सध्या मी काय पाहतोय ? भाग ४

मदनबाण's picture
मदनबाण in जनातलं, मनातलं
10 Apr 2021 - 7:35 pm

स्कॅम १९९२ ही वेब सिरीज मला विशेष आवडण्याची अनेक कारणे असतील, पण यातील प्रतीक गांधी यांचा अप्रतिम अभिनय आणि याच्या जोडीलाच असलेले अफलातुन संवाद हे २ घटक मला फारच भावले.
ही वेब सिरीज हिट झाली हे काही वेगळ्याने सांगायची गरज नाही,पण मला अचानक ही सिरीज आठवण्याचे कारण म्हणजे याच घटनेवर अभिषेक बच्चन यांचा [ अर्थातच अभिनय नसलेला ] द बिग बुल चित्रपट आला... :))) कोण पाहणार हा चित्रपट ? बरं... आधीच या घटनेवर हिट वेब सिरीज येउन गेली असताना त्याच विषयावर चित्रपट तो देखील अभिषेक बच्चनला घेउन काढण्याचा "मटका" कोणी आणि का खेळला असावा ? असा मला प्रश्न पडलाय. :)))
असो... Peaky Blinders season 6 चे चित्रिकरण संपुन तो सिझन प्रदर्शित होण्याची आता वाट पहावी लागणार आहे, गॉडझिला आणि काँग याची मारामारी पाहणे देखील बाकी असुन उत्तम प्रिंट आनंद देइल असे वाटते.

आधीचा भाग :- सध्या मी काय पाहतोय ? भाग ३

मदनबाण.....

मौजमजाप्रकटनमाध्यमवेधविरंगुळा

प्रतिक्रिया

मुक्त विहारि's picture

10 Apr 2021 - 7:43 pm | मुक्त विहारि

नेहमी प्रमाणे, तुझ्या ह्या सिरीज मधल्या प्रत्येक लेखा प्रमाणे, हा पण लेख वाखूसा ...

सध्या तरी आम्ही फक्त, हिंदीत डब केलेले, बाॅलीवूड सिनेमे बघत आहोत...

चंद्रसूर्यकुमार's picture

10 Apr 2021 - 8:34 pm | चंद्रसूर्यकुमार

सोनी लीव्हवर काही वेबसिरीज चांगल्या आहेत. मुळच्या एका इस्राएली कथेवरील आधारीत युअर ऑनर ही वेबसिरीज आणि उरीनंतर झालेल्या सर्जिकल स्ट्राईकवर अवरोध ही वेबसिरीज आवडली.

मदनबाण's picture

11 Apr 2021 - 9:33 am | मदनबाण

काल मेरा साया हा संपूर्ण चित्रपट अनेक वर्षांनी पुन्हा पाहिला.
सध्या सचिन वाझे आणि प्रदिप शर्मा या चकमक फेम [ एनकाऊंटर स्पेशालिस्ट ] नावांची फार चर्चा चालु आहे, यातच एका वेबसिरीजचा ट्रेलर माझ्या पाहण्यात आला तो खाली देत आहे. [ मला दर्जा बाबत अधिक अपेक्षा नसली तरी १२ भाग डाउनलोड मारुन ठेवले आहेत, सवड मिळताच पाहण्याचा विचार आहे. ]

उरीनंतर झालेल्या सर्जिकल स्ट्राईकवर अवरोध ही वेबसिरीज आवडली.
हो, मस्त आहे आणि पाहण्या सारखीच आहे.

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Chupke Se... :- Saathiya

स्कॅम मधील प्रतीक गांधीचा अभिनय जबरदस्त आहे..
डायलॉग मस्तच..
Risk है तो ishq है.. क्या बात..

युअर ऑनर हिंदीत असेल तर पाहतो..

--
सध्या मी काय पाहतोय

- क्रिकेट

सुपरनॅचरलचा चौथा सीजन संपला, ल्युसिफर पिंजऱ्यातून बाहेर पडताना दाखवला.
गॉडझिला व्हर्सेस काँग बघून झाला. पकाऊ आहे. काँगला बघायचंच असेल तर पीटर जॅक्सनचा किंगकाँग उत्तम.

प्रचेतस's picture

11 Apr 2021 - 3:38 pm | प्रचेतस

गॉड, एन्जल्स, डिमन्स ह्या बायबलमधील मिथकांचा चांगला वापर केला आहे. कल्ट सिरीज झालीय आता ती.

