थोतांड थोतांड थोतांड..
जे जे पहावे ते थोतांड..
नाझींचे थैमान? थोतांड
न्यूटन महान? थोतांड
धरतीची गोलाई? थोतांड
नभाची निळाई? थोतांड
चंद्रावर स्वारी? थोतांड
मंगळाची वारी? थोतांड
कार्बन उत्सर्ग? थोतांड
कोरोना संसर्ग? थोतांड
बोसांचे मरण? थोतांड
नर्मदा धरण? थोतांड
ग्लोबल वार्मिंग? थोतांड
त्सुनामी वार्निंग? थोतांड
वृक्षांची निकड? थोतांड
इव्हीएम निवड? थोतांड
विमान नाहीसे? थोतांड
आरोप बाईचे? थोतांड
नऊ अकरा? थोतांड
पृथ्वीच्या चकरा? थोतांड
लसीला होकार? थोतांड
चिन्यांची माघार? थोतांड
हे विश्वचि सारे थोतांड
प्रस्थापितांचे कुभांड
पर्दाफाशार्थ ऊठ नवपार्था
खोदुनि शोधुनि सुप्तलुप्त प्रबंध
जगापुढे मांड..जगापुढे मांड..!!
....
हलके घेतल्यास आजन्म आभारी..!! ;-)
प्रतिक्रिया
4 Mar 2021 - 12:30 pm | गणेशा
शब्दां पलीकडची भावना एकदम समजतेय..
प्रस्थापितांचे कुभांड
पर्दाफाशार्थ ऊठ नवपार्था
खोदुनि शोधुनि सुप्तलुप्त प्रबंध
जगापुढे मांड..जगापुढे मांड..!!
__^__
4 Mar 2021 - 12:33 pm | कुमार१
4 Mar 2021 - 12:33 pm | कुमार१
एकदम पटले
4 Mar 2021 - 12:33 pm | कुमार१
एकदम पटले
4 Mar 2021 - 12:49 pm | आनन्दा
आवडली.. मस्त आहे.
4 Mar 2021 - 12:57 pm | चौथा कोनाडा
व्वा, भारी + १
माझे अस्तित्व ? थोतांड
माझा मिपायडी ? थोतांड
माझा कोनाडा ? थोतांड
लाइक्स, कमेंटस ? थोतांड
4 Mar 2021 - 1:30 pm | प्रचेतस
लै दिवसांनी गविशेठ लिहिते झालेत, मस्त. सातत्य ठेवा भो आता :)
4 Mar 2021 - 1:40 pm | गवि
ये लिहिना भी कोई लिहिना है प्रचु?
हेही आपलं थोतांडच.. ;-)
4 Mar 2021 - 2:02 pm | प्रचेतस
=))
4 Mar 2021 - 4:29 pm | टवाळ कार्टा
नुस्तं प्रचु???
4 Mar 2021 - 3:27 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
>>>>लै दिवसांनी गविशेठ लिहिते झालेत, मस्त. सातत्य ठेवा भो आता :)
असेच म्हणतो. लिहिते राहा गविसेठ. _/\_
-दिलीप बिरुटे
(गविसेठच्या लेखन फॅन) :)
4 Mar 2021 - 3:33 pm | प्रचेतस
गविशेठच्या समोर किंवा डोक्यावर फॅनसारखे गरागरा फिरणारे सर डोळ्यांसमोर आले.
4 Mar 2021 - 1:36 pm | ज्ञानोबाचे पैजार
थोतांड आवडले
पैजारबुवा,
4 Mar 2021 - 1:44 pm | टर्मीनेटर
lol... भारीच एकदम!
😂
4 Mar 2021 - 1:45 pm | खेडूत
मस्त.. झकास... चााबुक!!
4 Mar 2021 - 1:48 pm | मुक्त विहारि
भारी आहे
4 Mar 2021 - 3:23 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
काय हे धागे ? थोतांड
मिसळपाव ? थोतांड
अच्छे दिन ? थोतांड
वाढवलेली दाढी ? थोतांड
आम्ही करून दाखवलं ? थोतांड
अध्यक्ष महोदय ? थोतांड
हमारो बोंगाल ? थोतांड
दोन लशीचे डोस ? थोतांड
थाळी-दिवाबत्ती ? थोतांड
.........
.........
.........
