मिपा छायाचित्रण कला स्पर्धा २०२१- स्पर्धे करता नाही

साहित्य संपादक's picture
साहित्य संपादक in मिपा कलादालन
26 Jun 2021 - 10:53 am

छायाचित्रण कला स्पर्धा दणाक्यात सुरु झाली आहे. मिपाकरांचा त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे.

स्पर्धक एका गटात एकच छायाचित्र देउ शकत असल्याने त्यांच्या आवडत्या छायाचित्रांचा आस्वाद इतर मिपाकरांना घेता यावा म्हणून हा धागा सुरु करत आहोत.

या धाग्यावर प्रतिसादामधे मिपाकर आपली आवडती छायाचित्रे देउ शकतात. (कितीही)

धाग्याची सुरुवात प्रशांत आणि टर्मिनेटर यांच्या या तीन छायाचित्रांनी करत आहोत.

PRASHANT
प्रशांत

Terminator 1
गोव्यातील शापोरा किल्ल्यावरून दिसणारा समुद्र
-टर्मीनेटर

Judgement Day

देवबाग ते वालावल च्या रस्त्यावर चिपी विमानतळजवळील एका पुलावरून दिसणारे दृष्य
- टर्मीनेटर

प्रतिक्रिया

तुषार काळभोर's picture

8 Jul 2021 - 6:13 am | तुषार काळभोर

एकदम खुन्नस ने बघत असल्या सारखा दिसतोय.

राघव's picture

8 Jul 2021 - 11:09 am | राघव

सर्वसाक्षीशेठ, खूप सुंदर आहेत सगळे पोर्ट्रेट्स! :-)

ज्ञानोबाचे पैजार's picture

8 Jul 2021 - 2:14 pm | ज्ञानोबाचे पैजार

एखादा फास्ट बॉलर बॉल टाकायला तयार असताना असाच सज्ज उभा असतो.

पैजारबुवा,

@सर्वसाक्षी. छान पोट्रेट्स
@राघव. सर्व फोटो आवडले. आम्हाला हरिहरेश्वर मंदिरात फोटो काढण्यास बंदी करण्यात आली होती

गोरगावलेकर's picture

8 Jul 2021 - 9:17 am | गोरगावलेकर

गंगटोकहून लाचेन (उ.सिक्कीम) जातांना वाटेत चुंगथांग येथे तीस्ता ऊर्जा प्रकल्पातर्फे लावलेली एक पाटी आणि त्यावरील माझ्या भटकंतीच्या आवडीशी निगडित एक छान सुविचार
फोटो : नोव्हेंबर २०१९

साम वाळवंट, जेसलमेर येथील एक सूर्योदय
फोटो: नोव्हेंबर २०१६

गुल्लू दादा's picture

8 Jul 2021 - 9:50 am | गुल्लू दादा

दोन्ही फोटो झकास. धन्यवाद.

टर्मीनेटर's picture

8 Jul 2021 - 6:05 pm | टर्मीनेटर

गंगटोकचा सुविचार व फोटो मस्तच आणि सुशिंचा डाय हार्ड फॅन असल्याने त्यांचा कथानायक असलेल्या दाराबुलंदचे गाव म्हणुन आवर्जून आणि विशेष जिव्हाळ्याने बघितलेल्या 'साम' चा फोटो तर लै भारी 👍

