अकोल्याले जायची तयारी झपाट्यानं चालू झाली होती. बाबांचा राग अजून उतरला नोता. त्याच्या, पोट्याले डॉक्टर बनवण्याच्या स्वप्नाच म्या आधीच वाटोळं करून टाकलं होत. कमीतकमी घरच्या भाकरीवर तरी इंजिनेरींग झाली असती, त त्याची पण म्या वाट लावून टाकली होती. त्या टायमाले नाय काय त, महिना दोन ते तीन हजारांचा लोड, म्या बाबांवर टाकला होता. पण आपल्या स्वप्नाचा जरी बट्याबोळ झाला, तरी पोट्ट्या ले कमी पडू देईन काय? चेहऱ्यावर, जरी राग दिसत असला, तरी जाऊ दे, कमीतकमी मधल्या बहिणी सारखा इंजिनीअर त होईन. अन पोट्यासाठी, हाल सोसणार नाई, त मग तो बाप कसला? त्या तीन हजारांच्या आगाऊ बोझ्यान, बाबांन अन आईन, नक्की कायतरी काटकसर चालू केली असणच. हे मले काय समजत नसणं काय? समजत असणं, पण उमजत नसणं. सोन्या आपला, अकोल्याला चाल्ला, म्हणून आईची लय चंगळ सुरु. लाडू बनू दे, त चिवडा बनू दे, थंडी हाय त स्वेटर दे. माई बॅग खाऊं, कपडे अन आईच्या लाडानं फुल्ल भरली होती.
तितक्यात बाहेरून आवाज आला.
“श्रीकांत ....श्रीकांत !!!”
मी बाहेर आलो, त दोन लंबे, बारीक, एक गोरा, एक सावळा, एक सिल्वर कलरची बीसए एसलार, त दुसरा लाल कलरची हिरो कॅप्टन सायकल घेऊन, माया घरच्या गेटवर उभे होते. घरात, दोन मोठ्या बहिणी असल्यान, बाहेरच्या अनोळखी लोकाले, त्या टायमाले घरात, एवढ्या इझिली घेत नसे. तो आमच्या बावाजीन आम्हाले दिलेला दम म्हणा, की संस्कृती जपाची जुन्या लोकांची ती पध्दत, तो बाबांचा निर्णय, मले अजूनही बरोबर वाटतो.
कोण होते हे दोघ? लागला का लाईट? अबे, इंजिनीरिंग ऍडमिशन घ्याले, ऍडमिशन हॉलमध्ये भेटले ना. तेच ... तेच हे दोघे झामलत.
आता आमची पयली भेट कशी झाली, ते समजून सांगले मले तुमाले अजून माग, म्हणजे भूतकाळात घेउनजा लागन.
एकनंबर बदमास, उडाणटप्पू , खोलापूरच्या पुलावरून, पुर्णानदीच्या पुरात उड्या मारणारे, कोणच्या बापाला न ऐकणारे, म्हणजेच माये तीर्थरूप बाबा. माया आजोबांन अश्या मस्तीखोर पोट्यालें गावातून काळून दिल, की त्याची कर्मभूमी, शिंगणापूर गाव नसून अमरावतीशहर असं लिहून ठेवलं असणं, म्हणून ते स्वताःच गावातून पळून गेले. ..जाऊद्या तो विषय वेगळा. पण, माया बाबाले अमरावती शहारात आसरा दिला तो त्यांच्या मामांन.
“अबे आज जे काय दिवस तुम्ही बघता ना, ती या थोर मामांची कृपा.” अस बाबा नेहमी सांगायचे.
बाबांचे मामा म्हणजे, माये आजोबाच, हे शिवाजी शिक्षण संस्थेमधून, रिटायर्ड झालेले वक्तिमत्व. त्याची पाचही मुल हुशार, इंजिनीअर, आजही मोठं मोठ्या कंपनीत साहेब. बाबा आमा तिघा पोट्याले, त्यांचा पोराचे उदाहरण द्यायचे.
“शिका काही, व्हा मोठे त्यांचासारखे.” अस नेहमी सांगायचे.
