काही वाक्ये अशी आहेत कि त्याला फार मोठा इतीहास आहे आणि ती अजरामर झालेली आहेत. मला माहित असलेली काही टंकत आहे, तुम्हिही भर घाला. वाक्यांबरोबर त्यांचा संदर्भ, काल अशी पुरक माहिती पण द्यावी.
१. "माझ्या बंधु आणि भगिनींनो" - स्वामी विवेकानंदांचे हे (अर्ध) वाक्य अतिशय प्रसिद्ध् तर आहेच, पण आपल्या भारतिय संस्कॄतीची सर्व जगाला ओळख करून देणारे आहे. स्थळ - शिकागो.
२. "I have a Dream" - मार्टीन ल्युथर किंग ह्यांचे हे वाक्य (आणि त्या नंतरचे भाषण) वर्णद्वेषाविरूद्द् चळवळीचा एक मोठा भाग मानला जातो. - स्थळ - वॉशिंटन
३. "चले जाव" - जास्ती सांगायची गरज नाहीये...
हि पुर्ण वाक्ये नसून काही मोजक्या शब्दांची गुंफण आहे कि त्याने ईतिहास बदलला... अजून माहिती असतील तर ईथे लिहा....
- अडाणि.
प्रतिक्रिया
5 May 2009 - 11:35 am | महेश हतोळकर
स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच.
हे राज्य व्हावे हि तो श्रींची इच्छा.
तुम मुझे खून दो मै तुम्हे आजादी दुंगा
5 May 2009 - 11:42 am | विसोबा खेचर
ही आमची आवडती वाक्ये -
१) योगापेक्षा भोग मोठे आहेत!
२) शेवटी नियतीच खरी! तिचा मार पडला की भले भले सुधारतात..!
तात्या.
5 May 2009 - 11:44 am | चिरोटा
"The law will take its own course"
"Inaction is also an action"
पी.व्हीं नरसिंहराव
भेन्डि
क्ष्^न + य्^न = झ्^न
5 May 2009 - 11:56 am | परिकथेतील राजकुमार
Hector: You Say You're Willing To Die For Love But You Know Nothing About Dying And You Know Nothing About Love!
--------------------------------------------------------------------------------
Hector: All My Life I've Lived By A Code And The Code Is Simple: Honor The Gods, Love Your Woman And Defend Your Country.
चित्रपट ट्रॉय.
(अंतरजालावरुन साभार)
हेक्टर मध्ये कुठेतरी मृत्युंजय कर्णाला शोधणारा
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य
5 May 2009 - 12:02 pm | नितिन थत्ते
गॉड डझ नॉट प्ले डाईस.- आइन्स्टाइन.
(हे वाक्य त्याने पुंजयांत्रिकीची खिल्ली उडवण्यासाठी उच्चारले होते. परंतु पुढे त्याला आपली चूक झाल्याचे मान्य करावे लागले. तसा या वाक्याने काही इतिहास वगैरे घडला नाही)
खराटा
(रंग माझा वेगळा)
5 May 2009 - 12:03 pm | दशानन
गरिबी हटावो ! - इंदिरा गांधी
* गरिब लोकांचे काय भले झाले माहीत नाही पण नेते मंडळींची गरिबी नक्कीच पळुन गेली ;)
थोडेसं नवीन !
5 May 2009 - 12:05 pm | घाटावरचे भट
'कसा मी? कसा मी? कसा मी? कसा मी? जसा मी तसा मी असा मी असा मी' इति भाईकाका देशपांडे
5 May 2009 - 12:08 pm | विशाल कुलकर्णी
तुम मुझे खुन दो मै तुम्हे आझादी दुंगा (आदरणीय नेताजी)
बचेंगे तो और भी लडेंगे (रणझुंझार दत्ताजी शिंदे)
मेरी झांसी नही दुंगी ( राणी लक्ष्मीबाई)
सस्नेह
विशाल
*************************************************************
इतक्या वर्षानंतर तिला पाहिली तेव्हा कशी भासली सांगु....
