आज सगळ जग डेवलप होतय ,
इमान अण राकेटात बसुण आभालाळा गवसणी घालतय ,
अशा या बदलत्या काळात रात्रीचं पण येगळच विश्व सुरू होतय |
तरी माझा शेतकरी बाप अजुन मातीतच घाम गाळतोय ,
रात्रीच पाणी द्यायला इच्चुकाड्याची सोबत घेतोय,
दिवसा ना त्याला उन्हाचा ताप ना रात्रीची त्याला झोप ||
असा हा आमचा शेतकरी बाप कधी राहिल टिपटाप ?
मोठाले यापरी ब्यांकीची हाजारो कोटी बुडवतात,
देश सोडुन पळुन जातात न देश खड्ड्यात घालुन मजा मारतात |
पन बी अन् खतासाठी घेतलेले पन्नास हाजार
न फेडता आल्या मुळे तो स्वाभीमानी घेतो गळफास, ||
त्याला होती एकच आस माझ पिक येईन खास ,
अन् सार्या जगाच्या पोटात जाईल सुखाचा घास |
आज तोच झाला खाक अन् त्याची स्वप्न झाली राख,
आज पोर त्याच पोरक कोण देईल त्याला खुराक ||
पाणी नव्हत त्याच्या आडात तरी शेती केली जोमात,
शेवटी अवकाळी आला अन् तोंडातला घास घेउन गेला,
हाच तो सुखाचा घास नाही आज त्याच्या पोराच्या पोटात |
त्याच्या या पोराला आता कोण देइल पाठीवर थाप,
असा हा शेतकरी बाप कधी राहिला नाही टिपटाप ||
टिप :
ही कविता मा.बो. वर आधिच प्रकशित आहे , अनिथ या माझ्याच आय डी ने. धन्यवाद.
प्रतिक्रिया
28 Jul 2020 - 2:08 pm | अभ्या..
तुम्हाला अधिकारच नाहिये अशा कविता लिहिण्याचा आन रडगाणे गाण्याचा.
तुम्ही आकडा टाकून वीज घेता.
तुम्ही वारेमाप खर्च करुन लग्न समारंभे करता.
कुठलाच टॅक्स न देता स्कॉर्पिओतून फिरता.
व्यापार जमत नाही म्हणून आडत्याला शरण जाता आणि भाव मिळत नाही म्हणून बोंबलता.
आडती लोक शहरी लोकांना जास्त भावात विकून कमावतात म्हणून विव्हळता.
शहरी लोक तुमच्या हितासाठी त्यांची सगळी कर्जे विनामाफीची फेडून वर सगळे टॅक्स भरुन तुमच्या हितासाठी धडपडतात तर त्यांच्याच नावाने ओरडता.
शहरी लोक इतक्या प्रेमाने अॅग्रो पर्यटनाला येतात तर तिथेही तुम्ही त्यांना नाडता.
भाव मिळत नाही म्हनून कांदा, टमाटे आणि दूध रस्त्यावर ओतायचा माजुरडे पणा करता.
तुम्हाला पिक, जमीन, भाव, बाजार, शिक्षण, घर ह्या कशातलेच व्यवस्थापन जमत नाही तरीही शेत सोडवत नाही आणि ते दुसर्यालाही घेऊ न देता रडता.
राजकारण्यांना एकगट्ठा मताची लालूच दाखवून पिकविमा, कर्जमाफी, विज्बिलमाफी, सवलती अशा गोष्टी पदरात पाडून घेऊन परत तडफड करता.
.
.तुम्हाला अधिकारच नाहिये अशा कविता लिहिण्याचा आन रडगाणे गाण्याचा.
28 Jul 2020 - 2:25 pm | प्रसाद गोडबोले
+१
अभ्याशेठ , परखड आणि सुस्पष्ट प्रतिसाद ! आता बाकी काही बोलायची गरजच नाही !!
28 Jul 2020 - 2:59 pm | अभ्या..
आता बाकी काही बोलायची गरजच नाही !!
त्यासाठीच दिलाय तो प्रतिसाद
30 Jul 2020 - 4:30 pm | अनिल चव्हाण राम...
आधी माझ्या प्रश्नाची उत्तरे द्या मग ठरवु काही बोलायची गरज आहे का नाही ते. @मार्कस्_ऑरेलियस
30 Jul 2020 - 11:57 pm | प्रसाद गोडबोले
कशाला करताय इतकी तोट्यातली शेती , फुंकुन टाका जमीन अन मस्त शहरात जाऊन राव्हा ना , मस्त फॉर्चुनर घ्या , "पनवेल"ला जाऊन पैसे उडवा ! पैसे गेले तरी चालतील पण खेळ झाला पाहिजे =))))
तुमची शेतजमीन विकायची असल्यास लोकेशन , क्वोट आणि मोबाईल नंबर सांगा.
31 Jul 2020 - 5:19 pm | अनिल चव्हाण राम...
,, तुमच्या भाषेत रिअल इस्टेट एजंट ,, असाल तर मग दुसर काय अपेक्षित असनार
3 Aug 2020 - 12:26 pm | प्रसाद गोडबोले
तुम्ही एकदा ठरवा हो नक्की की तुम्हाला काय पाहिजे - टापटीप राहायचं आहे की संपूर्ण भारत देशावरील जनतेवर "उपकार" करत तोट्यात चाललेली शेती करायची आहे ?
तुमची शेती तोट्यात चालली असेल तर बुडीतखाती कंपनीचे जसे वाल्युएशन करतात तसे आपण तुमच्या बुडीत शेतजमिनीचे वाल्युएशन करू, बाकीचे लिव्हरेज बायआउट कसे करायचे ह्याचे मी प्लॅंनिंग करतो . तुम्हाला ह्याला काय म्हणयाचें ते म्हणा, तुम्ही दलाल म्हणा मी इन्व्हेस्टमेंट बँकिंग म्हणतो , हायकायनायकाय.
एकदा तुमचा निर्णय झाला की कळवा मग आपण डायरेक्ट बोलू की!
तुमच्या हाती एकरकमी पैसा पडेल , मग राव्हा की टिपटॉप !!
3 Aug 2020 - 12:26 pm | प्रसाद गोडबोले
तुम्ही एकदा ठरवा हो नक्की की तुम्हाला काय पाहिजे - टापटीप राहायचं आहे की संपूर्ण भारत देशावरील जनतेवर "उपकार" करत तोट्यात चाललेली शेती करायची आहे ?
तुमची शेती तोट्यात चालली असेल तर बुडीतखाती कंपनीचे जसे वाल्युएशन करतात तसे आपण तुमच्या बुडीत शेतजमिनीचे वाल्युएशन करू, बाकीचे लिव्हरेज बायआउट कसे करायचे ह्याचे मी प्लॅंनिंग करतो . तुम्हाला ह्याला काय म्हणयाचें ते म्हणा, तुम्ही दलाल म्हणा मी इन्व्हेस्टमेंट बँकिंग म्हणतो , हायकायनायकाय.
एकदा तुमचा निर्णय झाला की कळवा मग आपण डायरेक्ट बोलू की!
तुमच्या हाती एकरकमी पैसा पडेल , मग राव्हा की टिपटॉप !!
28 Jul 2020 - 10:48 pm | सर टोबी
तसेच आक्रस्ताळ्या प्रतिसादाशीही सहमत नाही. प्रथम शेतीविषयक त्रुटींविषयी जाणून घेऊ:
शेतकऱ्यांनी त्यांचं जीवनमान बदलवून टाकणारी सहकार पद्धत गैरव्यवहार आणि राजकारण यामुळे पूरती मोडकळीस आणली. एके काळी सहकारी क्षेत्राने निव्वळ शेतीच नाही तर शेतीपूरक व्यवसाय जसे सूत गिरणी, मद्यार्क, वीज इ. क्षेत्रात पाय रोवले होते. महाराष्ट्रात तर सहकार क्षेत्राने अपना बाजार, अभियांत्रिकी, पेट्रोल पंप, असे नवनवीन क्षेत्रात जम बसविण्यास सुरुवात केली. आज तेच सहकार क्षेत्र जेमतेम शेतीपुरते टिकून आहे.
सहकारी पध्धतीने शीतगृहांची निर्मिती, पुरवठ्याच्या नियंत्रातून बाजार भावाचे नियोजन, सामुदायिक रित्या ठरवलेली पीक पद्धत ज्यात सर्वच शेतकरी एकच एक उत्पादन घेण्याऐवजी भिशी पध्धतीने उत्पादन घेतील अश्या अनेक कल्पक गोष्टी करू शकतात.
आता प्रतिसाद देणार्यांकडे वळु. प्रथम आकडा टाकण्याची चैन असणारे, स्कॉर्पियोतून फिरणारे, सोन्याचा गोफ घालणारे, लग्न कार्यात मोठा खर्च करणारे शेतकरी फक्त मोठ्या शहरांच्या आजूबाजूला बागायती शेती करणारे असतात. निवडणुकीच्या वेळेस होडीतून जाणारे, डोंगर चढून जाणाऱ्या अधिकाऱ्यांचे जे फोटो येतात ना अशा दुर्गम भागात गरीब आणि जिरायती शेती करणारा शेतकरी असतो. आणि बागायतीचं जरी म्हणाल तरी खालील गोष्टींचा विचार करा आणि आपला प्रतिसाद किती उथळ होता ते बघा:
30 Jul 2020 - 4:24 pm | अनिल चव्हाण राम...
आता तुमचे सर्व मुद्दे खोडुन काडतो ,, १ आकडे ,,,, एक वेळेस सर्च करा महाराष्ट्रातील किती शेती सिन्चन क्षेत्रात येते न किती कोरड वाहु आहे,,, अर्धवट माहीती धोक्याची असते, जिथे विज नाही, आली तरिही फिक्स टाइम नाही,, राहाता राहिला प्रश्न आकड्यचा आता नियम बदलले आहेत कोणी ही विज चोरु शकत नाही ,, काहि जण चोरत असतील तर अस नाही ना की सर्वच जण चोरत असतिल,,, आणि जर तस असेल तर शहरात राहणारे सर्व जण श्रिमंत पाहिजेत ना मग कशाला लोकल ने प्रवास करता, भाड्याच्या घरात राहाता बी एम ड्ब्लु घेउन फिरा ना सर्व,,,, आता २. लग्न खर्च ,,, तुमच लग्न झालय का ,, झाल असेल तर तुम्ही कोर्ट marriage केल आहे का ??? नसेल तर का नाही केल,, आणि लग्न नसेल केल तर का नाहि करनार???????, का कमी पना वाट्तो ????? ,,,, आता ३ टॅक्स ,, इ बूड्बक ,, अभि नये कानुन के हिसाब से ५,००,००० के उपर वालो को भी टॅक्स देना होगा ,, जे एका सामान्य शेतकर्याच (२-३ एकर वाले) ३-४ वर्षाच पन उतपन्न नसत.,,, आता स्काॅर्पिओ त्याला तुम्ही घेउन दिली काय???? ४ .. हे मात्र अती झाल जो जगाला जगवतो त्याला व्यापार शिकवणार तुम्ही ,, अरे बाबा त्याला वेळ कुठाय ,, एक महिन्यात २-४ वेळा खुरपण एक दोन वेळा पाळी टाकावी लागते,, ति काय तुम्ही करुण देनार???? कधी केलय का हे काम ऐकुन तरि आहात का,, हे आस असत म्हनुण, ,, आता भाव सोडुन द्या कशाला माझ तोंड उघडता, शिक्षका चा पगार at the time of independence and now or ( today ),,, n the cost of food grains at the time of independence and now,, you will find a huge difference about 400 times ,, हे लिहीनारा पण एक शेतकरीच आहे म्हनुण ते शिक्षण न बाकी उपदेशाचे डोस देउ नका,,.,,! आणि टॅक्स भरता म्हनुन ऊडु नका तुम्हाल इनकम रिटर्न मिळत,, तुमच्य टॅक्स पेक्षा जास्त बियान अन खत जमिनीत ओततो जे येइल का नाही ग्यारन्टी नसते,, घेतली का कधी असली रिस्क ,, ओतले का कधी हजरो रुपये जमिनीत???? आले मोठे व्यापार अन् भाव शिकवायला. ओय!!!!! AGRO पर्यटन ,,, शहरी च नाही जगातील कोणाताही व्यक्ती जर सहज म्हनुण शेतात आला तर आम्ही असेल तो रानमेवा खाउ घातल्या शिवाय त्याला जाउ देत नाही ,, त्याला काहि त्रास असेल तर मुक्काम करायला लावतो. Without expecting and accepting a single penny from him/them,, can u do that ,,???????. रात्री कोणी बेल वाजवली तर पोलिस स्टेशन ला कॉल करनारे, आम्हाला म्हणता आम्ही शहरी लोकांवर ओरडतो,,, खोटा आरोप करता,,, वाह् रे वाह !!!! ५ .. भाव नाहि मिळाला तर travel expenses and wages देउ शकु एवढ पण उतपन्न नाहि निघत,, मग तुम्हि देनार का ते पैसै??. काय जोक करता राव ६,,,६ अन हे व्यवस्थापन कुठुन आनल, असु देत,, एक महिन्याचा ५०,००० पगार लेट झाला तर बजेट बिघडल अन् घर खर्च कमी करनारे,,, तुम्ही जो ५०,००० सहज जमिनीत ओततो अन १,००,००त वर्ष काढतो एखद्या एम बी ए ला लाजवेल अस व्यस्थापन करतो,, त्याला मॅनेजमेंट येत नाही अस म्हनता.... कमाल !!! ,, ७ आता मात्र संयम संपला,, लाज वाट्ते का काळी आई विक म्हणायला,,, जर असाच विचार करून सगळ्यांनी जमीनी विकल्या तर खाणार काय ?????? ,., ८ ... ओ राजकारणी ,, पिक विमा, कर्ज माफी ४-५ वर्षाला एकदा होते,, दररोज नाही.. ,, अन आताच तर म्हनालात आकडे टाकतो,, तरिहि विजबिल माफी घुसवली ,, तरिही सांगतो. आम्हाला फक्त ३-५ ₹ पर युनिट बिल ,, म्हणजे ५०० ₹ पण बिल येत नाही ,, मग आम्ही कधी माफी मागितली, उलट आता लॉकडाउन मधे बिल माफी कोण मागतय.,, ज्या शेतकर्याच्या शेतात पाणी नाही मोटर नाही ते पण मागतात का हो विजबिल माफी????? हे सर्व फक्त तुम्हालाच ,, तुमच्या बाल बुद्धीची किव येते.. तुम्हाला कोणी अधिकार दिला , शितावरुन भाताची परिक्षा करायला. आधि नांगरट न पाळी मधला फरक सांगा.,,, उचलली जिभ न लावली टाळाला..
टिप :
हे सर्व फक्त @अभ्या.. साठी बाकी शहर वासिय अन ग्रामिण लोकांनी जास्त मनावर घेउ नये ,, घेतल्यास मी जबाबदार नाही.
Last but not least ,, Don't talk about anything until and unless you have therotical as well as practical knowledge or experience about it. by अनिथ.
बाकी टायपिंग मिस्टेक असतिल तर जाउ देत.
30 Jul 2020 - 5:48 pm | अभ्या..
असे का म्हणून? मी विचारलेले कधी ऐकले नाहि ह्याआधी कुणाकडून?
कशामुळे आली ही परिस्थिती?
आणि मी सोडून इतरांनी मनावर घेऊ नये असे का म्हणून?
घेऊ दे की मनावर. जबाबदारी पण घ्यावी मनावर घेतल्याची. कशाला घाबरायचे..
सल काय आहे ते कळले पण त्याची उकल कुणी करायची?
कशी करायची? का करायची?
.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या मोर्चात भाषणे ठोकल्यासारखे लिहुन काही होत नाही बळीराजा.
हसण्याचा विषय नाहीये हा पण तो होतोय तुमाच्यासारखे आवेशपूर्ण पण बिनबुडाचे प्रतिसाद वाचून.
.
सावरा, सांभाळा
31 Jul 2020 - 5:05 pm | अनिल चव्हाण राम...
आधी बघा बिनबुडाचे आरोप कोण करतय,, मनावर घ्या नका घेउ तुमचा विशय ,, फक्त हा मुद्दा शहरी / ग्रामिण न व्हावा हा हेतु होता म्हनुन तस लिहील ,,, अन् मी काही भाषण नव्हतो देत , ते तुम्ही दिल मी नाही ,,, मी फक्त कविता लिहीली , तुमचा प्रतिसाद आला मी प्रतिउत्तर दिल that's it,, आता मी दिलेल्या प्रतिसादातील प्रश्नाला उत्तर द्या नका देउ मर्जी तुमची , तसा तो तुम्ही नाही देणार हे अपेक्षितच होत , झाल हि तेच ,, उगाच विषयांतर केलत,, आता तुमचे उत्तर अन माझे प्रश्न यांचा मेळ बसत असनारा प्रतिसाद आला तरच मी रिप्लाय देइल,, , धन्यवाद.
31 Jul 2020 - 8:27 pm | अभ्या..
हे बघा मालक,
तुमच्या कवितेत टोटल तीन प्रश्न आहेत.
१) असा हा आमचा शेतकरी बाप कधी राहिल टिपटाप ?
२) आज पोर त्याच पोरक कोण देईल त्याला खुराक ||
३) त्याच्या या पोराला आता कोण देइल पाठीवर थाप,
त्यातल्या पहिल्या प्रश्नाचे उत्तर तुम्हीच दिलेले आहे कवितेत शेवटी.
असा हा शेतकरी बाप कधी राहिला नाही टिपटाप
ओके.
काही हरकत नाही. माझाही बाप कधी टिपटाप राहिला नाही. अगदी माझ्या(म्हणजे माझ्या बापाच्या) शेताचा सध्याचा चालू भाव ६५ लाख प्रति एकर (फक्त शेतीसाठी, गुंठेवारीसाठी नाही) असूनही टिपटाप राहात नाही. त्यांना गरज वाटत नाही त्याची. पोरांनी टिपटाप राहावे असे वाटते त्यांना पण स्वतःच्या पोराच्या लग्नातही खांद्यावर गमजा टाकून कामे करत हिंडतील. मनुष्य स्वभाव. पिढीचा फरक, इलाज नाही.
दुसरा प्रश्न पोरक्या पोराचा प्रश्न फक्त शेतकर्यांच्या पोरांचा नसतो. पोरका झाला तरी त्याची काळी माय शाबूत असते. नोकरदाराच्या पोरक्या पोराला अनुकंपेत नोकरी मिळायचे प्रमाण फक्त सरकारी मध्ये. खाजगीत ते ही नाही. सगळी सुरुवात नव्याने.
तिसरा प्रश्न : कोण देईल थाप? अर्थात ह्याचेही उत्तर वरचेच आहे. पितृछत्र दुरावणे ही खरोखर दुर्दैवी गोष्ट आहे. पण ती युनिव्हर्सल आहे. प्रत्येक बाप नसलेल्या पोराला बापाची कमी वाटत राहणार. त्याचा शेतकरी बाप आणि शहरी बाप असा फरक नसतो.
.
राहता राहिले कवितेबद्दल आणि वस्तुस्थिती बद्दल.
अॅज अ कविता रचना चांगलीच आहे. काही थोडी यमके आणि शब्दरचना सोडल्यास बाकी उत्तम आहे.
पण....
हि कविता म्हणजे वस्तुस्थिती आहे आणि ती प्रत्येक शेतकृयाची आहे आणि त्यातून आपण फार शेतीविषयक गंभीर प्रष्न मांडत आहोत असा आव आणत असताल तर प्लीज ....
फक्त तुम्ही शेतकरी नाही आहात किंवा बाके सगळ्यांनी शेतकृयावर अन्याय केलाय आणि तरीही शेतकृयांवर आरोप करतोय असा समज कदापिहि करुन घेऊ नका.
आता माझ्या प्रतिसादातले आरोप...
ते निष्कर्ष आहेत गेल्या कित्येक वर्षातले प्रत्येक चर्चेतले, प्रत्येक व्यासपीठावरचे शेतीच्या कुठल्याही प्रश्नांवर काहीही लिहिले गेले तरी काढले गेलेले निष्कर्ष आहेत. मी नाही काढलेले. मी तर उद्विग्न होऊन फक्त संकलित केलेत. आतापर्यंत ते तुमच्या कधीच वाचनात आले नसतील तर तुम्हाला खरोखर मूळापासून विचार करायची फार गरज आहे.
मला आदर आहे प्रत्येकच काम करणार्या कामगाराचा. भले तो शेतकरी असेल, जवान असेल किंवा शास्त्रज्ञ असेल. शिक्षणाचे महत्व तुम्हाला तर सांगायलाच नको. एखादा शेतकर्याचा मुलगा फर्डे इंग्रजितले कोटस देत जर संभाषण करत असेल त्याचे कौतुक वाटेल पण मुद्दा हरवून कसे चालेल मालक.
तुम्हाला इंग्रजि मिलो हे अपमानास्पद आणि मुस्कील घडी वाटते पण त्या मिलो वर तेव्हाचा शेतकरी पण जगलाय. आज शेतीत बियाणे, खते, किटकनाशके, औजारे परदेशी कंपनीचे जर शेतकर्यांना चालू शकत असतील तर शहरी माणसांनी केले इंपोर्ट धान्य काय बिघडणारे. आम्ही पिकवलेच नाही तर तुम्ही खाणार काय हा खाक्या आणि तुम्ही पिकवलेच नाही तर आम्ही बाहेरुन आणू हा खाक्या दोन्ही विचारशुन्यतेचे आणि केवळ त्राग्याची विधाने आहेत. कुणाचे पूर्वज शेतकरी नव्हते आणि कोण फक्त सर्व पिढ्या शेतीच करत आले आहेत ह्याचा गंभीरपणे विचार करा तुम्हाला जाणवेल तुम्ही (म्हणजे शेतकरी) फक्त सिस्टिमचा एक भाग आहेत. असतात प्रत्येक क्षेत्राला स्वतःचे असे काही प्रॉब्लेम पण ते दुसर्या कुणाला स्मजणारच नाहीत असा आव आणला तर ते कधीच संपणार नाहीत.
मूल लहान असले की ते फक्त रडते. आई समजून घेते त्याला भूक लागलीय का सू लागलीय का गरम होतय का थंडी वाजत्ये. जसे जसे मूल जाणते होते तसतसे त्याला काय हवेय आणि ते कसे आणि कुणाकडून मिळवायची ह्याची जाण येते. मला वाटते ह्यावरुन तुम्हास समजेल असेल काय म्हणाय्चेय ते.
धन्यवाद.
