माझ्या पोर्टफोलिओ मध्ये २ ऍसेट्स आहे. 'हिं', आणि 'मु'
दोन्ही आजघडीला पोर्टफोलिओमधील प्रपोर्शन असे आहे. 'हिं' = ८५ रु आणि 'मु' = १५ रु.
हे दोन्ही ऍसेट्स सरकारी आहेत, आणि यांचा वार्षिक वृद्धी दर CAGR सरकार मोजते.
'हिं' ह्याचा हि CAGR आजघडीला १.९% आहे. (सरकारी मोजमापानुसार)
'मु' ह्याचा हि CAGR आजघडीला २.४% आहे. (सरकारी मोजमापानुसार)
आणि दोन्ही CAGR कमी होत आहेत (सरकारी मोजमापानुसार)..
तरीही असे समजूयात , हे आजघडीला जे CAGR आहेत ते पुढील ९९ वर्षे स्थिर राहतील, (आहे त्या लेव्हललाच राहतील) ('हिं' CAGR = १.९%, 'मु' CAGR = २.४%)
तर ऑनलाईन कॅलक्युलेटर वापरून, गणित केले असता खालील उत्तरे मिळाली.
९९ वर्ष्यानंतर
ऍसेट् हिं = ५७० रु
ऍसेट्स मु = १५७ रु
ऍसेट् हिं ९९ वर्ष्यानंतरसुद्धा, माझ्या पोर्टफोलिओमधील , ऍसेट्स मु च्या साडे तीन पट पेक्षा जास्त राहील.
बाकी तुमचं चालू द्यात...
National Family Health Survey, India
##http://rchiips.org/nfhs/index.shtml
##http://easy-calc.com/financial-calculators/CAGR/Calculate-Final-Amount
प्रतिक्रिया
17 May 2023 - 11:09 am | आनन्दा
यात परकीय गुंतवणूक धरली का?
17 May 2023 - 11:33 am | आंद्रे वडापाव
अति नगण्य
(मागील ८-९ वर्ष्यांची मोजदाद नुसार )
23 Jun 2023 - 9:02 am | आंद्रे वडापाव
23 Jun 2023 - 9:36 am | सुबोध खरे
आकडेवारीने कोणतीही गोष्ट सिद्ध करता येते - सत्य सोडून.
बाकी चालू द्या
18 May 2023 - 2:12 pm | आंद्रे वडापाव
18 May 2023 - 2:16 pm | आंद्रे वडापाव
17 May 2023 - 12:37 pm | सुबोध खरे
बेसिक मध्ये लोच्या आहे.
गुंतवणूक वाढ यात मूळ मुद्दल मृत्यू पावत नसते तर स्थिर असते
लोकसंख्या अमर आहे हे गृहीतक धरले आहे म्हणून गडबड झाली आहे.
लोकसंख्या वाढी मध्ये जर दर २ पेक्षा कमी झाला तर लोकसंख्या कमी होत जाते.
कारण एक जोडप्याच्या बदली (replacement) म्हणून दोन मुले जन्माला आली तर लोकसंख्या स्थिर राहते
दोन पेक्षा जास्त जन्म दर असेल तर लोकसंख्या वाढत जाते
17 May 2023 - 1:23 pm | आंद्रे वडापाव
चला लोकसंख्या अमर नाही हे मान्य केले , तरीही मृत्यूदर सर्वांसाठी सामान असतो ... प्रपोर्शन तसेच राहील.. मोठा भाऊ लहानाच्या साडे तीन पट किंवा त्यापेक्षा जास्त असेल ...
17 May 2023 - 6:19 pm | सुबोध खरे
समर्थन असे होत नाही.
एकाचा वाढीचा दर उणे आणि दुसऱ्याचा अधिक असला तर दोघातील तफावत व्यस्त प्रमाणात वाढत जाते.
गणिती भाषेत कसे समजवायचे ते तज्ज्ञांनी समजवावे
17 May 2023 - 6:37 pm | सुबोध खरे
२१ आणि १९ मधील
आणि
+१ आणि - १ यातील गुणोत्तर यात जबरदस्त फरक पडत जातो.
17 May 2023 - 6:48 pm | आंद्रे वडापाव
पण दोन्ही वार्षिक विकास दर हे अधिक आहेतच..
'हिं' CAGR = १.९%, 'मु' CAGR = २.४%
18 May 2023 - 11:31 am | सुबोध खरे
मी असलेल्या मुदलात २४०० रुपये गुंतवले आणि २००० काढून घेतले तर नक्त नफा वरच्या ४०० रुपयांवर होईल. टक्केवारी किती का असेना
पण मी मुदलात१९०० गुंतवले आणि २००० काढून घेतले तर नक्त नफा होईल कि तोटा?
उणे १०० आणि अधिक ४०० मधील हा फरक (पाच पट) जास्त भयावह असेल.
होणारे मृत्यू हे वाढत्या लोकसंख्ययेचे नसून अस्तित्वात असणाऱ्या लोकसंख्येतुन होणार आहेत. तेंव्हा जिथे जन्म दर जास्त तिथे मृत्यू दर जास्त हा मुद्दा मुळातूनच चुकीचा आहे.
बाकी चालू द्या
18 May 2023 - 11:53 am | आंद्रे वडापाव
म्हणूनच
दोंघांसाठी मृत्युदर शून्य धरला. किंवा
दोंघांसाठी मृत्युदर समान धरून सुद्धा गणित केले तरी, 'हिं' हे 'मु' च्या ३.५ पटी पेक्षा जास्त असतील ९९ वर्ष्यानंतर सुद्धा ...
18 May 2023 - 12:16 pm | सुबोध खरे
आकडेवारीने कोणतीही गोष्ट सिद्ध करता येते.
फक्त सत्य नाही.
17 May 2023 - 10:00 pm | श्रीगुरुजी
१.९% व २.४% हे वार्षिक वृद्धीदर आहेत की दशवार्षिक? म्हणजे १ वर्षानंतर १०० चे १०१.९० होणार की १० वर्षांनंतर १०९ चे १०१.९० होणार?
17 May 2023 - 10:03 pm | कॉमी
टोटल फरतीलिती रेट आहेत माझ्या अंदाजाने.
18 May 2023 - 10:47 am | आंद्रे वडापाव
वार्षिक विकास दर
18 May 2023 - 1:21 pm | टीपीके
माझ्या मते फर्टिलिटी रेट आणि CAGR मधे खूप जास्त फरक आहे, कृपया मूळ संकल्पना सजवून घेऊन परत गणित करा आणि आकडे मांडा , नवीन आकड्यांवर चर्चा अधिक संयुक्तिक होईल.
यात अजून एका गोष्टीचा प्रभाव पडू शकतो का याचाही विचार करावा लागेल आणि तो म्हणजे सरासरी लग्नाचे वय, म्हणजे एका गटात ते २० आणि दुसऱ्या गटात ते २५ असेल तरीही खूप जास्त फरक पडेल. फर्टिलिटी रेट मधे याचा आधीच विचार केला असेल अशी शक्यता वाटते, पण नक्की माहित नाही. मुद्दा समजला नसल्यास Rule of ७२ च्या पद्धतीने विचार करा. तुम्ही शेअर मार्केट मधे सक्रिय असल्याने हा rule तुम्हाला माहिती असेलच.
अर्थात एव्हडा खटाटोप तेव्हाच करा जर तुमच्या गणिताचे तुम्हाला उत्तर पाहिजे असेल नाहीतर तुमचा ज्यावर विश्वास असेल तेच सिद्ध करायचे असेल तर जे चालू आहे ते चालू द्या.
