नवापुर - (हो तेच ते बर्ड फ्लू वाले) हे महाराष्ट्र आणि गुजरात या राज्याच्या हद्दीवर वसलेले तालूक्याचे ठिकाण आहे. येथूनच राष्ट्रीय महामार्ग ६ (नागपूर- सुरत) जातो. ते नंदुरबार या आदिवासी जिल्ह्यात मोडते. स्वतंत्र महाराष्ट्र होण्यापुर्वी हे गाव गुजरात मध्ये जाणार होते. त्या वेळी तेथील लोकांनी ठराव करून हे गाव महाराष्ट्रात आणले. (गुजरात मधील सुब्बत्ता बघुन त्यांचे आत्मे आता पस्तावत असतील.) या गावात मराठी तसेच गुजराथी लोक गुण्यागोवींदाने राहतात. शहरात नगरपालिका स्वच्छ्तेची विषेश काळजी घेते असे दिसले.
हे गाव उकाई धरणाच्या पाण्याच्या फुगवट्याच्या (मराठीत आपले 'बॅक वॉटर' हो)जवळ आहे. निसर्गाने या तालूक्याला भरभरून दान दिले आहे. या तालुक्यात सागाची भरपूर वने आहेत. पावसाळ्यात येथे जातांना चरणमाळ आणि कोंडाईबारी या घाटांमध्ये असलेल्या जंगलातले द्रुष्य तर मनोरम असते.
येथील आदिवासी रहीवासी कष्टाळू आहे. शासनाच्या क्रुपेमुळे (!!) त्यांची आर्थीक परीस्थीती चांगली आहे.
या ठिकाणी लाकूड कताई / लाकूड काम फार मोठ्या प्रमाणात चालते. सुतार लोक प्रामाणीक आहेत. गिर्हाईकाकडुन योग्य मोबदला घेवुन सागवानी ला़कडाचे सामान बनवून दिले जाते.
या गावाच्या परीसरात बर्ड फ्लू च्या साथीने कोंबड्या मरण्यापुर्वी (२००६) कोंबड्याची शेते (पोल्र्ट्री फार्म) फार मोठ्याप्रमाणात होती. इतकी की, गाव ५-६ कि.मी. वर असतांना कोंबड्यांच्या शेतांमधुन विशीष्ट वास येई. आता ते प्रमाण फारच कमी झाले आहे.
या गावाची भौगोलीक रचना काहीतरी वेगळी असल्याने येथील हवा कोरडी असुनसूद्धा फार गरम होते. थंड वारे सहसा वाहतच नाही. बारोमास तुम्ही पंख्याशीवाय राहूच शकत नाही. (१ कि.मी. च्या फरकाने हेच गाव गुजराथ मध्ये असले असते. गुजरात मध्ये भारनियमन नाही. )सुरत, बारडोली, बडोदा सारखे मोठे शहरे जवळ असूनही येथील MIDC नावालाच आहे. ("गुजरात मधील सुब्बत्ता बघुन ..." ह्या वाक्याचा संदर्भ आत्ता तुमच्या लक्षात आला असेल.) असो. कालाय तस्मै नमः
आता या लेखाच्या मुख्य शीर्षकाबद्दल्...
नवापुर रेल्वे स्टेशन हे पश्चिम रेल्वे च्या सुरत-जळगाव या मार्गात येते. येथे जो रेल्वे फलाट आहे तो अक्षरशा: निम्मा महाराष्ट्रात आणि निम्मा गुजरात राज्यात येतो.
जसा:
===========गुजरात हद्द [ नवापुर रेल्वे फलाट ] महाराष्ट्र हद्द============
छायाचित्र क्रमांक १. विकीमॅपीयावरील नवापुर रेल्वे स्टेशनचे छायाचित्र
छायाचित्रात जी लाल रेषा आहे त्या ठिकाणी दोन्ही राज्याची हद्द सुरु होते (किंवा संपते). (मी जसे काही वाघा बॉर्डर वर उभा आहे असे सांगतो आहे. :-))
छायाचित्र क्रमांक २. आस्मादिकांचे चिरंजीव महाराष्ट्रात तर भाचेराव फुटभर लांब असलेल्या गुजरातेत उभे!
