तू

पाषाणभेद जे न देखे रवी...
तू चालते अशी झाडावरची वेल ग अंगावरती पानं फुलं ल्यायते ग तू हसते अशी झरा वाहतो ग खळखळाटानं हासणं पिकतं ग तुझ्या येण्यानं वारा वाहतो ग येता येता सुगंघ आणतो ग तू बघते तेव्हा अंगावर रोमांच येतो ग बघून तुला मीच लाजल्यागत होतो ग तू चंचला सुरेखा चतूरा रेखीव सरिता ग तुझ्या ठाई प्रगती हर्ष आनंद वसतो ग - पाषाणभेद २९/०४/२०२२
वर्गीकरण
काव्यरस

6 टिप्पण्या 3,607 दृश्ये

Comments

ज्ञानोबाचे पैजार नवीन

पहिल्या वाचनातच आवडली होती. क्षमा करा पाभे सर, विडंबन लिहायच्या सुरसुरी मधे इथे प्रतिसाद लिहायचा राहूनच गेला, पैजारबुवा,

चित्रगुप्त नवीन

निसर्गातील चैतन्य शब्दात ओतून मांडलेल्या मदमस्त कल्पना. फक्त शेवटल्या ओळीतला 'प्रगती' शब्द वाचताना अडखळल्यासारखे झाले.
बघून तुला मीच लाजल्यागत होतो ग
हे वाचून आता खूप दूर गेलेल्या पौगंडावस्थेतले दिवस आठवले. .