सध्या मी काय पाहतोय ? भाग १०

मदनबाण's picture
मदनबाण in जनातलं, मनातलं
31 Jul 2022 - 1:03 am

खरं तर गेला आठवडाभर मी डोळ्याच्या इन्फेक्शन ने त्रस्त आहे आणि त्यामुळेच रजेवर देखील आहे. डोळा उघडा ठेवणे कठीण जात होते म्हणुन काही पाहणे देखील नकोसे वाटतं होते.पण वेळ घालवायचा कसा ? कारण कामात व्यस्त राहण्याची नशा मला इतके वर्षात लागलेली आहे ! त्रास होत असला तरी देखील इथे मिपावर येऊन डोळे किलकिले करुन अधुन मधुन येऊन एखादा प्रतिसाद देऊन मग परत विश्रांती घेत होतो. आज जरा डोळ्याची सूज कमी झाली आणि मघाशी मुविंचा प्रतिसाद वाचला त्यांनी माझ्या प्रतिसादाला उत्तर देताना फाॅरेस्ट गम्पचा उल्लेख केला आहे.कराचीवुड मधील खानावळीतील एक असलेला आमिर खानचा लाल सिंह चड्ढा हा चित्रपट येणार आहे हे जेव्हा मला समजले होते तेव्हाच फाॅरेस्ट गम्प बद्धल देखील अर्थातच कळले होते,पण तो मी वेळ मिळेल तेव्हा पाहु किंवा आरामात पाहु असा विचार करुन ठेवला होता. मधल्या काळात काही चित्रपट आणि वेब सिरीज देखील पाहिल्या आहेत पण फाॅरेस्ट गम्पचा पाहण्याचा मुहुर्त मुविंच्या प्रतिसादामुळे निघालाच शेवटी !
हा चित्रपट अतिशय सुंदर आहे... ६ अ‍ॅकॅडमी / ऑस्कर पुरसकार मिळालेला हा चित्रपट काळजात उतरणारा आणि मनाला भिडणारा असुन हा चित्रपट पाहणे हा एक उत्तम अनुभुती आहे असे म्हणायला हवे.
या चित्रपटातील ३ संवाद मला फार आवडले.खरं तर हे निवडणे देखील कठीण, पण माझ्या मनाला विशेष आवडले म्हणुन ते इथे देत आहे.
"Well, I happen to believe you make your own destiny. You have to do the best with what god gave you."

" Life is a box of chocolates,Forrest. You never know what you're gonna get.'"

"My Mama always said, you got to put the past behind you before you can move on."

या चित्रपटाच्या ट्रेलर मधुनच या चित्रपटा बद्धलची कल्पना येते. मी यावर अधिक काही लिहणार नसुन इतकेच सांगेन बर्‍याच काळाने मला एक उत्तम अमेरिकन चित्रपट पाहिल्याचे समाधान मिळाले आहे. :)

चित्रपटप्रकटन

प्रतिक्रिया

जेम्स वांड's picture

31 Jul 2022 - 7:29 pm | जेम्स वांड

इथे गोळा करायची असल्यास पहिल्या नंबर वर मी इथे लावेन The Pursuit of Happyness.

हा सिनेमा पाहून डोळ्यात पाणी न येणारं माणूस म्हणजे मनुष्य नव्हे असेच मला वाटते, कृष्णवर्णीय क्रिस गार्डनर ह्याचा एक फेल शल्यशस्त्र विक्रेता ते गार्डनर रीच ह्या ट्रेडिंग/ investment firm ची स्थापना इथपर्यंतचा प्रवास डोळे भिजवतो,

माणुसकीचा धडा देणारा Pursuit of Happyness माझ्यासाठी नंबर वन.

.

कुमार१'s picture

31 Jul 2022 - 7:45 pm | कुमार१

पाहून अंदाजे दहा वर्षे झाली आहेत
अप्रतिम

टर्मीनेटर's picture

31 Jul 2022 - 9:33 pm | टर्मीनेटर

+१
मी पण पाहिलाय ७-८ वर्षांपूर्वी.

कॉमी's picture

2 Aug 2022 - 8:08 am | कॉमी

माझे आवडते-
(Genre वाईज)

भयपट-
१. द कॅबिन इन द वुड्स
२. मिडसोमर
३. हेरेडिटरी
४. द बाबाडूक
५. ग्रीन रूम
६. द शायनिंग
७. द थिंग
८. इन द माऊथ ऑफ मॅडनेस
९. द विच
१०. पॅन्स लॅबिरीन्थ

विनोदी/हलकेफुलके-
१. फ्रेंड्स विथ बेनेफिट्स
२. लायर लायर
३. गॉड्स मस्ट बी क्रेझी १ & २
४. डॉक्टर स्ट्रेंजलव्ह
५. डेडपूल
६. सुपरबॅड
७. द ट्रूमन शो
८. द हँगोव्हर
९. माय कजीन व्हिनी
१०. शॉन ऑफ द डेड

हाईस्ट/चोरी सिनेमे-
१. ओशन्स ११,१२,१३
२. कॅच मी इफ यू कॅन
३. द इटालियन जॉब
(ओशन मालिके इतके इतर दोन चांगले नाहीत. ओशन ११ आणि १३ मात्र जबरदस्त, सर्वोत्तम हाईस्ट सिनेमे आहेत.)

ऍक्शन सिनेमे-
१. ३००
२. जॉन विक
३. ट्रॉय
४. जँगो अनचेन्ड
५. किल बिल १ & २
६. ब्लड डायमंड

ऐतिहासिक व्यक्तिरेखांवर/ घटनांवर/ कल्पित ऐतिहासिक घटना-
१. द इमिटेशन गेम्स
२. द इनग्लोरिअस बास्टर्डस
३. द लास्ट ड्युअल
४. डनकर्क
५. थियरी ऑफ एव्हरीथिंग
६. द किंग
७. ब्रेव्हहार्ट

तपास/थ्रिलर/सायकोलॉजीकल थ्रिलर-
१. शटर आयलंड
२. सेव्हन
३. द स्पॉटलाईट
४. गॉन गर्ल
५. द डिपार्टेड
६. नाईव्हज आउट !
७. मेमेंटो
८. द प्रेस्टीज
९.१२ अँग्री मेन

साय-फाय-
१. इन टाईम
२. एक्स माकीना
३. अरायव्हल
४. एव्हरीथिंग एव्हरिव्हेअर ऑल ऍट वन्स

सुपरहिरो-
१. द डार्क नाईट ट्रिलॉजी
२. वॉचमन
३. लोगन

संजय पाटिल's picture

7 Aug 2022 - 2:17 pm | संजय पाटिल

Jason Bourn १ २ ३ बघितला नाही का आवडला नाही?

