(आज तुझा वाढदिवस )

दशानन's picture
दशानन in जनातलं, मनातलं
26 Mar 2009 - 1:38 pm

निखिल देशपांडे ह्यांची ही कथा वाचल्यावर असेच मनात आले जर निखिल च्या जागी मी असतो तर कशी लिहली असती ही कथा, निखिल देशपांडे ह्यांची परवानगी घेऊन मी ही त्याची कथा परत लिहीली आहे माझ्या शब्दात.
_________________________________________________

आज तिचा वाढदिवस.........

काल सकाळी उठुन ऑफिसला पोहचायचे होते, पण सोमवार रात्री घेतलेल्या एक्स्ट्रा पॅग मुळे उठण्यासाठीच उशीर झाला व त्यामुळे मी धावत पळतच ऑफिस मध्ये पोहचलो, आपल्या सीट वर पोहचू पर्यंत मला जाणवलं की अजून कोणीच आले नाही आहे, म्हणजे मी एकटाच उशीरा नाही तर, हलकंस हसत मी आपला संगणक चालू केला व मिपा उघडले. थोड्याच वेळाने साहेब माझ्या डेस्क जवळ आले तर माझ्या संगणकावर मिपा पाहून त्यांच्या कपाळावर थोड्याफार आठ्या आल्या असं मला जाणवलं व ते मला जरा रागानेच म्हणाले " आज काय तारिख आहे माहीत आहे तुम्हाला ?" साहेब पण महाराष्ट्रीयन व मी पण बाकीच्या अमराठी व्यक्तीसमोर देखील आम्ही बिनधास्त मध्ये मराठीच बोलतो, पण साहेब काय विचारत आहेत ह्या कडे जवळ जवळ माझे लक्षच नव्हते मी तर कुठे तरी दुसरी कडेच गुरफटलो होतो, मनात काहीतरी वेगळेच चालू होते, त्यांनी पुन्हा विचारल्यावर मनात आलं" ह्यांना काय झालं सकाळ सकाळी" माझी ही समाधीस्थ अवस्था पाहून साहेब पुन्हा जोरात म्हणाले " अरे आज २४ तारिख आहे, आपला रिव्हु डेट" नकळत माझ्या तोंडातून "झाला ???" असे बाहेर पडले, जे होणे होते तेच झाले ते शिव्यांची लाखोली वाहत निघून गेले, शेजारचा लगेच म्हणाला " अरे यार, २४ मार्च लक्षात नाही का ठेवता येत?" पण त्यांना कसं सांगू की २४ मार्च म्हणजे उद्या तिचा वाढदिवस, मनात काहूर उठले, कसे बसे मनाला समजवण्याचा प्रयत्न चालू केला, पण...

तो जुना काळ डोळ्यासमोरुन झर झर वाहू लागला, मन आठवणी मध्ये रमू लागले, मागिल २४ मार्च असाच आठवला, किती किती विचार केला होता, किती प्लान तयार केले होते तुला सरप्राईज करण्यासाठी व सर्वात शेवटी बारा वाजता रात्री तुझ्या घरी केके घेऊन आलो होतो, आठवतं तुला ? मी कुठे आहे, काय करत आहे हे सर्व विसरुन जणू मी हरवलो तुझ्या आठवणी मध्ये. राहून राहून तुझ्या सोबत घालवलेले ते क्षण, तासन तास तुझ्याशी फोनवर मारलेल्या गप्पा, तुझं बोलणं, तुझं हसणं, तुझ हळुच मिश्किल नजरेने मला पाहणं... व तुझ्या सोबत घालवलेले ती संध्याकाळ समुद्र किना-यावर.... कसा विसरु मी. तुझ्या सोबत खालेली ती मिसळ, तुला आठवतं ती मिसळ खुप टिखट होती व त्या मुळे लालबुंद झालेला तुझ्या नाकाचा शेंडा. मला सर्व काही आठवतं, प्रत्येक क्षण अन क्षण. नकळतच हात फोनकडे गेला व वाटले तुला एक फोन करावा पण, नंबर डायल करता करता अचानकच तू आलीस नजरे समोर.. तशीच जशी शेवट्च्या भेटी वेळी आली होतीस सांगायला " आपल्या मधले नातं संपलं आज, आज पासून तु व मी फक्त मित्र. नातं फक्तं मैत्रीचे."

