अमेरिका ३ - पर्याय सापळा..
एक दिवस इथल्या मॉलमध्ये खरेदीला गेलो होतो...एकतर अवाढव्य मॉल असतात. खरेदीच्या आनंदापेक्षा 'हरवू आपण' ही भीतीच वाटते. 'ग्रोसरी स्टोअर्स' मध्ये केवळ खाण्यापिण्याच्या गोष्टी असल्याने ते थोडं आपल्या सरावाचं वाटतं. भारतात पण डी मार्ट सारख्या ठिकाणी भाज्या, फळं, दूध इत्यादी विभाग आपण पाहिलेला असतो. त्यामुळे थोडसं 'घरेलू' फिलिंग येत. अशीच काहीशी खरेदी करायला आम्ही गेलो. डॉलर्स गुणिले ८० हा मनातील कॅल्क्युलेटर 'सायलेंट मोड'ला टाकला कारण खरंच इथे 'लेकीच्या बापाचं' काही जाणार नव्हतं ! तरीही इथे वस्तू सापळ्याचे दर्शन घडलेच. इथे सॅन्टा क्लॅराजवळ 'आपना बजार' नावाचा एक बजार आहे. तिथे 'मोफत तयार चहा हवा तितका मिळतो' म्हणूनही असेल पण आमच्यासारखे काहीजण मोफत चहाप्रेमी इथे येतात. या मॉल बाहेर पाणीपुरी स्टॉल पण होता आणि भारतातल्या पाणीपुरीला 'मिस' करणारे खवय्ये पण होते. पाणीपुरीला 'गोल गप्पा' हे नाव सूट होतं. पण 'पुचका' नाव मात्र मला अजिबात आवडलेलं नाहीये. अहो, पश्चिम बंगालमध्ये पाणीपुरीला 'पुचका' म्हणतात. नावात काय आहे असं म्हणणाऱ्यांसाठी नावात काहीतरी नक्कीच आहे, 'उगीच का आम्ही नाव ठेवतो!' असं म्हणावसं वाटतं. इथे अमेरिकेत Rotten Robbies नावामध्ये Rotten म्हणजे चक्क 'कुजकं' असा अर्थ असणारा पेट्रोल पंप पाहिलाय. पाणीपुरीकडे दुर्लक्षून भाजी खरेदीला आत गेलो. आपल्या फ्लॉवर सारखी दिसणारी आणि आता आपल्याकडेही मिळणारी ब्रोकोली... कोबीसारखे दिसणारे लेट्युस.. सेलरी, झुकीनी अशी विदेशी नावं धारण केलेल्या विदेशी भाज्या समोर येतात तर 'बेलपेपर' म्हणून आपली ढब्बू मिरची किंवा भोंगी मिरची, 'एगप्लांट' म्हणजे वांग 'ओकरा' म्हणजे भेंडी अशा साक्षात्काराने नावाला भुलू नये हे ही समजतं.
इथल्या बहुतांशी सर्व भाज्या, फळं ह्या प्रचंड अतिरेकी मोठ्या साईजमध्ये असतात. भली मोठी केळी, डाळिंब पाहून आपलंच बाळ असं कशानं सुजलं बरं? अशी भीती वाटते. ढमाले कांदे, लसुणाच्या कुड्या बघून 'पिटुकल ग बाई आमचं कांदा बाळ !' असं वाटतं. भारतीय रेसिपीत 3-4 कांदे, 5-6 लसणाच्या पाकळ्या असं लिहिलेलं वाचून कुण्या काळ्या गोऱ्या मडमेन किंवा साहेबानं रेसिपी केली तर 'मॅड रेसिपी' तयार होईल. दोन जणांच्या पोह्याला चतकोर कांदा इथे भरपूर होतो. आकाराकडे दुर्लक्षून भाजी, फळं, दूध खरेदी करेपर्यंत तर आपण पहिल्या सापळ्यात अडकलेलो असतो.
आम्ही मागं एक छोटसं नाटुकलं केलं होतं. त्यात नुसता 'चहा कसा करू?' या एका प्रश्नासाठी एक मैत्रीण दुसऱ्या मैत्रिणीला गोड की अगोड, साखरेचा की गुळाचा, खऱ्या साखरेचा की झिरो कॅलरीचा, दुधाचा की बिन दुधाचा, दूध गाईचं की म्हशीचं, चहा कडक की फिका, फ्लेवर्ड की अन फ्लेवर्ड असे कैक प्रश्न विचारून भंडावते. ती इतके प्रश्न विचारते की चहा पिणारीने माफी मागून पळ काढावा. तसंच काहीस इथे होतं. आपल्याकडे किराणा दुकानात जाऊन '10 चा बिस्किट पुडा द्या' किंवा शेजाऱ्याकडच्या आईस्क्रीमकडे बोट दाखवून 'मला पण तसलं द्या' असं सांगता येतं आणि मिळतं सुद्धा! 'रवा द्या' म्हणणाऱ्या दादांना दुकानदारही नवऱ्याच्या अज्ञानाची पुरेपूर खात्री असल्याने अगदी हमखास विचारतो ,'लाडवासाठी की उप्पिटाला' हे आपलेपणाने समजून विचारणं इथं भारतात ! अमेरिकेत आपण सापळ्यात अडकतो-सापडतो.