बघितले नाहीयेत. ट्राय करीन.

king_of_net's picture

15 Aug 2022 - 9:48 pm | king_of_net

+१११

टर्मीनेटर's picture

31 Jul 2022 - 9:28 pm | टर्मीनेटर

आज 777 Charlie हा कन्नड चित्रपट VI Movies and TV वर इंग्लिश सबटायटल्स वाचत बघितला.
मला असा अघोरी प्रकार करायला आवडत नाही, पण IMDb वर 9.1/10, Facebook वर 5/5 आणि Rotten Tomatoes वर 100% असे तगडे रेटिंग असल्याने चित्रपट पाहण्याची उत्सुकता होती. तरी अजून पर्यंत ह्या चित्रपटाची हिंदी आवृत्ती येण्याचे नाव घेत नव्हती म्हणुन नाईलाजाने तो अशा प्रकारे बघावा लागला.

माणूस आणि कुत्रा (चित्रपटातली लॅब्रेडॉर कुत्री) ह्यांच्यातील भावनिक नातेसंबंध दर्शवणारा हा चित्रपट श्वानप्रेमीना नक्कीच आवडेल.

1

माझी चित्रपट माध्यमाकडून अपेक्षा ही निव्वळ मनोरंजन एवढीच असल्याने हा माझ्या टाईपचा चित्रपट नव्हता हे खरे, पण जोडीने चित्रपट पाहणारी बायको कित्येक प्रसंगी हुंदके देत रडत होती, त्यामुळे अशा प्रकारचे चित्रपट पाहण्याची ज्यांची मानसिक तयारी आहे त्यांनी हा चित्रपट आपल्या जवाबदारीवर जरूर पाहावा असा वैधानिक इशाराही देऊन ठेवतो 😀

मी हाडाचा श्वानप्रेमी नाही, मला भावनाप्रधान चित्रपटही आवडत नाहीत त्यामुळे माझी निखळ मनोरंजनाची अपेक्षा हा चित्रपट पूर्ण करू शकला नसला तरी वेळ वाया गेल्या सारखेही वाटले नाही हे विशेष!

धर्मराजमुटके's picture

31 Jul 2022 - 9:37 pm | धर्मराजमुटके

या चित्रपटाचा ट्रेलर मी देखील युट्यूबवर पाहिला होता आणि चित्रपट देखील आवडेल असे ट्रेलर पाहून वाटले होते. थोडे दिवस थांबून हिंदी भाषांतर येईपर्यंत थांबावे म्हणतो.

टर्मीनेटर's picture

31 Jul 2022 - 10:00 pm | टर्मीनेटर

थोडे दिवस थांबून हिंदी भाषांतर येईपर्यंत थांबावे म्हणतो.

हे बेस्ट!

नायकचे आणि कुत्रीचे नाते हे भावनिक पातळीवरचे असल्याने संवाद महत्वाचा नसल्याने चालून जाते, पण इतर पात्रांचे संभाषण समजून घेताना सबटायटल्स वाचावी लागत असल्याने थोडा रसभंग होतो.

धर्मराजमुटके's picture

31 Jul 2022 - 10:48 pm | धर्मराजमुटके

हा दुवा. गायब होण्याआधी बघा.

टर्मीनेटर's picture

31 Jul 2022 - 11:24 pm | टर्मीनेटर

हो आलाय... धन्यवाद!
app वर quality select करायचा ऑप्शन दाखवत नाहीये नाही पण web version वर 720p पर्यंतचे पर्याय आहेत 👍

मुक्त विहारि's picture

1 Aug 2022 - 10:22 am | मुक्त विहारि

चक नाॅरीस आणि जाॅन विकची भ्रष्ट नक्कल ....

टाईम पास म्हणून ठीक आहे ....

मदनबाण's picture

1 Aug 2022 - 10:18 pm | मदनबाण

@ जेम्स वांड
तुम्ही सांगितलेला चित्रपट पाहण्याच्या यादीत आहे, ट्रेलर फार पूर्वीच पाहिला आहे, आता नक्कीच पाहिन.
फाॅरेस्ट गम्प डाऊनलोड मारुन ठेवला होता तेव्हाच रॉकेट्री-नंबी इफेक्ट ची हिंदी प्रिंट देखील डाऊनलोड मारुन ठेवलेली आहे, हा देखील पहायचा आहे.

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Har Har Shambhu | Mahadev New Song | har har shambhu shiv mahadeva | Shiv Bhajan | Mahakaal Song

जेम्स वांड's picture

2 Aug 2022 - 7:55 am | जेम्स वांड

द टर्मिनल :-

.

टॉम हँक्स आणि कॅथरीन झेटा जोन्स, विषय तिथेच संपवायला हवा, पण विक्टर नोवोर्सकी असा सहज संपणारा माणूस अन् विषय दोन्ही नाहीत, आपल्या वडलांच्या आवडत्या जॅझ बँड मधील एका वादकाची सही घ्यायला न्यूयॉर्क शहरात क्रकोझिया देशातून आलेला व्हिक्टर मायदेशात गृहयुद्ध होऊन तो देश म्हणून अस्तित्वात असणेच थांबल्यावर बिन पासपोर्ट बिन देश होतो, अन् बाहेर जायची परवानगी न मिळाल्यामुळे टर्मिनलवरच राहू लागतो

मुळकथा मेहरान करिमी नासेरी ह्या ईराणी मनुष्याच्या पॅरिस चार्ल्स द गॉल एअरपोर्ट टर्मिनल १ वर १९८८ - २००६ स्टेटलेस म्हणून राहण्यावर बेतलेली.