2 Aug 2020 - 11:33 am | अनिल चव्हाण राम...
या प्रतिसादाशी मी सहमत आहे,, पण मी कवितेतील प्रश्नाचे उत्तर नाही तर तुमच्या उद्विग्न होउन दिलेल्या प्रतिसादावर मी दिलेला प्रतिसादात विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे विचारली होती. पण असो., तुमच्या बद्द्ल झालेला गैरसमज ( तुमचा पहिला प्रतिसाद वाचुन ) दुर झाला हा प्रतिसाद वाचुन. " आम्ही पिकवलेच नाही तर तुम्ही खाणार काय हा खाक्या आणि तुम्ही पिकवलेच नाही तर आम्ही बाहेरुन आणू हा खाक्या दोन्ही विचारशुन्यतेचे आणि केवळ त्राग्याची विधाने आहेत. " हे ही पटले. खाली एका प्रतिसादात वाचले कि तिकडे जमिन ६५ लाख रुपये प्रति एकर आहे, विभाग वार किंमत बदलते,, सध्या परभणी जिल्ह्यात ६-१० लाख प्रति एकर इतकाच भाव आहे., असो. ,,,, तुमच्या भावना पोहोचल्या तुम्हाला काय म्हणायचय ते पण कळल. म्हणुन हा विषय वाढवण्यात अर्थ नाही अस मला वाटत, मी एका कर्जबाजारीपणामुळे फाशी घेतलेल्या शेतकर्याच्या एका मुलाची व्यथा मांडण्याचा प्रामानिक प्रयत्न केला होता, पेश्याने काही मी कवि नाही ना तुम्ही मालक म्हणाव एवढा मोठा. पण अजुनही मी तुमच्या पहिल्या प्रतिसादास असहमत ( सहमत नाही ).
2 Aug 2020 - 12:03 pm | शाम भागवत
१. शेतजमीनीच्या खरेदी विक्रीवरील बंधने उठवली तर हा ६-१० एकरी भाव वाढू शकेल का?
२. या बंधनांचा शेतकऱ्याला खरोखरच फायदा होतोय का?
2 Aug 2020 - 12:04 pm | शाम भागवत
१. शेतजमीनीच्या खरेदी विक्रीवरील बंधने उठवली तर हा ६५ लाख एकरी भाव वाढू शकेल का?
२. या बंधनांचा शेतकऱ्याला खरोखरच फायदा होतोय का?
31 Jul 2020 - 6:33 pm | कपिलमुनी
एवढे प्रॉब्लेम आहेत तर शेती करू नका, शहरात या नोकरि करा, धंदा करा , टिप टॉप रहा
30 Jul 2020 - 9:44 pm | जिन्क्स
Sarcasm at its best.
सलाम अभ्याशेठ. प्रतिसादाशी एकदम सहमत.
31 Jul 2020 - 11:33 am | कांदा लिंबू
धागालेखकाच्या भावना पोहोचल्या.
दुर्दैवाने, अभ्याशेठचा संपूर्ण प्रतिसाद (उपरोधिक आणि) अत्यंत वास्तवदर्शी आहे.
28 Jul 2020 - 2:53 pm | Rajesh188
शेती करणे म्हणजे जुगार आहे .
इथे तुम्ही किती उत्पादन घेवू शकता ह्या वर अनेक घटक कार्य करतात.
काही घटक तुमच्या हातात तर काही घटकांवर तुमचे कोणतेच नियंत्रण नसते.
1), चांगले बी,मशागत, खत देणे हे तुमच्या हातात आहे पण पावसचा लहरीपणा,पिकावर पडणारी रोग राई हे आपल्या हातात नाही आणि हे घटक सर्व अंदाज चुकवू शकतात आणि उत्पादन खर्च पण निघत नाही.
मजुरांची कमतरता,रस्त्यांची सुविधा,पाणी पुरवठा,विजेची उपलब्धता एक नाही असंख्य अडचणी वर मात करून जेव्हा उत्पादन बाजारात येते तेव्हा भाव नसतो.
भाज्या टिकावू नसतात त्या मुळे त्या साठवता येत नाहीत त्या विकण्यासाठी साखळी ची गरज असते ती साखळी निर्माण करणे एका शेतकऱ्याला शक्य नाही
तशी यंत्रणा उभी राहणे aavshakya आहे.
30 Jul 2020 - 4:25 pm | अनिल चव्हाण राम...
हा हे मात्र खर
30 Jul 2020 - 4:48 pm | कपिलमुनी
शेती करु नका , शिका आणि नोकरी करा , टिप टॉप रहा
30 Jul 2020 - 5:29 pm | अनिल चव्हाण राम...
सर्व शेतकर्यांनी जर असाच विचार केला तर मग खाणार काय ? हायब्रीड
30 Jul 2020 - 5:42 pm | अभ्या..
हायब्रीड पिकवायला ही शेतकरी लागणार ना? म्हण्जे ते पीएल १८० मधला अमेरिकेतुन आलेला मिलो म्हण्जे हायब्रीड म्हणत असताल तर ती वेगळी गोश्ट.
ज्यांच्यासाठी पिकवता ते विचार करेना झाले मग शेतकर्यांनी का करावा त्यांचा विचार? ते करतील काहीही. इंपोर्ट करतील, त्याला पैसे मोजतील.
शेतकर्यांनी आपापल्या पोटापुरते पिकवायचे अन मजेत राहायचे. एखाद्या पोराने नोकरी करायची अन राहायचे टिपटॉप.
31 Jul 2020 - 5:12 pm | अनिल चव्हाण राम...
फक्त मागच्या वर्षी ज्वारी पिकली नाही तर ६००₹ क्विंटल असनारी ज्वारी ४३००-४८०० पर्यंत गेली,, बाकि सोडुन द्या,, परत इंग्लंड वरुन डुकरांसाठीचा मिलो आणावा लागेल
31 Jul 2020 - 6:21 pm | Rajesh188
शेती हा व्यवसाय आहे समाज सेवा नाही (समाजाची सेवा होते तो by-product समजा).
शेती दुसऱ्यांना अन्न धान्य मिळावे म्हणून कोणी करत नाही स्वतः चा फायदा व्हावा म्हणून शेती केली जाते.
शेती च नाही तर सर्वच,व्यवसाय,नोकरी माणूस स्वतः साठी करतो.
कोंबडी अंड देते ती मालकाला खुश करण्यासाठी देत नाही.
तसेच आहे हे.
दुष्काळ ची झळ ज्यांचा शेती व्यक्तितिक्त इन्कम आहे त्यांना बसत नाही.
शेतकरी,कामगार,आणि गरीब लोकांना बसते.
देव करो आणि अमेरिका किंवा दुसऱ्या कोणत्या ही देशातून अन्न धान्य मागवायचे वेळ येवू नये.
30 Jul 2020 - 7:12 pm | कपिलमुनी
खायचे काय हा लोकांचा प्रॉब्लेम आहे . तुमचा प्रॉब्लेम तुम्ही सोडावा, लोक आयात करून 200₹ किलो ने खातील , तुम्हाला काय करायचंय ??
30 Jul 2020 - 6:03 pm | गणेशा
मुक्तक आवडले... शेतकऱ्यांप्रती नेहमीच आदर आहे.
30 Jul 2020 - 6:47 pm | Rajesh188
खनिज तेल आयात करायला पैसे पुराणात आणि चालले अन्न धान्य आयात करायला.
तेवढं विदेशी भांडार आहे का.
जेव्हा इथेच काहीच उत्पादन होणार नाही तेव्हा 40 रुपये किलो गहू ,आणि 40 रुपये किलो टोमॅटो एक पण देश देणार नाही.
एक आपल्या कडे दुसऱ्या देशांना देण्यासारखे काही नाही त्या अशी किंमत नाहीच जगात.
शेती वर आधारित उत्पादन पिकणे बंद झाले तर दुसरे देश सांगतील तो भाव
500 रुपये किलो टोमॅटो.
एक वेळेचे जेवायला तुमचा पगार किंवा जो काही इन्कम असेल तो पुरेल का.
Import करू
एवढं सोपं आहे का,खावू आहे काय.
30 Jul 2020 - 7:19 pm | गणेशा
स्वतःच स्वतःची प्रसिद्धी करू नये..
पण अशी चर्चा आधी माझ्याच एका शेती वरच्या धाग्यावर झालीये सो येथे आता पुन्हा नाही..
पास माझा..
मूळ कवितेच्या भावना कळल्या आहेत
30 Jul 2020 - 8:34 pm | Rajesh188
माणूस हा सर्वात आधी शेती करायला शिकला आणि त्याची वणवण थांबली आणि तो स्थिर झाला.
आणि त्याची खरी प्रगती तेथूनच सुरू झाली.
अन्न साठी वणवण फिरणे बंद झाल्या मुळे मिळालेल्या मोकळ्या वेळेचा त्याला फायदा झाला आणि नवनवीन शोध तो लावत गेला.
शहर तशी नवीनच आता इंडस्ट्रियल क्रांती यूरोप मध्ये झाली आणि भारत त्यांचा अंकित देश असल्यामुळे त्याची काही
फळ इथे पण उडाली.
आणि खऱ्या अर्थाने शहर निर्माण होवू लागली.
काही भारतीय कंपन्या मोजक्याच निर्मिती क्षेत्रात होते त्यांना देश अंतर्गत च बाजार होता.
सर्वच नवीन असल्या मुळे शहर वाढू लागली .
आणि खऱ्या अर्थाने नोकरी हा प्रकार चालू झाला.
सरकारी नोकरांना सरकारी तिजोरी मधून पगार दिला जातो त्यांची कार्य क्षमता काय आहे.
त्यांना जो भरमसाठ पगार दिला जातो तेवढं फायदा त्यांच्यावकडून मिळतो का तर बिलकुल नाही
10 percent सुद्धा रिटर्न त्यांच्या कडून मिळत नाहीत.
शहर निर्माण होण्यासाठी जमीन लागते अजुन तरी अधांतरी शहर निर्माण झालेली नाहीत.
ती जमीन अत्यंत कमी किमतीत जबरदस्ती नी ताब्यात घेतली जाते त्यांचे मालक शेतकरी च असतात.
रस्ते निर्मिती,कारखानदारी साठी जमीन ,कमी किमतीत सरकार ताब्यात घेत ती जमीन कोणाची असते,
पाणी पुरवठा करण्यासाठी धरण त्याला जमीन लागते ती कोणाची असते.
जास्त विरोध न करता देशाचे कार्य म्हणून ती जमीन शेतकरी देतो.
उद्या पुण्यातील अतिशय पॉश वस्ती जमीनदोस्त करून तिथे जनतेच्या हितासाठी हॉस्पिटल बांधायचे आहे म्हणून. 1000 रुपये गुंटा भरपाई देवून सरकार नी ती जमीन ताब्यात घेतली तर शहरी लोक अटॅक येवून मरतील.
कोणाची ही जमीन सरकार देश हितासाठी ताब्यात घेवू शकते हाच नियम त्यांना लागू होईल.
थोडक्यात शहर निर्मिती शेतकऱ्यांच्या त्यागवर झाली आहे.
शेतकऱ्यांना सरळ पैस्याच्या रुपात कधीच मदत मिळत नाही.
खतांची सबसिडी खतनिर्मिती करणाऱ्या कारखान्यांना दिली जाते.
दूध साठी सबसिडी दूध dairy na दिली जाते.
कर्ज माफी ही मागणी शेतकऱ्यांची नाही ती नेत्यांची आहे.
योग्य भाव द्यावा,आणि प्राथमिक सुविधा निर्माण कराव्यात ही शेतकऱ्यांची मागणी आहे.
1 ते 2 दीन acre शेती असणार जिरायत किंवा बागायत शेतकऱ्यांचे वार्षिक उत्पादन इन्कम टॅक्स chya कक्षात येत नाही .
पण बाकी टॅक्स ते भरत असतात.
नोकरदार इन्कम असूनसुद्धा सरकार ला फसवण्याचा धंधा करत असतात.
व्यापारी तर त्यांचे बाप रोज लाख रुपये कमवत असले तरी कर चुकवने,वीज बिल बुडवणे,पाणी बिल बुळवणे हे bindast करतात.