कल्पनेतला "ताजमहाल" हिणकस ठरला !!! :-) :-)
5 May 2009 - 12:20 pm | अमोल केळकर
'हर हर महादेव '
--------------------------------------------------
छोट्या दोस्तांसाठी गंमत गाणी इथे वाचा
5 May 2009 - 12:28 pm | नितिन थत्ते
'दीन दीन'
खराटा
(रंग माझा वेगळा)
5 May 2009 - 1:10 pm | निखिलराव
"जय हो"
तसा या वाक्याने काही इतिहास वगैरे घडेल असे वाट्त नाही.
5 May 2009 - 1:51 pm | मनीषा
" If you love something , set it free
if it comes back to you, it is yours,
if it dosen't ............ it never was "
--- Oscar Wild
7 May 2009 - 3:22 am | नेत्रेश
पण उगीच कशाल धोका पत्करा?
5 May 2009 - 2:02 pm | पर्नल नेने मराठे
कोणी घर देत का घर ........
चुचु
5 May 2009 - 2:20 pm | अविनाशकुलकर्णी
मै नाबालिग हु..कसाब
5 May 2009 - 2:22 pm | विजुभाऊ
बाबा लगीन फुर्र्र्र्र्र्र .....ढिंचँग ढिंचँग ढिंचँग
बघ डोळे बघ डोळे बघडोळे बघ
आज तेरी नजरों से नजरे मिलाने की इजाजत चाहता हुं
जीनेसे पहले मरने की इजाजत चाहत हुं.
ये मुमकीन नही के खामोंश चला जाऊं
तुम्हे अल्फाजों मे बसाने की इजाजत चाहता हुं........विजुभाऊ सातारवी
5 May 2009 - 4:45 pm | दवबिन्दु
देवाच्ये काठिला आवाज नस्तो.
.
अब्बी ऊठी अण्डा बनायी पकायी खायी और आयी। आँ, पैचान कौन । नई रे, चंदा भी नई, सोनि भी नई, अबे खुफियापनती क्या कर रहा है, ज्युली बोल रहि हू मै, शेखरअन्ना है?
5 May 2009 - 5:20 pm | नितिन थत्ते
ही आणखी काही
अंगात दम असणं चांगलं. पण तो सारखा लागणं वाईट
एखाद्या गोष्टीचा ताप येणं ठीक......
आम्ही कुठल्याही कंपूत नाही कारण आमचा स्वतःचाच एक कंपू आहे.
अब्बी ऊठी अण्डा बनायी पकायी खायी और आयी। आँ, पैचान कौन । नई रे, चंदा भी नई, सोनि भी नई, अबे खुफियापनती क्या कर रहा है, ज्युली बोल रहि हू मै, शेखरअन्ना है?
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
5 May 2009 - 6:24 pm | सोनू
काका मला वाचवा
आधी लगिन कोंढाण्याचे
नरोवा कुंजरोवा
आपके पैर, कितने नाजुक, कितने कोमल, इन्हे जमिन पर मत रखिये नही तो मैले हो जायेंगे
अत्त दीप भव
दाग, ढुंढते रह जाओगे
कसला विचार करताय रामण्णा
मोगॅम्बो खुष हुआ
राज, नाम तो सुना होगा ना
Yes, we can - Obama
5 May 2009 - 6:29 pm | नितिन थत्ते
माय नेम इज बॉण्ड- जेम्स बॉण्ड
खराटा
(रंग माझा वेगळा)
5 May 2009 - 6:40 pm | हर्षद बर्वे
" हिंदी चिनी भाई भाई.... ".......
या वाक्यामूळे भारताचा इतिहास आणि त्यानंतरच्या गाफीलपणामूळे भूगोल-सुद्धा बदलला....अजूनही बदलण्याचे प्रयत्न चालूच आहेत.....
आणि कदाचित ' भाई ' या शब्दाचा अर्थ सुद्धा यानंतरच बदलला असावा....अशी मजला शंका आहे.....
एच.बी.
5 May 2009 - 6:54 pm | नितिन थत्ते
कितने आदमी थे....
खराटा
(रंग माझा वेगळा)
5 May 2009 - 7:08 pm | लवंगी
म्हणजे काळजी करणे सोडून द्या.