मुक्त विहारि's picture

2 Aug 2022 - 10:21 am | मुक्त विहारि

हा सिनेमा बघाच, असे मुलांनी सांगीतले होते ....

नगरी's picture

12 Aug 2022 - 1:17 pm | नगरी

मूळ सोर्स बद्दल आभारी. माझाही आवडता चित्रपट

नगरी's picture

12 Aug 2022 - 1:45 pm | नगरी

तो कोणता ज्यात तो एका बेटावर अडकतो

सुरिया's picture

12 Aug 2022 - 1:58 pm | सुरिया

कास्ट अवे

रंगीला रतन's picture

12 Aug 2022 - 2:16 pm | रंगीला रतन

द टर्मिनल मला आवडला होता.

जुग जुग जियो हा अत्यंत टुकार चित्रपट १५ मिनिटांत बघितल्यावर, त्यावर उतारा म्हणून LOTR - Extended & Theatrical बघायला सुरुवात केली. कितव्यांदा तरी बघतेय, सलगही पाहता येत नाही सध्या, वेळेची गणितं जमवत रोज अर्धा-पाऊण तासच बघता येतो...आज दुसरा भाग पूर्ण केला.... just brillant n peerless ! शक्य असेल तर 4Kमध्ये पहा, असे सुचवेन.

अवांतर : पुढील महिन्यांत प्राईमवर The Lord of the Rings: The Rings of Power चा पहिला सिझन येतोय. LOTR फॅन्स आहेत का इथे? नवीन धागा काढून चर्चा करता येईल तिथे.

कॉमी's picture

5 Aug 2022 - 9:43 am | कॉमी

(हात वर)

मी पण लॉर्ड ऑफ द रिंग्सचा फॅन. घरी खास त्यासाठी एक्स्टेन्डेद एडिशनच्या ब्ल्यू रे डिस्क्स घेऊन ठेवल्यात. कित्येक पारायणे झालीत.

कपिलमुनी's picture

11 Aug 2022 - 11:38 pm | कपिलमुनी

तुम्ही लोकांना पकडून रात्री बेरात्री त्या डिस्क लावून दाखवता अशी अफवा आहे..
यामुळे लोक घाबरायला लागलेत

सतिश गावडे's picture

11 Aug 2022 - 11:55 pm | सतिश गावडे

याला म्हणतात योगायोग.

प्रचेतस's picture

12 Aug 2022 - 6:56 am | प्रचेतस

=)) या तुम्ही पण एकदा घरी मुनिवर :)

प्रशांत's picture

12 Aug 2022 - 2:10 pm | प्रशांत

तुम्ही लोकांना पकडून रात्री बेरात्री त्या डिस्क लावून दाखवता अशी अफवा आहे..

छे अफवा नाहि, खरं आहे ते.

आणि जोवर चित्रपट चांगला असं म्हणत नाही तोवर सोडत नाहि.

जेम्स वांड's picture

5 Aug 2022 - 11:24 am | जेम्स वांड

लॉर्ड ऑफ द रींग्सचा पंखा, हॉर्समन ऑफ रोहान :)

मदनबाण's picture

6 Aug 2022 - 10:37 pm | मदनबाण

@ जेम्स वांड
द टर्मिनल हा नितांत सुंदर चित्रपट असुन टॉम हँक्स ने अप्रतिम सहज सुंदर अभिनय केला आहे, या त्याच्या अभिनयामुळे कॅथरीन झेटा जोन्स देखील माझ्या लक्षात राहिली नाही. बादवे... कॅथरीन झेटा जोन्स म्हंटले की मला मास्क ऑफ जोरो आठवतो. त्या ती अगदी " फटाकडी" दिसली आहे ! :)))
@ कॉमी
तुमच्या यादीतील लायर लायर,द ट्रूमन शो हे जिम कॅरी च्या अभिनयामुळे आणि वेगळ्या कथांमुळे पाहिले. जिम कॅरी चा The Mask हा माझा आवडता चित्रपट ! यात कॅमरन डिएज अत्यंत मादक दिसली आहे, तिचे या चित्रपटातील नृत्य तर लईच भारी आहे ! [ तो व्हिडियो खाली देत आहे. ] कॅमरन डिएज चा आजचा चेहरा आणि या चित्रपटाच्या वेळचा चेहरा मला इतका वेगळा वाटतो की हीच का ती ? असा प्रश्न पडावा.

माय कजीन व्हिनी देखील तुमच्या यादीत आहे, हा माझा ऑल टाईम फेव्हरेट चित्रपट आहे. केव्हाही पाहिला तरी तितकाच आनंद मिळावा अश्या काही एक चित्रपटा मध्ये हा असावा असे मला वाटते. Marisa Tomei यात मला लईच भावली, तिने कोर्टात जो नखरेलपणा दाखवत परंतु अत्यंत प्रभावशाली जवाब दिला आहे तो अगदी बघणेबल सीन आहे. :)
भयपटात आजच The Black Phone पाहण्याचा विचार आहे, ट्रेलर देऊन ठेवतो.

हल्लीच ब्लॉकबस्टर सक्सेस भूल भुलैया 2 पाहिला, इतका काही खास वाटला नाही. Jurassic World Dominion देखील पाहिला, कशाला पाहिला असे वाटले ! या पेक्षा या सिरीजचे पहिलाच भाग मला आवडलेला आहे. डोळे आता अ‍ॅनिमेशनला फार सरावले आहेत की काय ?असे हल्लीचे चित्रपट पाहुन वाटते.
वेब सिरीज मध्ये आश्रम सिरीज चा ३ रा सिझन पाहुन काढला... बाबा आणि त्याचे उपद्वाप यात आहेच पण या सिझन मध्ये इशा गुप्ताची एंन्ट्री झाली असुन तिने त्रिधा चौधरीला हॉटनेस आणि बोल्डनेस मध्ये खाऊन टाकले आहे.
मराठीत रानबाजार चा सिझन पाहिला. तगडी स्टार कास्ट असलेल्या सिरीजचे सुरुवातील प्राजक्ता माळी आणि तेजस्वीनी पंडीत यांचे अत्यंत अश्लिल व्हिडियो [ ट्रेलर ] व्हायरल झाले होते. मला तरी प्रसिद्धीचा चिप प्रकार वाटला. याची गरज का वाटली ? ते मला कळाले नाही.मला तरी सिझन १ ठीक वाटला म्हणेन,कथेने मनाची पकड काही घेतली नाही. प्राजक्ता माळीचा अभियन विशेष आवडला. २ रा सिझन मध्ये काय होते ते पहाण्यासाठी वाट पहावी लागणार आहे.