31 Jul 2020 - 4:15 pm | डॅनी ओशन
एकर्सचा काहीही संबंध नसतो. कितीही शेती असली तरी पूर्ण उत्पन्न टॅक्स फ्री असते. अर्थात इनडायरेकट् टॅक्स (gst वैगेरे) अर्थातच सर्वच जण भरतात. आणि इनडायरेकट् टॅक्स टोटल कॉन्ट्रीब्युशनच्या 65% असल्यामुळे शेतकरी किंवा कमी उत्पन्नाच्या लोकांचा करभरणीतला वाटा नक्कीच दुर्लक्ष करण्यासारखा नाही. इथे तुमचे म्हणणे 100% बरोबर. शेतकरी देशाच्या करसाठ्यात हातभार लावत नाहीत हे फसवे विधान आहे.
30 Jul 2020 - 9:40 pm | बोलघेवडा
एक साधा प्रश्न आहे. शेतीत इतके प्रॉब्लेम्स आहेत तर शेती विकून का टाकत नाहीत. जी मेहनत शेतीत करणार तीच मेहनत विकून आलेल्या पैशातून दुसरं काहीतरी धंदा करण्यात लावायची.
कृपा करून राग मानू नये.
30 Jul 2020 - 10:19 pm | Rajesh188
जे जमीन विकतील ते सर्वात unlucky असतील .
काही वर्षांनी इथे सर्व मिळेल पण जमीन मिळणार नाही.
फ्लॅट ला काही किँमत नसेल बिल्डिंग चे आयुष्य संपलं की सर्व संपलं.
ज्याची जमिनी वर मालकी तोच जगेल.
बोलघेवडे 100 वर्ष नंतर आताच्या बिल्डिंग उभ्या नाही आडव्या असतील.
जमीन वर असलेली 9 by 9 chi झोपडी उभी असेल.
30 Jul 2020 - 10:48 pm | mrcoolguynice
कन्व्हेयन्स डिड नामक प्रकार , आपल्या ऐकण्या वाचण्यात आला का ?
भारतीय नागरिकांची सरासरी आयुष्य वर्षे किती ? १०० वर्षे का ?
31 Jul 2020 - 11:43 am | कांदा लिंबू
श्री-थंड-चांगल्या-मनुष्या,
प्रतिसादाच्या between the lines शी पूर्ण सहमत.
काय वेळ आलीय माझ्यावर, कुणाशी सहमत होतोय ;) हघ्याहेवेसांन.
रच्याक, Conveyance deed बद्धल माझा थोडा गोंधळ आहे राव. इथे किंवा स्वतंत्र, सविस्तर लिहू शकाल का?
30 Jul 2020 - 11:13 pm | Rajesh188
कमी व्याज दर त्या मुळे फ्लॅट चे कृत्रिम पने वाढलेले दर.
फ्लॅट ची किंमत 30 लाख खरी किँमत 15 लाख .
15 लाखाचा फुगा.
आता रिअल estate chi अवस्था अत्यंत खराब .
फुगा फुटला नाही पण हवा गेली आहे.
40 फ्लोअर ची बिल्डिंग आहे 50 वर्षात ती पाडण्या च्या अवस्थेत येईल.
फुकट घर पाहिजे असेल तर 80 फ्लोअर ची बिल्डिंग हवी .
मग मोकळी जागा राहणार नाही .
सरकारी नियमात बसणार नाही.
आणि कोणीच पैसे गुंतवणे शक्य नाही redevelopment साठी.
ते फायद्याचे ठरणार नाही.
31 Jul 2020 - 12:28 am | Rajesh188
मी शेतकरी नाही उत्तम नोकरी करणारा च आहे.
पण अभ्या नामक आयडी चा प्रतिसाद अत्यंत हिन दर्जाचा होता.
त्यांच्या प्रतिसाद चा सत्य परिस्थिती शी काहीच संबंध नाही.
असभ्य,सत्यापासून लांब जाणार,पूर्व गृह दूषित असणारा प्रतिसाद तत्काळ काढून टाकणे गरजेचे होते.
प्रतेक प्रश्नांच्या दोन बाजू असतात.
आपल्याला त्या मधील काहीच कळत नसेल तर ठाम मत व्यक्त करू नये.
माणूस जुना सभासद आहे,काही विषयात उत्तम लेखन करतो.
म्हणून चूक आहे ते बरोबर आहे अशी भूमिका नको.
चुकीला माफी नसावी.
ती दाखवून दिली पाहिजे अंध पने समर्थन नको.
31 Jul 2020 - 8:08 am | धनावडे
साहेब उपहास केला त्यांनी, त्यांचे असल्या धाग्यावरचे प्रतिसाद वाचा.
31 Jul 2020 - 8:38 pm | अभ्या..
धनावडे साहेब नमस्कार,
खरे सांगतो मालक, चीज केले तुम्ही माझ्या तुटक्या मुटक्या लिखाणाचे. मला खरेच कधी ही वाटले नव्हते की कुणी लक्षात ठेवून माझे प्रतिसाद वाचत असतील आणि त्याची नोंद ठेवून वेळेवर आठवण करुन देईल. थॅन्क्क्स अ लॉट धनावडे साहेब आणि मिपा पण.
बाकी ते राजेश कुणी आहेत त्यांचे काही मनावर घ्यायचे नसते. ते मनकी बात फेम आहेत. नुसते पिंका टाकत लॉजिकलेस विधाने करत हिंडायचे एवढेच ते करतात. चर्चा नामक एक प्रकार असतो, कुणाला प्रष्न विचारला तर त्याची उत्तरे द्यायची असतात कींवा निदान माहित नसले तर गप्प वाचन करायचे असते ते त्यांना माहित नाही अजून.
संजय क्षीरसागर आणि अर्धवटराव, कोहंसोहं, भागवसर अशा थोरामोठ्यांच्या चर्चेत पिंका टाकून आध्यात्म अन आस्तिकनास्तिकता शिकवण्याचे धाडस आहे ह्या आयडीचे. विचारलेल्या एकाही प्रश्नाला उत्तर मात्र देणार नाहीत. दुसरीकडे तिसरीच टेप वाजवत बसणार. ह्यांनी विचारलेल्या प्रश्नांची मात्र उत्तरे द्यायची लोकांनी. उपहास, लॉजिक, अभ्यास, व्यासंग, शुध्द्लेखन अशा कोणत्याही गोष्टीचा दूरदूरचा संबध नसताना लोकांच्या चुकीच्या माफीची गोष्ट करतो हाच विनोद आहे.
असो.
पुन्हा एकदा धन्यवाद धनावडे साहेब.
लोभ असु द्या
31 Jul 2020 - 11:34 am | कांदा लिंबू
मला वाटतं, इतर कोणत्याही कामाप्रमाणे शेती हे एक उपजीविकेचे साधन आहे. तिला काळी माय (किंवा भौगोलिक स्थानानुसार - लाल माय, for that matter) म्हणणे, तिची पूजा करणे यात योग्य-अयोग्य असं काही नाही. व्यापारी त्याच्या गल्ल्याची, कारखानदार त्याच्या यंत्र सामुग्रीची, इडली-डोसेवाला त्याच्या गॅस-शेगडीची पूजा करतात, नाही का?
पण नियंत्रणात असलेल्या-नसलेल्या कारणांनी जर धंदा चालत नसेल तर तेच लोक, तीच उपजीविकेची साधने येईल त्या भावात विकूनही टाकतात आणि कुवतीनुसार दुसरा धंदा करतात. "मी जर हा उद्योग बंद केला तर या जगाचे काय होईल" असा विचार ते करतात का?
शेती जर आतबट्ट्याचा उद्योग ठरत असेल, आणि पुनःपुन्हा शेती जर आतबट्ट्याचा उद्योग ठरत आहे असा अनुभव येत असेल तर... पुढे काही लिहिण्याची गरज आहे का?
31 Jul 2020 - 11:56 am | Rajesh188
जो धंधा चालत नाही तो विकून दुसरा धंधा चालू करणे हे व्यवहारिक आहे आणि योग्य पण आहे.
ह्या विषयी दुमत नाही.
शेती नेहमीच नुकसानी मध्ये जात असेल तर विकावी हा सल्ला योग्य दिसत असला तरी तो योग्य नाही.
ह्या पृथ्वी वर तुमच्या हक्काची जमीन असावी नाहीतर राहणार,फिरणार,वावरणार कुठे.
स्वतःला हवं तसे कोणतेच निर्बंध नसणार तुमच्या स्वतःच्या हक्काच्या जमिनीवर.
जी लोकसंख्या वाढेल तशी कमी होत जाईल.
दुसरा मुद्धा हा आहे की जमीन ही पिढ्यान् पिढ्या च्या वारसा हक्क नी मिळालेली संपत्ती आहे ती कमावलेली नाही .
त्या मुळे ती विकण्याचा नैतिक अधिकार पण नाही.
शेती ला पूरक व्यवसाय करू शकता,नोकरी करून शेती पण करू शकता.
अनेक पर्याय आहेत.
शेती ला सांभाळण्यासाठी 1 रुपयाचा खर्च नाही.
ना maintance ना प्रॉपर्टी टॅक्स.
पुढे भविष्यात जमिनीची कमतरता भासेल तेव्हा करोडो मध्ये किंमत असेल त्या जमिनी ची.
आताच जमीन,जागा घेणे सोप राहिलेले नाही.
31 Jul 2020 - 2:04 pm | mrcoolguynice
हे सगळं ठिकाय,
त्यांच्या मूळ प्रश्नाचे उत्तर सुचवा प्लिज.
शेतकरी टीपटाप कधी राहायला लागेल ?
जमिनीचे भाव करोडो होतील, तेव्हा जमीन विकून की आणखी कश्या प्रकारे ?
31 Jul 2020 - 6:28 pm | सतिश गावडे
कोकणात प्रामुख्याने भात शेती होते. पूर्वी दुबार असायची. म्हणजे पावसाळ्यात पावसाच्या पाण्यावर आणि उन्हाळ्यात कालव्याचे पाणी. कालवा म्हणजे घाटावर असतो तसा मोठा ओढा सदृष्य नव्हे, एका ढांगेत ओलांडता येईल इतका रुंद आणि फुट दिड फुट खोल. पुढे पुढे हे कालवे वर्षागणिक बंद होत गेले आणि काही भागात उन्हाळी भात शेती बंद झाली. तशा नद्या आहेत, बारमाही भरुन वाहणार्या. मात्र कोकणातील शेतकरी नदीला मोटर पंप लावून वगैरे भातशेती करण्याची तसदी घेत नाही.
पूर्वी जेव्हा दुबार शेती होती तेव्हा स्वतःसाठी ठेवून धान्य उरायचे ते विकले जायचे. आता पावसाळ्यात जे पिकते ते स्वतःसाठी ठेवतात. (किंवा आपण पिकवलेला भात विकतात आणि राशनचा/दुकानातील "पालिस" केलेला तांदूळ आणतात. जिथे शहरी माणसं ब्राऊन राईस चढ्या किंमतीने विकत घेतोय तिथे हा भात उत्पादक मात्र मशीनवर डबल पॉलिश केलेला तांदूळ विकत घेतो. असो)
नदीकाठी जमीन असेल तर थोडीफार भाजी पिकवली जाते. मात्र असे कष्ट घेणारा कोकणी शेतकरी गावात एखाद दुसरा. उन्हाळी जिथे कालव्याचे पाणी जात नाही मात्र नदीकिनारी शेत असेल तर शेताला ओल असते. अशावेळी कडधान्ये पेरली जातात. हे ही अपवादात्मक असते. पावसाळ्यात मात्र अंगणात, परसदारी शेताच्या बांधावर भाजीपाला उगवला जातो. आणि त्या भाजीवर पुर्ण पावसाळा साजरा होतो.