तुला फोन लावावा की नाही ह्या विचारांची कसरत करत होतो तोच परत साहेब माझ्या डेक्स जवळ आले व त्यावेळी एका हाता माझ्या फोन व माझी नजर फोन कडे समोर संगणक चालू मिपा ची खिडकी उघडलेली व साहेब माझ्या कडे निरखुन पाहत आहेत.. मला काहीच सुचत नव्हतं काय करावे , फोन खाली ठेवावा अथवा मिपा बंद करावे की साहेबांशी बोलावे... साहेब मला म्हणाले " कम विथ मी एन वॉर रुम." माझ्या मनात आलं ह्याला काय झालं अचानक ? इग्रजी मध्ये काय बोलत आहे, वॉर रुम मध्ये काय बोलवत आहे, आता का लढाई करायची आहे कुणा बरोबर. कसा बसा सावरत, मनस्थिति स्थीर ठेवत त्याच्या समोर गेलो, आत गेल्या गेल्याच साहेब म्हणाले " निखिल आज तब्येत बरी नाही का ? सकाळ पासून पाहत आहे तुमचे लक्ष नाही आहे, विचित्र पणे वागत आहात" असे म्हनून पुढे अचानक म्हणाले " जर तब्येत बरी नाही असे वाटत असेल तर जे थोडेसे काम बाकी आहे ते पुर्ण करुन घरी जा." मी त्यांना असेच काहीतरी असंबध उत्तर दिले व हो म्हणून कसा बसा बाहेर आलो व आपल्या कामाला लागलो. नेहमी प्रमाणे मनाची समजूत घातली व जे छोटेसे काम होते ते पुर्ण करु लागलो, काम पुर्ण होऊ पर्यंत पाच वाजले.

कधी स्टेशन वर पोहचलो ते कळालेच नाही, ऑफिस मधून लवकर निघाल्यामुळे रस्त्यावर फारशी गर्दी भेटलीच नाही, चहावाल्यांचे पण बाकडे जवळ जवळ रिकामेच होते, तोच चहावाला जेथे बसून तु माझी ऑफिस मधून येण्याची वाट पाहत असे कितिदा तरी. मी धावत पळत तुझ्या जवळ आल्यावर मी उशीर केला ह्या साठी तु माझ्या वर खोटं खोटं रागवायचीस. मग मी हळुच त्या ब्रिजवरील आज्जी कडून घेतलेले गुलाबाचे फुल तुला द्यायचो तेव्हा तेव्हा दिसणारे आनंदाचे भाव तुझ्या चेह-यावर .. मी कधीच विसरु शकणार नाही, तुझ्या मागच्या वाढदिवसाच्या आदल्या दिवशी आपण येथे भेटलो होतो, येथेच बसून आपण न जाणे किती स्वप्ने पाहीली... अनेक स्वप्नाना पुर्ण करण्या-या शपथा पण तु येथे घेतल्या होत्यास आठवतं तुला.. नकळत पुन्हा हात खिश्यात गेला व मी फोन बाहेर काढला पण पुन्हा तुझे तेच वाक्य आठवल्यामुळे परत ठेवला फोन. व मी असाच न जाणे किती वेळ तसाच बसून राहिलो.

थोड्यावेळेने आजुबाजूला अंधार पडतो आहे ह्याची जाणीव झाली व ट्रेन पकडून घरी निघालो, घरी पोहचल्यावर मला लक्ष्यात आले की आज रुममेट गावी गेला आहे म्हणजे मी आज एकटाच रुमवर. तसा बसून राहिलो, सुचतच नव्हतं काही, काय करावे काय नाही, बीयर घ्यावी का नको, पॅग घ्यावा का, कशाला हवी दारु... असे स्वतःशीच भांडत.. किती वेळ असाच गेला निघून शेवटी पुन्हा फोन उचलला व तुला फोन लावण्यासाठी , पण तुला टाळून एका जुन्या मित्राला लावला, त्याच्याशी मी गेली एक वर्ष बोललो देखील नव्हतो त्याला फोन लावला, जुन्या आठवणी काढत राहीलो, किती तरी वेळ नुस्तेच बोलत होतो, काय बोलत होतो काहीच कळत नव्हते पण मी बोलत होतो पण जाणुन बुजून तुझी आठवण काढत नव्हतो, पण अचानक तुझा विषय निघाला तेव्हा मी नेटवर्क निट नाही आहे असे सांगून फोन कट केला, मी असे का केले हे मलाच नाही कळाले पण मी फोन कट केला होता.