जाता जाता :- हिंदू देवताओं को लापता बता देने वालों की मुव्ही थेटर से लापता होनी चाहिए |
P1
लाल सिंह चड्ढा सुपर फ्लॉप होनी ही चाहिए

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Har Ghar Tiranga

जेम्स वांड's picture

6 Aug 2022 - 11:05 pm | जेम्स वांड

टर्मिनल आवर्जून आमच्या recommendation वर बघितला ह्याचा आनंद वाटला, अजून एक दागिना खास आपल्यासाठी आणि इतर सभासदांसाठी पण (जर आपण बघितला नसेल तर)

Invictus

९०च्या दशकातील साऊथ आफ्रिका, वर्णद्वेषी एपर्थाईड उचकटून नेल्सन मंडेला पहिले कृष्णवर्णीय राष्ट्राध्यक्ष झाले आहेत, कृष्णवर्णीय जनता मूठभर गोऱ्यांचा सुड उगवून त्यांना दक्षिण आफ्रिका देशाच्या सार्वजनिक आयुष्यातून हद्दपार करायला उतावीळ झाली आहे, रँडचे दर पडतच जातायत, गुन्हेगारी दर वाढतच जातायत,

अश्यात, नव-निर्वाचित प्रेसिडेंट मंडेला आपली पूर्ण स्किल पणाला लावून रग्बी सारखा खेळ अख्खा देश एकत्र बांधायला वापरण्यास सुरुवात करतात. रग्बी टीम ही typical गोऱ्यांची सद्दी मानली गेलेली, नवनिर्वाचित कृष्णवर्णीय बहुसंख्य असलेली राष्ट्रीय क्रीडा कार्यकारणी दक्षिण आफ्रिकन रग्बी टीम खालसा करण्यावर उतावीळ, अन् त्याचा ठराव घेणाऱ्या सभेत मंडेलाचे आगमन

"This is not the time for retribution but cooperation, you have chosen me your leader now let me lead you"

असा काहीसा अंगावर काटा डायलॉग आहे त्या प्रसंगी, असेच शंकासुर गोऱ्यांच्या मनात, ते दूर करण्याची मंडेलाची धडपड. त्या रग्बी टीमचा कप्तान अन् त्याची लीडरशिप, सगळेच प्रेक्षणीय.

प्रेसिडेंट नेल्सन मंडेला - Morgan Freeman

रग्बी टीम कॅप्टन फ्रांस्वा पिना - Matt Damon

.

मुळात invictus ही एक victorian English कविता होय खालीलप्रमाणे, तिचा आस्वाद हा एक अजूनच स्वतंत्र विषय आहे

.

अन् हो ही एक सत्यकथा होय

Bhakti's picture

6 Aug 2022 - 11:35 pm | Bhakti

चंद्रमुखी
विश्वास पाटील यांच्या चंद्रमुखी कादंबरी वर आधारित संगीताने सजलेला सुंदर मराठी सिनेमा आहे.प्रसाद ओक यांच दिग्दर्शन कमाल आहे.सिनेमा पाहताना थोडी नटरंग सिनेमाचीही आठवण आली.सिनेमातील वापरलेल्या रंगसंगती फ्रेम सुंदर आहेत.संवाद खुप छान आहेत, तेव्हा मुळ कादंबरी वाचावी वाटतेय.सर्व कलाकारांचा अभिनय उत्कृष्ट आहेच.सर्व गाणी आणि अमृता खानविलकरचा नृत्याविष्कार अप्रतिम आहे.आर्या आंबेकरच्या आवाजातले 'कस करमत नाही ग' गाणं विशेष आवडलं.

मित्रहो's picture

11 Aug 2022 - 10:31 am | मित्रहो

मला हा चित्रपट प्रचंड आवडला होता. याआधी तीन चार वेळा बघितलेला आहे. टॉम हँक्स लक्षात राहतो. त्याचे ते Life is like a box of chocolate कधीच विसरु शकणार नाही. लालसिंग मधला अमीर मला ट्रेलरमधे तरी PK मधून पुढे गेल्यासारखा वाटला. ती टॉमची निरागसता ट्रेलरमधे जाणवली नाही.
वर उल्लेखलेला Terminal देखील आवडला.
मला आवडलेला आणखीन एक चित्रपट म्हणजे The Intern. मस्त आहे. फेमिनिझम म्हणजे काय कसलाही आरडाओरडा न करता येत. यातला मला आवडलेला प्रसंग म्हणजे जेव्हा Robert De Niro नायिकेला सांगतो एके काळी माझे ऑफिस याच बिल्डिंगमधे होते. आज ती कंपनी राहिली नाही आणि त्या प्रॉडक्टची गरज उरली नाही. त्याचे हिंदी वर्जन येणार आहे अमिताभ आणि दिपिकाला घेऊन.
मला Nora Ephron चे चित्रपट आवडतात. तिचा विनोदाचा सेंस मस्त आहे. तिने दिग्दर्शित केलेले दोन मला आवडलेले चित्रपट म्हणजे Julie and Julia. हा काहीसा वेगळा आहे. रोमँटिक नाही. यातली Meryl Streep आणि तिचा आभिनय जबरदस्त. तसेच Sleepless in Seattle देखील आवडला. Harry Met Sally आणि You have got mail तर आहेच.

मुक्त विहारि's picture

11 Aug 2022 - 6:49 pm | मुक्त विहारि

Meg Ryanचा, तोडीस तोड अभिनय ...

नगरी's picture

12 Aug 2022 - 2:13 pm | नगरी

.