-दिलीप बिरुटे
4 Mar 2021 - 3:27 pm | गवि
अरे देवा.. का आले हे? आय मीन.. आले का हे?!
या. बसा. सरकून घेत आहे.
4 Mar 2021 - 3:30 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
>>>>> अरे देवा.. का आले हे?
=)) =)) =)) मेलो.
-दिलीप बिरुटे
4 Mar 2021 - 3:35 pm | प्रचेतस
ते पुन्हा येतील... ते पुन्हा येतील...ते पुन्हा येतील....
-प्रचेतस खडसवणीस
4 Mar 2021 - 3:34 pm | खेडूत
हे काय? उजवीकडे सरका..त्यांना डावीकडे आवडते!
(ह. घ्या प्रा डॉ सर...नाहीतर ती थाळी फेकून मार्ताल...)
4 Mar 2021 - 3:39 pm | गवि
ठ्ठो..!!
6 Mar 2021 - 2:35 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
हा हा . चांगला होता आवडला. पण तसं कै नै ये, या सर्व आभासी कल्पना. बाकी...
डावे-उजवे ? थोतांड
कमळ-मोगरा ? थोतांड
मित्र-मैत्रीण ? थोतांड
भाइयो-बहनो ? थोतांड
......
......
-दिलीप बिरुटे
4 Mar 2021 - 3:47 pm | अथांग आकाश
खिक्क
4 Mar 2021 - 4:29 pm | टवाळ कार्टा
ख्या ख्या ख्या
4 Mar 2021 - 5:13 pm | तुषार काळभोर
थोतांडवादी कवि गविंची थोतांडवादी कविता. ;)
शेकडो हजारो लाखो करोडो थोतांड समर्थक असताना मी एकटा तेवढा सत्य जाणणारा...
- (नाव बदलून घेतलेला) पै तुषार काळभोर
4 Mar 2021 - 6:19 pm | शा वि कु
तुम्ही थोतांड आहात, ही सगळी दुनिया थोतांड आहे !
(I’m out of order? You’re out of order! This whole courtroom’s out of order!” च्या चालीत.)
- (कन्सपायरसी थियरिस्ट) शाविकु
4 Mar 2021 - 6:33 pm | शा वि कु
ह्या ! तुम्हाला काय माहीत ! इथे प्रस्थापितांना हाकलून बोल्शेविक लोकं देशच्या देश बळकावत आहेत, आणि तुम्ही प्रस्थापितांच्या कुभांडाबद्दल बोलताय !
- (प्रस्थापित कुभांडवादी) शाविकु
4 Mar 2021 - 7:27 pm | राजेंद्र मेहेंदळे
बरीच वाढवता आली असती, पोटेन्शियल आहे
पूजाची उडी, थोतांड
राठोड्ची पुडी थोतांड
सुशांतसिंग राजपुत थोतांड,
बिहारचे श्रीयुत थोतांड
जळगाव विवस्त्र थोतांड
भाजपाचे अस्त्र थोतांड
कोणीच नाही उठत पेटुन
राजद्रोहाला घाबरुन :(
4 Mar 2021 - 8:14 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
>>>> बरीच वाढवता आली असती, पोटेन्शियल आहे
धागा लाइफटाइम तेवत राहणार आहे . सगळे रेकॉर्ड ब्रेक होतील. खरं तर हा शिमगाच आहे व्यवस्थेवरचा.
देशप्रेमाचं अफू ? थोतांड
घराणेशाहीची गोळी ? थोतांड
साठ वर्षाचं (दुस-याचं) ते कार्ट ? थोतांड
पंधरा वर्षाचं (आपला) बाब्या? थोतांड
वाढती महागाई ? थोतांड
मस्तानी लस्सी ? थोतांड
विकासाची गोळी ? थोतांड
............
...........
-दिलीप बिरुटे
4 Mar 2021 - 9:08 pm | गामा पैलवान
गवि,
सर्वत्र थोतांड माजलंय हे तुमचं निरीक्षण अचूक आहे. कलियुगाचा प्रभाव, दुसरं काय. मात्र एक गोष्ट अगदी शंभर टक्के सत्य आहे. ती म्हणजे जगभर पसरलेलं ब्रिटीश साम्राज्य.
ते १९४५ साली दुसरं महायुद्ध संपतांना मोडीत निघालेलं असं मानतात. पण आज ७५ वर्षांनी करोनाच्या नावाखाली 'त्यांना' सगळं जग वेठीला धरणं शक्य झालंय.