मनापासुन आवडली, अर्थात समान्य माणसे सुपर हिरोज धुळीला मिळवतील ही जरी अशक्यप्राय बाब असली तरीही एकुण प्रकरण अत्यंत वास्तवादी आणी खतरनाक आहे... मजा आ गया.

@प्रचेतस
पीटरचा किंगकॉंग म्हणजे उरलेले पदार्थ वापरुन अफलातुन चवीची निर्माण केलेली एक्दम कडकदार मिसळ होय. यात हावशी कार्पोरेट जग, सिनेसृश्टी, टायटेनीक, समुद्रपायरेट्स, आदीवासी, जुरसिक काळ आणी वरतुन किंगकाँगही आहे... आणखी काय हवे ? गोजीरा उर्फ गॉड्जिला ?

आंद्रे वडापाव's picture

11 Apr 2021 - 12:57 pm | आंद्रे वडापाव

द बिग बुल,
एक नंबरचा भंगार चित्रपट (माझ्या मते).
असं इम्प्रेशन दिलंय चित्रपटात, की बाबा
हा जो बिग बैल तोच इकडे मुंबईत बसून भारताची इकॉनॉमी चालवतोय,
नव्हे उदारीकरण वै ह्याचाच शेअर मधील उलढालीमुळे शिकून तत्कालीन अर्थमंत्री पं प्र वै यांनी आणली.
उद्योजका ना अक्कल नव्हती ती माझ्यामुळे आली...
अरे काय दलिंदरी आहे चालवलीये राव पिक्चर मध्ये ?
खोट्या बँक नोट्स छापून वर तोंड वर करून हा देशभक्त म्हणून मिरवायला बघतो. मी कोणाचा पैसा चोराला , तुमचा ? तुमचा ? असे समोरच्या गर्दीला विचारतो,
हा शॉट पाहिल्यावर डोळ्यासमोर जर पी एम सी बँक घोटाळा, आर बी आय ने लावलेले पैसे काढण्यावर लावलेले निर्बंध, लोकांनी केलेल्या आत्महत्या ,
हे जर लोकांच्या डोळयांसमोर नाही आलं
आणि तरी काही लोक अश्या बिग बैलाला आपल्याला हा अच्छे दिन दाखवत होता असं वाटत असेल.
अश्या लोकांनी मनाशी खात्री बांधावी की ते मुर्र्ख आहेत.

उद्या काय डीएसके सुद्धा पिक्चर काढून म्हणेल मी भारताची इकॉनॉमी सुधारावली, नव्हे आणखी पुढे नेली असती पण काही राजकारण्यांनी मी डी एस , विशेषतः के असल्याने, मला तुरुंगात टाकलं, तसे मी कोणाचेही पैसे चोरले नव्हते, फक्त रिकांसीलेशन मध्ये प्रॉब्लेम आला, मी सेटल करणारच होतो, पण मला तुरुंगात टाकलं हो ...

पिक्चर काढायचे तर् लक्ष्मणराव किर्लोस्कर वै वर काढा की ?

जे आर डी वर काढा, अश्या लोकांनी इकॉनॉमी पुढे नेली.

=====≠=========

शा वि कु's picture

11 Apr 2021 - 2:42 pm | शा वि कु

खोट्या बँक नोट्स छापून वर तोंड वर करून हा देशभक्त म्हणून मिरवायला बघतो. मी कोणाचा पैसा चोराला , तुमचा ? तुमचा ? असे समोरच्या गर्दीला विचारतो,

&#129315

डॉनी डार्को नावाचा साय-फाय सिनेमा पाहिला. कथा आणि मांडणी वेगळ्या धाटणीची आहे. कथा समजल्यावर मागे वळून पाहताना सोपी वाटते, पण सिनेमा पाहताना लवकर कळत नाही. सिनेमाचे काही भाग पुन्हा पाहिल्यावर कथा समजली.

डॉनी डार्को नावाच्या टीनेज मुलाला 'फ्रँक' नावाचा सश्याच्या कॉस्ट्यूम मधला एक व्यक्ती दिसत असतो. (फक्त डॉनीलाच दिसत असतो.) हा फ्रँक डॉनीला २८ दिवसात जग नष्ट होणार आहे असे सांगत असतो.

छान आहे.

