मनाला मांस असते का? आपल्या सगळ्याच अवयवांत मग अगदी मेंदूपासून ते पायाच्या करंगळी पर्यंत मांस असते. आणि मन, ते कशाचे बनलेले असावे? कुठे पडला, ठेच लागली, वार झाला की माणूस जखमी होतो. थोडक्यात आपल्या मांसाला धक्का लागतो. कधी एखादा लचकाही तुटतो. पुढे जखम भरते म्हणजे गमावलेले किंवा बिघडलेले मांस पूर्ववत होते. जखमा मनालाही होतात असं ऐकलंय मी. अनुभवलं सुद्धा! मग तेव्हा कोणत्या मांसाला धक्का लागतो आणि मन जखमी होते? जखमी व्हायचं असेल तर मांस असणे आवश्यक आहे. म्हणजेच मनाला मांस आहे. आपल्यात नाही एवढेच. आपल्या प्रियजनांच्या जखमांनी आपल्या ही मनाला वेदना का व्हाव्यात? कारण आपली मनं त्यांच्या शरीरात वास करतात. माणूस मांसाचा गोळा असला तरी कुणी जाड असतो तर कुणी तोळामासा. त्याचप्रमाणे सुदृढ आणि सशक्त मने अनेकांच्या शरीरात वसलेली असतात. याउलट कृश मने केवळ काही जणांवर समाधान मानतात. जेवढ्या जास्त जीवांचे मिळून मन बनते तेवढेच ते हरहुन्नरी आणि प्रसन्न असते. आपल्या भोवती वावरणारी प्रत्येक व्यक्ती कित्येक मनांचे मांसल रूप असते. प्रत्येक माणूस हाच मनाचा मांसल भाग असतो. माणूस म्हणजे मांस. मन म्हणजे माणूस.
प्रतिक्रिया
16 May 2021 - 10:42 am | विजुभाऊ
लेख अत्यंत दवणीय आहे.
पुढील वाटचालीस हार्दीक शुभेच्छा
16 May 2021 - 11:02 am | सतिश गावडे
होय,मिपाला आपले दवणीय लेखन करणारे लेखक गवसले आहेत :)
16 May 2021 - 1:39 pm | प्रसाद गोडबोले
पण सर , लेखन दवणीय असलं तरीही आपण व्यवस्थित विवेचन करु शकतो.
आयुर्वेदात सप्त धातु सांगितले आहेत = रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा और शुक्र. सदर लेखक मांस वर अडकलेले दिसतात, पण मन हे मज्जा लेव्हल ला असल्याने त्यात मजा आहे !
मन म्हणजे आपल्या मेंदुत असलेल्या अब्जावधी न्युरॉन्स ची कनेक्शन्स.
येस. मुळात मन जखमी होणे हे दोन प्रकारे होते - पहिले म्हणजे फिजिकल आणि दुसरे म्हणजे इमोशनल. फिजिकल म्हण्जे मेंदुला अन त्यातील न्युरॉन्स ना धक्का लागला की मन जखमी होते ते . युट्युब वर कंकशन्स concussion असे सर्चह करा , ह्य विषयी तुम्हाला खुप काही शिकायला मिळेल . https://youtu.be/xvjK-4NXRsM
आणि दुसर्या प्रकारची जखम म्हणजे मन अर्थात न्युरॉन्स ने आधीचही जी कनेक्शन्स बनवली आहेत ती तुटणे , हे कशानेही होऊ शकते, म्हणजे नवीन वाचन , नवीन लोकांशी संपर्क येणे , लोकांचे नवीन अनुभव येणे वगैरे. उदाहरणार्थ : सध्या मी फ्रेडरिक निश्चा वाचत आहे एके ठिकाणी तओ म्हणतो - आय फइलॉसोफाईझ विथ हॅमर . तो लिटरली असे विचार मांडत असतो कई जे आपलया लहानपणापासुनच्या शिकवणीला संस्कारांना हतोडीने तोडत असतात तेव्हा मन जखमी होण्याची शक्यता असते , रादर , ते तसे होतेच. अर्थात ही जखम , हे ब्रेकिंग हे जिम मध्ये व्यायाम केल्यावर मसल्स ब्रेक होतात त्या प्रकारातले असते कारण त्यातुनच पुढे हायपरट्रॉफी होणार असते !!
आपले प्रियजन अन त्यांच्या वेदनेने आपल्या मनाला का दु:ख होते - फार सोप्पे उत्तर आहे. फक्त तुम्हाला आधी प्रियजन म्हणजे काय ह्याचे उत्तर शोधावे लागेल.