शेतीला पुरक धंदा म्हणून म्हशी पाळल्या जातात. दूध विकले जाते. तो मोठा उत्पन्नाचा आधार असतो.
कुठे आत्महत्या नाही, कुठे कर्जमाफी वीज बील माफी ची मागणी नाही, सावकारी व्यवसाय अस्तित्वात नाही, अडी नडीला जमीन गहाणवट टाकली जाते, मात्र ती वेळेवर सोडवलीही जाते. गहाणवट ठेवलेली जमीन हडपणारा अण्णा नाईक हा सिरियलमध्येच दिसतो. तसाही कोकणी माणूस अल्पसंतुष्ट. छानछौकी न करता आहे त्यात समाधानी राहणारा.
समस्या नाहीत असं नाही, मात्र कोकणी शेतकरी रडताना, यंत्रणेपुढे हात पसरताना दिसत नाही. कर्जमाफी, वीजबिलमाफीकडे आस लावून बसत नाही. झेपेल तितकं पोराबाळांना शिकवतो, नाही झेपत तेव्हा हात जोडून म्हणतो बाबारे आता काय पुढं शिकवणं शक्य नाही. पोरगा काय ते समजून जातो आणि कोकण रेल्वेत बसून मुंबईला जातो. चार पैसे कमवतो. त्यातले दोन पैसे आई बापांना इमानदारीने पाठवतो. कोकणातील शेतकर्यांच्या लेकी बाळीही तशा शहाण्या. बाप शिकवेल तितकं शिकतात, शिक्षण थांबलं की मुंबईचा रस्ता धरतात. चार घरची धुणी भांडी करतात. चार पैसे गाठीला बांधतात. तेव्हढाच बापावरील लग्नाच्या खर्चाचा बोझा कमी होतो.
यातील काहींना उच्च शिक्षणाचं महत्व कळतं. कुठेतरी कुणाच्या इंजिनीयर पोराला गाडीतून फिरताना एखादा शेतकरी पाहतो आणि आपल्या पोरालाही इंजिनीयर करायचं मनावर घेतो. घरातील म्हशी वाढतात, भात लावायची शेतं वाढतात. त्या पोरालाही शाळा, गुरं आणि शेती अशी तिहेरी कसरत करावी लागते. पोरगंही रक्त आटवतं, शाळेत जातं, गुरं राखतं, शेतात नांगर धरतं, डोक्यावर भाताचे भारे वाहतो. आणि एक दिवस इंजिनीयर होऊन विमानात बसून कॅलिफोर्नियाला जातं. याचं पाहून अजून चार पोर शेती गुरं ढोरं यांच्या जोडीने मन लावून अभ्यास करतात. काही बाही बनतात आणि घरी आई बापाला चार पैसे पाठवतात.
राज्याच्या इतर भागातील शेतकर्यांनी कोकणातील शेतकर्यांकडून शिकण्यासारखं बरंच काही आहे.
2 Aug 2020 - 9:40 am | शाम भागवत
_/\_
31 Jul 2020 - 7:44 pm | Rajesh188
शेतकरी हा शेतकरी असतो तो कोकणी, घाटावर चा,भारतीय,अमेरिकन असा नसतो.
मनुष्य स्वभावाचा बदल असू शकतो शेतकऱ्यांचं समस्या मध्ये बदल नसतो.
मध्ये मी अमेरिकन शेतकऱ्या विषयी पण वाचलं होते.
त्यांना असणाऱ्या समस्या काय आहेत.
शेती ची सर्वात मोठी समस्या आहे प्रक्रिया न केलेल्या शेती च्या उत्पादन ला मागणी नाही.
आणि प्रक्रिया उद्योग शेतकऱ्या च्या हातात नाही.
Exa
बटाटा 30 रुपये किलो
बटाट्याचे चिप्स 10 रुपयाला 50 ग्राम.
म्हणजे 200 रुपये किलो.
फळांचे भाव आणि फळा पासून बनलेले जाम किंवा बाकी पदार्थ ह्यांचे भाव फरक बघा.
दुधाचे भाव 20 ते 25 रुपये लिटर (विक्री) आणि लोणी, चीझ,मावा ह्यांचे भाव.
रोजच्या जीवनात आता लोक कशाला महत्व देतात.
सॉस(प्रक्रिया केलेले)
जाम(प्रक्रिया केलेलं)
चीज ( प्रक्रिया केलेले)
पिझ्झा( प्रक्रिया केलेले)
चिप्स(प्रक्रिया केलेली)
साखर( प्रक्रिया केलेले)
ज्युस( प्रक्रिया केलेले)
तेल ( प्रक्रिया केलेले)
ब्रेड(प्रक्रिया केलेले)
पाव( प्रक्रिया केलेले).
प्रोटीन्स suppliment ( प्रक्रिया केलेले)
असे अनेक प्रकार
हे सर्व पदार्थ शेती मधील कच्च्या मालावर प्रक्रिया केलेले आहेत.
ह्या वर उद्योगपती चे नियंत्रण आहे.
प्रक्रिया न झालेले.
सरळ शेतकरी विकू शकतो.
दूध, डाळी,आणि भाज्या.
ह्या मध्ये प्रक्रिया केलेल्या शेतीमालाला जास्त मागणी आहे हे सहज लक्षात येईल
आणि हे एक कारण आहे शेती तोट्यात जाण्याचे.
2 Aug 2020 - 7:30 pm | चौकस२१२
"ह्या मध्ये प्रक्रिया केलेल्या शेतीमालाला जास्त मागणी आहे हे सहज लक्षात येईल
आणि हे एक कारण आहे शेती तोट्यात जाण्याचे."
हा तर्क काही कळला नाही...
जर प्रक्रिया केलेलं पदार्थ वाढत आहेत आणि ते मूळ शेतीच्या मालावर अवलंबून असतील तर शेतकऱ्याला घाऊक भावात अश्या उद्योगांना विकून खात्रीचे गिर्हाईक मिळतील
कि.. म्हणजे मग फक्त ताजी भाजी, फळाच्या रोजच्या विक्रीवर अवलंबून राहावे लागत नसेल. म्हणजे एकूण शेतकऱ्याचा फायदाच कि
फळ पिकवणारा शेतकरी २, ३ प्रकारे त्याचे उत्पादन विकू शकतो , पूर्वी फक्त बाजारात फळ म्हणून आत जॅम बनवणारे कारखाने, रस बनवून विकणारे कारखाने यांनचं कडून मागणी वाढली.. मग तक्रार काय? तोटा कसा ?
31 Jul 2020 - 7:53 pm | सुबोध खरे
एक किंवा दोन एकर शेती (हि पूरक उत्पन्न नसेल तर) आतबट्ट्याचा ठरली आहे. ( लातूर भूकंपाच्या नंतर केलेले सर्वेक्षण हि गोष्ट स्पष्टपणे दाखवून देते)
पूर्वी दर डोई १० एकर शेती होती तेंव्हा केवळ एक पीक घेऊन काम भागत होतं. त्यातील २ एकर शेती दर ४ वर्षांनी पडीक ठेवून परत कसायला घेत असत त्यामुळे शेतीची नापिकी होत नसे.
परंतु एका शेतकऱ्याला ५ मुले झाल्यावर दर डोई शेती २ एकर झाली. यामुळे शेतीवरचा भार वाढला आणि पडीक ठेवणे शक्य झाले नाही आणि शेतीचा कस कमी होत गेला
त्यातून अनेक ठिकाणी रासायनिक खते आणि अमाप पाणी देऊन त्या भागात न झेपणारी पिके ( उदा मराठवाड्यात उसाची शेती) तात्पुरत्या फायद्यासाठी घेतली गेली. यामुळे भूजल पातळी खाली गेली आणि बोअरमधून वारेमाप उपसा केल्यामुळे क्षारयुक्त पाणी येऊ लागले आणि काही काळाने मातीत अतिरिक्त क्षार झाल्याने नापिकीचे प्रमाण वाढले.
एवढे असूनही लोकसंख्य दुप्पट झाली त्यामुळे बहुसंख्य शेतकरी अल्प भूधारक झाले. यामुळे येणारे उत्पन्न खाण्यासाठीच पुरत नसल्यामुळे व्यवसाय भरभराटीला येण्यासाठी त्यात गुंतवणूक होतच नाही आणि हे दुष्टचक्र चालूच राहते.
एक उदाहरण देतो आहे. आमच्या लहानपणापासून पाणीपुरी विकणारा (रामानुज सिंह) भय्या आजही मिशा आणि केस पिकले तरी पाणीपुरीच विकत आहे कारण येणारा अतिरिक्त नफा तो "गाव मी भेज देता है" यामुळे त्याची स्थिती तीच राहिली आहे.
याउलट माझ्या भावाची वातानुकूलन यंत्रे दुरुस्त करणारा तंत्रज्ञ (अली) याला माझ्या भावाने रोख पैसे देण्याचे साफ नाकारले. त्याला बँकेत करंट खाते उघडून दिले आणि त्यात चेक टाकायला लावला. यानंतर आपल्या मित्रांना सुद्धा सांगून त्याला रोख पैसे न देता बँकेचा चेक दिला. बँकेत चालू खाते आल्यावर त्यातून पैसे काढून "गाव मे भेजना" बंद करायला लावले यानंतर त्याला एक दुकान भाड्याने घ्यायला लावले. त्याचे व्हिजिटिंग कार्ड बनवायला लावले. हे दुकान भाड्याने घेतल्यामुळे त्याला लोकांच्या घरून वातानुकूलन यंत्र दुकानात घेऊन जाऊन दुरुस्त करणे शक्य झाले. ( अन्यथा मुंबईत घरात बायको एकटी असताना कोणीही माणूस तंत्रज्ञाला घरात काम करू देत नव्हता.
हे सर्व करून त्याचे करनियोजन केल्याने त्याने गृह कर्ज घेऊन एक खोली विकत घेतली.बँकेत खाते, पॅन आणि आधार कार्ड असल्यामुले माणसाला एक पत प्राप्त झाली आणि अलीने आपले दोन भाचे आता कामावर ठेवले आहेत. भाड्याचे दुकान त्याने कर्ज काढून विकत घेतले आहे.
थोडक्यात आपला व्यवसाय जर भरभराटीला आणायचा असेल तर उद्योजकतेचा मार्ग चोखाळला लागतो.
उद्योजक हा चोर च आहे अशीच मनोवृत्ती सरकारी अधिकाऱ्यांची असते आणि ते उद्योजकाला नाडत असतात हा सार्वत्रिक अनुभव आहे.
पण शेतकरी मात्र बळीराजा म्हणून सहानुभूतीला पात्र असतो.
बहुसंख्य शेतकऱ्यांना जमीन हि वडिलोपार्जित म्हणून फुकट ( भांडवली खर्च न करता) मिळालेली आहे. दोन एकर जिरायती जमिनीची किंमत किती याचा व्यापारी हिशेब ( फुकट मिळालेले भांडवल) करणे अत्यावश्यक आहे. मी आजतागायत एकही शेतकरी गळा काढताना हि गोष्ट हिशेबात धरताना पाहिलेला नाही. ( गैरसोयीच्या गोष्टी बोलणे गैरसोयीचे असते)
बहुसंख्य पहिल्या पिढीचे उद्योजक यांनी कोणतीही गोष्ट बापाची वारसाहक्काने मिळालेली नसताना स्वतःच्या बुद्धिमत्तेवर आणि अपार कष्टावर उभी केलेली आहे.
यात धीरूभाई अंबानी, गौतम अडानी पासून लक्ष्मणराव किर्लोस्कर,आबासाहेब गरवारे, चितळे, कॅम्लिनचे दादासाहेब दांडेकर, सारखे असंख्य उद्योजक आहेत.
