कण अमृताचे......

कर्नलतपस्वी's picture
कर्नलतपस्वी in जे न देखे रवी...
21 Sep 2022 - 12:05 pm

आयुष्याच्या सहाणेवर चंदन उगाळत नाही
भूतकाळा वरती, दोष मी उगाच मढत नाही

पांघरून भुतांच्या झुली ,वर्तमानात जगत नाही
उघडून चिंध्याचे गाठोडे, मी उगाच चिवडत नाही

करूनी पाटी कोरी, जुने हिशोब मांडत नाही
कर्जमुक्त मी आता, कुठलेही व्याज भरत नाही

झाली दृष्टीपटले साफ,लक्ष धुसर दिसत नाही
मिळणाऱ्या अमृत कणांचे,आता विष मी बनवत नाही

आयुष्यमुक्त कविताकवितामुक्तक

प्रतिक्रिया

कर्नलतपस्वी's picture

21 Sep 2022 - 12:09 pm | कर्नलतपस्वी

मुवी,माऊलींचे धन्यवाद.

ज्ञानोबाचे पैजार's picture

21 Sep 2022 - 12:12 pm | ज्ञानोबाचे पैजार

भावना पोचली, पण हे आचरणात आणणे फार अवघड आहे,
भल्या भल्यांची त्रेघातिरपिट होते.
पैजारबुवा,

कर्नलतपस्वी's picture

21 Sep 2022 - 12:39 pm | कर्नलतपस्वी

माऊली आपल म्हणणं बरोबर आहे पण ठरवलं तर फार आवघड नाही.

मुक्त विहारि's picture

22 Sep 2022 - 6:00 pm | मुक्त विहारि

अशक्य नक्कीच नाही ....

झाली दृष्टीपटले साफ,लक्ष धुसर दिसत नाही
मिळणाऱ्या अमृत कणांचे,आता विष मी बनवत नाही

_/\_

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

21 Sep 2022 - 7:14 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

क्या बात!!

कर्नलतपस्वी's picture

22 Sep 2022 - 5:42 pm | कर्नलतपस्वी

मिसळलेला काव्यप्रेमी,भक्ती प्रतिसादाबद्दल धन्यवाद.

प्रचेतस's picture

22 Sep 2022 - 5:46 pm | प्रचेतस

एकदम सुरेख

श्रीगणेशा's picture

22 Sep 2022 - 7:17 pm | श्रीगणेशा

मिळणाऱ्या अमृत कणांचे,आता विष मी बनवत नाही

खूप छान!

कर्नलतपस्वी's picture

22 Sep 2022 - 8:41 pm | कर्नलतपस्वी

प्रचेतस,श्रीगणेशा प्रतिसादाबद्दल मनापासून आभार.

प्राची अश्विनी's picture

23 Sep 2022 - 9:10 am | प्राची अश्विनी

खूप छान. ज्याला हे जमलं तो सुखी

प्राची अश्विनी's picture

23 Sep 2022 - 9:11 am | प्राची अश्विनी

पण एक शंका. अमृताचे कण की थेंब ? द्रव आहे म्हणून म्हटलं

कर्नलतपस्वी's picture

23 Sep 2022 - 1:57 pm | कर्नलतपस्वी

अमृत द्रव पदार्थ पण जेव्हा हाच शब्द म्हणून दुसर्‍या शब्दात बरोबर येतो त्या अनुषंगानेच त्याचा अर्थ घेतला जातो. जसे क्षण अमृताचा तसाच वापरला आहे. अर्थात हे स्पष्टीकरण माझे ,कुठलाच आधार नाही.
तशीही माझी भाषासमृद्धी गरिबीच्या रेषेखालील.
प्रतिसादाबद्दल मनापासून आभार.

प्राची अश्विनी's picture

23 Sep 2022 - 3:30 pm | प्राची अश्विनी

गरिबीच्या रेषेखाली... छत्रपती हो. फार सुंदर लिहिता तुम्ही.
पण तुमचं स्पष्टीकरणही शक्य आहे. मी सहज.शंका विचारली.

प्राची अश्विनी's picture

23 Sep 2022 - 3:33 pm | प्राची अश्विनी

#छत्रपती नाही तर छे छे लिहायचं होतं. Autocorrect खूप गोंधळ करतोय

कर्नलतपस्वी's picture

23 Sep 2022 - 4:08 pm | कर्नलतपस्वी

@प्राची अश्विनी,

गलेमा मधे शांताबाई शेळके यांच्या जन्मशताब्दी निमीत्त लिहीलेला लेख जरूर वाचा,कदाचित आवडेल व मला नवीन माहीती कळेल .

https://misalpav.com/node/50662/backlinks

😀 *** 🙏