 'रवा द्या' म्हणणाऱ्या दादांना दुकानदारही नवऱ्याच्या अज्ञानाची पुरेपूर खात्री असल्याने अगदी हमखास विचारतो ,'लाडवासाठी की उप्पिटाला' हे आपलेपणाने समजून विचारणं इथं भारतात ! अमेरिकेत आपण सापळ्यात अडकतो-सापडतो.
साध्या दुधात इथे 56 प्रकार. फुल क्रीम-लो क्रीम-नो क्रीम, गाईचं-म्हशीचं-सोयाचं, बॉटलमध्ये-टेट्रापॅकमध्ये असे असंख्य पर्याय... प्रत्येकावर कॅलरी, फॅट आणि त्यातील अन्य घटकांचा भडीमार ! डॉलरचा कॅल्क्युलेटर मध्येच म्यूट ऑप्शन सोडून ऍक्टिव्ह होतो. कॅलरी आणि कॅल्क्युलेटर युद्धात एकाचा विजय होतो आणि दूध खरेदी होते. जे दुधाचं तेच दही, तुप, रेडी टू कूक पॅकेट, परोठ्यांचे प्रकार. कोबी-फ्लॉवर-गाजर अशा भाज्या चिरूनही मिळतात किंवा पूर्ण पण मिळतात. तयार केलेल्या भाज्या पण इथे उपलब्ध असतात. हे कमी म्हणून की काय तर केळफुलापासून गवारीपर्यंत आणि धान्यांपासून कडधान्य, त्यांच्या डाळी, अर्धवट-सालासकट, रवा, पीठ असे बहु पर्याय देऊन सुखावतो की बुचकळ्या टाकतो तेच समजत नाही. जितके लाड माणसांचे त्याच्या काही पटीने लाड श्वानांचे! त्यांच्यासाठी स्वतंत्र लिखाण करायलाच हवं. या इथेच ढोकळा, सामोसे, मिठाया अशा खाण्याच्या तयार पदार्थांचे आमिष दाखवणारे काउंटर आहेत.. आणि 'for here or to go' या प्रश्नाचे त्वरित उत्तर देणारी जनता त्या सगळ्या सापळ्यातून आपली क्रेडिट कार्ड टॅप करून सुटतात. आम्ही मात्र त्या पार्किंगमध्ये 'बरोबर आपल्या गाडीकडे नेणाऱ्या' वाटाड्याच्या मागे मुकाट चालू लागतो. बहुपर्याय सापळ्यातून विदाऊट डॉलर्स सुटल्याच्या खुशीत..!
प्रतिक्रिया
8 Aug 2023 - 6:46 am | गवि
आपल्या विनंतीनुसार हा लेख प्रकाशित करून बाकीचे डबल झालेले लेख अप्रकाशित करत आहे.
लेख प्रकाशित करताना येणाऱ्या अडचणींसाठी वारंवार विचारले जाणारे प्रश्न या धाग्याचे वाचन करावे किंवा साहित्य संपादक आयडी वर व्यक्तिगत निरोप करता येईल मदतीसाठी.
लेखमाला उत्तम.
8 Aug 2023 - 6:56 am | नचिकेत जवखेडकर
हाहाहा मस्त :)
8 Aug 2023 - 3:30 pm | निमी
धन्यवाद
8 Aug 2023 - 7:59 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आवदलाय हाही भाग. पुलेशु.
-दिलीप बिरुटे
8 Aug 2023 - 10:20 am | विजुभाऊ
आवदला हा शब्द आवडल्या गेल्या आहे.
8 Aug 2023 - 8:35 am | विवेकपटाईत
मस्त, आवडला.
8 Aug 2023 - 11:27 am | कंजूस
ओके.
8 Aug 2023 - 11:55 am | राजेंद्र मेहेंदळे
बर्याच ठिकाणी बहुपर्यायी व्यवस्था असल्याने "प्रॉब्लेम ऑफ प्लेंटी" होतो खरा. मग माणुस उगाचच खरेदी करत सुटतो आणि खिसा खाली करतो. मग घरात पसारा वाढतो.