फर्टिलिटी रेट आणि CAGR हे एकच नाही हे माझे म्हणणे चुकीचे असेल तर तेही समजवा
18 May 2023 - 2:01 pm | आंद्रे वडापाव
आपल्यासारख्या अभ्यासूंसाठीच लेखात भारत सरकारची लिंक दिली होती .
National Family Health Survey, India
##http://rchiips.org/nfhs/index.shtml
अनेक वर्षे सातत्याने चालणार हा सर्वे आहे.
लग्नाचे वयाचा बॅण्ड इथे अप्रस्तुत आहे, कारण भारत सरकारच्या सर्व्हेमध्ये
स्त्रीचे जननक्षम वयाचा बॅण्ड वर प्रश्न विचारलेले असतात .. (वय १५ ते ४५).
18 May 2023 - 2:22 pm | टीपीके
माफ करा पण वरवर चाळताना फर्टिलिटी रेट आणि CAGR हे एकच आहे असे दिसले नाही. तुमचा तसा दावा दिसतोय. माझे काही चुकते आहे का?
अगदी साध्य शब्दात (Over simplified ) सांगायचे तर < २ फर्टिलिटी रेट म्हणजे लोकसंख्या कमी होणे, =२ फर्टिलिटी रेट (Also known as replacement rate) म्हणजे लोकसंख्या आहे तितकी राहणे आणि > २ फर्टिलिटी रेट म्हणजे लोकसंख्या वाढणे. परंतु CAGR च्या गणिताने फर्टिलिटी रेट > १ म्हणजे लोकसंख्या वाढणे. बरोबर ना? म्हणूनच मला वाटते तुमचे गणित चुकते आहे.
मी सध्या फक्त गणिताबद्दल बोलतो आहे, माझ्यामते तेच चुकीचे असल्याने पुढील चर्चा व्यर्थ आहे. त्यामुळे वैयक्तिक चिखलफेक न करता आपण गणिताबद्दल बोललो तर तुमचा मुद्दा मला नीट समजेल
18 May 2023 - 2:55 pm | श्रीगुरुजी
मुस्लिमांचा फर्टिलिटी दर २.४ असेल तर प्रत्येकी २ मुस्लिमांमागे २.४ मुस्लिम वाढणार. म्हणजे २०% लोकसंख्या वाढ. या दराने दर १० वर्षांनी २०% वाढ झाली तर दर ३६ वर्षांनी लोकसंख्या दुप्पट होईल. म्हणजेच ९९ वर्षांनंतर आजची २१ कोटी मुस्लिम लोकसंख्या १४०+ कोटी होईल.
हिंदूंचा फर्टिलिटी दर १.९ असेल तर प्रत्येकी २ हिंदूंमागे १.९ हिंदू वाढणार. म्हणजे ५% लोकसंख्या घट. आजची हिंदूंची लोकसंख्या ११९ कोटी. दर १० वर्षांनी ५% कमी झाल्यास ९९ वर्षांनी हिंदू ६५ कोटी असतील व मुस्लिम १४० कोटी. साधारणपणे ७० वर्षांनी मुस्लिम लोकसंख्या हिंदूंपेक्षा जास्त होईल. यात परकीय गुंतवणूक धरली तर यासाठी कदाचित ४०-५० वर्षेच लागतील.
18 May 2023 - 2:59 pm | आंद्रे वडापाव
माझ्या मते, रेट म्हणजे टक्केवारी (%) असते ... म्हणजे उदा प्रत्येक १००० स्त्रियांना (२.४%) रेट ने २४ मुलं होणार ...
बघा बुवा , माझं गणित तर असं म्हणतंय ...या उप्पर तुमची मर्जी ...
18 May 2023 - 3:04 pm | श्रीगुरुजी
१००० मुस्लिम स्त्रियांना फक्त २४ मुले? म्हणजे १००० मधील किमान ९७६ मुस्लिम स्त्रियांना मूलच होणार नाही?
आपले तर्कशास्त्र पूर्णपणे गंडले आहे. आपण दिलेल्या आलेखातच लिहिले आहे २.४ म्हणजे average 2.4 live births per muslim women.
18 May 2023 - 3:06 pm | श्रीगुरुजी
२.४ फर्टिलिटी दर म्हणजे १००० मुस्लिम स्त्रिया २४०० अपत्यांना जन्म देणार. २४ नाही.
18 May 2023 - 4:26 pm | आंद्रे वडापाव
२.४ च्या पुढं % ची खुण असते नं , त्याला फार महत्व असतं बरं.
मराठी प्राथमिक शाळेत शेकडेवारी च्या धड्यात शिकवतात ..
18 May 2023 - 4:32 pm | आंद्रे वडापाव
चला मग काढा हिशेब
१५ % लोकसंख्येच्या एका गटातील स्त्रिया दर हजारी २४०० बाळांना जन्म देणार
आणि
८५% लोखसंख्येतल्या दुसऱ्या गटातील दर हजारी १९०० बाळांना जन्म देणार
९९ वर्ष्यानी दोन्ही गटाची लोकसंख्या काय असेल
18 May 2023 - 4:50 pm | श्रीगुरुजी
येथे उत्तर दिलंय.
आपणास ते समजत नाही किंवा समजून घ्यायचे नाही.
18 May 2023 - 6:20 pm | सुबोध खरे
शेअर बाजार आणि लोकसंख्या यात मूलभूत फरक आहे म्हणूनच मी आपल्या बेसिक्स मध्ये लोच्या आहे हे म्हटलं आहे.
चला मग काढा हिशेब
१५ % लोकसंख्येच्या एका गटातील स्त्रिया दर हजारी २४०० बाळांना जन्म देणार
आणि
८५% लोखसंख्येतल्या दुसऱ्या गटातील दर हजारी १९०० बाळांना जन्म देणार
९९ वर्ष्यानी दोन्ही गटाची लोकसंख्या काय असेल
२४०० बाळांना जन्म देणार आणि त्यातील २००० माणसे ( स्त्री आणि पुरुष मिळून) मृत्युमुखी पडणार. म्हणजे लोकसंख्येत ४०० ची वाढ होणार.
आणि १९०० बाळांना जन्म देणारी २००० माणसे ( स्त्री आणि पुरुष मिळून) मृत्युमुखी पडणार. म्हणजेच लोकसंख्येत १०० ची घट होणार.
हे गणित समजून घेणार असाल तर ठीक आहे नाही तर चालू द्या तुमचं.
19 May 2023 - 8:58 am | आंद्रे वडापाव
बाळाला जन्म देताच त्याचे आई बाप मृत्युमुखी पडणार का ?
काहींच्या काही लॉजिक ...
भारताची लोकसांख्या १४० कोटी.
त्यातले ७० कोटी (कमीच आहेत ) पण समजून जाऊ की महिला आहेत.
रिप्रॉडप्क्टिव्ह वयातील लोकसंख्येतील प्रमाण ६६%
म्हणून ०.६६ * ७० = ४६ कोटी
४६ कोटीचे ८५% हिंदू महिला = ३९.२७ कोटी
१५% मुस्लिम महिला = ६.९३ कोटी
साधारणपणे दरवर्षी जन्माला येणारी बाळे हिंदू = ७४.६ कोटी
मुस्लिम = १६.६ कोटी
साधारणता ५ पट जास्त हिंदू बाळे जन्माला येतात देशात.
19 May 2023 - 9:01 am | आंद्रे वडापाव
बाळाला जन्म देताच त्याचे आई बाप मृत्युमुखी पडणार का ?
काहींच्या काही लॉजिक ...
भारताची लोकसांख्या १४० कोटी.