रिटायर्ड मामाआजोबा कडे, दहावी (१९९३), इंग्रजी ट्युशन ले, मी मायी ड्यशिंग स्ट्रीट कॅट सायकल घेऊन जायचो.
तिकडे, अजून एक बारक, लंबू, गोरागोमट, केस स्पाईक कट केल्यासारखे, हिरो कॅप्टन सायकल घेऊन आलेल पोट्ट, अन दुसर बारक, लंबू, सावळास, सिल्वर कलरची बीसए एसलार घेऊन आलेल पोट्ट. मी सारख सारख या दोघांच अस काऊन डिस्क्रिपशन देऊन रायलो? त्यांची त्याच्या घरच्यान ठेवलेल, दोन तीन अक्षरी नाव, तुमाले काऊन नाय सांगून टाकत ? हम्म..त्याचं काय हाय, हे दोघेही आज चांगल्या मोठ्या कंपनीत कमीतकमी मॅनेजर नाय, त त्याहुन पण मोठे साहेब हाय, माय लग्न झाल, तस त्याच पण झाल हाय. ते पण, कोणातरी लेकराचे बाबा मंजे सुपरहिरोत हायच, मंग मी जर त्याच खर नाव वापरल, अन मग पुढ मायाच गोष्टीत त्याचा मजाक उडवाचा, हे काऊन त, काय माहित गळ्या, मले पटून नाय रायल. त मंग, असं करू, आपण दोघांलेही माया या गमतीदार गोष्टीत, नाव देऊ टाकू .
सावळा तो मनीष, अन गोरागोमटा तो राहुल.
अमरावतीसारख्या जागी, नावाच्या किलच्या न पाडता नाव घेण म्हणजे, तो खास दोस्त तरी असतो का राज्या? त असा मन्या ,राहुल्या अन मी. राहुल्या मले माया टोपण नावान, म्हणजे अनप्या तर मन्या मले, मी दोघापेक्ष्या बुटका असल्यान, अन माया स्वभावाप्रमाण, मले छोटा मुक्री म्हणू लागला. अशी ही आमची दहावीले झालेली ओळख, ही मामाआजोबाच्याकडील ट्युशन संपल्यानंतर भूतकाळात लपली होती.
ती, परत इंजिनीअरिंग ऍडमिशन, अन आता माया घराच्या गेटवर उगताना दिसून रायली होती.
आता परत दोस्तीले सुरवात होंणार होती. पण अजून नावाच्या किलच्या पाडन्या येवडी, दोस्ती पक्की झाली नोती. म्हणून एकमेकाले रिस्पेक्ट देत, गप्पा सुरुझाल्या.
राहुल लय साधाभोळ गोरेगोमटं पोट्ट. चेहऱयावर शांती. त्याची बारावीची काय स्टोरी, ती त्याची त्यालेच माहीत , पण तो सायकरवरून उतरून मायाकडे गालातल्या गालात हासातच आला.
"अरे मित्रा अनुप, माझी पण ऍडमिशन अकोला इंजिनीअरिंग, सिव्हिल ब्रॅन्चलाच झाली रे."
आधी श्रीकांत, अन आता अनुप अस कस याले माय टोपण नाव (अगदी जवळचे नाव) माहीत बे?
बरोबर, मामाआजोबा मले, दहावी ट्युशन मध्ये मनोहरचा अनुप म्हुणूनच बोलवाचे.
आता मनोहर कोण? मनोहर म्हणजे माया बाबांच, त्याच्या आईकडेच म्हणजे,मायी आजी, मामाआजे यांच्या कडच लाडानं बोलवाच नाव.
मले पण एकदा मामीआजीन,
"कारे अनुप, मनोहर कसा हाय?" अस विचारल, अन मी बुचकळ्यातच पडलो ना.
"अरे मनोहर तुझा बाप रे." जाऊद्या. सांगायचा मुद्दा म्हणजे, अमरावतीकराले, निदान दोन चार तरी नाव असते, हे आता तुम्ही लक्ष्यात ठेवाले पाहिजे.
राहुलच बोलण ऐकून, मले लय आनंद झाला.
