बंद पडलेली दारे
आत आठवणी गच्च
कुण्या देहाने त्या
जाऊन उलगडाव्या !?
रित्या रित्या खोल्या
रिती तावदाने
मनात आनमाने
संवाद करिती .
किती उन्हाळे
किती पावसाळे
आणि ग्गार हिवाळे
पाहीले या घराने ?
जुन्या आठवणींचा
जुना तो सहवास
हाच तो निवास
माझ्या अंतरीचा !
आता छतही गळते
गळतात काही आठवणी
मुक्या मुक्या मनाने
ओलवतात आठवणी !
ठेऊ मिटून त्यांना
पुन्हा बोलवतील कधी ?
नसतो समारोप ज्यांना
ओलवतील कधी कधी ?
--------------------------
अतृप्त ..
२/८/२०२३
प्रतिक्रिया
8 Aug 2023 - 12:03 pm | शानबा५१२
https://postimg.cc/
ईथे जाऊन आप्ली ईमेज फाईल अपलोड करा, खु सा-या लिंक्स येतात त्यातली Direct link: कॉपी करा. insert edit image वर क्लीक करुन हाईट विड्थ सेट करा. झायल!
8 Aug 2023 - 12:35 pm | चौथा कोनाडा
आत्मूस गुर्जी ... इमेज दिसत नाय !
आठवणी गच्च, ग्गार हिवाळे, मुक्या मुक्या मनाने ओलवतात अश्या शब्द प्रयोगांनी इमेज मंदाकिनी / किमी काटकर वैगरेंची असावी की काय असे कुतुहल जागे झाले !
8 Aug 2023 - 1:17 pm | विजुभाऊ
सहमत आहे.
चित्र दिसत नाही आणि इतर मजकुराशी देक्खील
8 Aug 2023 - 6:18 pm | चांदणे संदीप
मला तर चित्र दिसत आहे.
दुर्दैवाने अशा कुठल्याच हिरवीनीचे चित्र नाही. येत्या शुक्रवारी रात्री सात मिपाकरांना जमवून पार्टी दिल्यास तुम्हांलाही दिसू लागेल (कदाचित). ;)
सं - दी - प
8 Aug 2023 - 10:35 pm | चौथा कोनाडा
येत्या शुक्रवारी रात्री सात मिपाकरांना जमवून पार्टी दिल्यास तुम्हांलाही दिसू लागेल (कदाचित). ;)
हा .... हा .... हा .... !
8 Aug 2023 - 1:08 pm | सौंदाळा
भावूक केलेत
कोकणातील बर्याच घरांची अशीच परिस्थिती आहे सध्या.
हरेश्वरला गेला होता का हल्ली?
लिहित रहा.
8 Aug 2023 - 7:12 pm | कंजूस
चालायचेच. आठवणी अशाच असतात. गळक्या.
8 Aug 2023 - 7:18 pm | गवि
छायाचित्र फारच बोलके आणि अर्थपूर्ण आहे. कारण यात एसटीडी आयएसडी पिसीओ हे केवळ जुनेपणाचे नव्हे तर कालबाह्यतेचे देखील प्रतीक आहे. इथे छोटेसे घर असेल तर त्यालाच जोडून एक छोटासा व्यवसाय कोणी चालवत असेल. पण आता सर्वच काळाच्या रेट्यात मागे पडले. निर्जन झाले. असा खंतावणारा फील येतोय.
8 Aug 2023 - 7:22 pm | गवि
खूप पूर्वी फक्त एसटीडी बूथच्या उत्पन्नावर वर एखादे घर चालत असे. एसटीडी आयएसडी पिसीओ आणि त्याखेरीज झेरॉक्स, फॅक्स, नंतर नंतर प्रिंटर असे जोडत जोडत एक "कम्युनिकेशन सेंटर" चालवणे नावाचा व्यवसाय खूप तेजीत होता. सायबर कॅफे हा त्या सर्वाचा शेवटचा अध्याय. आता हे सर्व व्यवसाय एका शक्तीने कोंडून घालून आपल्या हातातील एका चौकोनी डबीत आले.
8 Aug 2023 - 7:28 pm | चित्रगुप्त
सफारी आणि गूगल क्रोमपैकी कशातही फोटो दिसत नाहीये. काय करावे काही सुचेना.
8 Aug 2023 - 9:04 pm | अत्रुप्त आत्मा
Uc browser वर पहा . तेथून दिसेल कदाचीत .
8 Aug 2023 - 9:12 pm | अत्रुप्त आत्मा
https://m.facebook.com/story.php?story_fbid=pfbid0g8auZJi58JbUJDZXg9HBjX...
फेसबुका वरुन उचलून कुणाला येथे लावता आले . ., तर पहा .
8 Aug 2023 - 9:45 pm | चित्रगुप्त
आवडली कविता. मात्र 'आनमाने' म्हणजे काय बरें ?
8 Aug 2023 - 10:12 pm | कंजूस
चित्र पाहिलं. फेसबुक पोस्ट.
ते फक्त चित्र वेगळं पुन्हा पोस्ट केलं तर लिंक काढता येईल.