छान आहे सिरीज, हलक्याफुलक्या विनोदांनी सुरू होऊन नंतर डार्क टोनल शिफ्ट्स भारी आहेत.

गॉडझिला व्हर्सेस काँग बघून झाला. पकाऊ आहे.
पाहिला आणि हेच मत आहे.

Mum Bhai चे ३ भाग पाहिले, ट्रेलर मधला आवाज ओळखीचा वाटला होता तो अर्थातच समीर धर्माधिकारी यांचा आहे. ही फॅमेली वेबसिरिज अर्थातच नाही.

सत्या :- २२ वर्षांपुर्वी हा अफलातुन चित्रपट आला आणि हिंदी चित्रपट सृष्टीत सुरुवातीला फ्लॉप म्हणुन धरला जाणारा चित्रपट सुपर हिट झाला. राम गोपाल वर्मा, मनोज वाजपेयी आणि लेखक अनुराग कश्यप यांचे आयुष्यच या घटनेने आणि चित्रपटाने कायमचे बदलुन गेले.
रामु कॅम्पचा हा चित्रपट त्याच्यासाठी मैलाचा दगड ठरला ! तर प्रेक्षकांना नो बकवास ऑन्ली थरार अनुभवता आला. मुंबई अंडरवर्ल्ड थीम आणि आता वेबसिरीज आले आणि येतील पण सत्या चित्रपटाचा प्रभाव हा आजतागायत कोणालाही परत निर्माण करणे शक्य झाले नाही.
रामु आणि अनुराग हल्ली मोकाट सुटल्या सारखे वागतात आणि बोलतात हेच त्यांनी त्यांच्या कामा बाबत देखील करुन ठेवले आहे. अनुरागचा आणि अनिल कपुरची AK vs AK पाहिल्यावर हा तोच अनुराग का ? असे मला प्रश्न पडला होता. हेच अगदी रामु बाबत देखील आहे... त्याने Mia Malkova बरोबर CLIMAX काढला ! अख्या चित्रपटात जणु त्याला तिचे गच्च नितंब आणि त्या नितंबांची हालचाल दाखवण्या पलिकडे काही सुचले नसावे ! :)))
या दोघांनीही आता स्वतःचे डोके तपासुन एखादी चांगली कलाकृती निर्माण करण्यासाठी स्वतःलाच वेळ दिला पाहिजे असे हल्ली मला त्यांना सांगावेसे वाटते.
असो... येत्या जुलै मध्ये सत्याला २३ वर्ष पूर्ण होतील. मध्यंतरी मी रामुचाच मेकिंग ऑफ सत्या हा व्हिडियो पाहिला होता, तो इथे देत आहे.

सत्या चित्रपटातील कथे प्रमाणेच या चित्रपटातील गाणी आणि संगीत अप्रतिम आहेत, प्रत्येक गाणं हे वेगळ्या भाव-भावना दर्शवणार... मग ते सत्या थीम असो वा गोली मार भेजे मे किंवा तू मेरे पास भी है. अनेक वेळा पाहिला असला,तरी पुन्हा पाहण्यासाठी परत डाउनलोड मारला आहे.
जाता जाता :- याच चित्रपटातील माझं आवडत गाणं देउन हे सत्या पुराण आवरत घेतो.

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Chupke Se... :- Saathiya

प्रचेतस's picture

11 Apr 2021 - 7:40 pm | प्रचेतस

सत्या आणि कंपनी हे तर माईलस्टोन आहेत. रामू नंतर मात्र तंत्राच्या खूप आहारी गेला, एकावरच कॅमेरा बराच काळ रोखलेला असणे, दीर्घ पॉझेस, कर्णकटू पार्श्वसंगीतामुळे चित्रपटांचा आत्माच हरवला. अगदी सरकारमध्ये खुद्द अमिताभ असूनही चित्रपट गंडला. सरकारनंतर रामू जो खालावत गेला तो कधीही वर येऊ शकला नाही.

कोणी कोरिअन सिरीज बघतात का माहित नाही. डबिंग नसल्याने सबटायटल्स वर निभवावे लागते. पण काही फार सुंदर सिरीज आहेत. या चांगल्या सिरीजचे लेखन आणि दिग्दर्शन खरोखरच अतिशय नेटके असते. अभिनय देखील खूप चांगला. कोरिअन चे खास जॉनर्स म्हणजे - भयपट आणि होपलेसली रोमँटीक.

