मागे वळुन पाहताना..

मन्या ऽ's picture
मन्या ऽ in जे न देखे रवी...
20 May 2020 - 9:18 pm

मागे वळून पाहताना..

मागे वळुन पाहताना
एक निरागस चेहरा
दिसतो मज मनसोक्त
खळखळुन हसताना

मागे वळुन पाहताना
तोच चेहरा दिसतो मज
भेदरलेल्या डोळ्यांनी
आसपास पाहताना

मागे वळुन पाहताना
लोकांचे चेहेरे न्याहाळताना
तो चेहरा दिसे मज
ओंगळवाण्या नजरा सहन करताना

मागे वळुन पाहताना
ओळखीच्या चेहेऱ्यांवरचे
पाहिले मी मुखवटे
एकावर एक चढवताना

मागे वळुन पाहताना
स्वतःला आरशात बघताना
पाहिले आहे मी
स्वतःचीच किळस करताना

मागे वळुन पाहताना
ते स्पर्श सहन करताना
पाहिले आहे मी
स्वतःलाच तीळ तीळ तुटताना

मागे वळुन पाहताना
रोज रोज मरताना
पाहिले आहे मी स्वतःलाच
नैराश्याच्या खाईत झोकताना

मागे वळुन पाहताना
आजही जाणवतो तो कोमल
हातांचा स्पर्श;
केसांमधुन फिरलेला
प्रेमाने ओथंबलेला

मागे वळुन पाहताना
तो स्पर्श अनुभवताना
रोखते. अन्
हात देते स्वतःलाच
जगु पाहते पुन्हा एकदा
ती जळमटे दुर करुनी
शोधते मी स्वतःलाच..

-दिप्ती भगत
(९ मार्च,२०२०)

जीवनमुक्त कवितामुक्तकसमाजस्पर्शजाणिवआयुष्य

प्रतिक्रिया

कौस्तुभ भोसले's picture

22 May 2020 - 12:42 am | कौस्तुभ भोसले

छान

चांदणे संदीप's picture

22 May 2020 - 8:35 am | चांदणे संदीप

कवितेतल्या भावना पोचल्या.

सं - दी - प

मन्या ऽ's picture

22 May 2020 - 9:11 pm | मन्या ऽ

कौस्तुभ, संदीप आपल्या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद!
वाचकांचे आभार! :)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

22 May 2020 - 10:02 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

लिहिते राहा.

-दिलीप बिरुटे

मन्या ऽ's picture

23 May 2020 - 7:47 am | मन्या ऽ

लिहिते राहा.>>> नक्कीच! :)