प्रशांत's picture

12 Aug 2022 - 2:17 pm | प्रशांत

माझा सर्वात आवडता चित्रपट.
2
1

मुक्त विहारि's picture

12 Aug 2022 - 5:51 pm | मुक्त विहारि

Morgan Freeman आणि Tim Robbins यांच्या तोडीस तोड अभिनय केला आहे तो, Bob Guntonने ....कुठल्याही प्रकारचा आक्रस्ताळे पणा न करता, निर्दयी, स्वार्थी आणि डरपोक वाॅर्डन, Bob Guntonने चांगलाच रंगवला आहे ...

वामन देशमुख's picture

12 Aug 2022 - 6:10 pm | वामन देशमुख

The Shawshank Redemption पाहिलाय. Morgan Freemanचा आणि इतरांचा अभिनय, कथानक दिग्दर्शन आवडले.

अमर विश्वास's picture

12 Aug 2022 - 4:08 pm | अमर विश्वास

नेटफ्लिक्स वर दोन ब्रिटिश सिरीज आहेत ...

१. Unblivable : एका अलेज्ड रेप व्हिक्टीम पोलीस स्टेशन मध्ये रिपोर्ट करायला येते ... आणि नंतर कम्प्लेंट मागे घेते ... आणि मग सुरु होते एका पोलीस तपासाची (ऑफ द रेकॉर्ड) आणि मग त्यातून होत जाणारे कॉम्पलिकेशन्स ..शेवटी पीडितेला न्याय मिळतो का ? अत्यंत गुंतागुंतीचे कथानक भडकपणा टाळून सादर केलेले ... मस्ट वॉच

२. Line of Duty : ब्रिटिश पोलिसांमधील अँटी करप्शन युनिट ची ही कहाणी ... आपल्याच लोकांना (पोलिसांनाच) इन्वेस्टीगेट करणारे हे युनिट .. त्यांचे चॅलेंजेस ... another must watch

मदनबाण's picture

12 Aug 2022 - 7:00 pm | मदनबाण

@ जेम्स वांड
मला तुम्हाला दुखवायचे नाही, परंतु द टर्मिनल ही मी बराच आधी बहुतेक स्ट्रार मुव्हीजवर पाहिला होता. Invictus बद्धल चांगली माहिती दिली आहे, या नावाचा पर्फ्युम असुन त्याचेच क्लोन असलेले अत्तर माझ्याकडे आहे ! :)

@ मित्रहो
Julie and Julia चा ट्रेलर पाहिला, का कोणास ठावूक पण मला क्षणभर Mrs. Doubtfire आठवला.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

वरती The Black Phone चा ट्रेलर दिलेला आहे तो पाहिला, आवडला ! एकचा बघवा असा चित्रपट नक्कीच आहे.
कपिलमुनींच्यामुळे मला Predator सिरीज मधला Prey या लेटेस्ट चित्रपटा बद्धल कळले ! मला या सिरीजच्या पहिल्या भागाने जी मोहिनी घातली ती अजुनही उतरलेली नाही ! याचे इतर आलेले भाग देखील पाहिलेत पण इतके काय खास वाटले नाहीत, मात्र Prey याला अपवाद ठरला आहे. यात Predator ची वेगळी वेपन्स देखील पाहण्यात आलेली आहेत.

जाता जाता :- Predator चा जो सीन माझ्या मनात कायमचे स्थान करुन राहिला आहे, तो इथे देऊन प्रतिसाद आटपता घेतो. [ मुद्दामुन नॉर्मल साईझ मध्ये देतो आहे. ]

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Zanjeere Full Song | Ft. Pujita Ponnada | Bheems | Suddala Ashok Teja | Ram (Dhee13)|Folk Songs 2022

जेम्स वांड's picture

13 Aug 2022 - 7:54 am | जेम्स वांड

दुखावण्याचा वगैरे प्रश्नच नाही, म्हणून तर मी अगोदरच पाहिला नसेल तर अशी पुस्ती जोडली होतीच की.

तुमचा धागा एक उत्तम निमित्तमात्र आहे, त्या निमित्ताने उत्तमोत्तम सिनेमा कलाकृतींच्या लिस्ट चे एक उत्तम क्युरेशन होईलच की भावी मिपाकरांसाठी

(पोस्टरीटी असा जडजांबाल शब्द वापरणे टाळले आहे)

- (सिने योगी) वांड

कॉमी's picture

13 Aug 2022 - 7:59 am | कॉमी

Marisa Tomei यात मला लईच भावली, तिने कोर्टात जो नखरेलपणा दाखवत परंतु अत्यंत प्रभावशाली जवाब दिला आहे तो अगदी बघणेबल सीन आहे. :)

अगदी अगदी. मारीसाचे काम सिनेमाची रंजकता कित्येक पटीने वाढवते. भारी पात्र बनवलंय अगदी.

नगरी's picture

13 Aug 2022 - 9:34 am | नगरी
नगरी's picture

13 Aug 2022 - 10:07 am | नगरी
नगरी's picture

13 Aug 2022 - 10:24 am | नगरी
नगरी's picture

13 Aug 2022 - 10:40 am | नगरी

मी केजीएफ पाहणार नव्हतो असे वाटले होते, पण चक्का दोन्ही भाग पाहिले. मला आरआरआर पेक्षा हे दोन्ही चित्रपट अधिक ठीक वाटले.
[ केवळ टाईमपास ही व्याख्या पूर्ण करण्यासाठी हे दोन्ही चित्रपट पाहिले, त्या कसोटीवर ते नक्कीच पूर्ण उतरले ! मी पण आता दाढी वाढवावी म्हणतो. :))) ]

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- I Love My India :- Pardes

क्लिओपात्रा ब्लू रे प्रिन्ट मध्ये पाहिला ! साधारणतः ज्याला इजिप्त बद्धल माहिती आणि आकर्षण असते त्याला क्लिओपात्रा नक्कीच ठावूक असते. चांगले चित्रपट शोधताना 1963 रिलीज आणि आजच्या बजेट नुसार साधारण ३०० मिलियन बजेटचा आयकॉनिक मुव्ही दिसला. वर्थ वॉचिंग !