त्यातले ७० कोटी (कमीच आहेत ) पण समजून जाऊ की महिला आहेत.
रिप्रॉडप्क्टिव्ह वयातील लोकसंख्येतील प्रमाण ६६%
म्हणून ०.६६ * ७० = ४६ कोटी
४६ कोटीचे ८५% हिंदू महिला = ३९.२७ कोटी
१५% मुस्लिम महिला = ६.९३ कोटी
साधारणपणे दरवर्षी हिंदू महिलेच्या रिप्रॉडप्क्टिव्ह वयातील जन्माला येणारी बाळे हिंदू = ७४.६ कोटी
मुस्लिम महिलेच्या रिप्रॉडप्क्टिव्ह वयातील = १६.६ कोटी
साधारणता ५ पट जास्त हिंदू बाळे जन्माला येतात देशात.
19 May 2023 - 9:41 am | सुबोध खरे
बाळाला जन्म देताच त्याचे आई बाप मृत्युमुखी पडणार का ?
समर्थन करण्यासाठी काहीही तर्क वापरायचा?
Replacement level fertility is the level of fertility at which a population exactly replaces itself from one generation to the next. In developed countries, replacement level fertility can be taken as requiring an average of 2.1 children per woman.
https://pubmed.ncbi.nlm.nih.gov/7834459/#:~:text=PIP%3A%20Replacement%20....
असो
आपल्याला समजावून घ्यायचंच नाही तर मी कशाला माझा अमूल्य वेळ फुकट घालवू?
सुज्ञ मिपाकरांना मुद्दा समजला
माझ्यासाठी एवढं पुरेसं आहे
19 May 2023 - 9:46 am | श्रीगुरुजी
पूर्णपणे फसलेल्या तर्काचे केविलवाणे समर्थन करताना अजूनही तर्कहीन विधाने सुरू आहेत. ज्याला टक्केवारी आणि प्रति व्यक्ती हे समान वाटतात त्याच्याकडून तर्कहीन विधानांचीच अपेक्षा आहे.
19 May 2023 - 10:19 am | आंद्रे वडापाव
तुमच्या कडे काही ठोस माहिती आहे कि फक्त ... कैच्या कै सांगत राहायचं
तुमच्या कडे काही ठोस माहिती आहे का ? की येणाऱ्या भविष्यात
"फक्त हिंदू महिलांचा रिप्लेसमेंट रेट हा २.१ पेक्षा कमी राहणार आहे ... आणि
मुस्लिम महिलांचा रिप्लेसमेंट रेट हा २.१ किंवा जास्त राहणार आहे.. तर सांगा. "
बाकी डेटा ट्रेंड पाहून तर कोणीही सांगेल सर्वच जण रिप्लेसमेंट लेवल च्या खाली येणारायेत ...
आणि राहत राहिला मूल्यवान वेळ, तो कोणी दुसऱ्या धर्माविरुद्ध गरळ ओकण्यात का घालवेना .. तो त्या व्यक्तीचा प्रश्न असेल..
18 May 2023 - 3:02 pm | आंद्रे वडापाव
तुम्ही म्हणताय तो 'रिप्लेसमेंट रेट'...
फर्टिलिटी रेट म्हणजे टक्केवारी (%) असते ... म्हणजे उदा प्रत्येक १००० स्त्रियांना (२.४%) रेट ने २४ मुलं होणार ...
18 May 2023 - 3:03 pm | आंद्रे वडापाव
हा प्रतिसाद टिपिके साठी होता ...
18 May 2023 - 4:28 pm | टीपीके
माफ करा, पण मला वाटतंय तुमच गणित गंडलंय. मला वाटत की गुरुजी यांचे वरील गणित बरोबर आहे. फर्टिलिटी रेट हा % मधे नसतो
हे बघा
तुमच्या उदाहरणात "हीं" चा फर्टिलिटी रेट १.९ आहे म्हणजे या पुढे "हीं" ची लोकसंख्या फक्त कमीच होणार , म्हणजे डॉक्टरांच्या भाषेत मुद्दलच राहणार नाही, व्याज सोडून द्या. पण १.९ वरून तुमही काही प्रयत्न केले तर हा रेट परत २ च्या वर जाऊ शकतो आणि लोकसंख्या वाढू शकते, पण ते तितकेसे सोपे नाही. चीन हे त्याचे चांगले उदाहरण आहे. या मागच्या, सामाजिक, सांस्कृतिक आणि मानसशात्रीय कारणांमध्ये मी आत्ता जाणार नाही. पण हाच रेट जर १.६ च्या खाली गेला तर its considered point of no return. मग काहीही केले तर भविष्यात तो वंश, संस्कृती संपते.
18 May 2023 - 4:33 pm | आंद्रे वडापाव
चला मान्य केलं तुमचं म्हणणं तर मग काढा हिशेब
१५ % लोकसंख्येच्या एका गटातील स्त्रिया दर हजारी २४०० बाळांना जन्म देणार
आणि
८५% लोखसंख्येतल्या दुसऱ्या गटातील दर हजारी १९०० बाळांना जन्म देणार
९९ वर्ष्यानी दोन्ही गटाची लोकसंख्या काय असेल
18 May 2023 - 6:21 pm | सुबोध खरे
२४०० बाळांना जन्म देणार आणि त्यातील २००० माणसे ( स्त्री आणि पुरुष मिळून) मृत्युमुखी पडणार. म्हणजे लोकसंख्येत ४०० ची वाढ होणार.
आणि १९०० बाळांना जन्म देणारी २००० माणसे ( स्त्री आणि पुरुष मिळून) मृत्युमुखी पडणार. म्हणजेच लोकसंख्येत १०० ची घट होणार.
हे गणित समजून घेणार असाल तर ठीक आहे
नाही तर चालू द्या तुमचं.
18 May 2023 - 7:33 pm | चंद्रसूर्यकुमार
इतके त्यांना समजेल अशी अपेक्षा आहे? सरासरी घेतली की काही आकडे त्यापेक्षा कमी असतात आणि काही जास्त असतात त्यामुळे जास्त आकड्यांमुळे 'टोकाचे निरीक्षण' (एक्सट्रीम केस) येत नाही ना हे बघायला हवे एवढे साधे त्यांना कळत नाहीये. पूर्ण भारतात सरासरी तपमान समजा २५ डिग्री असेल तरी त्यात सियाचीनमध्ये उणे ४० आणि जैसलमेरला ४७-४८ डिग्री असू शकेल त्यामुळे २५ डिग्रीचे गणित सरसकट सगळीकडे लावता येत नाही, सरासरी वापरताना त्या संकल्पनेची ही मर्यादा आहे हे सुध्दा त्यांना कळत नाहीये. मग हे गणित म्हणजे त्यांच्यासाठी कळणे फारच अवघड. किंवा कळले असले तरी आपल्या म्हणण्याचा हेका कायमच धरायचा असल्याने ते मान्य करणे फारच कठिण.
18 May 2023 - 4:39 pm | टीपीके
खरं तर स्थिर लोकसंख्येसाठी २.१ चा फर्टिलिटी रेट लागतो.
वर्ल्ड बँकेचा हा चार्ट बघा , या वरून तुम्हाला भविष्यातील ट्रेंड समजेल आणि त्याचे परिणाम काय हे मात्र मी तुमच्यावरच सोडतो.
17 May 2023 - 10:18 pm | श्रीगुरुजी
काही जणांकडे हिं ८५ नसून ७०किंवा त्यापेक्षाही कमी आहे व मु ३० किंवा त्याहून जास्त आहे. त्या ठिकाणी परकीय गुंतवणूक सुद्धा खूप जास्त आहे. तस्मात् ९९ वर्षांपेक्षा कितीतरी आधीच पोर्टफोलिओतील हिंचे प्रमाण मुपेक्षा बरेच कमी होऊन पोर्टफोलिओ नुकसानीत जाईल.