गोरगावलेकर's picture

8 Jul 2021 - 10:30 pm | गोरगावलेकर

नुकतीच नोटबंदी झाली होती. एटीएमच्या रांगेत उभे राहण्यासाठी बहुतेक पर्यटकांनी आपली सहल रद्द केलेली. जेसलमेरला अगदी तुरळक पर्यटक. एका उंटवाल्याला हाक मारावी तर दहा जणांचा गराडा. मागणी कमी-पुरवठा जास्त त्यामुळे अगदी कमी किमतीत तेही मोठा राउंड मारायला मिळत होता.
तीन दिवसात कित्येकदा उंटावरून साम व थार वाळवंटात फिरण्याचा मनसोक्त आनंद लुटला. आमचा फायदा होत असला तरी त्यांचा उंटांच्या खाण्याचा खर्च तरी निघत असेल का शंकाच होती. त्यामुळे ग्रुपतर्फे प्रत्येक राईडनंतर स्वखुशीने बक्षीस मात्र द्यायला विसरलो नाही.
हा सूर्योदयाचा फोटो घेतला त्याच फेरीच्या परतीत भाचीचा महागडा फोन वाटेत कुठेतरी पडला. परत आल्यावर नाश्टा वगैरे आटोपून हॉटेल सोडायच्या वेळी फोनची आठवण झाली. फोन केला तर रिंग वाजत होती पण कोणी उचलत नव्हते. वाळूत कुठे गाडला गेला असेल तर परत मिळणे मुश्कीलच.
उंटवाल्याना गाठले. त्यांच्याकडे काम नव्हतेच. दोघे-तिघे बरोबर निघाले. भाची कसे कसे गेलो ती वाट दाखवत होती. एके ठिकाणी मात्र ती दाखवत असलेली दिशा उंटवाल्याना चुकीची वाटली. कारण उंटांच्या पाउलाच्या खुणा दुसरीकडेच जात होत्या. त्यांचे म्हणणे सकाळपासून या भागात दुसरा ग्रुप आलेला नाही. तसेच वाराही नाही त्यामुळे २-३ तासांपूर्वीच्या पाऊलखुणा बुजलेल्या नाहीत व त्या आमच्याच ग्रुपच्या आहेत. आणि खरोखर त्यांनी नेलेल्या वाटेवरच फोन सापडला.
वास्तविक आम्हाला चुकीच्या वाटेवर नेऊन नंतर ते फोन शोधू शकत होते. पण त्यावेळी धंद्याची बिकट अवस्था असतांनाही त्यांनी प्रामाणिकपणे मदत केली या गोष्टीला सलाम.

ज्ञानोबाचे पैजार's picture

9 Jul 2021 - 10:05 am | ज्ञानोबाचे पैजार

आपण ज्यांना गरीब समजतो बहुतेक वेळा ते लोकच खुप श्रीमंत असतात.
पैजारबुवा,

टर्मीनेटर's picture

9 Jul 2021 - 10:45 am | टर्मीनेटर

भारी आहे किस्सा....
स्थानिकांना त्या त्या परिसराचे माहित असलेले बारकावे, त्यांचे भौगोलिक ज्ञान, त्यांची निरीक्षणे आणि अनुभव आपल्यालाही खूप काही शिकवून जातात.

हंटरब्राव्हो's picture

8 Jul 2021 - 11:18 am | हंटरब्राव्हो

छायाचित्रे अपलोड कशी करतात बुवा?
मार्ग दाखवा.

राघव's picture

8 Jul 2021 - 12:09 pm | राघव

http://www.misalpav.com/comment/1030977#comment-1030977

येथे मार्गदर्शन केलेले आहे. तसेच इतर प्रतिसादही उपयुक्त आहेत.

हंटरब्राव्हो's picture

8 Jul 2021 - 12:47 pm | हंटरब्राव्हो

माहिती उपयुक्त आहे पण तरीही काय समजाना बॉ…
असो. काही फक्त व्यवसायानिमित्त पाहायला मिळणाऱ्या जागांचे आणि ठिकाणांचे फोटो होते. सर्वसामान्य नागरिक तिथं जाऊ शकत नाहीत म्हणून शेअर करावेसे वाटले.
धन्यवाद !

हंटरब्राव्हो's picture

8 Jul 2021 - 12:25 pm | हंटरब्राव्हो

अनवट..

प्रचेतस's picture

8 Jul 2021 - 12:37 pm | प्रचेतस

वेरुळ

a
वेरुळ

a

Bhakti's picture

8 Jul 2021 - 2:11 pm | Bhakti

अजिंठा अजिंठा पण द्या असेल तर.

प्रचेतस's picture

8 Jul 2021 - 2:25 pm | प्रचेतस

a

a

a

गुल्लू दादा's picture

8 Jul 2021 - 2:59 pm | गुल्लू दादा

यातला पहिला खूप आवडला. बाकीचे पण छान आहेत. धन्यवाद.

तीनही फोटो अप्रतिम आहेत.
लवकर वारी घडावी रे देवा!

टर्मीनेटर's picture

8 Jul 2021 - 5:35 pm | टर्मीनेटर

छान आहेत फोटोज!
माझ्याकडेही अजिंठा लेण्यांचे काही फोटोज असतील, शोधाशोध करुन मिळाल्यास तेही डकवीन.

राघव's picture

8 Jul 2021 - 5:45 pm | राघव

फार फार सुंदर वल्लीभौ! एक नंबर!

चौथा कोनाडा's picture

8 Jul 2021 - 6:18 pm | चौथा कोनाडा

प्रचेतस,

सुंदर आहेत तिन्ही फोटोज !