तेंव्हा उद्योजक हे हरामखोर रक्तपिपासू हि भिकारडी कम्युनिस्ट मनोवृत्ती टाकून दिली पाहिजे.
तेंव्हा शेतकर्याचे कल्याण करणे त्यांच्या स्वतःच्या हातात आहे. सरकार तुमच्या साठी काही करेल हि अपेक्षाच सोडून दिली पाहिजे
31 Jul 2020 - 10:27 pm | बाप्पू
खरे सर यांच्याशी सहमत..
बऱ्याच वेळेला ह्या धाग्यावर लिहावे असे वाटले.. पण स्वतः ला आवरते घेतले कारण स्पष्ट आणि मुद्देसूद लिहिलं कि शेतकऱ्यांना सॉरी... बळीराजाला आणि त्याच्या हितचिंतकांना ते पचत नाही.. त्यामुळे अश्या धाग्यावर आता प्रतिक्रिया देणे बंद केलेय..
1 Aug 2020 - 10:01 am | कपिलमुनी
१.रिपेयर चार्जेस चार्जेस सरकार ठरवते का ?
२.अली ने ठराविक ठिकाणी जाऊनच ए सी रिपेयर केला पाहिजे असे सरकार ठरवते का ?
३. मागणी वाढल्याने अली च्या सर्व्हिस वर सरकारी नियंत्रण आणले जाते का ?
1 Aug 2020 - 12:37 pm | सुबोध खरे
मूळ मुद्दा समजून घ्या.
अलीला लागणारे अनेक परवाने (कुलन्ट गॅस विकत घेण्यासाठी आणि ठेवण्यासाठी यासारखे) शेतकऱ्याला तसेच्या तसेच लागतात का?
दुकान रहिवासी क्षेत्रात चालवता येत नाही( निदान मुंबईत तरी कायदे बऱ्यापैकी कडक पणे पाळले जातात) . व्यावसायिक जागीच दुकान असावे लागते.
त्याचे भाडे/ किंमत रहिवासी क्षेत्रापेक्षा भरपूर जास्त असते.
अलीला बापजाद्यांकडून काहीही फुकट मिळालेले नव्हते. सरकारी अधिकारी आले कि त्यांचे "चहापाणी" करावे लागते.
वीज फुकट तर नाहीच परंतु ११ रुपये युनिट ने घ्यावी लागते आणि दुरुस्त केलेला प्रत्येक ए सी चालू ठेवून थंड होतो कि नाही हे पाहण्यासाठी विजेचे भरमसाठ बिल येते. त्यातील एक दमडी कधीही माफ होत नाही. प्रत्येक व्यवसायाचे आपले प्रश्न वेगळे असतात
उगाच अहमदशहा अब्दालीची शेंडी बाजीरावाला लावू नका
मूळ मुद्दा समजून घ्या.
2 Aug 2020 - 12:54 am | कपिलमुनी
जमत नसेल तर राहू द्या !
1 Aug 2020 - 1:29 pm | Rajesh188
मुळात सर्व्हिस सेक्टर आणि उत्पादन सेक्टर हे दोन्ही भिन्न बाबी आहेत.
सेवा क्षेत्रात एसी रेपैरिंग येते .
शेती उत्पटन क्षेत्रात येते.
दोन्ही च्या अडचणी वेगळ्या आहेत त्यांची मिसळ करायला नको.
शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधाण्यासाठी त्यांनी शहरात या आणि लहान सहान धंदे आणि नोकऱ्या करा हा तात्पुरता पर्याय झाला .
झोपड्या ची वाढ होण्यास हेच कारणीभूत आहे.
झोपडपट्टी राहणारे आणि किरकोळ काम करून पोट भरणारे ह्यांची अवस्था केविलवाणी होते शहरात.
आणि बाकी असंख्य अडचणी निर्माण होतात त्या वेगळ्या.
नियोजन बद्ध ग्रामीण विकास हाच शास्वत मार्ग आहे.
आयटी इंजिियर्स ला मेडिकल क्षेत्रात काम असा सांगितले तर त्याचे लक्ष तरी लागेल का त्या कामात .
आणि त्याच्या कडे ते स्किल सुद्धा नसेल.
फक्त pattya टाकायचे काम करेल तो
शेती ला पूरक व्यवसाय निर्माण झाले तर शेती व्यतिरिक्त पैसे कमविण्याची मार्ग मिळेल.
शेती परवडत नाही तर ती सोडा आणि शहरात येवून वॉचमनी,करा,रस्त्यावर उभे राहून फेरीवाला बना,किंवा peoun बना हा काही उपाय नाही.
1 Aug 2020 - 7:26 pm | सुबोध खरे
you have to have employable skills -- warren buffet
31 Jul 2020 - 8:19 pm | कपिलमुनी
महाराष्ट्रातील विभागवार शेतकरी
पश्चिम महाराष्ट्र - सांगली , सातारा (माणदेश वगळता )आणि कोल्हापूर .
या भागात मुबलक पाणी , कसदार जमीन , सहकार उद्योग , डेअरि उद्योग , साखर कारखाने , जागरुक मतदार यामुळे इथले शेतकरि उस , द्राक्ष , केळी अशी नगदी पिके घेतात , इथे तुम्हाला आत्महत्या केलेला शेत़करी सापडणार नाही.
पुणे - नाशिक - उत्तम हवामान आणि भरपूर पाऊस यामुळे इथे पीक मुख्यत भाजि पाला उत्तम पिकतो , शहरी मार्केट जवळ असल्यने नगदि पिके घेतात आणि पैसे बरे मिळतात , सोबत पोळ्ट्री वगैरे व्यवसाय करतत. या भागात जमीनीचे रेट जास्त असल्याने आत्महत्या करण्यापेक्षा जमिनि विकून इतर उद्योग करतात .
विदर्भ - सर्वाधिक आत्महत्या होणारे जिल्हे - अमरावती, अकोला, बुलढाणा, यवतमाळ, वाशिम आणि वर्धा हे अत्महत्यांचे मुख्य केंद्र आहे.
बेभरवशी हवामान, खासगी कर्जे , पाण्याचा अभाव आणि मुख्य म्हणजे गाव ना सोडण्याची वॄत्ती व १०० % शेतीवर अवलंबून कुटूंबे ही आत्महत्यांची कारणे आहेत..
सरकारने कितिही मदत केली तरि या भागात उद्योग , सिंचन आणि स्किलसेट आणि घर सोडण्याची मानसिकता तयार होत नाही तोवर इथल्या आत्महत्या अशाच राहणार
पुढे चालू ..
31 Jul 2020 - 9:16 pm | Rajesh188
शहरांची अवस्था गंभीर होवू नये म्हणून त्यांची काळजी घेणे पण सर्वांचीच जबाबदारी आहे.
आताच पुणे,मुंबई,बंगलोर,सारख्या मोठ्या शहरांची अवस्था गंभीर झालेली आहे.
ग्रामीण भागातून रोजगार साठी प्रचंड मोठी लोकसंख्या शहरात येत आहे.
कसलेच नियोजन नसल्या मुळे शहर अस्ताव्यस्त वाढत आहेत.
लोकांना चालायला जागा नाही तर मोकळ्या जागा तर असूच शकत नाही.
हे असेच चालले तर एक दिवस भारतीय शहर मृत होतील.
त्या मुळे ग्रामीण अर्थ व्यवस्था उभी राहणे गरजेचे आहे.
पश्चिम महाराष्ट्र ह्या मध्ये बर्या पैकी यशस्वी आहे.
कोकणात जबरदस्त ताकत आहे आहे .
सहकारी साखर कारखाने,पाणी व्यवस्था,धरण,सहकारी दुग्ध व्यवसाय,वीज, रस्ते ह्या वर सरकारी खर्च झालाच पाहिजे.
ग्रामीण भागात शेती आधारित उद्योग उभे राहिले तर लोकसंख्या शहरात येणार नाही.
हीच ती वेळ आहे सावरायची.
नंतर परिस्थिती हातात राहणार नाही.
31 Jul 2020 - 9:22 pm | Rajesh188
सहकार क्षेत्राचा ज्यांनी पाया रचला आणि तो सहकाराचा वृक्ष वाढवला त्या महान नेत्यांचा ,कर्मवीरांचे महाराष्ट्र शतशः ऋनी आहे.
मुंबई,पुण्यात मराठी लोक कमी असण्याचे ते पण कारण आहे लोकांना गावातच रोजगार उपलब्ध आहे.
त्या मुळे ते धाव घेत नाहीत.
यूपी,बिहार सारख्या राज्यात ग्रामीण अर्थ व्यवस्था निर्माण च झाली नाही त्या मुळे प्रचंड स्थलांतर होत आहे.
फक्त शहर वाढणे अभिमान ची गोष्ट नाही पुढल्या संकटाची चाहूल आहे.
1 Aug 2020 - 9:40 pm | पियुशा
आज दूध दर वाढी साठी रस्त्यावर ओतलेले दुधाचे can, टैंकर ओततना पाहुन मला तरी खुप वाइट वाटले , जे आपण इतक्या कषटाने कमवले तेच मातीमोल करण्याचा विचार तरी कसा येतो, कधी एखादा व्यवसाय बुडाला तर ते लोक आपले उत्पादन ऐसे रस्त्यावर फेकून देताना पाहिलेत का? एखादा फेब्रिकेशन वाला नांगर बनवनारा डुबीत निघाला कर्ज बाजारी झाला तर तो आपले नांगर फेकल का रस्त्यावर, हे फक्त एक उदाहरण ,ऐसे कितीतरी व्यसाय आहेत, पण शेतकरी बन्धु आपले पिकाला भाव नाही रस्त्यावर फेक, शेतात उभ्या पिकावर बुलडोज़र फिरव, दूध रस्त्यावर आतून दे , भाजी रस्त्यावर फेकून दे है असले प्रकार करतात त्याचे वाइट वाटते चीड़ येते, ज्या पिकानी, दुधानी आपल्याला तारल त्यालाच माती मोल करायचे धाडस फक्त " शेतकरी" करतो
2 Aug 2020 - 1:12 am | कपिलमुनी
शाळेत लाल चिखल नावाचा धडा होता , कुठे मिळाला तर नक्की वाचा
2 Aug 2020 - 6:44 am | गणेशा
@पियुशा..
राजकीय, रयत क्रांती आणि विरोधक हे याला कारणीभूत आहेत, आणि दूध रस्त्यावर टँकर मधुन ओतणारे हीच लोकं आहेत..
मी तर म्हणतो फक्त दूध का..
पेट्रोल, गॅस, रस्त्यावरचे, खड्डे असे अनेक मुद्दे घेऊन आंदोलनं झाली होती पुन्हा तशीच सगळ्याची आंदोलने करा ना.. त्याला दम लागतो, आपन नक्की बोलाचीच कडी केली होती हे समोर येईल म्हणुन हे मार्ग..
खेदाने,
करोना काळ.. केंद्र आणि राज्य दोन्हीकडे पैसेच नाहीयेत जास्त.. आणि अश्या वेळेस पुन्हा शेतकर्या मागून राजकारण करणाऱ्या लोकांची कीव वाटते..
आणि शेतकर्या नी राजकारण्या कडून काही अपेक्षा करू नये असे बिन्धास्त बोलणारे यामागून चाललेले राजकारण कसे पाहू शकतात..
दूध सोडून मुळ मुद्द्यावर बोलतो -
पायाभुत सुविधा सरकार ने दिल्या पाहिजेत.. मग यात शेतकरी, गावाकडचे, शहरी... मध्यमवर्ग असले येतेच कोठे..?