17 May 2023 - 10:22 pm | आंद्रे वडापाव
मी वरती भारताच्या केंद्रीय सरकारचे दुवे दिलेत.
तुम्ही विश्वासार्ह दुवा द्या तुमच्या माहितीचा.
17 May 2023 - 10:48 pm | श्रीगुरुजी
https://www.google.com/amp/s/m.economictimes.com/news/india/muslims-cons...
https://www.findeasy.in/west-bengal-population-by-religion/
https://www.census2011.co.in/data/religion/state/1-jammu-and-kashmir.html
17 May 2023 - 10:28 pm | कॉमी
नोंदी-
१.सदर आकडे Fertility rate चे आहेत २००५-०६ आणि २०१५-१६ चे. Fertility rate म्हणजे सरासरी स्त्रियान्ना संपूर्ण आयुष्यात किती मुले होतात तो आकडा.
२. हिंदू आणि मुस्लिम दोघांचा फर्टिलिटि रेट कमी होत आहे. ही बाब राष्ट्रीय सरासरी पाहिली तरी लक्षात येईल.
३. दोघांच्या रेट मधला फरक कमी होत आहे.
४. हिंदी पट्ट्यामध्ये (युपि बिहार) हिंदू व मुस्लिम दोघांचे रेट राष्ट्रीय सरासरीपेक्षा खुप जास्त आहेत.
१०. सध्या देखील दरांमध्ये किरकोळच फरक आहे.
17 May 2023 - 10:50 pm | कॉमी
वर प्ररमाणे आयता चार्ट मिळाला नाही. पण-
१. ट्रेण्ड तसाच आहे. TFR सर्व धर्मं लोकसंख्येचा कमी झाला आहे.
२. NFHS 5 मध्ये सर्व धर्मान्मध्ये मुस्लिमांचा TFR सर्वात जास्त दराने कमी झाला आहे.
३. दोघांच्या रेट मधला फरक आणखी कमी झाला आहे.
.tg {border-collapse:collapse;border-spacing:0;}
.tg td{border-color:black;border-style:solid;border-width:1px;font-family:Arial, sans-serif;font-size:14px;
overflow:hidden;padding:10px 5px;word-break:normal;}
.tg th{border-color:black;border-style:solid;border-width:1px;font-family:Arial, sans-serif;font-size:14px;
font-weight:normal;overflow:hidden;padding:10px 5px;word-break:normal;}
.tg .tg-0lax{text-align:left;vertical-align:top}
नाव
2०१५-१६ (NFHS 4)
2०१९-२१(NFHS 5)
घट %
हिंदू
2.13
1.96
7.98%
मुस्लिम
2.62
2.36
9.92%
फरक
0.49
0.40
-
https://timesofindia.indiatimes.com/india/total-fertility-rate-down-acro...
17 May 2023 - 11:16 pm | कॉमी
हे आकडे बिकडे महत्वाचे नाहीत. आपल्याला काय वाटते हेच महत्वाचे. प्रोपोगंडा ह्या विषयावर लेखन टाकतो पण आकडेवारी वैगरे निरर्थक असते असे म्हणतो. हे आकडे बघणे म्हणजे आपल्या आईवडिलांना पालकत्वाचा पुरावा विचारल्यासारखे आहे.
- माननीय सदस्य.
18 May 2023 - 10:52 am | आंद्रे वडापाव
अरेरे महान गणिती आर्यभट्टाच्या देशात ...
ज्या देशाला गणिताची महान परंपरा आहे त्या देशात ..
माननीय सद्यस्य ... "हे आकडे बिकडे महत्वाचे नाहीत. आपल्याला काय वाटते हेच महत्वाचे.आकडेवारी वैगरे निरर्थक असते" असे जर म्हणत असतील... तर
आर्यभट्टा लिलावती यांचे आत्मे स्वर्गात तळमळत असतील ...
18 May 2023 - 12:10 pm | चंद्रसूर्यकुमार
काश्मीरमध्ये ० डिग्री तपमान आहे आणि तामिळनाडूत ४० डिग्री तपमान आहे याचा अर्थ पूर्ण देशात सरासरी २० डिग्री तपमान आहे. २० डिग्रीमध्ये लोकांना कसे काय गरम होते तेच समजत नाही. अशाप्रकारचे हे आर्ग्युमेन्ट आहे.
२०११ च्या जनगणनेप्रमाणे कोणत्या राज्यात किती मु लोकसंख्या होती हे पुढील टेबलात दिसेल.
https://timesofindia.indiatimes.com/india/census-2011-assam-records-high...
पूर्ण भारतात १५% की किती हे मला माहित नाही. पण काश्मीर, बंगाल, आसाम, केरळ अशा राज्यांमध्ये तो आकडा १५% पेक्षा कितीतरी जास्त आहे हे समजतेच. ती लोकसंख्या वाढायला लागली की मग सुरवातीला अधिक सवलती, मग शरीया कायद्याची अंमलबजावणीची मागणी आणि मग इतरांचे सक्तीचे धर्मांतर/ कत्तली किंवा त्यांना हाकलून देणे हे प्रकार होत असतात हे फक्त डोळ्याला झापडे लावलेल्या बुध्दीमान लोकांनाच दिसत नसते. पूर्ण भारतात १५% (किंवा वाढीचा वेग जो काही आहे तो) एवढाच आकडा आहे मग काय घाबरण्यासारखे आहे असली विधाने त्यातून येतात.
आता समजा १५% आकडा असेल तो ९९ वर्षांनंतरचे या तथाकथित लेखातील आकडे ग्राह्य धरले तर २१.६% होईल. सरासरी २१.६% असेल तर बंगाल, आसाम वगैरे राज्यांमध्ये आतापेक्षा कितीतरी जास्त असेल. हळूहळू मग तिथल्या हिंदूंची अवस्था काश्मीरातल्या हिंदूंसारखीच होणार हे थोडंफार वाचलेल्या आणि माहिती असलेल्या कोणालाही समजू शकेल.
नक्कीच. नुसते सरासरी आकडे बघायचे पण आकड्यातलेच दुसरे काहीही बघायचे नाही, त्या आकड्यांमागचे इतर संदर्भ तर खूपच दूर राहिले असला प्रकार बघून आर्यभट्ट, लिलावतीच नाही तर भास्कराचार्य आणि रामानुजन यांचेही आत्मे स्वर्गात तळमळत असतील.
18 May 2023 - 12:18 pm | सुबोध खरे
आकडेवारीने कोणतीही गोष्ट सिद्ध करता येते.
फक्त सत्य नाही.
18 May 2023 - 1:19 pm | चंद्रसूर्यकुमार
थोडे गणित करू या.
आसामची लोकसंख्या
२००१ मध्ये २.६६ कोटी. त्यापैकी ३०.९% म्हणजे ८२.१९ लाख मु
२०११ मध्ये ३.१२ कोटी. त्यापैकी ३४.२% म्हणजे १०६.७० लाख मु
म्हणजे २००१ ते २०११ या काळात ती संख्या ८२.१९ लाख ते १०६.७० लाख म्हणजे दरवर्षी २.६४% CAGR ने वाढली. म्हणजे देशात २.४% पेक्षा आसामात हा वाढीचा दर जास्त आहे. आणि हो. जर २.४% आणि २.६४% मध्ये फार फरक नाही असे वाटत असेल तर त्याच ९९ वर्षाच्या काळात २.४% आणि २.६४% दरामुळे आकड्यात किती फरक पडेल ते पण बघा.