मन रमत नव्हते कश्यात ही शेवटी घरातील सर्व लाइट बंद केल्या व तसाच अंधारात बसून राहीलो व शेवटी बेडवर हुडपलो, झोप येत नव्हती, जसे काही तरी हरवले आहे, काही तरी जवळ नाही आहे असे वाटत होतं त्यामुळे तळमळत तसाच बेड वर पडून राहिलो. रात्री बाराचे टोले पडले, आज तुझा वाढदिवस. मनाला समजवले तु आपल्या नव-याबरोबर करशील साजरा वाढदिवस, पण माझं मन मला पुन्हा पुन्हा सांगत होतं की चल जाऊ केक घेऊन तीच्या घरी पण आपल्या नव-याबरोबर तुला आनंदी पाहून तसेच फिरले आपल्या पाऊली, सगळे मनाचे खेळ, मनाला कोण समजवणार. ह्यांचे आपले वेगळेच विश्व, ह्याला वास्तव ते बद्दल काही देणे घेणे नाही जे हवे ते हवेच जरी मेंदु नको म्हणाले तरी मन तीकडे जातचं.

मी आपल्या मनाला समजवण्याचा प्रयत्न चालू केले, बाबा रे तीचे आता लग्न झाले आहे, ती आपल्या संसारात सुखी आहे, पुन्हा पुन्हा तिच्या आठवणी काढून काहीच मिळणार नाही उलट आपल्यालाच त्रास होईल कुठे तरी खोलवर. कशाला हवा हा वेडेपणा आता, ती आहे ना सुखी. तिला राहू दे तीच्या भावविश्वामध्ये, कश्याला आपण मध्ये जायचे दोघांच्या.

आज सकाळी वेळतच ऑफिस मध्ये आलो, व कटाक्षाने मी तुझे विचार माझ्या मनातून काढून टाकत होतो, चुकून जरी वाटले की एक फोन तरी करावा तर आपल्या मनाला समजूत घालून राहिलो की विसर आता, खुप वेडेपणा झाला काल पासून, गेले काही दिवस तर ती तुला एकदाही आठवली नाही व कालपासून प्रत्येक क्षणाला तीची आठवण. येथेच मिपावर वावरताना वाहिदा यांच्या खालील ओळी वाचल्या व मनाला शांत करण्याचा प्रयत्न केला.

कुणाची ईतकी ही ओढ नसावी ,
की पदोपदी त्याचीच वाट बघावी !
त्याची वाट बघता बघता ,
आपलीच वाट दिशाहीन व्हावी !

मनाला समजावणे सुरु झाले , कि ति आता तिच्या नवर्‍या बरोबर सुखी आहे. आता तिच्या आठवणी काढुन काही एक फायदा नाहीये.आज सकाळी वेळेवर ऑफिसला आलो.सकाळ पासुन टाळत आलो तुला फोन करायचे. समजावत आलो की विसर तिला आता. हा काय वेडेपणा लावला आहे काल पासुन?? गेले काही दिवस तर तु तिची आठवण सुद्धा काढन नव्हतास. मग मि पा वर वावरताना वाहीदा यांच्या खालच्या ओळी वाचल्या आणि मनाला शांत करायचा प्रयत्न केला.

असाच सुन्नपणे दिवस घालवून आता घरी पोहचलो, अजून तरी तिला फोन केला नाही, आता कळत-नकळत फोन कडे हात ही जात नाही, असे वाटले मनाला समजले आहे, आता काहीच अर्थ नाही, काय करावे बसून हा विचार करता करता रविवारी घेतल्या ल्या सीडीज् ची पिशवी आठवली, त्यातून डिक्स बाहेर काढता काढता एक सीडी हाती आली गुलजार व सौमित्र ह्यांच्या कवितेची सीडी "तरीही". ह्यातल्या एका कवितेवर मी थबकलोच जसे माझ्याच मनात दोन दिवसापासून चाललेले द्वंद व्यक्त केले आहे असे वाटले.. ती कविता खाली देत आहे.