5 May 2009 - 7:26 pm | विकास
“Only Thing We Have to Fear Is Fear Itself” - ३०च्या दशकातील जागतीक आर्थिक मंदीत आणि महायुद्धाच्या काळात, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्षपद स्विकारल्यानंतर केलेल्या पहील्या भाषणात एफ डी रुझवेल्ट यांचे हे वाक्य आणि नंतरच्या त्या वाक्याला अनुसरून केलेल्या कृतीमुळे अमेरिका ब्रिटन-युरोपला मागे टाकून जागतिक महासत्ता झाली.
सावरकरांनी म्हणलेले आणि स्वत: आचरणात आणलेले: "आलात तर तुमच्या बरोबर, नाही आलात तर तुमच्या विना, विरोधाल तर मोडून..."
केनडीचे प्रसिद्ध वाक्यः "..ask not what your country can do for you - ask what you can do for your country."
5 May 2009 - 9:25 pm | अडाणि
मला अपेक्षित असलेली वाक्ये फक्त तुमच्या प्रतिसादात दिसली..... ईतर प्रतिसादातील चित्रपटातील वाक्ये अपेक्षित नव्हती...
-
अफाट जगातील एक अडाणि.
5 May 2009 - 7:26 pm | पर्नल नेने मराठे
भिऊ नकोस..मी तुझ्या पाठीशी आहे.
चुचु
5 May 2009 - 8:07 pm | नितिन थत्ते
भिउ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे (तू काही घोळ केलेस तरी मी संभाळून घेईन)
खराटा
(रंग माझा वेगळा)
5 May 2009 - 7:32 pm | निशिगंध
"शिका, संघटित व्हा, संघर्ष करा"
_______ निशिगंध_________
मी शोधत आहे स्वत:ला!!!!
सापडलो की कळवेन सर्वांना!!!!
5 May 2009 - 9:16 pm | यन्ना _रास्कला
ये बाबुरावका स्ताइल हय :)
*/*\*/*\/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*
आनि डोळ्याइतक्याच जड आवाजात त्यान पहिला पोलीसी सवाल केला, डायवर कोन हाय !
5 May 2009 - 10:02 pm | गणा मास्तर
बडे बडे शहरोमे ऐसे छोटे छोटे हादसे होते रहते है |
आमचे हिंदीमध्ये अडाणी आबा.
- गणा मास्तर
भोकरवाडी (बुद्रुक)
7 May 2009 - 12:01 pm | अडाणि
ह किस्सा मिडीयाने पूर्णपणे चुकीचा रंगवून दाखवला आहे... तुम्ही खरा संवाद ऐकला आहे का?
The translation is being made incorrectly, the actual translation should be
Reporter: "kya ap ise total intelligence failure kehe sakte hai?"
R.R.Patil: "Aisa nahee hain, bade shahron mein aise ek adh hadse hote rahte hain,isleye total intelligence failure hua aisa nahe hain" [English] "Its not like that, in big cities one-two incidences can occour,but saying that total intelligence failure is not correct"
स्त्रोत वि़कीपिडीया - http://en.wikipedia.org/wiki/R._R._Patil
अजुन ऐक - http://www.mumbaimirror.com/index.aspx?Page=article§name=News%20-%20...
खर्या संवादाचा विडीयो कोणाकडे आसेल तर दुवा द्यावा...
-
अफाट जगातील एक अडाणि.
7 May 2009 - 11:17 pm | शैलेन्द्र
हिंदी नीट येत नसतानाही बोलायचा अट्टाहास, भाषा म्हणजे फक्त शब्द नाही, ते वापरायचही एक तंत्र असत.
6 May 2009 - 4:45 am | सुहास
"......राज्य सूतासारखे सरळ करेन..." (सूत की सुत?)
--- राजसाहेब (आता जरी इतके महत्त्व या वाक्याला मिळत नसेल तरी पुढे नक्कीच मि़ळेल...)
"..तर कर्नाटकाबरोबरचे सर्व करार क्रुश्णेच्या (हा शब्द शुध्द कसा लिहाल?) पाण्यात बुडवावे लागतील..."
--- आर. आर. २००५ च्या द. महाराश्ट्रातल्या महापुराचे खापर अलमट्टी धरण व कर्नाटकावर फोडताना (या वाक्यात ऐतिहासिक होण्याची क्शमता आहे...)