खरं सांगायचं तर तुम्हाला कसलीच माहिती दिसत नाही. उगीच आर्यभट आणि अजून कोणाकोणाची नावे फेकली, दोन चार आकडे फेकले की समोरचा गारद होईल असा गैरसमज तुमचा असावा असे दिसते. अर्थात काही लोकांचे समर्थक असेच अर्धवट असतात- कशाचा काही पत्ता नाही आणि निघाले गोळीबार करायला. त्यामुळे तुमच्याकडून त्यापेक्षा वेगळी अपेक्षा करणेही चुकीचेच म्हणा.
असो. पूर्णविराम
18 May 2023 - 1:55 pm | श्रीगुरुजी
हे मी कालच लिहिले होते. परंतु आपलाच चुकीचा मुद्दा पुढे रेटायचा असल्याने त्याकडे दुर्लक्ष केले गेले. आसाम, केरळ, जम्मू-काश्मीर, बंगाल येथे मु राष्ट्रीय सरासरीपेक्षा खूप जास्त आहे. तस्मात् तेथे ९९ वर्षे पूर्ण होण्याधीच गुणोत्तर उलटे होऊ शकते. विवाहाच्या वेळचे वय हा अजून एक महत्त्वाचा मुद्दा आहे. तस्मात् हा तथाकथित CAGR मुसाठी वेगाने वाढतो.
18 May 2023 - 1:56 pm | आंद्रे वडापाव
तुम्ही हे जे सिलेक्टिव्ह आसाम पुरते गणित मांडलय ना !! सुरेखच ... फक्त काय आहे ना
संपूर्ण भारताच्या साठी हेच गणित पुन्हा एकदा मांडा ...
आणि हो
सर्वच प्रकारच्या गटासाठी हं ... कृपया एकाच गटासंबंधात गणित मांडले असे नको..
आमचा देखील, येडं घेऊन पेड जाणार्यांना, कोपरापासून हात जोडून नमस्कार ...
18 May 2023 - 12:04 pm | गवि
नेमके काय सिद्ध करायचे आहे ते कळले नाही. पण. आज १५:८५ म्हणजे १: ५.६ असे असलेले मु : हिं गुणोत्तर शंभर वर्षांनी १: ३.६ मु : हिं असे होईल हे कळले. पण हे एका दिशेने बघत आहोत. याच असेट्सबाबत काही हिस्टोरिकल डेटा? उदा. शंभर वर्षांपूर्वी आणि आता. कोणताही ट्रेण्ड आजपासून सुरू आणि पुढची शंभर वर्षे असा एका दिशेत बघणे अचूक नाही.
बाकी १:५.६ आणि १:३.६ याबद्दल प्रत्येकाची वेगवेगळी मते असू शकतील. त्याबद्दल बरेवाईट काय असेल त्यात न पडता सध्या चालू असलेल्या गणितीय चर्चेबाबत हे मत आहे. माझ्या मते असली गणितेच मुळात करू नयेत. जी काही ग्रोथ, घट करायची ती सर्वांना एकत्र घेऊन करावी. सर्वांनीच काळाच्या ओघात आपल्या परीने सौम्य होण्याकडे आणि सौम्य करण्याकडे प्रवास ठेवावा. हिं किंवा मु अशा दोन्ही गटांत पुन्हा उपगट करून अशीच वाढ दर काढला तर प्रचंड वेगवेगळे आकडे असतील.
18 May 2023 - 1:10 pm | आंद्रे वडापाव
उपलब्ध माहिती नुसार .. गेली अनेक दशके , वार्षिक वृद्धी दर, कमी होताच आहे ...
तुम्ही कसही, स्लाइस किंवा डायस करून पहिल तरीही ..
टाइम , रिलिजन, स्टेट वै
सहमत
सुदैवाने तसेच होत आहे..
२०६५ पर्यंत उच्च्तम शिखर (वाढीचे ) येईल ... नंतर सगळं ओसरायला लागेल ... ९९ वर्षे सुद्धा थांबण्याची आवश्यकता नाही ...
18 May 2023 - 1:32 pm | गवि
अगदी. शिवाय ज्यांची लोकसंख्या वाढेल ते आणखीच गाळात जातील ही शक्यता अधिक. कुठेतरी सेल्फ balance किक इन होतोच. संख्या वाढत जाणे याचा अर्थ आपोआप समृद्धी आणि बळ वाढत जाणे असा नव्हे. झालेच तर उलट होते.
आता यात balance ठेवण्यासाठी हिं ग्रोथ रेट देखील वाढवावा असे कोणी म्हणेल तर..
कोणीही ग्रोथ रेट वाढवणे हे पायावर कुऱ्हाड मारणे आहे. याने दुसऱ्याचा ग्रोथ रेट कमी होणार नसून दोघेही अधिक वेगाने गाळात जातील.
नैसर्गिक साधन संपत्ती आणि इतर सोर्स मर्यादितच राहणार आणि जो संख्येने अधिक वाढेल तो अधिक दरिद्री होणार.
सो थोडक्यात, या गणितात मुद्दा काय तेच कळत नाही.
18 May 2023 - 6:27 pm | सुबोध खरे
स्वातंत्र्याचे वेळेस भारताची लोकसंख्या ३७ कोटी होती ती आता चौपट झाली आहे. त्याच कालावधीत पाकिस्तानची लोकसंख्या मात्र सात पट झाली आहे. आणि आर्थिक स्थिती मात्र भयंकर आहे.
उद्या केवळ मुसलमानांची संख्या वाढत राहिली तर भारताचा पाकिस्तान व्हायला वेळ लागणार नाही.
त्यांचा एकही नेता लोकसंख्या नियंत्रणात ठेवा असे म्हणत नाही.
यासाठी समान नागरी कायदा, एकच लग्न आणि दोनच मुले दोन पेक्षा जास्त मुले असतील तर सर्व सरकारी योजना/ लाभांपासून संपूर्ण विभक्ती हे धोरण सक्तीने राबवण्याची वेळ आली आहे.
18 May 2023 - 6:45 pm | आंद्रे वडापाव
18 May 2023 - 4:39 pm | कॉमी
गेल्या सरव्हेज मध्ये TFR मुसलमानांचा सर्वात वेगाने कमी झाला आहे. हिंदू आणि मुसलान दोन्ही TFR मधला फरक गेल्या प्रत्येक सर्व्हे मध्ये कमीच होतो आहे.
18 May 2023 - 4:55 pm | आंद्रे वडापाव
भारताच्या लोकसंख्येच्याबाबतीतील एका भाकितांनुसार, भारताची अत्युच्च लोकसंख्या साधारण २०५० साली येईल ( २०० कोटी च्या आसपास )
आणि तिथून घसरणीला लागेल...
आणि हो (माननीय सदस्यांसाठी ) "संपूर्ण भारताची" लोकसंख्या घसरणीला लागेल बरं, कुठल्या एका विशिष्ठ धर्माची नव्हे ...
18 May 2023 - 5:15 pm | श्रीगुरुजी
आपल्याला जननदर, वृद्धीदर यातील भेद समजत नाही (आणि समजून घ्यायचाही नाही) व असल्या भाकितांचा अर्थही समजत नाही. तस्मात् असे चुकीच्या गृहीतकांवर आधारित लेख व प्रतिसाद येतात.
18 May 2023 - 5:31 pm | आंद्रे वडापाव
"लोकसंख्येचा जननदर" आणि "लोखसंख्येचा वृद्धिदर" यातील फरक तुम्ही सांगा बरं ...