उद्या तिचा वाढदिवस मनात नाहीच धरायचा
खुप खुप वाटल तरी फोन नाही करायचा
उद्या तिचा वाढदिवस खुप खुप चालायच
जुने जुने मित्र शोधुन नविन सगळे बोलायच
स्वःता सोबत बोलतानाही उगाच नाही अडायच
संध्याकाळी गर्दी मधुन बाहेर नाही पडायच
गजबजलेल्या प्लॅट्फॉर्म वरती उगाच बसुन रहायच
घरी चाललेया माणसांकडे आपुलकीने पाहयच
गुड्डुप्प करुन काळोख आज लवकर झोपुन जायच
आज मोडायच नियम रात्र जागायच
पण खुप खुप वाटल तरी फोन नाही करायचा
बारा नंतर तिचि खुप आठ्वण येत राहिल
मन उठुन केक घुन तिच्या घरी जाईल
जणु काहिच घडल नाही अशिच ती पाहिल
नवरा घर मुल ह्यांचात पुन्हा रमुन जाईल
आपण पुन्हा रस्त्यावरती एकटे एकटे असतो
मध्यरात्री बारमधे मु़काट पिउन बसतो
आज पासुन असल जगण मुळिच नाही जगायच
आता पुन्हा कधिच वळुन मागे नाही बघायच
आज पासुन आपलाच हात हातात धरायचा
खुप खुप वाटल तरी फोन नाही करायचा

ह्या कवितेच्या शेवटी एक फोन वाजतो, हे सर्व लिहीत असताना माझा ही फोन वाजला असाच, पाहिलं तर तीचाच नम्बर ब्लिंक होत होता स्क्रिन वर....

जीवनमानलेखआस्वादसमीक्षा

प्रतिक्रिया

सहज's picture

26 Mar 2009 - 2:41 pm | सहज

किती वेळचा वाजतोय.

हॅपी बर्ड दे सांग आमच्यातर्फे!

पुढच्या वर्षीपण असाच साजरा करायचा का?

:-)

परिकथेतील राजकुमार's picture

26 Mar 2009 - 2:46 pm | परिकथेतील राजकुमार

वाढदिवस आवडला हो राजे.
एकदम सहज सुंदर.

©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी
एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य

mamuvinod's picture

26 Mar 2009 - 6:16 pm | mamuvinod

लिखा नहि हे अपना दिल उतारके रखा हे

खुपच छान राजे

निखिल देशपांडे's picture

26 Mar 2009 - 10:27 pm | निखिल देशपांडे

राजे

लै भारी लिहिले आहे हो....

माझ्या पेक्षा तर मस्तच....... मी पण पुढच्या वेळेस काही सुधारणा करायचा प्रयत्न करेन

लिखाळ's picture

27 Mar 2009 - 12:51 am | लिखाळ

राजे,
या लेखाचे प्रयोजन समजले नाही.
-- लिखाळ.

प्राजु's picture

27 Mar 2009 - 12:53 am | प्राजु

या लेखाचे प्रयोजन समजले नाही.

प्रयोजन कसले घेऊन बसला आहात? राजे आजकाल "महान प्रयोग " करताहेत. त्यातलाच एक आहे हा. (ह . घ्या.) :)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

दशानन's picture

27 Mar 2009 - 11:10 am | दशानन

बरोबर,

फक्त एक प्रयोग होता, प्रत्येकाची लेखन छैली वेगळी... प्रत्येकाची कुठल्याही गोष्टी कडे पाहण्याची नजर वेगळी... !

प्रयोगशील -

प्रमेय's picture

27 Mar 2009 - 2:50 am | प्रमेय

प्रयोजन कसले घेऊन बसला आहात?
हा काय प्रश्न आहे?

प्रश्न कसा पाहिजे: काय हो राजे, ही कोण? कोणाची? कुठली? आणि शेवटी, मग जमले ना?

च्यामारी, पण लग्नाच्या उल्लेखामुळे आता कायपण इचारता येईना की ओ राजे?
काय हे असे करून बसलात....

लागा परत उमेदवारीला...निवडणूक जवळ आली म्हण्त्यात लोक,...