गोरगावलेकर's picture

8 Jul 2021 - 6:54 pm | गोरगावलेकर

दोन्ही लेण्यांचे फोटो सुंदर.
अजिंठ्याचे विशेष आवडले.
पेडगावचा फोटो पूर्वी पाहिला असला तरी परत बघायला छानच .

ज्ञानोबाचे पैजार's picture

8 Jul 2021 - 2:16 pm | ज्ञानोबाचे पैजार

दगडातलं सौदर्य शोधावे ते याच माणसाने

पैजारबुवा,

नावातकायआहे's picture

8 Jul 2021 - 2:31 pm | नावातकायआहे

+१११११११११११११११

नाद च करायचा नाय!

टर्मीनेटर's picture

8 Jul 2021 - 3:59 pm | टर्मीनेटर

अगदी मनातलं बोललात... लेणी, शिल्प आणि मूर्तिकलांबद्दल त्यांचा व्यासंग प्रचंड आहे 🙏

टर्मीनेटर's picture

8 Jul 2021 - 3:46 pm | टर्मीनेटर

वाह! सुंदर फोटोज 👍

सर्वसाक्षी's picture

8 Jul 2021 - 5:38 pm | सर्वसाक्षी

उत्तम चित्रे

प्रचेतस's picture

8 Jul 2021 - 12:40 pm | प्रचेतस

a

टर्मीनेटर's picture

8 Jul 2021 - 3:47 pm | टर्मीनेटर

कसले अवशेष आहेत हे?

पेडगावचे भग्न बाळेश्वर मंदिर.

तीन तासांपूर्वी टिपलेले सह्याद्रीचे निसर्गसौदर्य...
सह्याद्री

सह्याद्री

सह्याद्री

सर्वसाक्षी's picture

8 Jul 2021 - 5:38 pm | सर्वसाक्षी

खास आव्डला

राघव's picture

8 Jul 2021 - 5:46 pm | राघव

असेच म्हणतो. फ्रेश आहे एकदम!

गोरगावलेकर's picture

8 Jul 2021 - 6:56 pm | गोरगावलेकर

रस्त्याच्या हेअर पिन वळणाचा फोटो मस्तच

प्रचेतस's picture

8 Jul 2021 - 7:03 pm | प्रचेतस

सुरेख.

ताम्हिणी घाट की वरंधा घाट?

पेण तालुक्यातील व्याघ्रेश्वर मंदीराच्या रस्त्यावरील विराणी ह्या आदिवासी पाड्या जवळचा परिसर …

प्रचेतस's picture

8 Jul 2021 - 7:54 pm | प्रचेतस

खूपच सुरेख आहे. सह्याद्री कायमच सुंदरच दिसतो, मात्र पावसकाळात त्याचे सौंदर्य फारच खुलून येते.

तुषार काळभोर's picture

8 Jul 2021 - 10:00 pm | तुषार काळभोर

पहिला वळणदार फोटो तर एकदम भारी...
.
.
.
भव्य हिमालय तुमचा आमचा, केवळ माझा सह्यकडा!

कंजूस's picture

9 Jul 2021 - 8:28 am | कंजूस

साम वाळवंटाचा विशेष आवडला. तीन फेऱ्या झाल्यात राजस्थानात पण वाळवंटी भाग अजून बाकी आहे. अजून तीन लागतील.

लेण्यांचे नेहमीप्रमाणे सुरेख.

सह्याद्री घाट- स्वत:चे वाहन नसल्याने अशी दृष्ये एसटीच्या खिडकीतूनच पाहून समाधान मानावे लागते.

हंटरब्राव्हो's picture

9 Jul 2021 - 3:00 pm | हंटरब्राव्हो

a

कंजूस's picture

12 Jul 2021 - 9:00 am | कंजूस


Image tag. टाकलेच नाहीत., raw=0 नाही. raw=1 करा.

टर्मीनेटर's picture

12 Jul 2021 - 11:50 am | टर्मीनेटर

सुंदर फोटो...
लेह-लडाख फोटोंमध्ये जितके सुंदर दिसते तेवढे प्रत्यक्षात सुंदर दिसत नाही असे माझे वैयक्तिक मत आहे!

कंजूस's picture

12 Jul 2021 - 7:31 pm | कंजूस

फोटोंमध्ये जितके सुंदर दिसते तेवढे प्रत्यक्षात सुंदर दिसत नाही

जीवघेणं थंड वाळवंट आहे. आणि मनुष्यास गाढवासारखं गवत पाण्यावर जगता येत नाही.

टर्मीनेटर's picture

12 Jul 2021 - 9:15 pm | टर्मीनेटर

जीवघेणं थंड वाळवंट आहे. आणि मनुष्यास गाढवासारखं गवत पाण्यावर जगता येत नाही.