18 May 2023 - 6:16 pm | श्रीगुरुजी
गुगलून पहा, स्वतः अभ्यास करा आणि मग लिहा.
18 May 2023 - 6:19 pm | आंद्रे वडापाव
माझ्या मते तरी, "लोकसंख्येचा जननदर" आणि "लोखसंख्येचा वृद्धिदर", हे दोन्ही सेम.
तुमचे मत सांगा.
18 May 2023 - 7:08 pm | श्रीगुरुजी
माझे मत व स्पष्टीकरण आधीच दिले आहे.
18 May 2023 - 6:54 pm | सुबोध खरे
माझ्या मते तरी, "लोकसंख्येचा जननदर" आणि "लोखसंख्येचा वृद्धिदर", हे दोन्ही सेम.
आपल्या बेसिक्स मध्ये लोच्या आहे हे मला परत परत लिहावे लागते आहे
लोकसंख्येचा जननदर" म्हणजे लोकसंख्येत जन्म घेणाऱ्या बालकांचा दर
तर
लोखसंख्येचा वृद्धिदर म्हणजे
(लोकसंख्येत जन्म घेणाऱ्या बालकांचा दर अधिक लोकसंख्येत आयात होणाऱ्या (immigration) लोकांचा दर)
वजा
(मृत्यू दर अधिक लोकसंख्येत निर्यात होणाऱ्या (emigration) लोकांचा दर).
आपली फार गल्लत होत आहे. मुद्दल( लोकसंख्या) आणि व्याज (जन्म घेणारी बालके).
यात मुदलात होणारी घट( मृत्यू) आपल्या लक्षातच येत नाहीये
गुगलून पहा हवं तर
18 May 2023 - 6:55 pm | सुबोध खरे
Birthrate is defined as the number of individuals born into a population,
whereas population growth is the result of birthrate and immigration minus death rate and emigration, or the total net increase in the population size.
18 May 2023 - 8:20 pm | कॉमी
हिंदू व मुस्लिम दोन्ही लोकसंख्येचा TFR कमी होत आहे. मुस्लिम लोकांचा TFR आत्ता हिंदू लोकांपेक्षा जास्त असला तरी तो हिंदू लोकसंख्येपेक्षा जास्त वेगाने कमी होत आहे. त्यामुळे हिंदू मुस्लिम TFR मधली दरी प्रत्येक सर्व्हे मध्ये कमी झालेली आढळते. त्यामुळे सरळ साधी भौमितिक श्रेणी वापरून गणित करायचे असल्यास हा कमी होणारा TFR पण घ्या.
अर्थातच, फक्त धर्माच्या चष्म्यातून ह्या विदा कडे बघणे हे तितकेसे संयुक्तिक नाही. त्यामध्ये आर्थिक सुबत्ता, शिक्षणाची पातळी, भौगोलिक भागातल्या सामाजिक रूढी ह्या सगळ्या धर्माशी थेट संबंधित गोष्टींची भिंगे सुध्दा चढवली पाहिजेत.
18 May 2023 - 8:21 pm | कॉमी
थेट संबंधित नसलेल्या* असे वाचा.
18 May 2023 - 8:44 pm | सुबोध खरे
तितकेसे संयुक्तिक नाही
मग किती संयुक्तिक आहे?
धर्माच्या पगड्यामुळेच ते अशिक्षित दरिद्री आणि सुधारणांना विरोध करताना आढळतात.
याला कायद्याचा बडगाच आवश्यक आहे अन्यथा भारताचा पाकिस्तान व्हायला वेळ लागणार नाही.
20 May 2023 - 6:30 pm | कॉमी
आजिबात संयुक्तिक नाही. कोणतीही लोकसंख्या धर्म ह्या एका गुणधर्माभोवती फिरत नसते. सर्व demographic contexts मध्ये न पाहता फक्त आणि फक्त धर्माच्या चष्म्यातून ह्या अकड्यांकडे पाहण्याला शून्य अर्थ आहे. त्यासाठी सर्व factors साठी adjust केलेली स्टडी लागते.
18 May 2023 - 8:55 pm | कॉमी
बहुविवाह विदा.
NFHS ५ प्रमाणे - (लोकसंख्येच्या किती % लोक बहुविवाहित आहेत ?)
१. इतर धर्म - २.५%
२. ख्रिश्चन - २.१%
३. मुस्लिम - १.९%
४. हिंदू - १.३ %
(गेल्या NFHS विदा शी तुलना केल्यास सर्व धर्मांमध्ये बहुविवाह कमी होत आहे.)
ह्याचा अर्थ हा -
भारतात बहुविवाह अतिशय कमी प्रमाणात होतात. हिंदू आणि मुस्लिम लोकसंख्या बहुविवाह प्रमाणात फारसा फरक नाही आहे.
त्यामुळे दोन बायका आणि १० मुले असलेला मुसलमान माणूस हा सन्माननीय सदस्यांच्या डोक्यातील बुजगावणे आहे. ह्याचा अर्थ असा नाही की असे कोणीच नाही, पण असे लोक असले तरी ते अपवाद म्हणावेत इतके कमी आहेत.
18 May 2023 - 8:56 pm | कॉमी
https://m.timesofindia.com/india/why-polygyny-is-not-about-muslims-alone...
18 May 2023 - 9:46 pm | धर्मराजमुटके
केवळ जनन दर, मृत्यु दर यावरुनच लोकसंख्येतील हिंदू, मुस्लीम लोकसंख्येचा वाटा ठरेल की त्यात धर्मांतरीत आणि स्थलांतरीत जनतेचा पण हिशोब होईल ? दरवर्षी किती लोक कोणता धर्म सोडतात, कोणता नवीन धर्म स्वीकारतात याची नोंद कुठेतरी होत असेल तर ते देखील पहावे लागेल.
बरेचसे लोक भारत सोडून बाहेर जात आहेत त्यामुळे इतर राष्ट्रांत (कमीत कमी इंग्लंडात) हिंदू जनसंख्या वाढलीय काय ? आणि त्याच्यामुळे इतर धर्मीय चिंतातूर झाले आहेत अशा काही बातम्या येतात काय ?
एकाच परिच्छेदात खूप प्रश्न झाले असेल तर माफ करा.
19 May 2023 - 8:05 am | आंद्रे वडापाव
भारतातील प्रत्येक ५० पुरुषांमागे, स्त्रिया ४९ किन्वा ४८ या रेंज मध्ये आहे ..
लिंग गुणोत्तर बघा .. आणि वर्ष्यानुवर्षे ते घसरत आहे ...
आणि हो , भारतातील मनुष्य प्राण्याविषयी बोलतोय मी इथे.
19 May 2023 - 7:28 pm | तर्कवादी
आंद्रे वडापाव,
आपला धागा काढण्याचा हेतु चांगला आहे. पण काही प्रतिसादांत म्हंटले गेल्याप्रमाणे TFR ची CAGR शी तुलना करणे तितकेसे योग्य नाही. आणि त्यामुळे बरीचशी चर्चा त्याच मुद्द्याभोवती झाली . याची प्रमुख दोन कारणे TFR म्हणजे लोकसंख्या वाढीचा दर नव्हे कारण त्यात मृत्यू दर अंतर्भुत नाही. आणि दुसरे कारण TFR म्हणजे एक स्त्री तिच्या जीवनकाळात किती मुलांना जन्म देते ते. ती दरवर्षी जन्म देते असे नाही. त्यामुळे इथे वर्षांचा संबंध नाही. लोकसंख्या वाढीचे काही गणिती प्रारुप जालावर बहुधा मिळू शकतील आणि त्यात योग्य ते आकडे टाकलेत तर ढोबळ मानाने उत्तरे मिळतील.