किंबहुना या अशा मॉल्स मध्ये वस्तू ठेवण्याचे पण एक शास्त्र आहे म्हणे. म्हणजे साधारणपणे माणुस आत येतो तेव्हा जीवनावश्यक वस्तू घ्यायच्या विचारात असतो, त्या सर्वात शेवटी ठेवतात , पण तिथे पोचण्याआधी भुलवणार्या फुटकळ वस्तूच दिसत राहतात आणि माणसे त्या खरेदी करत बसतात. सगळे झाल्यावर बिलिंग साठी रांगेत उभे असताना जो वेळ राहतो त्यातही आजुबाजुला काही महत्वाच्या पण उपेक्षित वस्तू जसे की रेझर्,ब्रश्,पेन बाम, नॅपकीन्स्,चॉकलेट्स ठेवलेल्या दिसतात आणि त्याही लास्ट मिनिट पर्चेस मध्ये उचलल्या जातात.
शिवाय ते झाल्यावर इंडीयन स्टोअर मध्ये मॅगी,ग्लुकोज् बिस्किटे,पॅराशूट तेल, पूजासामान किवा खास भाज्या/मसाले असे काय काय घेण्यासाठी एक चक्कर होतेच. असे अनेक सापळे.
8 Aug 2023 - 3:32 pm | निमी
खरंच बहुपर्यायाने गोंधळून जायला होते
8 Aug 2023 - 1:35 pm | विजुभाऊ
कन्झुमर्स बिहेवियर हा अभ्यासाचा भाग आहे.
मॉलमधे अत्यावश्यक वस्तू या सर्वात शेवटी ठेवल्या जातात.
आणि त्यातही छोट्या मापाच्या वस्तू नसतातच उदा एका कोलोची सर्फची पिशवी नसते त्या ऐवजी पाच किलोची असते.
साबणाची एक वडी मिळत नाही. चार कोंवा पाच वड्यांची चव्वड घ्यावी लागते
8 Aug 2023 - 1:37 pm | विजुभाऊ
मला मॉल्स मधे ज्वेलरी , वगैरे ची जी स्वतंत्र दुकाने असतात ती कशी चालतात याबद्दल प्रश्न आहे. त्यात कधीच ग्राहक पहायला मिळत नाहीत
8 Aug 2023 - 7:50 pm | अहिरावण
>>मला मॉल्स मधे ज्वेलरी , वगैरे ची जी स्वतंत्र दुकाने असतात ती कशी चालतात याबद्दल प्रश्न आहे. त्यात कधीच ग्राहक पहायला मिळत नाहीत
गुज्जुभाईने हवाला ओळखू नये ह्याचे नवल वाटते.
8 Aug 2023 - 9:58 pm | चित्रगुप्त
जरा अवांतर प्रश्न आहे, पण बरेच काळापासून पडलेल्या प्रश्नाचे उत्तर कुणीतरी इथे देइल असे वाटते.
आपण सोन्याचा दागिना खरेदी करायला जातो, तेंव्हा त्या दागिन्यात जे अमूक इतक्या कॅरेटचे सोने आहे (असे सांगितले जाते) त्याचा त्या दिवसाचा भाव + घडवाई/घडणावळ (किंवा जे काही म्हणतात ते) + टॅक्स. अशी रक्कम आपण देतो.
माझा प्रश्न असा की सोन्याचा भाव सगळीकडे सारखाच असताना सोनाराला 'फायदा' नेमका कशातून होत असतो ? २२ कॅरेटचे सांगून २० कॅरेटचे देत असले, तरी त्यातून एवढा प्रचंड नफा होऊ शकतो का? की त्यांना ते सोने खूप स्वस्तात मिळत असते ? असे ऐकले आहे की आफ्रिका वगैरेतील खाणींमधून अवैध मार्गाने कमी किंमतीत सोने जगभर विकले जात असते.
8 Aug 2023 - 10:23 pm | गवि
खरेदी आणि विक्रीच्या भावात खूप फरक असतो. घट बरीच धरली जाते. घडवणावळ बरीच असते. शिवाय खास दागिन्यांची किंमत फक्त सोन्याच्या वजनापेक्षा बरीच जास्त असू शकते. किंमती वर खाली होत असतात त्यात देखील काही कमाई होत असावी. सोने तारण ठेवून व्याजावर देणे हा उप व्यवसाय असू शकतो कायदेशीर .