त्यातलाच एक मेडिकल ड्रामा: Dr Romantic 1 & 2. हे रोमँटिक म्हणजे टिपिकल अर्थानं नाही हां. बाकी सध्या Vincenzo पाहतोय.

कोणी कोरिअन सिरीज बघतात का माहित नाही.
वेब सिरीज नाही पण Train to Busan आणि Parasite हे चित्रपट पाहिले आहेत.

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Jaane Kya Baat Hai Neend Nahi Aati Badi... :- Sunny

राघव's picture

12 Apr 2021 - 5:21 pm | राघव

मी हे दोन्ही बघीतले नाहीयेत. पण कोरिअन अ‍ॅक्शन थ्रीलर The man from nowhere बघीतलेला. क्रूरता म्हणजे काय असते त्याचं मूर्तीमंत उदाहरण आहे म्हटलं तर संयुक्तीक ठरेल, अक्षरशः काटा येतो. याच चित्रपटावर आधारीत जॉन अब्राहम चा Rocky Handsome आलेला, पण मूळ चित्रपट बघीतलेला असल्यानं हा नाही बघीतला. बाकी जॉनभाऊचा रोमिओ अकबर वॉल्टर चांगला होता.

मागे एक जुना इंग्रजी चित्रपट बघीतला होता - It happened one night. क्लार्क गेबलचा. "चोरी चोरी" याच चित्रपटाच्या कथानकावरून चोरी करून बनवलेलाय. गाणी सोडली तर जवळपास सगळं कॉपी आहे. पण गेबल आणि राजकपूर ची तुलना म्हणजे.. जाऊं देत.

पण कोरिअन अ‍ॅक्शन थ्रीलर The man from nowhere बघीतलेला. क्रूरता म्हणजे काय असते त्याचं मूर्तीमंत उदाहरण आहे म्हटलं तर संयुक्तीक ठरेल, अक्षरशः काटा येतो.
ट्रेलर पाहिला, प्रिंट मिळाली तर नक्की पाहिन. बाकी क्रूरते वरुन मला क्षणभर Saw ची आठवण झाली ! मला वाटतं त्याचे १-२ पार्ट पाहिले असतील नंतर म्हंटल बस्स झाल,अजुन डोक्याला शॉट नको. अजुन एक चित्रपट माझ्या पाहण्यात आला होता ज्याचे नाव देखील मला आठवत नाही. फक्त इतकेच आठवते की बहुतेक लोकांना किडनॅप केले जात असते, या किडनॅप केलेल्या लोकांना एका बंद पडलेल्या बाहेरुन ओसाड दिसणार्‍या फॅक्टरीत आणले जात असते. इथे वेगवेगळ्या खोल्या असतात जिथे प्रत्येक खोलीत एका व्यक्तिला डांबले जाते. विक्षिप्त / विकृत पण प्रचंड पैसेवाले बिझनेसमन [ बहुतेक रशियन ] पैसे देउन या खोलीत असणार्‍यांना स्वतःचे मनोरंजन म्हणुन ठार मारायला येत असतात्,प्रत्येक खोलीत वेगवेगळे सामान ठेवलेले असते, कुठल्या खोलीत सर्जरीचे सामान, कुठे कुर्‍हाड, कुठे इस्त्री आणि इतर सामान ज्याचा वापर करुन त्या किडनॅप केलेल्या व्यक्तीला ठार करण्याची सोय केलेली असते.
फार बेक्कार वाटले होते हा चित्रपट पाहताना...बिभत्स रस !
कोणी हा चित्रपट पाहिला असेल किंवा कोणाला या चित्रपटाचे नाव माहिती असेल तर नक्की सांगा. [ मी काल गुगल बाबांना वेगवेगळ्या प्रकारे विचारणा केली पण ते काही प्रसन्न झाले नाहीत. ]

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Nahin Samne... :- Taal

वो चित्रपट सापड्या मेरीकु:-

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Nahin Samne... :- Taal

राघव's picture

21 Apr 2021 - 9:41 pm | राघव

सायकॉलॉजिकल थ्रीलर आहे. ते सगळे क्रूरतेकडून बीभत्सतेकडे झुकतात.
The man from nowhere हा साधा अ‍ॅक्शन थ्रीलर म्हणता येईल. पण तस्करीच्या उद्योगातली क्रूरता बघूनच डोकं फिरून जातं. वास्तवातली कल्पनाही करवत नाही.