पण मुद्दा तो नाही. भारतातील सर्वच धर्मियांचा TFR हळूहळू कमी होत जाणार आहे. मग लोकसंख्या कमी होत जाईल. मी एका ठिकाणी वाचले होते की TFR २.२ पेक्षा कमी असल्यास लोकसंख्या कमी होत जाते.
त्यातही कॉमी यांनी दिलेल्या २०१५-१६ च्या तक्त्यांकडे बघता हिंदू व मुस्लिमांच्या TFR मध्ये फारसा फरक राहिलेला नाही हेच दिसते.
पण मुळात लोकसंख्या म्हणजेच सर्व काही नाही .. वाढत गेलेली लोकसंख्या म्हणजे खूप मोठी शक्ती असे काही नाही. पारशी लोकांची जनसंख्या खूप कमी आहे. पण त्यामुळे ते चिंतीत झालेत असं दिसत नाही. इतकी कमी लोकसंख्या असूनही त्यांचा TFR वाढवण्यावर भर आहे असे वाटत नाही. अगदी आदर पूनावालासारख्या श्रीमंत पारशी व्यक्तीला दोनच मुले आहेत.
मुस्लिमांची लोकसंख्या वाढल्याने भारत हे मुस्लिम राष्ट्र होईल ही भिती अनाठायी आहे. वर्तमानात भारताची मुस्लिम लोकसंख्या १४% आहे पण त्यांचे संसदेत वा राज्यांच्या विधानसभांत कितीसे प्रतिनिधित्व आहे याचाही विचार करायला हवा.
19 May 2023 - 7:44 pm | तर्कवादी
काही प्रतिसादात मत मांडले आहे की ज्या राज्यांत मुस्लिमांची संख्या वाढते आहे त्या राज्यातील हिंदूंची स्थिती ही काश्मीरमधील हिंदूंप्रमाणे होणार.
याचाच अप्रत्यक्ष अर्थ की काश्मीरमधील दहशतवाद वा इतर प्रश्न यांचा दोष फक्त आणि फक्त मुस्लिमांची लोकसंख्या आहे. हा प्रचार द्वेषमूलक आहे. हे म्हणजे महाराष्ट्र , छत्तीसगड, झारखंड ई राज्यांत काही भागांत अस्तित्वात असलेला नक्षलवादाचा दोष फक्त आणि फक्त आदिवासी लोकसंख्येला देण्यासारखे आहे. काश्मीर प्रश्न हा पुर्णतः वेगळा प्रश्न आहे. आणि इतर राज्यांची काश्मीरशी तुलना होवू शकत नाही.
19 May 2023 - 8:48 pm | आंद्रे वडापाव
होय तुमच्या प्रतिसादाशी अत्यंत सहमत.
"हिंदू खत्रेमे है" च्या प्रचारकी दुषप्रचाराला, मेटाफॉरीकली सांगितलेल्या गुंतवणुकीच्या गोष्टीत, काही शब्द सम्मुच्चायाची, माझी निवड, आणखी जास्त सयुक्तिक असायला हवी होती, याची जाणीव मला झाली आहे.
(असो
माझा दुसऱ्या एका सन्माननीयला आधीच वर एकदा दिलेला प्रतिसाद पुन्हा खाली डकवत आहे)
भारताची लोकसांख्या १४० कोटी.
त्यातले ७० कोटी (कमीच आहेत ) पण समजून जाऊ की महिला आहेत.
रिप्रॉडप्क्टिव्ह /प्रजननक्षम वयातील (१५ ते ४९ वर्षे) लोकसंख्येतील प्रमाण ६६%
म्हणून ७० चे ६६% = ४६ कोटी
४६ कोटीचे ८५% हिंदू महिला = ३९.२७ कोटी
१५% मुस्लिम महिला = ६.९३ कोटी
साधारणपणे हिंदू महिलांच्या प्रजननक्षम वयात, जन्माला येणारी हिंदू बाळे = ७४.६ कोटी
मुस्लिम महिलेच्या प्रजननक्षम वयात जन्माला येणारी मुस्लिम बाळे = १६.६ कोटी
साधारणता ५ पट जास्त हिंदू बाळे जन्माला येतात देशात.
तरीही हिंदू खतरेमे कसा ?
आणि
८५% लोकसंख्येला १५% लोकसंख्येचा न्यून गंड यावा का ?
20 May 2023 - 9:51 am | सुबोध खरे
हिंदू खतरेमे कसा ?
शहामृगी वृत्ती सोडून द्या.
इतिहासाकडे लक्ष दिले तर इराक इराण आगगाणिस्तान पाकिस्तान बांगलादेश हि सर्व राष्ट्रे आपले मूळ धर्म सोडून तलवारीच्या जोरावर मुसलमान केली गेली आहेत.
Before the partition, according to the 1941 census, Hindus constituted 14.6% of the population in West Pakistan (which is now Pakistan)[a] and 28% of the population in East Pakistan (now Bangladesh)
काश्मीर मधील हिंदू लोकाना नेसत्या वस्त्रानिशी बायकांना सोडून पलायन करायला लागले आहे या इतिहासा चा आपल्याला इतक्यात विसर पडला?
पण इतिहास विसरणाऱ्या लोकांना इतिहास कधीही क्षमा करत नाही.
27 Jun 2023 - 10:22 am | इपित्तर इतिहासकार
पण इतिहास विसरणाऱ्या लोकांना इतिहास कधीही क्षमा करत नाही.
इतिहासाचे सोयीस्कर अन् सिलेक्टिव परिशीलन करणाऱ्यांना इतिहास क्षमा करत असेल का ??
मग ते उजवे असो वा डावे....
काश्मिरी हिंदू मुद्दा बरोबर आहे तुमचा.
20 May 2023 - 5:31 pm | चौकस२१२
"हिंदू खत्रेमे है" च्या प्रचारकी दुषप्रचाराला
समजणाऱ्यानी एकदा स्वता अल्पसंख्यानक होऊन बघावे
27 Jun 2023 - 10:25 am | इपित्तर इतिहासकार
शतप्रतिशत सहमत.
बऱ्याचवेळा मला वेस्टर्न कंट्रीज मध्ये सेटल होऊन सतत अब्रहामिक मेंटलीटी मध्ये वावणाऱ्या लोकांची पण दया येते. सरते शेवटी बिचारे ते पण मानसिकतेने अब्रहमिक होऊन जातात......
अग्रेसिव हिंदुत्व असेल तर अशा लोकांना एक हक्काचे व्यासपीठ होईल.
20 May 2023 - 12:13 am | तर्कवादी
अशा एखाद्या राज्यात जरी हिंदूंची लोकसंख्या मुस्लिमांपेक्षा कमी झाली (खरे तर अशक्य कोटीतली गोष्ट आहे पण तरी सध्या गृहीत धरु) आणि राज्याच्या विधानसभेत मुस्लिमांचे प्रतिनिधित्व निम्म्यापेक्षाही वाढले तरी असे कितीसे कायदे ती विधानसभा बदलू शकेल ? आणि नव्याने केलेले वा बदललेले कायदेही घटनेच्या चौकटीतच असायला लागतील ना ? घटनेचा ढाचा तर राज्य नाही बदलू शकणार ? राहता राहिली भिती की कायदा/घटना बदलणार नाही पण अराजक होईल, हिंदूवर अत्याचार होतील असं मानलं तर केंद्राला राष्ट्रपती राजवट लावायचा अधिकार उरतोच ना. मग इतकी कसली भिती आहे ? बरं भिती आहेत तर उपाय काय म्हणे ? हिंदूंनी चार-पाच मुलांना जन्म द्यायला हवा असा काही उपाय सुचवायचा आहे का " भारतातील मुस्लिमांची लोकसंख्या" यावर चिंतीत होणार्या लोकांना ? सुचवला तरी तो बहुसंख्य हिंदूना मान्य होणार आहे का ?