9 Aug 2023 - 4:05 am | चौकस२१२
सोनार खालील पद्धतीने नफा कमवत असतो
पण त्याआधी सोनार म्हणजे दागिने उत्पादन करणारा कि फक्त विकनारा
आणि तुम्ही भारत दुआबई / सिंगापोरे येथे जे वळे किंवा बिस्कीट किंवा साद्या साखळ्या ज्यावजनावर विकलया जातात त्याबद्दल बोलताय कि भरजरी कलाकुसरीचे दागिने + हिरे खडे इत्यादी
येथे पहा वजनवर विकले जात नाही मग त्यातील मार्गीं अनेक पद्धतीचे असणार ( कोणत्याही उत्तापदं बद्दल हे बोलता येईल )
https://www.michaelhill.com.au/jewellery/gold
- विकण्याचा आणि विकत घेताणाचा भाव तफावत ( हि रिटेल पातळीवर सर्वात जास्त असते )
- लागणारे सोने घाऊक पद्धीतीने घेतले तर त्याची किंमत कमी असतेच कि
- सोनार काही फक्त कच्य्या माला वर कमवत नाही दागिन्यांचाही नाजूकता वैगरे आणि इतर हिरे वैगरे ..
- मोठा सोनार असेल तर बाजारातील सोन्याचं भावातील जाध उत्तरवार डेरीवेटीव्ही वापरून आपला संभाव्य तोटा टाळू शकतो ( वेगळा विषय )
9 Aug 2023 - 5:56 am | चित्रगुप्त
मला फक्त उदाहरणार्थ गाडगीळ सारख्या मोठ्या दुकानातील तयार सोन्याचे दागिने (हिरे वगैरे नग नसलेले) अभिप्रेत आहेत. दुबई वगैरेचे नाहीत. असे दुकानदार 'विक्रेते' असले तरी त्यांचे स्वतःचे कारीगर/सोनार असतातच. मिपावर कुणाच्या चांगल्या ओळखीचे सोनार असतील तर ते 'आतली' माहिती देऊ शकतील. मला तरी या धंद्यात मोठा प्रमाणात लबाडी केली जात असावी असे वाटते. सोन्याचे भाव वाढवत जाणे हे या लॉबीचा महत्वाचा उद्योग. त्यातूनही अमाप नफा मिळत असावा.
9 Aug 2023 - 1:30 pm | अहिरावण
भारतीय मध्यमवर्गाचा एक फार मोठा भ्रम असतो की. आपण खरेदी करतो म्हणून सोन्याचा भाव वाढतो. तसेच बाजारातील सोन्याचा भाव आपण ज्याच्याकडून सोने घेतो तो झिंगरु सोनार आणि त्याची बिरादरी ठरवत असते.
जरा जगाच्या बाजारात नजर टाकली तर हा भ्रम चटकन दुर होतो पण शहामृगी पवित्रा घेऊन वाळूत मस्तक लपवून आपल्यामुळेच भारताचा जीडीपी वाढतो अस समजायच अन याला अमाप नफा आहे अन त्याला बक्कळ कमाई आहे असे प्रलाप करत बसायचे ही टीपीकल मध्यमवर्गीय मानसिकता आहे. असो.
चालायचेच
9 Aug 2023 - 5:51 pm | चित्रगुप्त
'झिंगरु सोनार आणि त्याची बिरादरी' सोन्याचे भाव चढवत नेतात असे म्हणणे नाहीच.
१. सोन्याचे भाव वाढत जाण्यामगील कारणे कोणकोणती, आणि त्यासाठी जबाबदार कोण असते, त्यातून मुख्यतः फायदा कुणाचा होत असतो ?
२. सोन्याच्या मोठ्या विक्रेत्यांना होणारा प्रचंड नफा नेमका कश्यातून होत असतो ? त्यांना 'कमी किंमतीत' सोने खरेदी करता येत असते का? असल्यास कसे? कुठून?
३. या धंद्यात 'बेकायदा' आणि 'ग्राहकाची फसवणूक' या सदरात कोणत्या गोष्टी घडत असतात ?
--'मध्यमवर्गीय मानसिकते'पायी निर्माण होणारा 'संभ्रम' दूर करून सत्य काय आहे ते स्पष्टपणे मांडावे ही विनंती.