नि३सोलपुरकर's picture

19 Apr 2021 - 2:54 pm | नि३सोलपुरकर

द निगोशिएशन (कोरियन) हि देखिल पाहण्यायोग्य आहे .

नि३

Parasite फारच थ्रिलर आहे.कोरीयन नाव असलेला Mulan डिस्नेचा सिनेमा पाहायचा मुहूर्त लागेना.लवकर पाहते,डिस्नेचे सिनेमे फन्टसी मनोरंजक असतात​.

वरती दिलेला हॉस्टेल आज परत पाहिला, [ कारण तसा तो विस्मरणात गेला होता, पहिले ३० मिनीटे चित्रपट काय असेल याचा अंदाजच येत नाही. या ३० मिनीटात बरीच नग्न दृष्य आहेत पण त्या नंतर केवळ थरार ! ] सत्या देखील परत पाहुन घेतला.

Parasite फारच थ्रिलर आहे.
होय
कोरीयन नाव असलेला Mulan डिस्नेचा सिनेमा पाहायचा मुहूर्त लागेना.लवकर पाहते,डिस्नेचे सिनेमे फन्टसी मनोरंजक असतात​.
माझे The Chronicles of Narnia: The Lion, the Witch and the Wardrobe , Moana , Zootopia आणि Ferdinand , Beauty and the Beast , Maleficent आणि The Nutcracker and the Four Realms पाहुन झालेत.
यात मला अधिक Ferdinand आवडला.

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Nahin Samne... :- Taal

हे सर्व पाहिले फक्त Ferdinand नाही पाहिला,माझा आवडता Beauty and The Beast आणि Maleficent(ज्यूलियामुळे)

पिकासो पाहिला.. दशावतार कलेवर भावपूर्ण सुंदर गुंफलेला सिनेमा

पिकासो पाहिला.. दशावतार कलेवर भावपूर्ण सुंदर गुंफलेला सिनेमा
ओह्ह, या चित्रपटा बद्धल माहित नव्हते. मराठी चित्रपटात डोंबिवली रिटर्न, पुष्पक विमान, गर्लफ्रेंड, मुरांबा पाहिले आहेत.
डोंबिवली फास्ट ची मजा डोंबिवली रिटर्न मध्ये नाही. पुष्पक विमान इतका आवडला नाही. गर्लफ्रेंड आणि मुरांबा एकदा तरी पहावा असे आहे. याहुन वेगळा मराठी चित्रपट मी पाहिला जो या वरील चित्रपटांपेक्षा अधिक आवडला, त्याचा ट्रेलर खाली देत आहे. :)

जाता जाता :- मराठी चित्रपट बरेच डाउनलोड मारुन ठेवले आहेत. ते पाहण्याचा मूड लागला की नक्कीच पाहिन, कारण यादी बरीच मोठी आहे. :)

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Nahin Samne... :- Taal

चौकस२१२'s picture

12 Apr 2021 - 8:41 am | चौकस२१२

विधू विनोद चोप्रांचा "शिकारा" बघितला
चित्रपट म्हणून ठीक आहे अगदी भन्नाट वैगरे नाही , त्यातील कथा मात्र चटका लावून गेली आणि आपण भारतीय हिंदू बऱ्यपकी कमजोर आहोत याची परत खात्री पटली
काश्मीर मधील हिंदू नवविवाहित १९९० साली कसे उध्वस्त होतात...हा मुख्य विषय ...
काही प्रश्न मनात आले
- काश्मिरात या हिंदूंनी कोणचे काय घोड इमारले होते? हा हे खरे कि ते त्यांचं लोकसंख्येचं मानाने समाजात सधन असे स्थान होते पण महाराष्ट्रात जसे असे म्हणले जाते कि ब्रहमणांनी पूर्वी अन्याय केला म्हणून ४८ साली त्यांना समाजाने तिरस्कारित केलं? असच काही काश्मिरी पंडितांनी केलं होता का? ( कृत्यापायी येथे महाराष्ट्राचे फक्त सामन्तर उदाहरण दिले आहे .. त्यावर घसरू नये )
काश्मीर चा राजा तर पंडित नवहता ? कि पेवंशवाई सारखी सत्ता हि पंडितांनी कडे गेली नवहती ? का होती ?
- काश्मीर खोऱ्यात पंडितांशीव्या इतर जातीचाच हिंदू नवहते का?
- स्वतःच्याच देशात निर्वासित होत असताना केंद्र सरकार खरेच एवढे षंढपणे का वागले काँग्रेस ला सुद्धा नीतिमत्ता थोडीतरी आहे/ होती असे मी समजतो ? निर्वासितांना घेऊन लष्करासह परत का नाही वसवले ?
- जम्मू मधील डोग्रा हे पण हिंदूच मग त्यानं असा त्रास झाला का? आणि त्यांची या बद्दल काय भावना होती ?
- भारतातील इतर हिंदूंनी का साथ दिली नाही ( कि यातील काश्मिरी हे पं... असल्यामुळे त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले )

मुक्त विहारि's picture

13 Apr 2021 - 10:59 am | मुक्त विहारि

कलम 370

हे नडले.... कॉंग्रेसने केलेल्या चुकीची फळे निस्तरायला अजून किती तरी वर्षे लागतील...

चौथा कोनाडा's picture

12 Apr 2021 - 5:45 pm | चौथा कोनाडा

काल स्पर्श पाहिला.
वेगळ्या विषयाची हळूवार हाताळणी, नासीर-शबानचा अप्रतिम अभिनय आणि सई परांजपे यांचे उत्कृष्ट दिग्दर्शन या मुळे स्पर्शने अवॉर्ड मिळवली नसती तर नवलच.
खाली प्याला, धुंदला दर्पण आणि प्याला छलका, उजला दर्पण गाणी सुद्धा छान आहेत (गा. सुलक्षणा पंडित)

अमर विश्वास's picture

12 Apr 2021 - 9:12 pm | अमर विश्वास

अमेझॉन प्राईम वरची "मेटॅलिस्ट" बघितली ७ सीझन्स आहेत ... थोडी जुनी आहे .. पण टाइम पास ला बेस्ट

जयराज's picture

23 Apr 2021 - 1:12 pm | जयराज

>>>>>>अमेझॉन प्राईम वरची "मेटॅलिस्ट"

+१
एकदा पाहण्यासाठी छानच आहे.

गॉडजिला's picture

13 Apr 2021 - 10:31 am | गॉडजिला

पहिल्यन्दा बघितला तेन्व्हा झॉम्बि बॅशिन्ग बघायच्या मुडात असल्याने जाम हिरमोड झाला होता पण काल परत बघितला अन जाम आवडला... Its not about Zombie bashing its about how not to be bashed by Zombies. नक्किच बघा, ब्रॅड पिट नेहमीप्रमाणेच छावा वाटतो.

प्रचेतस's picture

13 Apr 2021 - 10:54 am | प्रचेतस

वर्ल्ड वॉर झी एकदम मस्त सिनेमा आहे. झोंबि जनरमधला सर्वोत्तम सिनेमा. विमान आणि इस्रायलमधील सीन्स खतरा आहेत.

आणि येउ घातलेल्या झोन्बिवलि बद्दलही बर्‍याच अपेक्शा आहेत

शा वि कु's picture

14 Apr 2021 - 9:42 am | शा वि कु

गो गोवा गॉन भारीच आहे.
शॉन ऑफ द डेड सुद्धा झकास हलकाफुलका झॉम्बीपट आहे.

चंद्रसूर्यकुमार's picture

13 Apr 2021 - 10:45 am | चंद्रसूर्यकुमार

सध्या युट्यूबवर संविधान नावाची राज्यसभा टीव्हीवर फेब्रुवारी-मार्च २०१४ मध्ये प्रसारीत झालेली सिरीज बघत आहे. देशाची राज्यघटना बनविणार्‍या घटनासमितीत चर्चा काय आणि कशी झाली याविषयी ती सिरीज आहे. सचिन खेडेकरने डॉ. आंबेडकरांच्या भूमिकेत आहे तर दिलीप ताहिलरामानी (बाझिगरमधला मदन चोपडा) नेहरूंच्या भूमिकेत आहे. सगळ्या कलाकारांनी फार उत्तम काम केले आहे असे नाही पण माझ्यासाठी त्यावेळी नक्की काय झाले होते हा 'कंटेन्ट' जास्त महत्वाचा. सादरकर्ती स्वरा भास्कर असली तरी सिरीजचा विषय माझ्या आवडीचा असल्याने मी ती सिरीज बघत आहे.

