तू

पाषाणभेद's picture
पाषाणभेद in जे न देखे रवी...
29 Apr 2022 - 9:38 am

तू चालते अशी झाडावरची वेल ग
अंगावरती पानं फुलं ल्यायते ग

तू हसते अशी झरा वाहतो ग
खळखळाटानं हासणं पिकतं ग

तुझ्या येण्यानं वारा वाहतो ग
येता येता सुगंघ आणतो ग

तू बघते तेव्हा अंगावर रोमांच येतो ग
बघून तुला मीच लाजल्यागत होतो ग

तू चंचला सुरेखा चतूरा रेखीव सरिता ग
तुझ्या ठाई प्रगती हर्ष आनंद वसतो ग

- पाषाणभेद
२९/०४/२०२२

प्रेम कविताकविताप्रेमकाव्य

प्रतिक्रिया

प्राची अश्विनी's picture

29 Apr 2022 - 5:37 pm | प्राची अश्विनी

वरिजिनल तू सुद्धा छान आहे

चौथा कोनाडा's picture

29 Apr 2022 - 11:05 pm | चौथा कोनाडा

व्वा, मस्तच !
💖

ज्ञानोबाचे पैजार's picture

30 Apr 2022 - 1:39 pm | ज्ञानोबाचे पैजार

पहिल्या वाचनातच आवडली होती.
क्षमा करा पाभे सर,
विडंबन लिहायच्या सुरसुरी मधे इथे प्रतिसाद लिहायचा राहूनच गेला,
पैजारबुवा,

कर्नलतपस्वी's picture

30 Apr 2022 - 9:30 pm | कर्नलतपस्वी

पाभे आवडली

कुमार१'s picture

5 Jun 2022 - 11:46 am | कुमार१

आवडली.

चित्रगुप्त's picture

5 Jun 2022 - 2:49 pm | चित्रगुप्त

निसर्गातील चैतन्य शब्दात ओतून मांडलेल्या मदमस्त कल्पना.
फक्त शेवटल्या ओळीतला 'प्रगती' शब्द वाचताना अडखळल्यासारखे झाले.

बघून तुला मीच लाजल्यागत होतो ग

हे वाचून आता खूप दूर गेलेल्या पौगंडावस्थेतले दिवस आठवले.

.