आशाबाई ,वय ६० आणि त्यांचे यजमान वय ६५ दोघेच गावाकडे राहत होते.यजमानांनी निवृत्तीनंतर गावाकडे बंगला बांधला होता.पहाटे उठावे,गावकडे शेतात जावे,आशाबाईनी सुग्रास जेवण बनवावे,रात्री लख्ख ताऱ्यात ईश्वराचे ध्यान करता निजावे.इतके सुंदर त्यांचे जीवन गेली दोन वर्षे चालू होते. खत आणायला यजमान तालुक्याला दुचाकीवर गेले होते.पण काळाने घात केला.काकांच्या दुचाकीला अपघात झाला आणि त्यातच काकाचं निधन झालं.आशाबाई तर सैरभैर झाल्या होत्या.रात्ररात्र त्यांना झोप येईना .मुलगा अमेरिकेत शिकायला होता.अजून तीन वर्ष त्याचे क्षिक्षण चालू राहणार होते.तेव्हा आशाबाईना गावकडे एकटीलाच राहावे लागणार होते.
आशाबाईंची गावाकडे सगळ्यांशी जुजबी ओळख झाली होती.पण बरीचशी काम आता त्यांना एकटीने करावी लागतं
होती.आशाबाईंच्या शेजारी सीताताई राहत.मुलगा सून नातवंडे असा भरला संसार होता.घराची लाईट एक दिवस झाला काही कारणाने गेले होती ,तेव्हा आशाबाई सीताताईना मदत मागायला गेल्या.तेव्हा त्यांच्या मुलाने वीज कार्यालयात हेलपाटे मारत ,वीज पुन्हा पूर्ववत होण्यासाठी बरीच मदत केली.आणि तिथून आशाबाईना कधीही काहीही मदत लागली की सीताताईं सर्वेतोपरी मदत करत.
दोघी उन्हाळी काम,शेतातली काम मिळून मिसळून करत.पण कधी कधी दुपारच्या निरभ्र उन्हामध्ये आशाताईंच्या मनाशी जोडीदाराने असे ढळत्या वयात अचानक सोडून जाण्याचे दुख: उभारून येत असत.सीताताई बरोबर आपल्या जोडीदाराचे अनेक किस्से त्या सांगून भूतकाळात रमत असत.मधेच पदराने डोळे पुसत वार्धक्याचा पोक्तपणा ओढून घ्यायचा प्रयत्न करीत.सीताताईही ह्या विधवा आणि वार्धक्याकडे झुकलेल्या होत्या.त्यांनाही या पोकळीची जाणीव होती.पण त्यांच्याकडे नातवंडे,सुना मुले मन रमवायला होते.त्यामाने आशाबाईंची पोकळी खूप मोठी होती.आपल्या या शेजारीणी-मैत्रिणीला आता पोकळी भरायला आधार द्यायला हवा हे त्यांनी हेरले होते.
सीताताईंनी त्यांना भजनी मंडळातही सामील करून घेतलं होत.त्या नाद तालात आशाताई हरवून जात.मुळचाच सुंदर आवाज मिळालेल्या आशाताई सुंदर भजने गाऊ लागल्या.सीताताई आणि आशाबाई असे सुंदर भजनाचे समीकरण जोडले गेले होते.अध्यात्माची वाट आणखीनच भक्तिमय झाली होती.आशाबाईनी आता ग्रंथांचा अभ्यास करत निरूपणाची वाट धरली होती.अभ्यासाचा व्यासंग भरपूर वाढवत त्यांनी बरीच टिपण काढली होती.हळू हळू अध्यात्माच्या सानिध्यात दोन वर्षे सारून गेली आशाबाई आणि सीताताई यांची मैत्री आता घट्ट झाली होती.आयुष्यात अचानक आलेली पोकळी नाहीशी झाली होती.
आशाबाई दोन वर्षांनी मुलाकडे परदेशात राहायला गेल्या होत्या.अचानक निर्माण झालेली पोकळी मैत्रिणीच्या साथीने भरून निघाली होती.आशाबाईनी मैत्रीचा रोपं म्हणजे आध्यात्मिक भजने मंडळ परदेशात सुरु करत त्याचा वटवृक्ष केला होता.
-भक्ती
जून २०२१
प्रतिक्रिया
1 Aug 2021 - 1:42 pm | गॉडजिला
भलेही हिचे महत्व मुलांना समजून यायला पोकळी अनुभवण्याचा काळ येई पर्यंत वाट जरी पहावी लागेल तरीहि अत्यंत सुंदर बालकथा हे नक्की.
1 Aug 2021 - 2:11 pm | Bhakti
अरे हो असा विचारच नव्हता केला.
बाल संस्कार कथा म्हणूया!
धन्यवाद गॉडजिला.
1 Aug 2021 - 2:48 pm | गॉडजिला
ते ही एक प्रकारे अगदी योग्यच आहे भक्तिजी, कारण मुलांना मुळातच हि बालकथा आहे हे समजायलाही आधी बरेच मोठे व्हावे लागेल...