साध्या दुधात इथे 56 प्रकार. फुल क्रीम-लो क्रीम-नो क्रीम, गाईचं-म्हशीचं-सोयाचं, बॉटलमध्ये-टेट्रापॅकमध्ये असे असंख्य पर्याय... प्रत्येकावर कॅलरी, फॅट आणि त्यातील अन्य घटकांचा भडीमार ! डॉलरचा कॅल्क्युलेटर मध्येच म्यूट ऑप्शन सोडून ऍक्टिव्ह होतो. कॅलरी आणि कॅल्क्युलेटर युद्धात एकाचा विजय होतो आणि दूध खरेदी होते. जे दुधाचं तेच दही, तुप, रेडी टू कूक पॅकेट, परोठ्यांचे प्रकार. कोबी-फ्लॉवर-गाजर अशा भाज्या चिरूनही मिळतात किंवा पूर्ण पण मिळतात. तयार केलेल्या भाज्या पण इथे उपलब्ध असतात. हे कमी म्हणून की काय तर केळफुलापासून गवारीपर्यंत आणि धान्यांपासून कडधान्य, त्यांच्या डाळी, अर्धवट-सालासकट, रवा, पीठ असे बहु पर्याय देऊन सुखावतो की बुचकळ्या टाकतो तेच समजत नाही. जितके लाड माणसांचे त्याच्या काही पटीने लाड श्वानांचे! त्यांच्यासाठी स्वतंत्र लिखाण करायलाच हवं. या इथेच ढोकळा, सामोसे, मिठाया अशा खाण्याच्या तयार पदार्थांचे आमिष दाखवणारे काउंटर आहेत.. आणि 'for here or to go' या प्रश्नाचे त्वरित उत्तर देणारी जनता त्या सगळ्या सापळ्यातून आपली क्रेडिट कार्ड टॅप करून सुटतात. आम्ही मात्र त्या पार्किंगमध्ये 'बरोबर आपल्या गाडीकडे नेणाऱ्या' वाटाड्याच्या मागे मुकाट चालू लागतो. बहुपर्याय सापळ्यातून विदाऊट डॉलर्स सुटल्याच्या खुशीत..!
वाचने
9147
वाचनखूण
प्रतिक्रिया
24
आपल्या विनंतीनुसार हा लेख
हाहाहा मस्त :)
In reply to हाहाहा मस्त :) by नचिकेत जवखेडकर
धन्यवाद
मस्त.
In reply to मस्त. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आवदला हा शब्द आवडल्या गेल्या
मस्त, आवडला.
ओके.
छान चाललेय लेखमाला!!
In reply to छान चाललेय लेखमाला!! by राजेंद्र मेहेंदळे
खरंच बहुपर्यायाने गोंधळून
कन्झुमर्स बिहेवियर हा
मला मॉल्स मधे ज्वेलरी , वगैरे
In reply to मला मॉल्स मधे ज्वेलरी , वगैरे by विजुभाऊ
लेखमाला उत्तम
सोन्याचा भाव आणि सोनारांचा नफा वगैरे.
In reply to सोन्याचा भाव आणि सोनारांचा नफा वगैरे. by चित्रगुप्त
खरेदी आणि विक्रीच्या भावात
In reply to सोन्याचा भाव आणि सोनारांचा नफा वगैरे. by चित्रगुप्त
सोनार
In reply to सोनार by चौकस२१२
मला फक्त उदाहरणार्थ गाडगीळ सारख्यांकडील सोन्याचे दागिने
In reply to मला फक्त उदाहरणार्थ गाडगीळ सारख्यांकडील सोन्याचे दागिने by चित्रगुप्त
संभ्रम
In reply to संभ्रम by अहिरावण
'संभ्रम', झिंगरु सोनार आणि त्याची बिरादरी .. तीन प्रश्न.
In reply to 'संभ्रम', झिंगरु सोनार आणि त्याची बिरादरी .. तीन प्रश्न. by चित्रगुप्त
पु ना गाडगीळ किंवा वामन हरी
In reply to पु ना गाडगीळ किंवा वामन हरी by सुबोध खरे
https://www.tanishq.co.in
In reply to पु ना गाडगीळ किंवा वामन हरी by सुबोध खरे
आफ्रिकेतील खाणींमधून बेकायदेशीरपणे खूप स्वस्त सोने
In reply to 'संभ्रम', झिंगरु सोनार आणि त्याची बिरादरी .. तीन प्रश्न. by चित्रगुप्त
१. सोन्याचे भाव वाढत
दूध म्हणजे दूध म्हणजे दूध असतं !!!
घडाई +++