सरकार कोणाचे असुद्या त्यांनी मूळ काम हे केले पाहिजेच..
पण शेतकऱ्यांनी अपेक्षा ठेवायची नाही.. अरे..
मग काय करायचे.. त्याला भिकारी, कटोरा घेऊन उभा राहणारा ह्या नजरेने बघणे आपण सोडून द्यावे..
सरकार ने मग काय, फक्त शहरातले डांबरी रस्ते उचकटवुन सिमेंट चे रस्ते करायचे, बुलेट ट्रेन शहरांना जोडायची हेच करायचे का..
असो..
शेतकऱ्यांच्या मालावर सरकार, दलाल यांचा अंकुश असतो.. मग असा इतर कुठला उत्पादक आहे, ज्याच्या मालाचा दर सरकार ठरवते?
आता कांदा नाशिक ला 2 रुपय किलो ने विकला जातोय,
शेतामधून माल मार्केट ला पोहचण्यास जितका खर्च येतोय ना तितका ही माल विकून मिळत नाहीये.. मग काय करायचे आता शेतकाऱ्याने..
घाईत लिहिलं आहे आता..
बोलणार नव्हतो पण लिहिले.
जुन्या चर्चेची लिंक डेतो.. पुन्हा तोच पाढा सुरु झालाय..
शेतकरी हा विषय निघाल्यावर, ती चर्चा मध्यमवर्गीय.. किंवा राजकीय विषय यावर येऊन ठेपते हे समाजाचे दुर्दैव आहे..
असो थांबतो.. आज पासून सायकलिंग करायला लवकर उठलो.. आणि येथेच टाइम जातोय..
2 Aug 2020 - 10:24 am | सतिश गावडे
पुर्णतः शेतीवर अवलंबून राहायचे नाही. जोडधंदे, पर्यायी व्यवसाय, नोकरी अशा गोष्टी करायच्या. पोटापूरते पिकवून चार पैसे कमवण्यासाठी इतर मार्गाला लागायचे. आपण जगाचे अन्नदाता आहोत आणि आपण नाही पिकवलं तर जग उपाशी मरेल या भ्रमात राहायचं नाही. जग त्याचं पाहून घेईल, आपण आपलं पाहायचं.
कोकणात फक्त आणि फक्त भातशेती होते आणि बहुतांश ठिकाणी ती ही फक्त उन्हाळ्यात. आणि तरीही कोकणातील शेतकरी रडत नाही. कारण तो कधीच फक्त शेती एके शेती करत नाही. शेतीची कामे नसतील त्या दिवसात तो ट्रकवर हमाल म्हणून जातो, वीट भट्टीवर रोजंदारीने जातो, गाई म्हशी पाळतो कोंबड्या पाळतो. मोठ्या शेतकर्यांकडे बांधबांधवली करायला मजूरीने जातो, अगदीच काही होत नसेल तर मुंबई गाठतो. पण गळा काढत आणि कर्जमाफीकडे डोळे लावून बसत नाही.
मी शेतकर्याचा मुलगा असून शाळा कॉलेच्या दिवसांत कंबरडं मोडेपर्यंत भातशेतीची कामं केलेली आहेत. त्यामुळे शेतीकामातील कष्टांची मला पूर्ण जाण आहे. बिगर कोकण प्रांतातील शेतकर्यांना त्यांचे प्रश्न सुटावे असे वाटत असेल तर त्यांनाच आपला मार्ग काढावा लागेल. शेतकर्यांच्या प्रश्नांचे राजकारण करणार्यांपासून चार हातात दूर ठेवावे लागेल. शेतकरी संमेलनं भरवून तिथे कविता वाचून शेतकर्यांचे प्रश्न सुटणार नाहीत. त्यानं फक्त शेतकरी नेते म्हणून मिरवणार्यांचा, संमेलनं भरवणार्यांचा राजकीय फायदा होईल. समूह माध्यमांवर कविता लिहीणार्याला तात्पुरते आपण शेतकर्यांच्या प्रश्नाला वाचा फोडली असे वाटेल. मात्र त्याने शेतकर्यांच्या परिस्थितीत काडी इतकाही फरक पडणार नाही.
कवीस काही प्रश्न विचारावेसे वाटतातः
१. आपण शेतकर्यांमध्ये मिसळता का?
२. आधुनिक कृषी तंत्रज्ञान, सुधारीत बी बियाणं यासंबंधी आपण वाचन करता का?
३. करत असल्यास ही माहिती शेतकर्यांपर्यंत पोहचवता का? त्यांना त्या माहितीचा वापर करुन पारंपारीक पद्धत सोडून आधूनिकतेची कास धरण्यास उद्युक्त करता का?
४. फुलशेती, मत्स्यशेती, मधुमक्षिका पालन याबाबत आपण काही वाचन/प्रयोग केले आहे का?
५. शेतीला पुरक जोडधंदे करण्यास आपण शेतकर्यांना उद्युक्त केले आहे का?
2 Aug 2020 - 12:57 pm | अनिल चव्हाण राम...
१. आपण शेतकर्यांमध्ये मिसळता का?
२. आधुनिक कृषी तंत्रज्ञान, सुधारीत बी बियाणं यासंबंधी आपण वाचन करता का?
३. करत असल्यास ही माहिती शेतकर्यांपर्यंत पोहचवता का? त्यांना त्या माहितीचा वापर करुन पारंपारीक पद्धत सोडून आधूनिकतेची कास धरण्यास उद्युक्त करता का?
४. फुलशेती, मत्स्यशेती, मधुमक्षिका पालन याबाबत आपण काही वाचन/प्रयोग केले आहे का?
५. शेतीला पुरक जोडधंदे करण्यास आपण शेतकर्यांना उद्युक्त केले आहे का?
होय. मी एक शेतकर्याचा मुलगा आहे, आणि शेतीतील कामे ही करतो.
अधुनिक आणि सुधारित बी-बियाणे वापरतो. गावातील इतरांना पण वापरायला लावतो.जास्त अधुनिक नाही पण ऑर्ग्यानिक शेती करण्याचा प्रयत्न करतो.
फुल शेती काही जण करतात अगदी बोटावर मोजण्याइतके,, मत्स्यशेती इकडे होत नाही, एक दोन शेततळी, गोदावरी नदीत मासेमारी फक्त भोई समाज करतो,,
कितीही आग्रह केला तरिही मत्स्य शेती, मधुमक्षीका पालन कोणीही करत नाही. ,, आणि जोड धंदे फक्त दुग्धव्यवसाय ,, बाकी काही जण कुक्कुट पालन , शेळी पालन करतात,, सध्या जुन्या मंडळीला न जुमानता जोडधंद्यात वाढ होत आहे हि एक समाधान कारक बाब. अजुन काही असल्यास मोकळेपणाने विचारावे.
2 Aug 2020 - 3:01 pm | गणेशा
मित्र या नात्याने तू वयक्तिक पणे बोलू शकतो, नव्हे पार शिव्या पण घालू शकतो, पण कवी बीवी काय राव.. मी स्वतःला कवी म्हणवून घेत नाही.. असो.. मजेचा भाग सोडला तर उत्तरे देण्याचा प्रयत्न करतो..
प्रिय मित्रा,
1.
शेतकऱ्याने काय करावे ही लाईन तू उचलली.. त्याने पायाभूत सुविधांची अपेक्षा करू नये का ही ती लाईन आहे..
यात कोकण किंवा गैर कोकण असाही मुद्दा नाही.. hope u understand, पायाभूत सुविधा मिळवणे हे फक्त शेतकऱ्याचेच नाही, तर सर्वांचे अधिकार आहेत..
आणि कर्ज माफी याबद्दल मी लिहिलेले आहे खूपदा, कर्ज माफी हे सोल्युशन नाहीये..शेतकऱ्यांना फक्त सुविधा नीट हव्यात.. पण राजकारण करणारे हे का करतील..
..
2. कोकणातील शेतकरी, पश्चिम महाराष्ट्रातील शेतकरी, विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकरी अशी तुलना आपण का करतोय.. तर ते आहे त्यात समाधानी आहे म्हणुन?
कोकण पाऊस पाण्याचा आणि आंबा काजू ह्यांचा भाग.. मला जास्त माहित नाही,
पण एकदंरीत पश्चिम महाराष्ट्र म्हणजे माझ्या भागातून ही कोणीच काही फाशी वगैरे घेत नाही.. आणि जोडधंदा म्हणत असशील तर ते मुद्दे बरोबर आहे, आणि तो ते करतो..
फरक इतका की कोकण शेतकरी या आपल्याकडील भागाचा अभिमान असल्याने तुम्ही पाहत नसाल ते..
पण फक्त संकोचित आपल्या भागा पुरता विचार का? समस्त प्रोब्लेम चे मूळ शोधले पाहिजे..
3.
कवीस काही प्रश्न विचारावेसे वाटतातः
१. आपण शेतकर्यांमध्ये मिसळता का?
येथे लिहिणारे कोण आहे असे.. नसल्यास त्यांनी त्यांचे बघावे, शेतकरी कर्ज मागतो म्हणे.. ज्या राजकारण्यांना कर्ज आणि त्यावरील राजकारण करायचे आहे त्यांना तुम्ही का कर्ज देता असे कधी विचारले आहे का?
माझे मत आधी मांडल्या प्रमाणे स्पष्ट आहे..
कर्जाची भीक नकोच.. पायाभूत सुविधा पुरवल्या तरी खुप आहे, माझा लेख पूर्ण त्यावर आहे..
कर्ज माफ करणे हे long term solution नाहीच.. आणि ते करू नये.. उलट कर्ज मागूच नये यासाठी सोयी, सुविधा, किंमत शेतकर्यांना मिळावी..
वयक्तिक शेतकऱ्यांत मिसळता का हा प्रश्न..
मी कधी काव्य वाचनात मिसळत नाही..
शेतकरी कुटुंब ..नातेवाईक.. मित्र सगळे शेतकरी..
माझ्या जिरायती असलेल्या शेतात, ज्वारी पेरलेली आहे..
आणि एक माझ्या शेतावर कधी मी लोन घेतले नाही ना मी बुडवले आहे..
येथे लिहिणारे स्वतःला काय समजतात काय माहित, पूर्ण शेतकरी म्हणजे कर्जा कडे डोळे लावून बसलेले आहे हे चित्र का रंगवले जातेय?
2 आणि 3 आणि 5
वयक्तिक हे करणे जमत नसले तरी, बारामती अग्रो ची मेन ब्रँच, सुरुवात होण्या पासून भाऊ आहे तेथे..
कुकूट पालन माहिती, त्यांचे खाद्य.. फायदे या साठी कायम फिरती वर..
पंचक्रोशीत माऊली /अग्रो म्हणा मध्ये कळेल, कधी सोबत फिरलोय..
बारामती agro कडून चालणारी कामे माहित नसतील तुम्हाला.. या कधी तुम्हाला पण देऊ..
लोणी भापकर कमी पाऊस भाग, तेथे ही मामाला पोल्ट्री टाकून दिल्यात..
बर बारामती म्हणजे राजकीय घेऊ नये.. मामा भाजपा तालुका उपाध्यक्ष, नीरा कृषी समिती चा संचालक,
बाकी इतर पक्षात..
राष्ट्रवादी आणि भाजपा दोन्ही आमच्या घरात आणि नातेवाईका मध्ये आहेत.. असो..
3. फुलशेती मत्स शेती आमच्या कोरड वाहू भागात नाही जमणार..
तरी पुरंदर च्या भागात, सीताफळ आणि फुलांच्या शेती मध्ये फिरलोय.. वयक्तिक नाही माहिती दिली..