अर्थात शेवट जरा भन्नाट हवा होता पण प्रयत्न उत्तम आहे. मराठीमधे बघायला जास्त मजा आली

मदनबाण's picture

18 Apr 2021 - 7:20 pm | मदनबाण

सध्या युक्रेन आणि रशिया यांच्यात प्रचंड तणाव वाढला आहे ! युक्रेनच्या [ आणि क्रिमियाच्या ] पूर्व सीमेवर रशियाने जवळपास ८०,००० सैन्य आणुन ठेवले आहे.
मागच्या वर्षी रशियाने Kavkaz 2020 [ Caucasus-2020 ] Command Post Exercise केला होता. यात Tornado-G 9 (9A52-4 Tornado ) [ MLRS - Multiple Launch Rocket System ] चा देखील वापर करण्यात आला होता. ही सिस्टिम BM-21 Grad ची अपग्रेडेड व्हेरिएंट आहे.
युक्रेन आणि रशियाच्या बातम्या पाहताना वरील अभ्यासात वापरली गेलेली सिस्टिम माझ्या पाहण्यात आली.

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Bangaru Kodi Petta... :- Gharana Mogudu

मुक्त विहारि's picture

18 Apr 2021 - 8:12 pm | मुक्त विहारि

आणि शस्त्रांच्या व्यापारावरील प्रभुत्व

कळत नकळत, ह्याचा परिणाम, भारतावर होणारच..

कुमार१'s picture

19 Apr 2021 - 12:00 pm | कुमार१

द ग्रेट इंडियन किचन (मल्याळम) प्राईम वर आहे. सुंदर चित्रपट !
पारंपरिक कर्मठ कुटुंबात गृहिणीची होणारी घुसमट छान दाखवली आहे.
रांधा वाढा उष्टी काढा आणि स्वतःचे मन मारून जगा. त्यात मासिक पाळीच्या दिवसांमध्ये कर्मकांड वगैरे वगैरे फारच प्रभावीपणे दाखवले आहे.

मुख्य म्हणजे संवाद बरेच कमी आहेत; दृष्य भाषेवर भर
त्यामुळे आपल्याला बघताना तर काहीच अडचण येत नाही

वर्णन वाचून गंध या मराठी चित्रपटाची आठवण झाली. त्यातली तिसरी गोष्ट, नीना कुलकर्णी. अप्रतीम अभिनय आणि पावसाचं शूटींग!

कुमार१'s picture

19 Apr 2021 - 1:58 pm | कुमार१

गंध या मराठी चित्रपटाची

>>>> अगदी अगदी !

गॉडजिला's picture

19 Apr 2021 - 2:39 pm | गॉडजिला

सविता ताइंचा अभिनय उत्कट, आणि अशोकरावांबद्दल आपण काय बोलणार ? अभिनयाची शाळाच ते. व्हिपी ढे़कणेसुध्दा मस्त... नकावरच्या रागाला औषध काय अजुनही नॉस्टेल्जिआ जागा करतो, कालौघात सिनेमा थोडा जुना वाट्तो पण एकुणच चित्रपट सुरेख.

शा वि कु's picture

19 Apr 2021 - 7:42 pm | शा वि कु

Doctor Strangelove: or how I learned to stop worrying and love the bomb (1964)

बघितला. एका माथेफिरू व्यक्तीकडे अणुबाँब बटण आले तर काय होईल, ह्यावर सिनेमा आहे. डॉक्टर स्ट्रेंजलव्ह चे लुळे असलेले आणि नंतर जागृत होणारे शरीर आणि महत्वाकांक्षा हे रूपक मस्त आहे.

