स्वतःचे स्वरूप ,पाहू दे मज डोळा
नाही मी भोळा , कळेल मज .
जाऊ दे मला , माझीया आत्म्याकडे
अन्य कुणीकडे , कळेल निजरूप???
पहीला मी खादाड , नंतरचा आसक्त
त्यानंतर अजून काही (?), भ्रम हा गेला !
आसक्ती हे मूळ , त्यावरी अनंत बांडगूळ
वेगवेगळे खूळ , पोशिले मी आवडीने .
ऐश्या निरंतराची , आहे मज गाठी
याशिवाय पाठी , नाही काही !
आत्मा म्हणे आता , पाहूनी मूळ रुप
होऊ नको तद्रूप , पुन्हा एकदा .
मूळ रुप खरे , जन्मांतरीचे बरे
. साफ करुनी त्याला , घडव पुन्हा .
आहे ऐसी क्रिया , धुवेल मूळ रूप
हाती देईल खूप , पुन्हा मातीचा गोळा .
पुन्हा घडव त्याला , तव जीवनी योग आला
आत्मारती तयाला , सहज विद्या सापडली .
ऐका रसीकजन , बोलते माझे मन
पुन्हा आणखिन , सांगीन तुम्हा काही .
तुम्हीच माझे स्वर्ग , इहलोक हाची सर्ग
तिकडे जायाचा मार्ग , टीका टीप्पणी तुमची !
घेतो आता विराम , स्वल्प काळापुरता
काही हाती उरता , येइन पुन्हा सांगावया !
-----------------------
( जास्ती सिरियस होऊ नका . [ मी तर कधीच नसतो . =)) ] अधिक मासात स्वतःतले उणे शोधण्यासाठी काही डाएट प्लॅन करतोय . त्याचेच हे हलक्या शब्दातले जड काव्य आहे. )
अतृप्त ..
( १५/७/२३ )
#आत्मकाव्य
#आत्म्याच्या_कविता
प्रतिक्रिया
17 Jul 2023 - 5:53 am | प्रचेतस
सुरेख कविता.
अत्रुप्तजी आत्मा यांचे दमदार पुनरागमन.
17 Jul 2023 - 8:59 am | विवेकपटाईत
कविता आवडली
17 Jul 2023 - 9:02 am | कंजूस
काही औषधी थेंब घेऊनी सवे.
शोध तुझा नेईल निज इच्छास्थानी
त्या गूढ मार्गावरी
राहू तुज सदैव साथी
17 Jul 2023 - 9:19 am | गवि
वा चांगले आहे बुवा. वेलकम बॅक.
अता लिहिण्यात खंड नको.
17 Jul 2023 - 6:06 pm | कर्नलतपस्वी
ओस पडले आहे. अधिकाधिक रचना इथे आणून समृद्ध होईल आशी वेडी आशा.
स्वसरूप आवडले.
20 Jul 2023 - 8:22 am | अत्रुप्त आत्मा
प्रचेतस , विवेकपटाईत , कंजूस , गवि , कर्नल तपस्वी
सर्वेषाम् धन्यवादम् .
20 Jul 2023 - 12:19 pm | चौथा कोनाडा
मस्त, भारी आवडली.
आत्मूस गुर्जी +१
मिपाकरांचा असा गौरव पाहून ड्वोले पानावले
20 Jul 2023 - 1:50 pm | राघव
आमचंही काही फार वेगळं नाहीच! प्रयत्न करणं महत्त्वाचं. :-)
20 Jul 2023 - 2:22 pm | चित्रगुप्त
व्वा बुवा, तुमचा "आपणासि जाणावे आपण" वाला 'डाएट प्लॅन' जबरदस्तच आहे.
मिपाने राजकारण-संन्यास घेतल्यापासून जुने जाणते मिपाकर पुन्हा नव्याने प्रकट होऊ लागले आहेत हे उत्तमच.
यापुढील "पुन्हा आणखिन , सांगीन तुम्हा काही .... .येइन पुन्हा सांगावया" ची प्रतिक्षा आहे.
सदा स्वरूपानुसंधान। हें मुख्य साधूचें लक्षण ।
जनीं असोन आपण । जनावेगळा ॥ ९ ॥
स्वरूपीं दृष्टी पडतां । तुटोन गेली संसारचिंता ।
पुढें लागली ममता । निरूपणाची ॥ १० ॥
स्वरूपीं स्वरूपचि जाला । मग तो पडोनिच राहिला ।
अथवा उठोनि पळाला । तरी चळेना ॥ १६ ॥
(श्री दासबोधः दशक ८, समास ९ : सिद्धलक्षण)
20 Jul 2023 - 4:05 pm | राघव
_/\_
8 Aug 2023 - 9:40 am | अत्रुप्त आत्मा
@चौथा कोनाडा, राघव , चित्रगुप्त - धन्यवाद