"पुण्याचा कारभारी बदला..."
--- अजितदादा
--सुहास
6 May 2009 - 9:57 am | अमोल केळकर
लई भारी -
पुढील काळात की वाक्ये नक्किच ऐतिहासिक वाक्यात मोडतील
--------------------------------------------------
छोट्या दोस्तांसाठी गंमत गाणी इथे वाचा
6 May 2009 - 10:02 am | नितिन थत्ते
kRuShNechyaa कृष्णेच्या
xamataa क्षमता
खराटा
(रंग माझा वेगळा)
6 May 2009 - 7:21 am | अनिता
Mr. Gorbachev, tear down this wall!
6 May 2009 - 7:57 am | विकास
"I've abandoned free market principles to save the free market system." --George W. Bush, Washington, D.C., Dec. 16, 2008
6 May 2009 - 7:27 am | काळा डॉन
बच्चा समझके कंदेपे लिया तो कान मे मुतता है।
-नाना
6 May 2009 - 8:10 am | संदीप चित्रे
मी टरफले उचलणार नाही .... :)
-- लो. टिळक
6 May 2009 - 10:20 am | ऋषिकेश
स्वातंत्र्योत्तर भारतीय इतिहासातील काहि महत्त्वपूर्ण वाक्ये
ऋषिकेश
6 May 2009 - 9:19 pm | हुप्प्या
I did not have sexual relations with that woman
अर्थात माझे त्या स्त्रीशी "तसले" काही संबंध नव्हते.
इति बिल क्लिंटन.
मी इराकच्या युद्धाला विरोध करायच्या आधी त्याचा समर्थक होतो : (I was for this war before I was against it.) जॉन केरी २००४ चा अमेरिकन राष्ट्राध्यक्षाकरता विरोधी पक्षाचा उमेदवार. फ्लिप फ्लॉपर असे बिरुद मिळवायला हे वाक्य कारणीभूत होते.
7 May 2009 - 3:08 am | बिपिन कार्यकर्ते
हा धागा ऐतिहासिक दृष्टीने अजरामर वाक्यांबद्दल आहे. माझ्या आकलनानुसार ज्या वाक्यांना काही एक कारणामुळे ऐतिहासिक महत्व आले किंवा त्या वाक्यांमुळे इतिहासाला वेगळेच वळण मिळाले ती वाक्ये या प्रकारात येऊ शकतात. अशाच प्रकारचे एक वाक्य आणि त्या मागची घटना इथे देत आहे. (या घटनेबद्दल आणि वाक्याबद्दल खूप मागे एका पुस्तकात वाचले होते.)
वर्ष १९६३. दुसर्या महायुध्दात जर्मनीचा पराभव होऊन काहीच वर्षं उलटली होती. जर्मनीची दोन शकलं झाली होती आणि त्यापैकी एका भागावर कमुनिस्टांची लालपकड अगदी व्यवस्थित बसली होती. जर्मनीची पूर्वापार राजधानी बर्लिन. तेव्हा हेच बर्लिन शहर मात्र दोन भागात विभागलेलं गेलं होतं. पूर्व बर्लिन जे कम्युनिस्टांच्या जर्मनीची राजधानी होतं आणि पश्चिम बर्लिन जे पश्चिम जर्मनीच्या अधिपत्याखाली होतं. हे असं व्हायचं कारण की युध्दाच्या शेवटी बर्लिनचे चार तुकडे झाले होते. रशिया, अमेरिका, ब्रिटन आणि फ्रांस यांनी पूर्ण जर्मनी आपापसात वाटून घेतला होता. त्याचे प्रकारे बर्लिनचे पण चार तुकडे झाले होते. जेव्हा रशियेतर दोस्तांनी पश्चिम जर्मनीला राज्यघटना बहाल करून तिथे स्वतंत्र सरकार स्थापले त्याच वेळी रशियाने मात्र त्यांच्या भागात दडपशाही करून साम्यवादी राजवट आणली. खरंतर बर्लिन हे पूर्व जर्मनीच्या भागात अगदी खूप आत मधे होतं. त्यामुळे पश्चिम बर्लिन हे भौगोलिकदृष्ट्या बाकी पश्चिम जर्मनीपासून अगदी वेगळं आणि सगळीकडून शत्रूने वेढलेलं होतं. अशातच १९६१ साली अचानक एके दिवशी बर्लिनर्स सकाळी उठले तेव्हा बर्लिनची प्रसिद्ध भिंत उभी राहत होती. तेव्हापासून 'बर्लिन वॉल' हे शीतयुद्धाचे एक प्रकारे प्रतीकच बनून गेले.