"काय बोलतोस राहुल यार" आत्मदे कुठंतरी दुःख लपून होत, त्याला सावरासाठी आता या दोस्तांची सोबत भेटली . म्हणजे माया पुढ्च्या अकोलाच्या प्रवासात मायी ताकत वाढवाले, अजून एक दोस्त भेटला होता. त्याचपण तसंच काहीतरी असणं.
राहुलच समजलं, पण हा मनीष, इकडे काय कराले आला?, मले अजून समजून नॊत रायल.
आतांपर्यन्त, तो पण आपल्या बीसए एसलार वरून उतरून, माया अन राहुल कडे आला होता .
"अरे श्रीकांत, माझी पण ऍडमिशन अकोला इंजिनीअरिंग, सिव्हिल ब्रॅन्चलाच झाली आहे."
तो राहुलबरोबर आला, म्हणजे राहुल ले हे पायलंच माहित असणं.
"हो का खरंच? काय बोलतोस यार.” म्हणत मी त्याच्याशी हात मिळविला.
पण मग, मनीषमले ऍडमिशन हॉलमध्ये, ब्रॅन्चचेंज साठी आलो अस खोटे काऊन बोलला? ते पण इतक्या चालाखीनं, की चेहऱ्यावरची माशी पण उडू न देता, त्याने मले चांगलाच चुना लावला होता. मायी अन याची परत कायले भेट होते, असं समजून त्यानं मले, तेव्हा जमालघोटा दिला होता. आता त्या टापिक वर सध्या मले उकरून काढायच नव्हत, कारण माया दुःखाले सावरणारा आणखी एक दोस्त भेटला, याचीच मले लय ख़ुशी झाली होती.
ते गाणं हाय ना “एक, एक से भले दो , दो से भले तीन,” असे अमर,अकबर, ऍन्थोनी एकजागा जमले होते. मनीष हा हुशारीनं कसा पुढच्याले चुना लावू शकतो, ही त्याची कला मले, मनातून दाद देण्यासारखी वाटत होती. नककीच हा एखाद्या मोठ्या पॉलिटिशियन किंवा पिपल मॅनेजरचा सुप्तगुण, मले त्याच्यामध्ये दिसु रायला होता.
तिघांचे वडील, हे शिवाजी शिक्षणसंस्थे मध्ये कामाले असल्यान, त्यांच्याही आतापर्यंत एकमेकांशी ओळखी झाल्या होत्या. त्यात मी जरी राहुल अन मनीषपेक्षा दिसाले बुटका, तरी पण ऍडमिशन हॉलमध्ये बाजीप्रभू देशपांडे सारखा एकट्याने खिंड लढवलेली, दोघांच्याही बाबांन पायल होत. त्यायले माय कौतुक वाटल की नाही, हे त मले नाही माहित. पण आपल्या पोट्याले हे ईपित्तर सांभाळून घेईल, असे त्याले वाटल असन हे नक्की.
मनिषच्या वडिलांच्या ओळखीन, अकोल्याले तपाडीया नगरमध्ये आमाले आधीच रूम भेटली होती. बाजूचे काका, हे मनीषच्या वडिलांचे दोस्त. त्यामुळे आमच्या तिघांच्या कारभारावर, बारीक लक्ष ठेवायला एक वरिष्ठ गृहस्थ तैनात झालं होत.
झाल, आता मनीष, राहुल अन मी म्हणजे श्रीकांत, अशी त्रिकुट,त्रिशंकु जोडी जमली होती. हि जोडी, आता कधीपण अकोल्याचा, इंजिनीअरिंग कॉलेज, तपाडीया नगर किंवा अकोल्याच्या कुठल्या गल्ल्या बोळीत, रस्त्यावर फिरताना दिसन , याचा विचार त, ब्रम्हदेवान पण केला नोता.
|| सूचना ||
माया छोट्या दोस्तांनो, बघितले ना रे बा , थापा मारण, दुसऱ्याले शेंडी लावण , चुना लावण, हे काही लय चांगले गुण नाही. परत कधी आपल्याले, त्याच मित्राच, कुठे काम पडणं हे माहित नसते . मजा करा ,मस्ती करा, अन समजा, केलीच कोणाची खोडी, अन कोणी तुमची, तरी दोस्त समजून त्याले माफ करा, नायत त्याची माफी मांगा. पण चांगल्या दोस्ताची दोस्ती, सोडू नका रे बा.