20 May 2023 - 9:41 am | सुबोध खरे
हिंदूवर अत्याचार होतील असं मानलं तर केंद्राला राष्ट्रपती राजवट लावायचा अधिकार उरतोच ना. मग इतकी कसली भिती आहे ? बरं भिती आहेत तर उपाय काय म्हणे ? हिंदूंनी चार-पाच मुलांना जन्म द्यायला हवा असा काही उपाय सुचवायचा आहे का " भारतातील मुस्लिमांची लोकसंख्या" यावर चिंतीत होणार्या लोकांना
पश्चिम बंगाल मध्ये काय होत आहे याकडे डोळेझाकच करायची असेल तर सोडून द्या. तेथे सरसकट अत्याचार होत असताना केवळ मुसलमान मतांकडे डोळे ठेवून त्याकडे दुर्लक्ष करणारे सरकार बरखास्त कार्याला हवे परंतु केंद्र सरकारचे हात न्यायालयांनी बांधलेले आहेत.
West Bengal Child Rights Commission oppose deportation of Rohingya children in Supreme Court
https://www.hindustantimes.com/india-news/west-bengal-child-rights-commi...
हिंदूंनी ४-५ मुले जन्माला घालणे हे चूक असून दोनच मुले असली पाहिजेत याचा कायदा सर्व धर्माना लागू करून कडक पणे अमलात आणायला हवा
23 May 2023 - 1:18 pm | तर्कवादी
याने प्रश्न (जो तुमच्या मते आहे) सुटेल ? कारण दोन तर दोन ..पण सगळे मुस्लिम जोडपी दोन मुलांना जन्माला नक्कीच घालतील (कारण ते तर ठरवून लोकसंख्या वाढवत आहेत ना !!) पण हिंदूंमध्ये एक अपत्यानंतर थांबणारी , विनापत्य जीवनशैली जगणारी जोडपी (यात लग्न केलेले वा लिव्ह इन मध्ये राहणारे आलेत) , लग्न न केलेल्या स्त्रिया असे सगळे आलेत त्यामुळे हिंदूंचा वास्तवातला TFR २ पेक्षा बराच कमी असेल (कदाचित १ च्या किंचित वर) तर मुस्लिमांचा TFR २ पेक्षा किंचितसाच कमी असेल. म्हणजे मुस्लिमांची लोकसंख्येतील टक्केवारी तर तेव्हाही वाढत राहिल. मग काय करावे ? हिंदूंना लग्न करण्याची, दोन अपत्ये जन्माला घालण्याची सक्ती करण्याचा कायदा करायचा काय ?
24 May 2023 - 11:45 am | आंद्रे वडापाव
होय, हिंदूंनी कमीतकमी २ (जास्तीतजास्त कितीही .. जय श्रीराम ) मुले जन्माला घालावी...
आणि उत्तेजनासाठी हे सरकार त्यांच्या पालनपोषणाकरिता, प्रत्येक जन्माला घातलेल्या आपत्या नुसार, प्रत्येकी १५ लाख रुपये (रक्कम ओळखीची वाटल्यास निव्वळ योगायोग समजावा) , पालकांच्या अकाउंटवर जमा करतील ...
20 May 2023 - 5:49 pm | चौकस२१२
घटनेचा ढाचा तर राज्य नाही बदलू शकणार
त्याची वाट पाहायची आहे का? आणि अगदी घटना बदलणे अवघड असेल तरी आपल्याला ना आवडणारी परंतु मानव जाती साठी आणि देशासाठी महत्वाचं असलेलया कायदें करण्यावर " हे इस्लाम विरोधी आहे" म्हणून अडवणूक होऊ शकते ( इदा ट्रिपल तलाक वर बंदी नको )
हज ला सबसिडी वाढवा इत्यादी
अहो हिंदू बहुल भारतातातील जाऊद्या वेगलय वर्णाचचे मुस्लिम राष्ट्रातील किती उदाहरणे देऊ? इंडोनेशिया आणि ब्रुनेई चे वहाबी करण बघ
. जगात बघ "ट्रेंड " काय आहे ते
खुद्द भारतात हि "शुद्ध इस्लाम पाळा यासाठी काय चालते आहे यात कलाकार झिशान आयुब काय म्हणतो ते पहा
https://www.youtube.com/watch?v=jzVrxw-Fj-A&t=214s
20 May 2023 - 9:36 am | सुबोध खरे
काश्मीरमधील दहशतवाद वा इतर प्रश्न यांचा दोष फक्त आणि फक्त मुस्लिमांची लोकसंख्या आहे
१०० % नसला तरी ८५ % नक्कीच आहे.
काश्मीरची लोकसंख्या हिंदू बहुतांश असती तर तेथे दहशतवाद्यांना मिळणारा पाठिंबा फारसा मिळाला नसता हेही तितकेच सत्य आहे.
पंजाब मधील दहशतवाद निपटून काढण्यात भारताला आलेले यश याचे हे एक मोठे कारण आहे.
पुरोगामी दांभिक दृष्टिकोन बाजूला ठेवला तरच सत्य जाणवू शकेल.
20 May 2023 - 5:36 pm | चौकस२१२
काश्मीरमधील दहशतवाद वा इतर प्रश्न यांचा दोष फक्त आणि फक्त मुस्लिमांची लोकसंख्या आहे
तसे नसते तर जम्मू आणि विशेषतः लडाख जिथे बुद्ध बहुसंख्या आहेत तिथे "भारत सरकार " विरुद्ध काश्मीर एवढा तिरस्कार का नाही?
जिथे जिथे मुस्लिम बहुसंख्यांक होतात तिथे तिथे इस्लाम वर आधारित राजय असावे हे मूलभूत आहे त्याचं कडे कानाडोळा केलात जनाब तर आज ना उदय आपलं धर्म ( आपण हिंदू अहहत असे गृहीत धरून ) नामशेश होण्याकडे वाटचाहल करणार
याचे मूळ कारण इस्लाम आणि ख्रिस्ती धर्म हे विस्तारवादी आहेत .. येवध समजत नसले तर धन्य आहे
20 May 2023 - 9:22 am | सुबोध खरे
पारशी लोकांची जनसंख्या खूप कमी आहे. पण त्यामुळे ते चिंतीत झालेत असं दिसत नाही.
संपूर्णपणे गैरसमजावर आधारित प्रतिसाद
20 May 2023 - 5:54 pm | चौकस२१२
अगदी बरोबर.. पारशी लोकांसमोरील सर्वात मोठा प्रश्न आहे हा .. श्रीमन्ती असून/ दुसरे कोणी त्यांना दुय्यम वागणूक देत नसून सुद्धा
अलिबाग भागातील मराठी भाषिक लोक सुद्धा नामशेष होत आहेत
या डोघही अल्प अल्प संख्यांक आहेत आणि यांनी भारतात धोका नसून सुद्धा त्यांना हि काळजी आहे
.. हिंदू जरी ८०% असले तरी धर्मांतराने तो आकडा हळू हळू कमी होईल किंवा काही ठराविक ठिकाणी कमी होईल आणि एक देश म्हणून त्याबद्दल चिंता असणे स्वाभाविक आहे .. उदय भारतात व आय सी चे सभासद व्हावे लागेल मग त्यांचा फतवा मानव लागेललं.. कोणालाच हे परिणाम समजत नाहीत का ?