😀 😀 😀
अर्थात हे खरं असलं तरी त्या ठिकाणाला भेट द्यायची इच्छा असलेल्या कोणालाही नाउमेद करण्याचा माझा बिलकुल उद्देश नाही. इतक्या उंचीवर, हाडे गोठावणाऱ्या थंडीत रहाण्याची शारीरिक क्षमता, मुबलक वेळ, रस्ता मार्गे जाणार असतील तर भरपूर लांब अंतराचा आणि चक्राकार रस्त्यांवरचा प्रवास करण्याची तयारी असल्यास एक अनुभव घेण्यासाठी जरूर जावे. पण फेसबुक, इंस्टाग्राम वा अन्य सोशल मीडिया वरील विलक्षण सुंदर दिसणारे फोटोज आणि ब्लॉग्स वरची रसभरीत वर्णने वाचून किंवा RE (रॉयल एनफिल्ड) गँग्सचे अनुभव ऐकून/वाचून जायची इच्छा झाली असेल तर नक्कीच पुनर्वीचार करावा असा आगंतुक सल्ला देऊन थांबतो.

कंजूस's picture

13 Jul 2021 - 8:15 am | कंजूस

बरेच वाचलेत. आणि फोटो प्रदर्शनंही पाहिली आहेत.
एका बाइक ब्लॉगमध्ये लिहिलंय -

वाटेत टपरीवर म्यागी, गुलकोज बिस्किटे, चा मिळतो. चा पिताना टपरीवाला विचारतो
"आप लोग यहा क्यूं आते हैं?
दसबारह बाईकवाले ग्रूप रोज दसपंधरह या जादा आते हैं।
-------------
प्लान - कोची/बंगळुरु/मुंबई/पुणे ... बाइक्स रेल्वेने दिल्लीला पाठवायच्या आणि मग रोंरोंरों सुरू.

पण काही अपवाद म्हणजे तिथे जाऊन थंडीतही राहतात आणि खरा अनुभव घेतात तिथल्या खडतर जीवनाचा. यापेक्षा अधिक सैन्यातले घेतात.

सौंदाळा's picture

13 Jul 2021 - 8:59 pm | सौंदाळा

मी तर म्हणतो आवर्जुन जा. अतिशय वेगळा निसर्ग, मोनेस्ट्री, रिव्हर राफ्टींग, धबधबे, ओसाड वाळवंटे, हिरवीगार कुरणे, प्रचंड तलाव, विविधरंगी डोंगर, खळ्खळुन वाहणार्‍या नद्या, तुरतुकसारखे डोंगरावर वसलेले आणि एलओसी पासुन जवळ असलेले नितांतसुंदर गाव, हानले सारखे चीन हद्दीजवळचे पक्षीनिरिक्षणासाठी प्रसिध्द गाव आणि वेधशाळा, लोमा आणि न्योमा दरम्यानचे अप्रतिम लँड्स्केप, बाईकवरुन जाताना छोट्या गावातील रस्त्याच्या कडेला एका ओळीत आपल्याला टाळ्या द्यायला थांबलेली गोजिरवाणी मुले. खुपच मजा येते. जुलै, ऑगस्टमधे तापमान पण सुसह्य असते.
आणि शक्य असेल तर बाईक घेऊनच फिरा. कारमधुन फिरलात की ५०% नजारा हरवुन जातो आणि प्रवासाची मजा यायच्याऐवजी शीण येतो. २५-३० च्या स्पीड्ने डोंगरदर्‍यातुन रमत गमत बाईक चालवण्याची मजाच वेगळी. तुम्हाला खोटे वाटेल पण ६ दिवसात (नाष्टा, दोन्ही जेवणे पकडुन) एकदाच भाज्या घालुन नुडल्स (मॅगी नाही) खाल्ल्या.
अर्थात बाईक चालवण्याची आवड, शारीरिक तंदुरुस्ती या महत्वाच्या गोष्टी आहेतच.

हंटरब्राव्हो's picture

12 Jul 2021 - 12:30 pm | हंटरब्राव्हो

धन्यवाद. पुढच्या वेळी लक्षात ठेवीन.

अथांग आकाश's picture

9 Jul 2021 - 4:13 pm | अथांग आकाश

छायाचित्रांची मेजवानी आहे ;)

.

हंटरब्राव्हो's picture

9 Jul 2021 - 6:25 pm | हंटरब्राव्हो

शरणं गच्छामि..