आ.न.,
-गा.पै.
5 Mar 2021 - 3:26 am | चौकस२१२
पण आज ७५ वर्षांनी करोनाच्या नावाखाली 'त्यांना' सगळं जग वेठीला धरणं शक्य झालंय.???
त्यांना म्हणजे नाकी कोणाला?
ब्रिटिशांना? म्हणजे करोना हा काय ब्रिटिशांनी वापरून जंगल वेथस धरलाय असं म्हणताय का?
5 Mar 2021 - 4:03 am | चौकस२१२
पण आज ७५ वर्षांनी करोनाच्या नावाखाली 'त्यांना' सगळं जग वेठीला धरणं शक्य झालंय.???
"त्यांना" म्हणजे नक्की कोणाला?
ब्रिटिशांना? म्हणजे करोना हा काय ब्रिटिशांनी वापरून जगाला वेठीस धरलाय असं म्हणताय का?
4 Mar 2021 - 9:26 pm | कर्नलतपस्वी
4 Mar 2021 - 9:31 pm | Rajesh188
हिंदू धोक्यात थोतांड
स्वदेशी वापर थोतांड
अतिरेकी हल्ले थोतांड
चीन च्या मालावर बहिष्कार थोतांड.
5 Mar 2021 - 11:03 am | राजेंद्र मेहेंदळे
कंगनाची माडी थोतांड
बी एम सीच्या धाडी थोतांड
दिशाचे टूलकिट थोतांड
बाल्टिस्तान गिलगिट थोतांड
राकेश टिकैत थोतांड
दलालांची विकेट थोतांड
मारणेची मिरवणुक थोतांड
पोलिसांची दमणुक थोतांड
5 Mar 2021 - 12:11 pm | सॅगी
बेकायदा बांधकामे थोतांड
रस्त्यावरचे खड्डे थोतांड
वाढीव विजबिले थोतांड
एकरी मदत थोतांड
कायद्याचे राज्य थोतांड
स्वाभाविक प्रतिक्रिया थोतांड
साधुंच्या हत्या थोतांड
बंगल्यावर मारहाण थोतांड
पावसात भिजणे थोतांड
शेतकर्यांचे भले थोतांड
पोहरादेवीची गर्दी थोतांड
5 Mar 2021 - 4:49 pm | मदनबाण
थोतांडवर थोतांडाचा धागा काढला जावा हेच थोतांड आहे ! :)))
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Din Mahine Saal Gujarte jayege... :- Avatar
5 Mar 2021 - 5:47 pm | चौथा कोनाडा
गझल, चारोळी सारखंच थोतांड हा नविन काव्यप्रकार गविंंमुळे अस्तित्वात आला हे मराठी साहित्याच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिले जाईल !
5 Mar 2021 - 6:08 pm | आनन्दा
अरे थोतांड थोतांड
कसे रचले कुभांड
धागा वाचता वाचता
पसरले की भोकांड
सारे भोकांड पंडित
झाले की हो एकत्रित
आणि लागले उकरू
काहीतरी विपरीत
करोनाच्या काळजीने
जीव झाला माझा अर्धा
ढवळ्या पवळ्याच्या जोडीने
सुरू उलटीची स्पर्धा
आले पंडित प्रकांड
कधी उकरोनी कांड
कुणी म्हणे नोटकांड
कोणी म्हणे नॉटिकांड
परी कसे विसरले
बोलायला अटकांड
भुलले वासनाकंड
विझवले अग्निकांड
जीव पुरता शिणला
सारे थोतांड वाचून
शुक्रवार आहे चला
येऊ पेट्रोल टाकून
5 Mar 2021 - 7:09 pm | तुषार काळभोर
पाय पाठवून द्या! चरणदर्शन होऊद्या..
5 Mar 2021 - 7:59 pm | गवि
पाय पाठवले तर ते पेट्रोल टाकायला कसे जाणार?
5 Mar 2021 - 8:19 pm | मुक्त विहारि
आम्ही सुक्ष्मात जातो,
तसे ते पाय पाठवू शकत असतील
5 Mar 2021 - 9:50 pm | आनन्दा
तुम्ही तर मला सूक्ष्मातच पाठवायला निघालात..
5 Mar 2021 - 9:50 pm | आनन्दा
सध्या बहुतेक जणांची पेट्रोल भरायची सोय घरातच आहे..
