जरा कुठे पाच सहा-तास ऑफलाईन असावं आणि येऊन पाहावं तर किमान ५/६ तरी नवे लेख, कविता आणि त्याला प्रत्येकी किमान ३०-३५ प्रतिसाद आलेले पाहायला मिळातात!
अरे यार पब्लिकला एवढं लिहायला आणि ते वाचकांना ते वाचून प्रतिसाद लिवायला टाईम तरी केव्हा भेटतो तेच समजत नाय! :)
आम्ही हे सगळं केव्हा वाचणार, केव्हा प्रतिसाद देणार, ते काय समजत नाय बा!
छ्या, हल्ली मिपाचं हे चित्र पाहूनच 'दमलो बुवा!' असं म्हणायची वेळ येते! :)
असो..
आपला,
(दिवसेंदिवस कामधंद्यात पार गुरफटत चाललेला!) तात्या.
प्रतिक्रिया
27 Mar 2009 - 1:12 am | प्राजु
दमलो आहे हे सांगण्यासाठी नव्या धाग्याची गरज नव्हती.
तुम्ही दमलात.. म्हणून मिपाकरांनी काय करावे?? लेखन करू नये का??
खुलासा करावा... ;)
अन्यथा धागा अप्रकाशीत केला जाईल. :)
- (सर्वव्यापी, संपादक)प्राजु
http://praaju.blogspot.com/
27 Mar 2009 - 1:14 am | विसोबा खेचर
अन्यथा धागा अप्रकाशीत केला जाईल.
यू हॅव ऑल द राईटस्! गरज वाटल्यास धागा अवश्य अप्रकाशित करा!
आम्ही संपादकांच्या कामात कधीही ढवळाढवळ करत नाही! :)
तात्या.
27 Mar 2009 - 2:56 am | प्रमेय
याला म्हणतात खिलाडू वॄत्ती....
हॅटस् ऑफ तात्या...
ठाण्याला येऊ म्हणतोय आता...
जून्या आठवणी ताज्या होऊ लागल्यात...
का हो, त्या तलावपाळी जवळचं 'नॅचरलस्' आइसक्रीम दुकान चालू आहे का?
मी तिथे 'मिरची, आले, शहाळे आणि लिंबू' चे आइसक्रीम खाल्ले होते ते अजून आठवते आहे...
बाकी काही म्हणा, ठाण्यासारखा मेवा कुठे मि़ळत नाही बरंका...
27 Mar 2009 - 8:22 am | अजय भागवत
तात्या,
वायरलेस इंटर्नेट घ्या, कारला ड्रायव्हर ठेवा व प्रवासात laptop वरुन संपादन करा- वेळ वाचेल; कसे?. सल्ल्याची फी म्हणून मिपावर एक मिसळपाव ची डिश पेश करा.
27 Mar 2009 - 10:47 am | धमाल नावाचा बैल
तात्या लवकर दमायला होतय आजकाल? ;) चाळीशीचा परिणाम काय ;)