हा चित्रपट नुक्ताच अ‍ॅमेझॉन वर बघितला.
Pierre-Auguste Renoir हा सुप्रसिद्ध फ्रेंच चित्रकार वृद्धपणी १९०७ साली Les Collettes नामक जागी (Cagnes-sur-Mer, Provence-Alpes-Côte d'Azur) कायमच्या वास्तव्यासाठी जाऊन राहिला होता. एक दिवस अचानकच एक सुंदर तरूणी त्याच्या इस्टेटवर मॉडेल म्हणून काम करण्यासाठी येते. रेनुआ हा नग्न तरुणींच्या चित्रांसाठी विख्यात होता आणि आहे. तो अर्थातच आनंदाने तिचा स्वीकार करतो. (चित्रपटातील तिची नैसर्गिक वातावरणात चित्रे रंगवत असल्याची दृश्ये सुंदर आहेत). लवकरच युद्धात जायबंदी झालेला Renoir चा मुलगा ज्यां (Jean) हा वडिलांकडे रहायला येतो. त्याचे यथावकाश त्या मॉडेलशी सूत जुळते वगैरे प्रसंग या चित्रपटात आहेत. संपूर्ण चित्रपट खर्‍याखुर्‍या अतिशय निसर्गरम्य असलेल्या जागी चित्रित केलेला असून चित्रकलाप्रेमी मंडळींना नक्कीच आवडेल. (पुढे १९१९ साली रेनुआ च्या मृत्युनंतर त्याच्या मुलाने त्याच तरुणीशी लग्न केले आणि तिला नायिकेची भूमिका देऊन बरेच चित्रपट बनवले. हा पुढे प्राख्यात चित्रपट दिग्दर्शक बनला मात्र १९३१ पासून विभक्त झालेली त्याची पत्नी मात्र १९७९ साली हलाखीच्या परिस्थितीत मरण पावली)

चित्रपटा बद्द्ल मी बरेच काही बोलु शकतो पन तसे करणार नाही कारण The first rule about fight club is you don't talk about fight club.

आंद्रे वडापाव's picture

22 Apr 2021 - 9:02 pm | आंद्रे वडापाव

सध्या मी काय पाहतोय....?

"बढती का नाम दाढी"...

कारण, "चालती का नाम गाडी" शक्य नाही म्हणून.

गॉडजिला's picture

23 Apr 2021 - 12:54 pm | गॉडजिला

एकदम मजा आली. जस्टीस लिग बघताना मधुनच निघुन जावेसे वाटत होते पण स्नायडर कट आस्पेक्ट रेशो ४:३ आसुनही धमाल वाटला

द ट्रायल ऑफ शिकागो सेव्हन पहिला.

चित्रपट खुप छान आहे.
1969 च्या अधिवेशनात झालेल्या हिंसाचारा वर दाखल करण्यात आलेल्या खटल्यावर हा चित्रपट घेतलेला आहे.

सर्वांचा अभिनय उत्तम आहे.
खासकरून Sacha Baron Cohen
याने अत्यंत सहज साकारलेली भूमिका सर्वात जास्त भाव खाऊन जाते.

न्यायाधीशा चे काम सुद्धा इतके चांगले झाले आहे की चित्रपट पाहताना आपली देखील चिडचिड होते.
नक्की बघा.

कॉमी's picture

23 Apr 2021 - 10:04 pm | कॉमी

Timbah on Toast ह्या ब्रिटिश युट्यूबरची प्रोजेक्ट व्हेरिटास वरची डाक्युमेंट्री बघण्यासारखी आहे. अंडरकव्हर जर्नलिस्ट जेम्स ओकिफ, प्रोजेक्ट व्हेरिटास नावाच्या संस्थेचा संस्थापक आहे. प्रोजेक्ट व्हेरिटास ने अनेक निमसरकारी, खाजगी संस्था, समाजसेवेक संस्था ह्यांच्या संदर्भात अंडरकव्हर रिपोर्ट्स आणि व्हिडीओ प्रकाशित केले. या रिपोर्ट्सचा आणि व्हिडिओजच्या परिणाम बऱ्याचदा या संस्था बंद पडण्यात झाला. राईट विंग विचारवंतांनी ह्या व्हिडीओजचा आपल्या विचारांना समकालीन पुरावा आणि त्या संस्थांना आपल्या टिकेसाठीचे बुजगावणे बनवले. फॉक्स न्यूऊज सारख्या सुप्रसिद्ध चॅनेल वर ओकिफ एक्सपर्ट आणि सेलिब्रिटी म्हणून जात असे.

अंडरकव्हर गोष्टींमधून जेव्हा वरकरणी गुन्हा घडला आहे असे समोर येते, ते सर्वांच्या लक्षात राहते. येणाऱ्या रोषामुळे रिपोर्टवाली संस्था/ व्यक्ती नष्ट होते. पण त्यानंतर काय काय समोर आलं, कोर्टात काय आलं हे फारसं कोणी पाहत नाही. जाणूनबुजून अर्धसत्य सांगणाऱ्या जेम्स ओकिफची गोष्ट.

भरपूर मोकळा वेळ असेल तर पाहावी.