तर अशा पार्श्वभूमीवर अमेरिकेचे तत्कालिन राष्ट्राध्यक्ष जॉन केनेडी पश्चिम बर्लिनला गेले. तिथे त्यांनी एका विराट जनसभेला संबोधित केले आणि त्या भाषणाच्या शेवटी त्यांनी बर्लिनवासियांबद्दल आपुलकी, मैत्री इ. भावना व्यक्त करताना हे वाक्य उच्चारले.
"इश बिन आइन बर्लिनेर" ....... "मी बर्लिनवासी आहे"
एका छोट्या पण योग्य वेळी उच्चारलेल्या वाक्यामुळे फक्त पश्चिम बर्लिनच नव्हे तर पूर्णच पश्चिम जर्मनी मधे एक प्रकारचे उत्साहाचे वातावरण तयार झाले आणि सोविएत वरवंट्यापासून रक्षण होईल असा दिलासा पश्चिमेकडच्या लोकांना मिळाला. जे काम करायला, अन्यथा, खूप मोठे सैन्य लागले असते ते काम या चार शब्दांनी अधिक प्रभावीपणे केले.
बिपिन कार्यकर्ते
7 May 2009 - 10:18 am | अडाणि
काय छान माहिती दिलीत.... हेच अपेक्षित होते.... i wish अजुन अश्या प्रतिक्रिया आल्या असत्या तर बरे झाले असते...
-
अफाट जगातील एक अडाणि.
7 May 2009 - 11:00 am | स्वाती दिनेश
जेव्हा त्यांनी "इष बिन आइन बर्लिनर.. " असे वाक्य आपल्या भाषणात उच्चारले तेव्हा लोकांना दिलासा मिळाला,उत्साहाचे वातावरण तयार तर झालेच पण एकच हशाही उसळला कारण याचाच दुसरा अर्थ "मी जेली डोनट आहे.."असा होतो. कारण बर्लिनर म्हणजे जसे बर्लिनवासी तसेच तेथील एका खास प्रकारच्या जेली डोनटला बर्लिनर असे नाव आहे..अर्थात केनेडींना अभिप्रेत असलेला अर्थ लोकांपर्यंत पोहोचलाच हे वे सां न ल.
स्वाती
7 May 2009 - 5:23 am | खालिद
फालतू , एका ओळीचे, उगीचच कै च्या कै डोके फिरवणार्या धाग्यांना माझा सक्त विरोध होता, आहे आणि राहिल.
खालिद
7 May 2009 - 10:39 am | उमेश__
गुलामाला तो गुलाम असल्याची जाणीव करुन दया
म्हणजे तो बंड करुन उठेल....................
7 May 2009 - 11:16 am | जागु
वंदे मातरमं !
जय जवान जय किसान !
7 May 2009 - 1:35 pm | पर्नल नेने मराठे
नौट टु बन्गळुर्..येस टु बफेल्लो.
:|
चुचु
7 May 2009 - 6:34 pm | हर्षद बर्वे
जागु..
वंदे मातरमं नाही हो.....
वंदे मातरम् ! या बाबतीत मात्र चुका होऊ नयेत असं वाटलं म्हणून लिहिलं....
एच.बी.
7 May 2009 - 7:40 pm | अमेरिकन त्रिशंकू
मॅसेडोनिआ चा राजा फिलिप २ (अलेक्झांडर चा बाप) याने स्पार्टावर आक्रमण केले होते. तेव्हा लढाईच्या आधी त्याने दूताबरोबर एक खलिता धाडला.
