( जेव्हा खूप खूप पाऊस पडेल ना )

रातराणी's picture
रातराणी in जे न देखे रवी...
24 Jun 2020 - 1:03 pm

( प्राचीताई माफ करशील ना ग? )

जेव्हा खूप खूप पाऊस पडेल ना,
आणि तुला नाक्यावरच्या वडापावची खूप खूप आठवण येईल ना
आणि तेव्हा जेव्हा मी बटाटेवड्याची रेसिपी पहात असेन
तू म्हणशील, "अवघड आहे! या जन्मी मिळतील का?"
मी तुझ्याकडे एक लुक देईन अन् मग बटाट्यांना कोंबेन कुकरमधे.
"अगं, शिट्टी!"
मी मग चिडून शिट्टी लावेन.
"जमलं!", तू म्हणशील.
मग मात्र मला रहावणार नाही.
मी तुझा फरसाणाच्या डब्यातला हात काढून घेईन,
कुकरजवळ नेईन.
तू घाबरशील..म्हणशील, हात भाजतील
मी म्हणेन भाजू देत.
शिट्ट्या होतीलच कुकरला.
झाकण काढेन, अशी अख्खी झुकून मी कुकरची वाफ घ्यायला बघेन.
तेवढंच स्टीम क्लिनिंग..
मान वर करून तुझ्याकडे पाहीन.
पाणी टाकायला विसरल्याने झालेला बटाट्याचा कोळसा, आता कसे वडे करू?
तू आता कुकर कसा घासायचा या चिंतेत असशील
मी हसून पुन्हा मोबाईलमध्ये नवी रेसिपी बघायला सुरू करेन,आत्मविश्वासाने
इझी, बिगीनर असे किवर्ड टाकेन
बघेन सोपं काही सापडतंय का
आणि मग...
.....
पण जेव्हा खूप खूप पाऊस पडेल ना,
तेव्हा तुला अरबट चरबट खावंसं वाटेल ना,
सिंकमधली भांडी आठवून तुझी भूक मरेल ना?????

gholmiss you!prayogअनर्थशास्त्रअविश्वसनीयआता मला वाटते भितीआरोग्यदायी पाककृतीआशादायकइशारागरम पाण्याचे कुंडजिलबीपाऊसमार्गदर्शनमुक्त कवितारोमांचकारी.विडंबन

प्रतिक्रिया

प्राची अश्विनी's picture

24 Jun 2020 - 1:49 pm | प्राची अश्विनी

आरारारारारा... चांगलंच तळलं की.;)

ज्ञानोबाचे पैजार's picture

24 Jun 2020 - 2:29 pm | ज्ञानोबाचे पैजार

काही खर नाही बाबा..
त्या युट्युब रेसिप्यांनी तर जाम वैताग आणला आहे या लॉकडाउनच्या काळात.
उध्दवा लवकर हाटेलं सुरु कर रे बाबा, लै लोकांचे दुवे मिळतील तुला
पैजारबुवा,

मूकवाचक's picture

24 Jun 2020 - 3:54 pm | मूकवाचक

+१

चांदणे संदीप's picture

24 Jun 2020 - 3:47 pm | चांदणे संदीप

सिंकमधली भांडी आठवून माझीच भूक मेली. ;)

सं - दी - प

हेहेहेहे मस्त जमलाय... किती वेळा अगदी अगदी झालंय काय सांगू :D

रातराणी's picture

24 Jun 2020 - 9:38 pm | रातराणी

धन्यवाद :)

प्रचेतस's picture

25 Jun 2020 - 6:18 am | प्रचेतस

लैच भारी =))

मन्या ऽ's picture

25 Jun 2020 - 11:43 am | मन्या ऽ

हे कांड करुन झालंय माझ!
(नको त्या आठवणी!)

गणेशा's picture

25 Jun 2020 - 1:14 pm | गणेशा

हा हा हा.. छान आहे..

एस's picture

25 Jun 2020 - 2:11 pm | एस

दंडवत स्वीकारा!

(रच्याकने, पाणी न घालता कुकरला शिट्ट्या कशा होतील? आजकालच्या कुकरांचे काही सांगता येत नाही ब्वॉ!) ;-)

रात राजाने मारल्या असतील शिट्ट्या. ;)
.
आजकालच्या नवर्यांचे काही सांगता येत नाही बुवा.

रातराणी's picture

26 Jun 2020 - 6:43 pm | रातराणी

दुत्त्त दुत्त्त अभ्या..

ज्ञानोबाचे पैजार's picture

25 Jun 2020 - 2:25 pm | ज्ञानोबाचे पैजार

या लॉकडाउन मुळे स्वयंपाकातले बारकावे सगळ्यांना माहित झाले आहेत,

युट्युब सुगरणींनो लिहितांना काळजी घ्या... घरी वाट्टेल ते मुकाट खात असलो तरी...इथे वाट्टेल ते लिहिलेले खपवून घेतले जाणार नाही..

पैजारबुवा,

हां बास! हे असं ठणकावून सांगण्याची हिंमत फक्त इथेच करू शकतो! नाही तर काय बिशाद आहे?? =))

पाणी घातलेल हो.. पण पाणी कमी आणि गॅसची आच मोठी ठेवलेली..

रातराणी's picture

26 Jun 2020 - 6:41 pm | रातराणी

:-) :-)

रातराणी's picture

26 Jun 2020 - 6:44 pm | रातराणी

धन्यवाद :)