ह्या फलाटावर तिकीट देणारा कारकून हा महाराष्ट्रात बसतो (छायाचित्रात पत्रे टाकलेली जागा जरा बारकाईने बघा); आणि तिकीट घेणारा पासिंजर हा गुजरातेत उभा असतो (आग विझवणार्या बादल्या / सिमेंटची जाळी या मागे). पासिंजरचा खांदा गुजरातेत आणि पैसे घेतलेला हाताचा पंजा महाराष्ट्रात असतो.
छायाचित्र क्रमांक ३. नवापुर रेल्वे स्टेशनची पाटी
छायाचित्र क्रमांक ४. डोकारे (नवापुर) येथील सहकारी साखर कारखाना
आम्ही गेलो तेव्हा उसासाठी मारामार चालु होती. त्यामुळे कारखाना बघण्यासाठी थोडे थांबावे लागले. नंतर कारखान्याच्या कार्यस्थळापासुन जवळच असलेल्या गावी एका लाकुड काम करणार्या सुताराच्या वर्कशॉप ला भेट दिली.
प्रतिक्रिया
3 Apr 2009 - 4:23 pm | सुमीत
नवीन माहिती मिळाली, भौगोलीक आणि राजकीय पण
3 Apr 2009 - 4:25 pm | सुनील
दोन राज्यांचे रेल्वे स्टेशन - असेच काहीसे उंबरगाव रेल्वे स्थानकाबाबतही आहे, असे ऐकले होते. खरे खोटे लालू जाणे!
माहिती उत्तम. फोटोही चांगले.
अवांतर - नवापुरात गुजरात एकीकरण समितीची शाखा नाही काय?
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
3 Apr 2009 - 4:34 pm | चिरोटा
आवडले.काही महिन्यान्पुर्वी स्वित्झर्लन्ड/जर्मनीला गेलो असताना 'बासेल' इथे गेलो होतो.तिथेही असाच प्रकार होता.स्टेशनचा काही भाग स्वित्झर्लन्डमध्ये तर काही भाग जर्मनीमध्ये असे कळले.
भेन्डि
क्ष्^न + य्^न = झ्^न
3 Apr 2009 - 4:36 pm | पाषाणभेद
नाही.
गुजरात ने आपला डांग जिल्हा बळकावला आहे हा ईतिहास आहे. तसेच बर्हाणपूरही म.प्र. ने बळकावले आहे. कर्नाटकची खोडी तुम्ही जाणताच.
आता विदर्भही आपल्यापासुन विभागायची गोष्ट चालू आहे.
आता आमची गल्ली ही स्वतंत्र राज्य व्हावे हि आमची ईच्छा आहे.
राज ठाकरे की जय हो.
- संयुक्त महाराष्ट्र प्रेमी - पाषाणभेद
3 Apr 2009 - 4:40 pm | दशानन
बरोबर, दिल्ली, गुडगांव, बेळगाव सह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहीजे ;)
=))
3 Apr 2009 - 4:45 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
अहो मग लॉस एंजेलिस, आदिसअबाबा, झॅक विवर, ऑलिंपस मॉन्स यांनी काय हो घोडं मारलं आहे? त्यांना का नको लोडशेडींग??
असो. नवापूरबद्दल नवीनच माहिती कळली. धन्यवाद.
अदिती
आमच्यात डेडलाईन गळ्याशी येईपर्यंत फक्त स्वतःच्या आवडीचीच कामं केली जातात.
3 Apr 2009 - 4:39 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
नवापूर ष्टेशनाची स्टोरी अन् फोटो मस्तच !
3 Apr 2009 - 4:46 pm | दशानन
हेच म्हणतो !
मस्त फोटो व माहीती.
4 Apr 2009 - 3:57 am | मदनबाण
सहमत...
मदनबाण.....
I Was Born Intelligent,But Education Ruined Me.
Mark Twain.
3 Apr 2009 - 4:46 pm | स्वाती दिनेश
लेख आवडला.नवीन माहिती समजली,
बासेल हे स्विस आणि जर्मनीच्या बॉर्डरवरचे गाव पण तेथे जर्मन बासेल स्टेशन आणि स्वीस बासेल स्टेशन अशी २ स्थानके अर्थातच जवळजवळ आहेत्.(शिवाजीनगर आणि पुणे प्रमाणे.)