आपण ज्या ज्या माणासांना ओळखतो ते ते एक कनेक्टेड ग्राफ असतात, बहुतांश वेळा डायरेच्टेड आणि वेटेड ग्राफ्स . आपला ब्रेन हे असे काहीसे मॉडेल करत असतो . एखाद्या कनेक्शन्चे वेट जितके जास्त तितके ते कनेक्शन जवळचे अर्थात तुम्ही म्हणता तसे प्रियजन वगैरे. पण अॅट द बेसिक, हे फक्त आपल्या न्युरॉन्स मधील कनेक्शन आहे बस्स बाकी काही नाही . आणि सर्वच्या सर्व कनेक्टेड असल्याने दु:ख आणि आनंद हे दोन्हीही ट्रान्स्फर होत असते .
(अर्थात ही माझी थेअरी आहे, ह्याला सपोर्टिंग काही वैज्ञानिक पुरावा नाही . ) आता आपले जवळचे कोण आणि लांबचे कोण हे आपल्या मेंदुतील कनेक्शन आपल्याला कळणार कसे ? ह्यावर मी एक प्रयत्न केला होता फार पुर्वी : सविस्तर धागा हे पहा : माझी कंपुबाजी https://www.misalpav.com/node/24253
ह्यातील हा कनेक्टेड ग्राफ फार इंटरेस्टिन्ग आहे : आपल्याला उत्सुकता असल्यास सविस्तर उत्तर लिहिन ह्या वर :
थोडे करेक्शन करुन - मन म्हणजे न्युरॉन्स मधीक कनेक्शन . काही लोकांची कमी असतील , काही लोकांची जास्त. त्यातील काही लोकांशी अपण कनेक्टेड असु काही लोकांशी नसु. माणुस हा मनाचा मांसल भाग नसुन मन हा माणसाच्या डोक्यातील मेंदुतील न्युरॉन्स मधील कनेक्शन्स चा केमीकल भाग आहे !
माणुस म्हणजे रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा और शुक्र.
मन म्हणजे मेंदुतील, मज्जा संस्थेतील न्युरॉन्स ची कनेक्शन्स !
-
इत्यलम
16 May 2021 - 2:39 pm | सतिश गावडे
ही न्युरॉन कनेक्शनची/पाथवेजची भानगड आधीपासून माहिती होती पण तुम्ही छान आढावा घेतला आहे, संदर्भांसहीत. आवदलं. :)
16 May 2021 - 10:35 pm | अनुस्वार
मस्त माहिती मिळाली आपले विवेचन वाचून. धन्यवाद.
'कनेक्टेड ग्राफ'बद्दल लिहा की. वाट पाहतोय.
16 May 2021 - 10:39 pm | अनुस्वार
धन्यवाद
16 May 2021 - 11:09 am | कॉमी
?
16 May 2021 - 12:42 pm | नावातकायआहे
प्रवीण दवणे गुगला.
16 May 2021 - 12:53 pm | उपयोजक
किरकोळ बाबदेखील हळवे होऊन भावनिक ओलावा दिलेल्या भाषेत लांबड लावून लिहिणे म्हणजे दवणीय :)
16 May 2021 - 3:59 pm | कॉमी
धन्यवाद.
16 May 2021 - 1:59 pm | गॉडजिला
....
16 May 2021 - 3:44 pm | बोलघेवडा
तुम्ही गुरुदेवांचे "इन ट्यून विथ द ट्यून" वाचलंय का? त्यात हेच सर्व लिहलय.
म्हणजे सुप्रा कॉंशस लेव्हल वरून आकल्ट अनुभव घेताना बर का.....नाही म्हणजे तुम्ही एकदा "इन ट्यून विथ द ट्यून" वाचाच!!
16 May 2021 - 10:38 pm | अनुस्वार
दुवा द्याल का?
16 May 2021 - 11:11 pm | श्रीगुरुजी
कपाळावर हात मारून घेणारी स्माईली
16 May 2021 - 11:23 pm | नावातकायआहे
काय हो, तुम्ही वाचलय का? :-)
16 May 2021 - 11:41 pm | श्रीगुरुजी
वाचलंय? फिदी फिदी फिदी . . . मी लिहिलंय. गुरूदेव स्वप्नात आले आणि म्हटले लिही. मग लिहिलं. तुम्ही पण वाचा. किंमत ५ रूपये फक्त.
16 May 2021 - 11:26 pm | अनुस्वार
मला वाटलं बोलघेवडा एखाद्या पुस्तकाबद्दल बोलत आहेत. आणि गुगलवर
In Tune with the Infinite: Or, Fullness of Peace, Power, and Plenty
Book by Ralph Waldo Trine
हे पुस्तक सापडले. म्हणून दुवा मागितला.
आता आपण कपाळावर हात मारला तेव्हा 'ट्युन' टोमणा होता असं वाटतंय.
खरं काय?
16 May 2021 - 11:42 pm | श्रीगुरुजी
भिंतीवर डोकं आपठणारी स्माईली
17 May 2021 - 1:09 am | मनो
अनुस्वार, इथे ऐका :)
https://youtu.be/b9ztrfinvZE?t=4939
17 May 2021 - 12:03 pm | अनुस्वार
आपले खूप खूप आभार _/\_
तुमच्या मदतीशिवाय 'ट्युन' ची उकल झाली नसती.