धन्यवाद.
प्रतिक्रिया
26 May 2020 - 10:56 am | गणेशा
वा वा भारी लिहिले आहे...
आवडले..
आमच्या ऍडमिशन वेळी पण असेच..
तीन महिन्याने ट्रान्सफर राउंड डिक्लेर झाला होता..
मी तर मुळ फेरी ला गेलो नव्हतो, नाही तर पुणे पक्के होते..
तीन महिन्याने ना इंजिनिअरींग ला ना फार्मसी ला ना कशाला गेलो होतो, त्यामुळे सगळ्यांची ऍडमिशन झाली पण सप्टेंबर जवळ आला पण आम्ही घरीच..
आणि सकाळी युनिव्हर्सिटी ला ट्रान्सफर राउंड ला गेल्यावर, आधी ज्यांना ऍडमिशन मिळाले होते, त्यांचे सगळे ट्रांसफर झाल्यावर जे उरेल ते नविन लोकांना, असे म्हणून शेवटी रात्री 11 ला प्रश्न विचारला गेला..
पुणे जिल्ह्यातील दोनच राहिलेत शिरूर पाहिजे का भोर?
आणि मग तेंव्हा शिरूर का म्हणालो माहीत नाही..
पण तेथून पुढे जे झाले ते माझ्या आयुष्याची सर्वात सुंदर वर्षे..
जे झाले ते चांगल्या साठीच..
किती ओळखी.. किती लोक.. किती मित्र किती मैत्रिणी..
अजूनही कायम आहे.. लिहिल याबद्दल छोटेसे माझ्या धाग्यात..
आज पासून काम असल्याने आता जास्त येता येणार नाहि
26 May 2020 - 11:05 pm | श्रीकांतहरणे
धन्यवाद . आपलं वेळ काढला आणि वाचले बद्दल.
बरोबर आहे जे ठोकर खात खात मिळत, त्यातच जीवनाचे बरे वाईट आणि चांगले अनुभव गाठीशी येतात.
26 May 2020 - 2:31 pm | सुचिता१
छान लिहित आहात. पुढील भाग लवकर टाका. वर्हाडी भाषेचा तडका छान वाटला.
26 May 2020 - 11:10 pm | श्रीकांतहरणे
धन्यवाद . आपलं वेळ काढला आणि वाचले बद्दल.
आपण आधीचे भाग वाचलेत का ? हा तिसरा भाग आहे या आधी मी
लॉकडाऊन सुरु आहे
लॉकडाऊन सुरु आहे - भाग १- बारावीचा निकाल
लॉकडाऊन सुरु आहे - भाग २- इंजिनेरींग ऍडमिशन
पण प्रकाशित केले आहेत. ते सुद्धा वाचा तर लिंक लागणार.
26 May 2020 - 11:10 pm | श्रीकांतहरणे
धन्यवाद . आपलं वेळ काढला आणि वाचले बद्दल.
आपण आधीचे भाग वाचलेत का ? हा तिसरा भाग आहे या आधी मी
लॉकडाऊन सुरु आहे
लॉकडाऊन सुरु आहे - भाग १- बारावीचा निकाल
लॉकडाऊन सुरु आहे - भाग २- इंजिनेरींग ऍडमिशन
पण प्रकाशित केले आहेत. ते सुद्धा वाचा तर लिंक लागणार.
26 May 2020 - 11:10 pm | श्रीकांतहरणे
धन्यवाद . आपलं वेळ काढला आणि वाचले बद्दल.
आपण आधीचे भाग वाचलेत का ? हा तिसरा भाग आहे या आधी मी
लॉकडाऊन सुरु आहे
लॉकडाऊन सुरु आहे - भाग १- बारावीचा निकाल
लॉकडाऊन सुरु आहे - भाग २- इंजिनेरींग ऍडमिशन
पण प्रकाशित केले आहेत. ते सुद्धा वाचा तर लिंक लागणार.