पण कुफ ष्टाइन हे जर्मनी व ऑस्ट्रीयाच्या बॉर्डरवरील रेल्वे स्टेशन नवापुरसारखेच आहे. एकाच स्टेशनात जर्मन हद्द आणि ऑस्ट्रीयन हद्द.
तसेच साल्झबुर्गजवळील ड्यूर्नबर्गच्या मीठाच्या खाणीत जमिनीच्या पोटात जर्मनी व ऑस्ट्रीयाची हद्द आहे.
स्वाती
3 Apr 2009 - 7:01 pm | रेवती
नवापूरची माहीती आवडली.
खरच मजा वाटते असं काही पाहून.
आपण साखर कारखान्यानंतर सुताराच्या वर्कशॉपला भेट दिलीत.
त्याबद्दल काही लिहावे अशी विनंती. फोटू असतील तर पहायला आवडतील.
नवापूर स्थानकाचे फोटूपण आवडले.
रेवती
3 Apr 2009 - 7:32 pm | शितल
सहमत.:)
माहिती आवडली. :)
3 Apr 2009 - 8:34 pm | प्राजु
असेच म्हणते..
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
5 Apr 2009 - 4:29 pm | धनंजय
असेच म्हणतो.
4 Apr 2009 - 12:09 am | अडाणि
आणि मोजकेपणे मांड्ली आहे...
-
अफाट जगातील एक अडाणि.
4 Apr 2009 - 12:27 am | चतुरंग
नवीन मनोरंजक माहिती मिळाली. चित्रे टाकल्याने एकदम आकर्षक झालाय लेख.
साखरकारखाना सुद्धा बघण्याजोगा असतो. नवापूर स.सा. बघून माझ्या साखर कारखान्यासंबंधतल्या जुन्या आठवणी जाग्या झाल्या!
धरणाच्या पाणवठ्याजवळ असूनही गावात कायम उकडते हे जरा चमत्कारिक वाटते.
सुतारकामाचे फोटूही आवडले असते. :)
चतुरंग
4 Apr 2009 - 5:11 pm | क्रान्ति
खरच छान माहिती आहे. फोटोही आवडले.
क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}
4 Apr 2009 - 7:28 pm | क्लिंटन
सुंदर माहिती आणि छायाचित्रे. साखर कारखाना आणि सुताराच्या वर्कशॉपला दिलेल्या भेटीविषयी माहिती असती तर जास्त चांगले झाले असते.
>>सुतार लोक प्रामाणीक आहेत.
वा वाचून चांगले वाटले.
---विल्यम जेफरसन क्लिंटन
4 Apr 2009 - 7:08 pm | आर्य
कोंबड्यांच्या शेतांमधुन विशीष्ट वास येई. - वाक्य विष्ठेचा वास येई असे वाचले तरी चालेल.
धरण ग्रस्त, पुनर्वसन आणि आंदोलन यातुन वाचण्या करता त्याकाळी सरकारने काही नंदुरबार (धुळयातल्या) गावांची अदलाबदली केली होती ............त्यातलाच हा ऐक प्रकर
आपला
आर्य
5 Apr 2009 - 10:55 am | विसोबा खेचर
नवापूर आवडले..
आपला,
(स्टेशनमास्तर) तात्या.
5 Apr 2009 - 5:53 pm | पाषाणभेद
प्रतिक्रीयांबद्द्ल आभारी आहे. मला जे माहीत आहे ते सांगण्याचा प्रयत्न केला.
सुतार लोक तर खरेच प्रामाणिक आहेत. मी माझ्या घरी एक चांगला पलंग, २ बॉक्स, टी-पॉय, स्टुल, पाट, आदी सामान योग्य किमतीत (शहरापेक्षा) आणि पिवर सागवानी करुन घेतलेत.
पलंग तर सासरेबुवांनीच दिला पण पसंत बायकोची होती. (माझी नव्हे.) :-)
साखरकारखान्यात फोटो काढता आले असते. (शालक तेथील स्थानीक होते.) पण मला ईतर ऑद्यॉगीक वसाहतींचा आणि कारखान्यांचा अनुभव पाठिशी होता. म्हणुन मी जरा मध्यमवर्गीय वागलो.