5 Mar 2021 - 9:54 pm | Rajesh188
घरात च पेट्रोल च्या विहरि आहेत की पाइप नी पेट्रोल पुरवठा होत आहे.
5 Mar 2021 - 10:07 pm | रंगीला रतन
तुम्ही पोगो बघा
5 Mar 2021 - 10:39 pm | Rajesh188
रतन खरोखर रंगीला आहे.
26 Mar 2021 - 6:01 pm | चौथा कोनाडा
मास्क वापरा ? थोतांड
सॅनिटायझर लावा ? थोतांड
गर्दी नका करु ? थोतांड
सोशल अंतर ? थोतांड
करोनाची चाचणी ? थोतांड
कोरोना संसर्ग ? थोतांड
करोनाची लस? थोतांड
कोविड सेंटर ? थोतांड
26 Mar 2021 - 6:33 pm | Rajesh188
हात धुणे
मास्क वापरणे..
अंतर ठेवणे.
Sanitizer करणे.
ह्या मध्ये हात धूने हा प्रकार लोक खूप वर्षा पासून पाळत आहेत.बाहेरून आले की हातपाय धुण्याची आपली पद्धत आहे.
मास्क वापरणे हा प्रकार नवीन आहे पण पुणे शहरात अर्धी लोकसंख्या पूर्वी पासून तोंड पूर्ण झाकून घेते .त्या पुढे मास्क काहीच नाहीत.
अंतर ठेवणे .पण किती अंतर ठेवणे ?
पंधरा फूट तरी अंतर ठेवले पाहिजे संशोधक सांगतात त्या नुसार.
हे शक्यच नाही.
लोकांच्या रूम पण १५ फूट पेक्षा लहान असतात.आणि बाहेर बस,ट्रेन,फूट पथ.अशा ठिकाणी पाय ठेवायला जागा मिळाली तरी खूप झाले अशी अवस्था आहे.
पूर्ण लॉक डाऊन गेल्या वर्षी काही महिने होते तरी covid बाधित लोकांची संख्या प्रचंड वाढत च होती.
काही तरी नक्की चुकतंय.
26 Mar 2021 - 10:48 pm | चौथा कोनाडा
उत्तम निरिक्षण !
शेवटच्या तीनचार ओळी सावध करताहेत.
आपलया सारख्या चेंगराचेंगरीच्या देशात किमान अंतर हा संशोधनाचाच विषय ठरावा.
दंड कोणाकोणाला करणार ?
27 Mar 2021 - 1:39 pm | मराठी_माणूस
बरोबर, ह्या बद्दल कोणीच काहीच बोलत नाहीत. सगळी जबाबदारी लोकांवर ढकलणे चालु आहे. माध्यमे सतत हेच ऐकवत/छापत असतात.
ह्याचा खोलवर विचार व्हायला हवा, वैद्दक शास्त्र कमी पडते आहे का हे तपासायला हवे,
26 Mar 2021 - 6:41 pm | कंजूस
कपोलकल्पित कथांनी. हुक वापरू नका. पोतं फाटेल.
26 Mar 2021 - 8:00 pm | अभिजीत अवलिया
थोतांड कविता. आवडली.
30 Mar 2021 - 8:09 pm | चिगो
कविता आवडली, गवि..
30 Mar 2021 - 9:21 pm | मराठी कथालेखक
थोतांडच थोतांड ? थोतांड..
4 Apr 2021 - 1:34 pm | विनायक प्रभू
अमूक इंच थोतांड
तमूक मिनिटे थोतांड
4 Apr 2021 - 3:31 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गुरुजी, कशाबद्दल आहे, खुलासा प्लीज. ;)
-दिलीप बिरुटे
4 Apr 2021 - 4:17 pm | विनायक प्रभू
नाक किती इंच?लांब किंवा मोठे
राज्यारोहण आणि बरखास्त - वेळ
4 Apr 2021 - 5:08 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
तुम्ही जर, खुलासा केला नसता तर माझा गैरसमज झाला असता.
आभारी आहे.
-दिलीप बिरुटे
4 Apr 2021 - 5:48 pm | विनायक प्रभू
आकलनशक्ती मोठीच हो तुमची.
असो.
पण मी नोंद केलेल्या थोतांडा वरचे उपाय आणखी मोठे थोतांड