"निमूटपणे शरण या. जर असे केले नाहित तर तुमचा पराभव हा निश्चित आहे. आणि जर का तुम्ही हरलात तर तुमच्या शहराची, राज्याची धूळदाण उडवून टाकू"
यावर स्पार्टन लोकानी फिलिप ला एका शब्दाचे उत्तर पाठवले होते.
"जर"
8 May 2009 - 2:51 pm | बिपिन कार्यकर्ते
बॉस, मला आवडलेल्या वाक्यामधे सगळ्यात जास्त आवडले हे वाक्य आजपर्यंत!!!! जबरदस्त. असा माज(चांगल्या अर्थाने)युक्त आत्मविश्वास पाहिजे...
बिपिन कार्यकर्ते
8 May 2009 - 2:56 pm | परिकथेतील राजकुमार
सहमत.
च्यायला वाक्य वाचुनच माज आला एकदम अंगात !
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य
7 May 2009 - 8:03 pm | आनंद घारे
मला आठवलेली कांही वाक्ये
नरो वा कुंजरो वा
आधी लगीन कोंढाण्याचं नंतर रायबाचं
उतरण्याचे दोर कापले आहेत
गड आला पण सिंह गेला
Et tu Brutus! Then Ceasor must die.
And Brutus is an honorable man!
To die or not to die? That is the question.
आनंद घारे
मी या जागी चार ओळी खरडल्या आहेत, जमल्यास वाचून पहाव्यात.
http://360.yahoo.com/abghare
http://anandghan.blogspot.com/
7 May 2009 - 8:22 pm | लिखाळ
विषय छान आहे. विकास, बिपिन आणि अमेरिकन त्रिशंकू यांचे प्रतिसाद आवडले. नवीनच माहिती समजली.
-- लिखाळ.
7 May 2009 - 11:50 pm | टायबेरीअस
"First They Ignore you,
Then They laugh at you,
Then They Fight you,
Then They Join you (You win!)"
मै तो अकेले ही चला था जानिबे मंझील मगर, लोग साथ आते गए और कारवां बनता गया"
8 May 2009 - 4:47 am | फारएन्ड
"तुमचे राज्य येथे ५० वर्षे राहणार नाही" - स्वा. सावरकरांना ५० वर्षे शिक्षा ठोठावल्यावर चे हे त्यांचे उद्गार होते असे वाचलेले आहे. ऐतिहासिक पुरावा वगैरे माहीत नाही.
8 May 2009 - 6:09 am | विकास
सावरकरांना कोर्टाने जेंव्हा दोन जन्मठेपांची शिक्षा सुनावली, तेंव्हा ते म्हणाले होते, "पन्नास वर्षे! तो पर्यंत ब्रिटीश सत्ता टिकली तर!" असे काहीसे ते वाक्य होते.
तसेच त्यांनी अंदमानातील (डिप्रेस्ड झालेल्या) खंतावलेल्या राजबंद्यांना उद्देशून म्हणले होते (ऑलमोस्ट असे तरी आठवणीतून आहे, मिपावर मी हे आधीपण येथे लिहीले होते): ""आज आपण असहाय्य आहोत, आज आपला या अशा ठिकाणि अपमान होईल. पण उद्या असाही दिवस येईल की स्वतंत्र भारतातील जनता तिर्थक्षेत्र समजून अंदमानच्या या काळकोठडीचे दर्शन घेण्यास येईल आणि अभिमानाने सांगतील की हाच तो तुरूंग जेथे भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील स्वातंत्र्यसैनीक राहीले होते..."
8 May 2009 - 4:21 pm | आंबोळी
"तिसरी आघाडी हेच देशाचे आशास्थान !" ____मेथांबा
आंबोळी
8 May 2009 - 4:37 pm | मि माझी
एडॉल्फ हिटलरची काही वाक्ये-->
-- Germany will either be a world power or will not be at all.
-- It is not truth that matters, but victory.
-- How fortunate for governments that the people they administer don't think.
-- If today I stand here as a revolutionary, it is as a revolutionary against the Revolution.
मि माझी ..
पुणेकर होण्यासाठी तूम्हांला कोणत्यातरी गोष्टीचा जाज्वल्य अभिमान बाळगण आवश्यक आहे..!!