2 Aug 2020 - 4:13 pm | सतिश गावडे
"कवीस" म्हणजे हा कविता धागा टाकणारा कवी यांना उद्देशून होते ते. तुला काही विचारायचे असते तर सरळ फोन नसता का केला मित्रा. असो.
प्रश्न संकोचित आपल्या भागापुरता विचार करण्यापूरता नाही. आमच्या रायगड जिह्यात ना हापूस आंबा होतो ना काजू. आंबा आणि काजू आमच्या खालील दोन जिल्हे, रत्नागिरी आणि सिंधूदुर्ग. आमच्याकडे फक्त आणि फक्त भात पिकतो. पावसाळ्यात जो थोडाफार भाजीपाला अंगणात, परसदारी किंवा शेताच्या बांधावर पिकतो तो घरापूरता असतो.
राहीली गोष्ट पावसाची आणि पाण्याची. पाऊस मुबलक असला तरी अवकाळी पाऊस कोकणातही होतो आणि त्यातून होणारे नुकसान कोकणी शेतकर्याचेही होतेच. आणि इतर भागात ज्याअर्थी पिके घेतली जातात त्याअर्थी तिथे पाणी ही समस्या नाही. पाणी नसते तर पिकच घेता आले नसते. त्यामुळे माझा रोख कोकणातील शेतकरी आपल्या परीने अडचणींवर मात करुन मार्ग काढतो तर मग ते इतर भागातील शेतकर्यांना का जमत नाही, ते ही मोठी शेती असताना, पिकांची विविधता असताना याकडे आहे.
थोडा बारकाईने अभ्यास केला तर लक्षात येते की शेतकर्यांना मदत कुणाला करायचीच नाहीये. केवळ शेतकर्यांच्या प्रश्नांचे राजकारण करुन आपली पोळी शेकून घ्यायची आहे. तसे नसते तर कर्जमाफी आणि विजबिल माफी अशा तात्कालिक मागण्या पुन्हा पुन्हा करत राहण्यापेक्षा तू म्हणतोस त्या पायाभूत सुविधा मागितल्या गेल्या असत्या. त्यांची पुर्तता व्हावी म्हणून पाठपुरावा केला गेला असता. तसे होत नाही.
2 Aug 2020 - 3:24 pm | गणेशा
मी म्हणुन रिप्लाय देत नव्हतो येथे . एकदा दिले की उत्तरे द्यावेच लागतात..
माझ्या आधीच मूळ धागा कर्त्याने पण रिप्लाय दिलाय..
मी कर्जमाफीची मते वरती जी माझी लिंक दिली आहे त्या बद्दल माझा लेख असे लिहिले आहे..
----
बाकी कवी कविता हा वेगळा विषय आहे, आणि त्याचा मला काडीमात्र अभिमान नाही..
माणसाने माणसात रहावे.. त्याला समजावे.. जगावे..
Problem सगळीकडे असतात, ते पहावे..
पण मुद्देसूद लिहिताना ही मध्यमवर्गीय माणुस, शेतकर्यांना कडू नजरेने बघणे सोडेल तर ना..
वरती परत.. शेतकार्यांचे कैवारी धावून येतात,
अरे, येथे सगळे वाचले तरी कळेल.. कोणाला जास्त बोलायचे आहे.. असो.
मी तर, मध्यमवर्गीय माणूस पण problem घेऊन जगतोय हे मान्य करतो.. पण म्हणुन त्याने दुसऱ्याला तुच्छ लेखावे..
मला कुठून दुर्बुद्धी झाली आणि आमची जुनी मैत्रिण पियुशा ला रिप्लाय दिला असे वाटते आहे..
माणुस म्हणून पाहायचे सोडून आम्ही कर भरतो फलाना..
उद्या मोठे उद्योजक म्हणाले आम्ही जास्त कर भरतो.. आम्ही म्हणेल तसेच झाले पाहिजे तर..? किती कर भरता तुम्ही?
मी स्वतः कर भरतो म्हणुन माझ्या शेतकरी बांधवाना मी तुच्छ नजरेने, दूषित नजरेने पाहिचे?
सरकारने शेतकऱ्यांना सुविधा देऊ नये, त्यांचे त्यांनी पहावे असे म्हणताना आपल्याला काहीच वाटत नाही?
मी तर पुढे जाऊन म्हणतो, लावा कर शेतकऱ्यांना पण.. काही हरकत नाही.. पण मग त्याच्या उत्त्पनाच्या किंमती वर तुम्ही बंधन घालणे बंद करा, दलाल बंद करा.. तो शेतकरी कसा त्यांचा माल विकेल तो बघेल..
नाही विकला तर नाही..
पण मग सरकार, आणि इतरांनी नाक खुपसू नका.. तेव्हडी हिम्मत आहे का?
बळीराजा म्हणुन फायदा उठवतायेत वाटते ना.. आणि बाहेरून माल मागवू..
मग जा बिनधास्त.. आणि कर काय, लाईट बिल काय नका माफ करू..
पण पायाभूत सुविधा, व्यवस्था देण्यात प्रत्येक सरकार नपुसंक आहे हे ही मग मान्य करा.. आणि ते सरकार चे काम नाही हे म्हणणे असेल तर मग सरकारे का हवीत?
अवघड आहे.. थांबतो..
का उगा टाइम पास करताय आणि करायला लावताय..
2 Aug 2020 - 6:49 am | गणेशा
आधीची चर्चा लेख.
आणि सुबोध जी आणि इतर जे येथे मुद्देसूद लिहीत आहे, त्याची प्रत्युत्ततरे तेव्हढ्याच मुद्देसूद तिकडे दिलेत..
पुन्हा तेच तेच लिहिण्यात काही अर्थ वाटत नाही..
थांबतो.
http://misalpav.com/node/45446
2 Aug 2020 - 1:10 pm | अनिल चव्हाण राम...
एक शेतमजुर दिवसाला ३००-५०० ₹ घेतो + वाहतुक खर्च
कधी कधी भाव नाही लागला तर हा खर्च पण निघत नाही,, मग नाईलाजाने फिरवावा लागतो नांगर ,, आधि केलेला बी बीयाणांचा खर्च खत , फवारण्या , खुरपणी , पाळी इत्यादि पण निघत नाही काही वेळा.. महत्वाच फेकाफेकी करणारे फक्त ५-१०% शेतकरी असतात ते पण संतापुन,, बाकी सर्व राजकीय आंदोलने असतात.
1 Aug 2020 - 11:20 pm | Rajesh188
शेती वाडी असल्या मुळे शेती विषयी अनुभव आहे.
एका गोष्टीचे मला नेहमी आश्चर्य वाटत eji कडे शेती तोट्यात आहे असं म्हणायचं पण कारण शोधून त्या वर उपाय पण करायचे नाहीत.
सरकार काही तरी करेल ह्या वर विसंबून राहायचे ..
मग कर्ज माफी, ची मागणी असेल किंवा हमी भाव.
फक्त एका गावाचा विचार केला तर 1 टक्के पण शेतकऱ्यांचा शेतात फळ झाड नाहीत ,
शेवगा, जांबुळ,अंबा, आवळा,चिंच अशी विविध प्रकारची झाडे 1 टक्के शेतकऱ्या कडे पण नाहीत..
सोयाबीन तर सर्व सोयाबीन च करणार मग भाव पडेल नाही तर काय होईल.
कित्येक वर्ष शेती तोट्यात आहे ना .
मग एकत्र येवून पिकांची रचना आणि नियोजन का केले जात नाही.
शेतीमाल शेतकरी मंडईत जावून कमी भावात विकतो पण कोण्ही विकत मागितले तर तो बाजारातील खरेदी भाव लावतो.
व्यापारी समजा गाजर 60 रुपये किलो नी विकत आहे तर तो शेतकऱ्या कडून 15 रुपये किलो नी खरेदी करतो .
पण तोच शेतकरी गाजर 20 रुपया किलो नी बाजारात विक्री करू लागला तर किती तरी फायद्यात जाईल तुफान विक्री होईल पण तसं घडत नाही .
आता 20 रुपये लिटर नी dairy la देईल पण 25 रुपये लिटर नी लोकांना देणार नाही त्यांना 45 रुपये बाजाराचा दर सांगेल.
25 रुपये लिटर नी शहरात शेतकरी दूध विकू लागला dairy var अवलंबून राहण्याची गरज लागणार नाही.
2 Aug 2020 - 11:52 am | अनिल चव्हाण राम...
वर दिलेले सर्व प्रतिसाद मी वाचले, थोडीफार नविन महिती पण वाचयला मिळाली,, पण काही प्रतिसादांशी मी सहमत नाही. कारण शेती ही पुर्णतः निसर्गावर अवलंबुन आहे. प्रत्येक भागात जसा कमि जास्त पाउस तसच पिक परंतु पिक कितीही चांगल आल तरिही एक अवकाळी जोराचा पाउस खुप काही करुन जातो. अशाच अवकळी ने मार खाल्लेल्या , सतत नापिकी व कर्जबाजारी पणामुळे कंटाळुन फाशी घेतलेल्या एका शेतकर्याच्या मुलाची व्यथा मांडण्याचा प्रयत्न केला. आपण दिलेल्या सर्व प्रतिसादांबद्द्ल धन्यवाद. लोभ असु द्या.
2 Aug 2020 - 7:39 pm | चौकस२१२
कोणत्याही देशात शेती हा "देशहितासाठीचा" व्यवसाय म्हणून समजला जातो आणि तो बुडून आपण परावलंबी होऊ नये म्हणून सरकार काळजी घेण्याचा प्रयत्न करत असते
१) पण तो व्यवसाय असतो...हे विसरून "सरकारने आणि समाजाने " केलेली मदत म्हणजे जन्मसिद्ध हक्क आहे असे कोणी समजू नये .. आणि २)बिगर शेतकऱ्यांनी शेतीचा मान हि ठेवावा .. दोन्ही बाजू टोकाला जायला लागल्या कि असा चुथडा होतो
आपला.. एका शेतीप्रधान देशाचा रहिवासी ( येथे देशातील ७०% शेतीमाल निर्यात होतो https://www.dfat.gov.au/trade/organisations/wto/Pages/agricultural-trade....)
3 Aug 2020 - 4:33 pm | Gk
1950 आजा - 20 एकर
मग त्याला 4 पोरे --- म्हणजे शेती प्रत्येकी 4 एकर
मग त्याला 4 पोरे ... शेती प्रत्येकी 1 एकर
मोठी जमीनदारकी नसेल तर 1।2 , 1 एकर शेती म्हणजे ययातीचे मढे असते.
एवढ्या काळात मुंबईत एक चाळीत घर , एक डोंबिवलीत व एक नेरळला घर होते
आणि वारस किती ? एक मुलगा सून नैतर एक मुलगी जावई
3 Aug 2020 - 5:30 pm | गणेशा
मग ते मुंबई पुण्यात येऊन चाळीत राहतात..
मग त्यांची पोरे शेतकरी आणि शेती पेक्षा शहराला जास्त योग्य समजतात..
मग त्यांची दोन आणखीन घरे होतात..
3 Aug 2020 - 8:55 pm | Gk
शहरातील एकुलती एक पोरे 2 रुपयेवाली असतात , बापाचा रुपायाही पोराला आणि आईचाही पोराला
शेतकऱ्याला 4 पोरे , तर एकेक पोर चार आणेवाले होते
3 Aug 2020 - 9:27 pm | गणेशा
हो मग तेच म्हणतोय ना मी.. चारआनेवाला पोरगा मुंबई किंवा पुण्यात येतो..
मग तो चाळीत राहतो.. त्याला एक पोरगा होतो.. तो पोरगा शेतीवाले आणि शेतकरी हे कसे बिनडोक असे समजतो..
मग तो शहरात वाढतो.. त्याची आणखिन 2 घरे होतात..