1 Aug 2021 - 3:55 pm | पाषाणभेद
गॉडजिला, अहो ही तर अत्यंत गूढ कथा आहे.
1 Aug 2021 - 4:09 pm | Bhakti
पाषाणभेद ,गॉडजिला ह्यांच्या भावना पोहोचल्या आहेत. :)
1 Aug 2021 - 5:19 pm | पाषाणभेद
__/\__
1 Aug 2021 - 7:19 pm | गॉडजिला
गॉडजिला, अहो ही तर अत्यंत गूढ कथा आहे.
Disagree...
मे बी काही काळाने मला किंवा तुम्हाला समजून जाईल हे नक्की काय आहे ते...
1 Aug 2021 - 2:27 pm | कुमार१
छान आहे.
1 Aug 2021 - 2:30 pm | मदनबाण
कथा छान आहे.
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी : - Kathalikkum Pennin Kaigal | RajheshVaidhya | Ramya Nambessan
1 Aug 2021 - 4:10 pm | Bhakti
धन्यवाद
कुमारजी,मदनबाणजी!
1 Aug 2021 - 7:36 pm | कंजूस
मैत्री धावून येते. पण नवीन ठिकाणी गेल्यावर जुन्या ठिकाणच्या मैत्रीचा उपयोग होत नाही. पुन्हा नवे लोक जोडावे लागतात. आणि ते मिळाल्यास आनंदच आहे.
नवीन जोडायला गेलेले लोक उपयोगी पडतीलच याची ग्यारंटी नसते. नशीब.
1 Aug 2021 - 9:10 pm | Bhakti
नवीन जोडायला गेलेले लोक उपयोगी पडतीलच याची ग्यारंटी नसते. नशीब.
मैत्रीवर जास्त भार देऊ नये.नवे मात्र जोडत जावे..जमेल तशी देवाण -घेवाण असावी.
1 Aug 2021 - 10:20 pm | गॉडजिला
शिव खेरांचा यू कॅन विन मधील उपदेश मला जास्त प्रॅक्टीकल वाटतो तो म्हणजे सर्वांशीच प्रेमाने वागावे व मैत्री मोजक्यांशी ठेवावी :)
1 Aug 2021 - 11:23 pm | Bhakti
शिव खेरा नाही माहित,पण मैत्री ठेवलि कशी जाईल?ती टिकायला शिकवावं नाही लागतं.:)
1 Aug 2021 - 11:38 pm | गॉडजिला
पण मैत्री ठेवलि कशी जाईल?ती टिकायला शिकवावं नाही लागतं.:)
About friends, we don't have to like them... we need them ;) हा हा हा
असो शब्दखेळात न पडता त्याचा मतितार्थ हा आहे की तुम्ही सर्वांशी प्रेमाने वागा भलेही मैत्री मोजक्या लोकांशी टिको :)
1 Aug 2021 - 11:42 pm | Bhakti
मग बरोबर आहे. ;)Be natural!Be yourself!
1 Aug 2021 - 10:47 pm | जागु
छान.
1 Aug 2021 - 11:24 pm | Bhakti
धन्यवाद जागुजी.
1 Aug 2021 - 11:25 pm | Bhakti
यानिमित्ताने एक कविता :):)जुनी आहे;)
आपली मैत्री एक गोंडस भेट
जणु पिवळ्या गुलाबाचे देढ
रुणझुण ही मैत्रीची मनाला देते साद थेट
आपली मैत्री एक अथांग सागर
जणु सुख दु:खाची आयुष्याला झालर
जीवाला जीव देत मनाला सुखावते फ़ुंकर
आपली मैत्री एक सुरेख गहिरे चित्र
जणु नवी पालवी सुखावी चैत्र
कधीही ना होई हे सोनेरी पान गलितगात्र
आपली मैत्री एक गुज मनीचे
जणु सुंदर गीततराणे ह्या जीवनाचे
नाते हे आहे अनमोल विश्वासाचे
@भक्ती
०४/०८/०७
1 Aug 2021 - 11:25 pm | Bhakti
यानिमित्ताने एक कविता :):)जुनी आहे;)
आपली मैत्री एक गोंडस भेट
जणु पिवळ्या गुलाबाचे देढ
रुणझुण ही मैत्रीची मनाला देते साद थेट
आपली मैत्री एक अथांग सागर
जणु सुख दु:खाची आयुष्याला झालर
जीवाला जीव देत मनाला सुखावते फ़ुंकर
आपली मैत्री एक सुरेख गहिरे चित्र
जणु नवी पालवी सुखावी चैत्र
कधीही ना होई हे सोनेरी पान गलितगात्र
आपली मैत्री एक गुज मनीचे
जणु सुंदर गीततराणे ह्या जीवनाचे
नाते हे आहे अनमोल विश्वासाचे
@भक्ती
०४/०८/०७
2 Aug 2021 - 5:11 pm | चौथा कोनाडा
व्वा, खुप आशादायक आणि प्रेरक कहाणी !
👌
म्हणतात ना "जगी ज्यास कोणी नाही, त्यास देव आहे" किंवा "जिसका कोई नहीं उसका तो खुदा हैं यारों"