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- “No one is more hated than he who speaks the truth.” :- Plato

मदनबाण's picture

28 Aug 2022 - 7:02 pm | मदनबाण

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- आते जाते खूबसूरत आवारा सड़को पे... :- Anurodh

कुमार१'s picture

30 Aug 2022 - 10:52 am | कुमार१

अनन्या (मराठी) : प्राईम वर आहे.
अपघातात अपंगत्व आलेल्या तरुणीची भूमिका हृता दुर्गुळेने छान केली आहे.
योगेश सोमण , अमेय वाघ यांच्याही भूमिका छान.

मूळ नाटकाचे हे चित्रपट-रुपांतर आहे

कुमार१'s picture

15 Sep 2022 - 8:17 am | कुमार१

जॉगर्स पार्क
हा हिंदी चित्रपट प्राईम वर पाहिला
हलकाफुलका सहकुटुंब बघण्याजोगा
एक निवृत्त न्यायाधीश एका तरुणीच्या प्रेमात पडतात त्याची मजेशीर गोष्ट

व्हिक्टर बॅनर्जी ज्येष्ठ अभिनेत्यांची सुरेख भूमिका

कानडाऊ योगेशु's picture

26 Sep 2022 - 9:50 pm | कानडाऊ योगेशु

सध्या अनेक सिरिज वा चित्रपट वर वर चाळतो व काही रोचक वाटले तर मग फास्ट फॉरवर्ड करुन पाहतो.
असे असताना ही Vezham ह्या तमिळ चित्रपटाने खिळवुन ठेवले. पहिला अर्धा भाग फास्ट फॉरवर्ड करुन पाहिला पण उत्तरार्ध जबरदस्त आहे.
तमिळ चित्रपटात चक्क मोहन आगाशे पण काही सेकंदांपुरते आहेत.
तसेच काल दगडी चाळ २ ही पाहिला. अंकुश चौधरी कुठल्याही अँगलने अ‍ॅक्शन स्टार वाटत नाही. पळताना तर पुढे खड्डा आहे अथवा पाणी सांडले आहे आणि पळलो तर
घसरुन पडु कि काय अश्याच मनोवस्थेत पळतो. चित्रपटात साऊथ दणादण चित्रपटात हाणामारी च्या प्रसंगत संस्कृत श्लोक वापरतात ना ( संदर्भ बाहुबली) तश्या प्ध्दतीचे श्लोक ऐकु येतात पण ते ही काही प्रभावी वाटत नाही. एकुण चित्रपत फारसा प्रभावी नाही आहे.
extraordinary attorney woo ही लॉ-कोरियन -ड्रामा अशीच फास्ट फॉरवर्ड करत व १.५X वेगाने बघितली. ऑटिझम असलेली वु ही लॉयर हे ह्या सिरिज चे मध्यवर्ती पात्र आहे. एकुण सिरिज पाहण्यासारखी झाली आहे.
आजकाल ऑटिझम पात्र असलेले बर्याच सिरिज पाहण्यात आल्या. गुड डॉक्टर. मॉन्क ह्या सिरिज त्यापैकी काही पाहण्यासारख्या.
तसेच कायद्यावर आधारीत ही बर्याच सिरिज आहेत.

diggi12's picture

29 Sep 2022 - 6:42 pm | diggi12

Flowers of war
मस्त आहे

मदनबाण's picture

29 Sep 2022 - 7:26 pm | मदनबाण

अ‍ॅमॅझॉन प्राईमवर पाहिला... केवळ अप्रतिम ! सध्य काळात थेटर मध्ये जाऊन पहावा असा उत्तम मराठी चित्रपट कोणता ? असे कोणी मला विचारले तर त्याचे उत्तर म्हणजे हा चित्रपट. [ मला संधी आणि वेळ मिळाला तर मी परत हा चित्रपट थेटर मध्ये जाऊन बघेन हे नक्की ! ] चित्रपटातील सर्वच गाणी सुंदर आहेत [ गुरु ठाकुर चे शब्द आणि अजय-अतुलचे संगीत आणि तितकेच उत्तम सर्व गायक ] पण बाई गं... पार काळाजाच्या आत गेल आहे !
एक उत्तम मराठी चित्रपट बर्‍याच काळाने पाहिल्याचे प्रचंड समाधान मला मिळाले आहे, या चित्रपटासाठी कष्ट घेणार्‍या सर्वांना _/\_

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- जय जय भार्गवप्रिये भवानी। भयनाशके भक्तवरदायिनी। सुभद्रकारिके हिमनगनंदिनी। त्रिपुरसुंदरी महामाये ॥

सुक्या's picture

30 Sep 2022 - 2:28 am | सुक्या

अगदी खरे !!
मी ही कादंबरी कही वर्षांपुर्वी वाचली होती. त्यामुळे कथानक माहीत होते. परंतु गाणी अगदी खास आहेत. कथानकाला अगदी अनुरुप.
बाई गं गाण्यावर घेतलेली मेहेनत अगदी स्पष्ट दिसते. गीतकार, संगीतकार, गायिका, नृत्य दिग्दर्शक आणी नृत्यांगना या सगळ्यांची एकत्रीत मेहेनत पाहता हे गाणे मैलाचा दगड आहे हे नक्की.

मदनबाण's picture

30 Sep 2022 - 12:13 pm | मदनबाण

बाई गं गाण्यावर घेतलेली मेहेनत अगदी स्पष्ट दिसते. गीतकार, संगीतकार, गायिका, नृत्य दिग्दर्शक आणी नृत्यांगना या सगळ्यांची एकत्रीत मेहेनत पाहता हे गाणे मैलाचा दगड आहे हे नक्की.

जाता जाता :-
ओरिजीनल Vikram Vedha आता हिंदीत डब केलेला पुर्णपणे चकटफु उपलब्ध आहे ! :) ऑफिशीअली ऑन एमएक्स प्लेअर. :)
तुमच्यासाठी लिंक :- https://www.mxplayer.in/movie/watch-vikram-vedha-hindi-dubbed-movie-onli...