सोयरीक असल्यामुळे आणि एका कंपनीत काम करत होतो तेव्हा कामानिमित्ताने या भागात मोटरसायकलवर बराच भटकलो. त्याबद्द्ल नंतर कधीतरी नंतर लिहीन.
- पाषाणभेद
6 Apr 2009 - 10:19 am | मैत्र
जिनिव्हा शहराला व विमानतळाला फ्रान्स ची सीमा आहे. अरायव्हल मध्ये आल्यावर स्विस अधिकारी जिथे तुमचा व्हिसा बघतात त्याच्या अलिकडे एक जिना आहे आणि त्या जिन्याने वर गेले तर वन वे एंट्री ( तुम्ही गेल्या नंतर दार मागे बंद होते - मागे फिरता येत नाही) अशी दारे आहेत. त्यातून गेल्यावर फ्रेंच पोलिस तुमचा फ्रेंच / शेन्गेन व्हिसा बघायला हजर असतात. हा जिनिव्हा विमानतळाचा फ्रेंच भाग पुणे विमानतळापेक्षाही छोटा आहे. फक्त एक हॉल आणि जिन्याने खाली उतरले (होय साधा जिना) की एक कार पार्क. इथून सुमारे तीस फूट उंचीच्या एका भिंती पलिकडे जिनिव्हा मधलं (स्विस भागातलं) कार पार्क आणि इतर हालचाल दिसते. पलिकडच्या बाजूची लेव्हल वर असल्याने हे दिसू शकते.
इथून कार /टॅक्सी ने बाहेर पडले की तुम्ही सरळ फ्रान्समध्ये पोहोचता. इथे थुआरी / सेंट जिनी या नावाची दोन छोटी गावे आहेत.
तिथल्या फ्रेंच हॉलिडे इन चे नाव पण हॉलिडे इन थुआरी - जिनिव्हा एअर पोर्ट असेच आहे!
6 Apr 2009 - 12:45 pm | पाषाणभेद
फारच रंजक माहिती आहे ही. एकुणच प्रशासकीय भार (services) कमी करण्यासाठी हा उपद्व्याप आहे हे कळते.
अशा ठिकाणी त्या त्या ठिकाणच्या शासनाला मिळणारा पैसा कसा एकमेकांना कसा वाटत असणार? आपण इतर बाबी समजू शकतो -जसे गुन्हेगारीची हद्द, नागरीकांनी वावरण्याची हद्द इ. पण पैशाचे काय?
- पाषाणभेद
6 Apr 2009 - 2:41 pm | मैत्र
जिनिव्हा विमानतळाचा खर्च किंवा उत्पन्न हे कसं वाटलं जातं हे माहीत नाही. पण एक गमतीची गोष्ट ही की विमानतळावर युरो (आत्ताचे फ्रेंच चलन) आणि स्विस फ्रँक्स हे दोन्ही चालतात. अगदी सँडविच घेतला तरी त्याचे दोन्ही चलनात दर लिहिलेले असतात किंवा चलन बदलाचा दर लिहिलेला असतो. स्विस चॉकोलेट्स जसे लिंड्ट, किंवा इतर सुव्हेनियर (मराठी?) च्या दुकानांमध्येही हाच कारभार होता.
एका अशाच उपाहार गृहात सुट्टे नव्हते तेव्हा त्या चालिकेने आम्हाला आमच्या युरोच्या बदल्यात थोडे युरो आणि थोडे स्विस फ्रँक्स दिले. त्या आकडेमोडीच्या घोटाळ्यात न पडता आम्ही स्विस प्रामाणिकपणावर विश्वास ठेवून ती नाणी न मोजता सरळ खिशात टाकली.
अर्थात हे सर्व दीड दोन वर्षापूर्वीचं आहे जेव्हा स्वित्झर्लंड युरोपीय समुदायात सामील झाला नव्हता.
6 Apr 2009 - 12:53 pm | अल्पना
एक प्रश्न: पैसे घेणारा कारकुन मराठी की गुजराथि? :W
6 Apr 2009 - 1:35 pm | सुनील
बिहारी... ;)
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
6 Apr 2009 - 1:51 pm | पाषाणभेद
होय, रेल्वे ही (बिहारची) राष्ट्रीय संप्पत्ती आहे.
- पाषाणभेद