9 Aug 2023 - 7:48 pm | सुबोध खरे
पु ना गाडगीळ किंवा वामन हरी पेठे यांच्या सारखे जवाहिरे त्यांच्याकडून सोने खरेदी केले असल्यास त्या दिवशी असेल त्या भावात आपला दागिना खरेदी करतात. आता हॉलमार्क असलेले दागिने सुद्धा त्या दिवशी असेल त्या भावात खरेदी करतात
त्यांचा नफा हा घडाई ( MAKING CHARGES) वर असतो.
पु ना गाडगीळ किंवा वामन हरी पेठे यांची घडाई ( MAKING CHARGES) सोन्याच्या भावाच्या १५ ते २०% असते. तनिष्क(टाटा) यांची काही दागिन्यांच्या बाबतीत २४ % पर्यंत असते म्हणजेच १०ग्राम सोन्याचा आजचा भाव ५० हजार असेल तर १२५०० रुपये आपण घडाई म्हणून देतो.
आपल्याकडील कोणतेही सोने तनिष्क(टाटा) च्या शोरूम मध्ये नेले तर त्यांच्याकडे ते तुमच्या समोर इलेक्ट्रिक भट्टीत वितळवतात (१००० 'सेल्सियस) त्यात तांबे आणि इतर धातू किंवा हिणकस पदार्थ अक्षरशः जळून जातात. हे सोने ते त्या दिवशी साले त्या भावाने परत घेतात आणि आपल्याला हवा असलेला दागिना त्यातून हि रक्कम कमी करून आपल्याला देतात.
माझ्या मुलीच्या लग्नात माझ्या आईने तिला दिलेले दागिने वितळवून तिच्या आवडीचा नेकलेस मी बनवून घेतला.
बाकी इतर फुटरमल किंवा छेदीलाल ज्वेलर्स आपल्याला २२ किंवा २४ कॅरेट म्हणून २० कॅरेट चे दागिने गळ्यात मारतात.कारण त्यांची घडाई ६-१० % असते आणि जेंव्हा तुम्ही ते विकायला जात तेंव्हा त्यात १० ते २० % घट निघते. म्हणजे शेवटी तो आपल्याला आतबट्ट्याचा व्यवहार होतो.
9 Aug 2023 - 7:53 pm | सुबोध खरे
https://www.tanishq.co.in/product/minimalist-22-karat-yellow-gold-finger...
हे पहा
9 Aug 2023 - 11:14 pm | चित्रगुप्त
बरेच वर्षांपूर्वी या व्यवसायातील एकाने (सदर गृहस्थ आमच्या महाराष्ट्र मंडळाचे सदस्य असल्याने त्यांच्या सांगण्यावर विश्वास ठेवला जाऊ शकतो) सांगितले होते की आफ्रिकेत अजूनही 'गुलाम'सदृष्य (किंवा अत्यल्प मजुरी) कामगारांकडून खाणींमधून काढलेले सोने बेकायदेशीरपणे भारतात येत असते. ते मोठ्या दुकानदारांना फार स्वस्त मिळत असल्याने त्यांचा मुख्य हा नफा सोन्याची खरेदी आणि विक्री यांच्या भावतील फरकामुळे होत असतो. यावर कदाचित नेट्फ्लिक्स वगैरेंचे माहितीपट असतीलही.
--- उदाहरणार्थ 'मध' या विषयावरील एका माहितीपटातून अकल्पनीय अशी माहिती मिळते. जसे जगभर विकला जाणारा प्रसिद्ध कंपन्यांचा, सर्वोत्कृष्ट म्हणून प्रचारित केलेला मध मुळात चीनमधे तांदुळापासून बनवलेला गोड, दाट, गंधहीन पदार्थ असतो. तो मोठमोठ्या कंटेनरांमधून जहाजातून सगळीकडे वितरित केला जातो. याला विविध देशातील कंपन्या वेगवेगळे रंग आणि गंध (उदा. जांभळाच्या झाडावरील पोळे इ.) देऊन विकतात ... पाळीव मधमाशांचा उपयोग मुख्यतः सफरचंदांच्या झाडांच्या परागणासाठी केला जातो ... वगैरे.
आपण मारे डाबर, पतंजली वगैरे आपल्याला विश्वसनीय वाटणार्या कंपनीचा मध घेतो, ती खरेतर तांदुळाची 'काकवी' असू शकते
10 Aug 2023 - 2:15 pm | अहिरावण
१. सोन्याचे भाव वाढत जाण्यामगील कारणे कोणकोणती, आणि त्यासाठी जबाबदार कोण असते, त्यातून मुख्यतः फायदा कुणाचा होत असतो ?