ओरिजीनल मुव्ही देखो, जिहादी कॉपिवूड बॉयकॉट करना जरुरी है भाई ! जय भवानी जय शिवाजी ! :)
तैमुरच्या अब्बाच्या बैलाला ढोल ! :)))
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- पञ्चमी पञ्चभूतेशी पञ्च-संख्योपचारिणी । शाश्वती शाश्वतैश्वर्या शर्मदा शम्भुमोहिनी ॥

मदनबाण's picture

29 Sep 2022 - 10:26 pm | मदनबाण

हिंदुत्व चॅप्टर वन :- मैं हुं हिंदु चा ट्रेलर पाहण्यात आला आहे.

जाता जाता :-
कल जिहादी सोच रखनेवाले तैमुर के आब्बा का मुव्ही आ रहा है ना ? आप तो जाओगे ही ना ?

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- जय जय भार्गवप्रिये भवानी। भयनाशके भक्तवरदायिनी। सुभद्रकारिके हिमनगनंदिनी। त्रिपुरसुंदरी महामाये ॥

हिंदुत्व चॅप्टर वन :- मैं हुं हिंदु चा ट्रेलर पाहण्यात आला आहे.
हे हिंदुत्व चॅप्टर वन :- में हिंदु हुं असे वाचावे.

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- जय जय भार्गवप्रिये भवानी। भयनाशके भक्तवरदायिनी। सुभद्रकारिके हिमनगनंदिनी। त्रिपुरसुंदरी महामाये ॥

टिनटिन's picture

30 Sep 2022 - 12:26 pm | टिनटिन

सध्या बऱ्याच ऍनिमेशन सिरीज/ चित्रपट बघतोय

१. the summit of gods (नेटफ्लिक्स ) - हाबु जोजी या fictional गिर्यारोहकांच्या जीवनावर आधारित ऍनिमेशन आहे . फुकूमाची नावाचा वार्ताहर त्याच्या शोधात असतो. हाबुचा जीवनप्रवास , एकटेच गिर्यारोहण करायची वृत्ती , george मॉलोरी चा मिळालेला कॅमेरा आणि त्याचा एव्हरेस्ट सर करण्याचा प्रयत्न याची कथा आहे. चित्रपट बघताना एक प्रकारचा मेडिटेशन फील येतो

२. The Liberators (नेटफ्लिक्स ) - बॅण्ड ऑफ ब्रदर्स सारखी आहे. फेलिक्स स्पार्क्स ह्या आर्मी ऑफिसरच्या अनुभवांवर आहे

३. बॅटमॅन (Hush ) Prime - ज्यांना जुने कार्टून नेटवर्कवाले बॅटमॅन आवडते त्यांना हा ऍनिमेशनपट आवडेल

४. साऊथ पार्कचे रिविजन चालूच असते पण सगळ्यांना नाही आवडणार . फारच satarical वाटते कधी कधी.

काही रिऍलिटी सिरीजचा पण नाद लागला आहे .

१. बिग टिम्बर (नेटफ्लिक्स ) - कॅनडामध्ये टिम्बर मिल चालवणाऱ्या कुटुंबाची थिम आहे. निसर्ग बघायला खूप छान वाटते. वेगवेगळी अवाढव्य यंत्रे , त्यांचे प्रॉब्लेम्स , या क्षेत्रातील धोके यांचे चांगले चित्रण आहे
२. Below Deck (नेटफ्लिक्स ) - luxury yacht वर काम करणाऱ्या टीमचे चित्रण आहे . त्यांचे पाहुणे आणि त्यांचे नखरे , आपापसातील रोमान्स असा सगळा मसाला आहे.

कुमार१'s picture

30 Sep 2022 - 1:49 pm | कुमार१

हा सह्याद्री वाहिनीवरील कार्यक्रम सुंदर असतो.
मी अधून मधून पाहतो परवा डॉ. सिसिलिया कारवालो यांची मुलाखत पाहिली.

त्या अतिशय सुंदर मराठी बोलतात. लक्षपूर्वक ऐकल्यावर हे दिसले की त्यांनी बोलताना एकही इंग्लिश शब्द (गरज नसताना) वापरला नव्हता.

सिरुसेरि's picture

3 Oct 2022 - 8:41 pm | सिरुसेरि

छान धागा . अनेक नवीन चित्रपटांची माहिती मिळाली . काही या आधी माहित असलेल्या चित्रपटांची नव्याने ओळख झाली . काही गाजलेल्या चित्रपटांची माहिती लिहिलेल्या धाग्यांची लिंक खाली देत आहे . ( जाहिरात ) .
http://www.misalpav.com/node/46978
http://www.misalpav.com/node/49670
http://www.misalpav.com/node/46533
http://www.misalpav.com/node/42653
http://www.misalpav.com/node/40694
http://www.misalpav.com/node/39435
http://www.misalpav.com/node/36903

सिरुसेरि's picture

3 Oct 2022 - 8:55 pm | सिरुसेरि

सध्या यु ट्युबवर "दिल के करीब" या कार्यक्रमात सुलेखा तळवळकर यांनी अनेक नामवंत कलाकारांच्या मुलाखती घेतल्या आहेत . हे सर्व भाग लोकप्रिय आहेत .

https://www.youtube.com/watch?v=gPeq_vUabMY

https://www.youtube.com/watch?v=6YGvONb8PjE

हल्लीच क्रिमिनल जस्टिस: अधूरा सच सीजन 3 पाहुन पूर्ण केली. माझे फ्वेरेट माधव मिश्रा उर्फ पंकज त्रिपाठी यात असल्याने उत्तम अभिनय असलेले कथानक पाहिला मिळेल याची खात्री होती, ती अर्थातच पूर्ण झाली ! मकडी चित्रपटातुन झळकलेली आणि त्या चित्रपटासाठीच सर्वोत्कृष्ट बाल कलाकार हा राष्ट्रीय पुरस्कार मिळवलेली श्वेता बसु प्रसाद हिला या वेब सिरीज मध्ये पाहिले तेव्हा ओळखलेच नाही ! तीने ठिक-ठाक अभिनय केला आहे. [ ही काही वर्षांपुर्वी सेक्स रॅकेट मध्ये अडकली होती ? आणि बहुतेक हैद्राबाद मधील बंजारा हिल्स या हाय प्रॉफाईल भागातुन तिला एका मोठ्या व्यवसायिकाच्या बरोबर नको त्या स्थितीत पकडले गेले होते असे मला आठवते. ती या सर्वातुन बाहेर आलेली दिसतेय ते एका प्रकार उत्तम म्हणावे ! ]

सध्या कांतारा ची हवा आणि चर्चा सगळीकडे आहे, हा पाहण्याची माझी इच्छा आहे.

