पाषाणभेदाची चांदरात वाचून आम्हाला आमचा 'चांद' आणि रात आठवली! ;)
उरल्या केसांतुन फिरवतो हात || ध्रु ||
भांग तो करण्या केस नुरले
मी हरलो अन वीग जिंकले
न कळे कुणी केली केसांवर मात || १ ||
उरल्या केसांतुन फिरवतो हात || ध्रु ||
नापितापुढे कळ सोसतो मुश्कील
विचारे 'साहेब, केस कसे झाले गुल?'
विस्तारता चांद असा दिनरात || २ ||
उरल्या केसांतुन फिरवतो हात || ध्रु ||
वारे चढले वीगही पडले
एका क्षणी सारे अवचित घडले
लोका सांगे जणू आज टाकली मी कात || ३ ||
उरल्या केसांतुन फिरवतो हात || ध्रु ||
चतुरंग
प्रतिक्रिया
27 Apr 2009 - 9:29 pm | अभिज्ञ
रंगा काका,
उच्च झालेय विडंबन.
:)
अभिज्ञ.
--------------------------------------------------------
पॉझिटिव्ह थिंकिंग....? अजिबात जमणार नाहि.
27 Apr 2009 - 9:46 pm | अवलिया
हा हा हा
लै भारी
--अवलिया
27 Apr 2009 - 9:50 pm | प्राजु
मस्तच...!!
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
27 Apr 2009 - 10:52 pm | संदीप चित्रे
माझी खात्री होती की रंगाशेठ स्वस्थ बसूच शकणार नाही :)
27 Apr 2009 - 11:08 pm | बेसनलाडू
(केसाळ)बेसनलाडू
27 Apr 2009 - 11:37 pm | लिखाळ
मजेदार :)
-- लिखाळ.
28 Apr 2009 - 7:19 am | मनीषा
व्यथेचे अचूक प्रकटन केले आहे .
विडंबन छान..
28 Apr 2009 - 7:25 am | शितल
चतुरंगजी,
विडंबन मस्त जमले आहे. :)
28 Apr 2009 - 7:35 am | पाषाणभेद
मी वाटच बघत होतो याची.
प्र. के. अत्रेंची आठवण झाली.
फक्त तारीख पण टाका खाली.
- पाषाणभेद उर्फ दगडफोड्या (- राजेंनी बहाल केलेले नाव)
28 Apr 2009 - 11:02 am | परिकथेतील राजकुमार
उच्च !
=)) =))
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य
28 Apr 2009 - 11:35 am | स्मिता श्रीपाद
लई बेश्ट झलय विडंबन... :-)
28 Apr 2009 - 11:37 am | स्वाती दिनेश
विडंबन आवडले,:)
स्वाती
28 Apr 2009 - 8:24 pm | क्रान्ति
मस्त विडंबन!
=D> क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}
www.mauntujhe.blogspot.com
29 Apr 2009 - 6:19 am | चतुरंग
चतुरंग