मोठमोठ्या वित्तसंस्था डॉलर आणि सोन्याचे डेरीवेटीव ट्रेडस करत असतात. फायदा त्यांचाच असतो
२. सोन्याच्या मोठ्या विक्रेत्यांना होणारा प्रचंड नफा नेमका कश्यातून होत असतो ? त्यांना 'कमी किंमतीत' सोने खरेदी करता येत असते का? असल्यास कसे? कुठून?
लोकांची काही करुन सोन्याचे दगिने घालून नातेवाई़कांसमोर मिरवण्याची आणि सोसायटीत आम्ही पण घेऊ शकतो हे दाखवण्याची हिडीस मानशिकता ही नफा मिळवण्ञाची खात्री
३. या धंद्यात 'बेकायदा' आणि 'ग्राहकाची फसवणूक' या सदरात कोणत्या गोष्टी घडत असतात ?
कोणत्या धंद्यात बेकायदा आणि ग्राहकाची फसवणूक नाही ?
9 Aug 2023 - 4:11 am | चौकस२१२
साध्या दुधात इथे 56 प्रकार.
प्रथम भारतातून गेलेल्यांना याची गम्मत वाटलं असणार आत नवल नाही पण या गोष्टींचा वापर पाश्चिमात्य देशात सुद्धा विनोदी पद्धतीने केला जातो जाहिरातीत दूध उत्पादकाच्या या जाहिरातीतील ग्राहकाचे म्हणणे असे असावे बहुदा कि " अरे बाबा दूध ते दूध, नको गोंधळ घालू चाल मला आपले असले ते साधे दूध दे "
येथे पहा
https://www.youtube.com/watch?v=z9D52e4TaFk
10 Aug 2023 - 4:43 am | चौकस२१२
चित्रगुप्त साहेब तुमचा मूळ प्रशा रोचक आहे, "साधे सोने जे वजन गुणिले बाजार भाव असे विकले जाते मग सोनार फायदा कसा कमवतो "
पण आपण आता जो उल्लेख केलात ते अफवा हि असू शकते किंवा भारतासारखाय प्रचंड मोठ्या सोन्याच्या बाजारपेठेत अशी बेकायदा आयात होत हि असेल ! पण % वारी किती ?
असो बेकायदेशीत गोष्ट जरा बाजूला ठेवूयात
असो मूळ प्रश्नाचे उत्तर डॉक्टर खरे दिले आहे
१) घडाई ( MAKING CHARGES)
+
२) घाऊक खरेदी "त्यांना 'कमी किंमतीत' सोने खरेदी करता येत असते का? असल्यास कसे? कुठून?" मिंट कडून https://www.perthmint.com/invest/information-for-investors/metal-prices/
३) विकण्याचा आणि विकत घ्यायचा यातील तफावत ( स्प्रेड )
३) डेरीवेटीव्ह वापरून हेजिंग ( समजा गाडगीलानी आज सरासरी ५०,००० रु किलो भावाने सोने १० किलो सोने विकले उद्या जर तेच १० किलो परत विकत ग्राहक विकायला आला तर आणि आज चा भा ५२,००० रु किलो असेल तर २००० चा फटका होतो का तर
एकतर डेरीवेटीव्ह वापरून ते तो तोटा थोडा कमी करू शकतात + स्प्रेड मध्ये + घडाई
५) मोठा सोनार ( टाटा / गाडगीळ वैगरे) हे कदाचित शुद्ध सोन्याच्या विक्रीतून फार कमवत नसतील हि, इतर कलाकुसरीचं दागिन्यातील मार्जिन इतके असेल कि शुद्ध सोने किरकोळ नफ्यात विकत असतील! (गंमत सांगतो "आयकिया" ह्या स्वीडिश उद्योगाच्या दुकानात लोक तास अन तास असतात तेथे केवळ फर्निचर विकत नाहीत तर एक मोठे उपहारगृह हि असते ते जर "कोस्ट सेंटर" धरले तर केवळ त्या उपहारगृहाचा फायदा भरपूर असतो ..
असो अर्थात प्रत्यक्ष गणित हे कोणातरी वयवसायिकच सांगू शकेल