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- दीपस्य प्रकाशः न केवलं भवतः गृहम् उज्ज्वालयतु जीवनम् अपि। शुभ दीपावली !

कुमार१'s picture

30 Oct 2022 - 8:32 am | कुमार१

सुमारे चार वर्षांनी रंगमंदिरात जाऊन नाटक पाहिले.

खरं खरं सांग..’!

फ्रेंच नाटककार फ्लॉरियन झेलरच्या "the truth’वर आधारित नीरज शिरवईकर लिखित आणि विजय केंकरे दिग्दर्शित नाटक.

हलकेफुलके धमाल मनोरंजन. विवाहबाह्य प्रेम प्रकरण हा नेहमीचा विषय छान फुलवला आहे. आनंद इंगळे यांच्या बहुरंगी अभिनयावर नाटक पेललेले आहे.
अन्य कलाकार: रुजुता देशमुख, सुलेखा तळवलकर आणि राहुल मेहंदळे.

नाटक संपल्यानंतर चारही कलाकार उभे राहून प्रेक्षकांना अभिवादन करतात तसेच ते त्यांच्या पुढील प्रयोगांची जाहिरातही करतात.
"

नाटक पाहणारी मंडळी आता आपण थोडीच राहिली आहोत. म्हणून जर तुम्हाला नाटक आवडले असेल तर तुमच्या मित्र परिवाराला ते पाहण्यास

जरूर सांगा",

असे आवाहन इंगळे यांनी केले.

व्हायकिंग्स नुकतीच पाहून झाली आता द एक्स्पान्स सुरू केलीय.

कुमार१'s picture

11 Dec 2022 - 6:59 pm | कुमार१

"रघुपती राघव राजाराम "
हे नाटक इथे पाहिले.

छान, आवडलेच..
त्या नावाचा भजनाशी काही संबंध नाही ! नाटकातल्या तीन भावांची नावे आहेत ती .

शानबा५१२'s picture

11 Dec 2022 - 8:25 pm | शानबा५१२

खरं तर गेला आठवडाभर मी डोळ्याच्या इन्फेक्शन ने त्रस्त आहे आणि त्यामुळेच रजेवर देखील आहे. डोळा उघडा ठेवणे कठीण जात होते म्हणुन काही पाहणे देखील नकोसे वाटतं होते.

आणि लेखाचे नाव, शिर्षक काय आहे?
सध्या मी काय पाहतोय ? भाग १०

हा विरोधाभास आहे. जोक्स अपार्ट, आयुर्वेदीक औषधे सांगु का? हाच रीप्लाय व्यनि करतो.

शानबा५१२'s picture

11 Dec 2022 - 8:41 pm | शानबा५१२

जर पिक्चरमधला हीरोच असा यडा (अ‍ॅक्चुली खुप घाण शब्द लिहायचा होता) असेल तर स्वःतला हीरो समजणारा प्रत्येकजण असाच यडा बनेल. ह्यांच्याकडुन काय प्रेरणा घ्यायची? हे पुरूष आतली कडी लावतात व बोलतात मी नाही त्यातला!
ह्या पिक्चरवरुन निघालेला अमिर(?)च्या भावाचे विचार युट्युब वर माहीती करा, तुम्हाला त्या हीरोला %%&&&&**** अस काहीतरी बोलावस वाटेल.

कुमार१'s picture

24 Dec 2022 - 9:00 pm | कुमार१

आवडली.

कुमार१'s picture

24 Dec 2022 - 9:01 pm | कुमार१

सुंदर. प्रेरणादायी

कुमार१'s picture

4 Feb 2023 - 4:45 pm | कुमार१

लेखन, अभिनय, दिग्दर्शन, नृत्य आणि शेती यांत कार्यरत
चतुरस्त्र !

उपेक्षित's picture

4 Feb 2023 - 6:06 pm | उपेक्षित

गेल्या रविवारी परेश मोकाशी यांचा मराठी चित्रपट 'वाळवी' पाहिला आणि अपेक्षेप्रमाणे धमाल होता, फक्त २ तासाचा आहे WFM आहे.

कुमार१'s picture

12 Feb 2023 - 10:27 am | कुमार१

हलकं फुलकं, नवे चेहरे.
एकंदरीत मला आवडले.

कुमार१'s picture

12 Feb 2023 - 10:30 am | कुमार१

दत्तक मूल या विषयाची सुरेख हाताळणी

चौकस२१२'s picture

13 Feb 2023 - 5:23 am | चौकस२१२

नेटफ्लिक्स वर " वध ", संजय मिश्रा आणि नीना गुप्ता ... "आंखो देखी" मधला परस्थितीने वैतागलेला मध्यमवर्गीय बाप किंवा मिर्झापूर मधील गावातील सरळ आयुष्य जगणारा वकील पांडे ... यांची आठवण झाली .. नीना गुप्ता यानं त्यांच्या वयाला आणि आवाज / देहयष्टी ला शोभनार्या अशा छान भूमिका मिळत आहेत , पंचायत मधील मंजुदेवी , किंवा "बधाई हो" मधील आई ...

कुमार१'s picture

2 Mar 2023 - 12:06 pm | कुमार१

2019 चा डोंबिवली रिटर्न (प्रमुख भूमिका संदीप कुलकर्णी) हा पाहिला.
पूर्वार्ध ठीक आहे; उत्तरार्ध भरकटलेला.
मुळात पूर्वीच्या डोंबिवली फास्टशी याचा काही संबंध नाही. पूर्ण वेगळ्या धर्तीवरची कथा आहे.

एक पापभीरु मध्यमवर्गीय, भाई- दादा आणि राजकारणी यांच्या नादी लागून भराभर श्रीमंत होत जातो आणि अखेरीस त्याचे पूर्ण पतन होते हा सारांश.
हॉटस्टारवर आहे