(...उदरात ढकल काही!)

चतुरंग's picture
चतुरंग in जे न देखे रवी...
23 Mar 2009 - 9:57 pm

राघव यांची अतिशय सुंदर कविता ...उदयात शोध काही! वाचल्यावर अतिशय आनंद झाला आणि शोधाशोध करणारे आपण एकटेच नाही ह्या जाणिवेने बरे वाटले! ;)

अजुनी उपास का रे खाण्यावयास काही?
की घातलेस पुन्हा ओठांस बांध काही?

नेहमीच लाडु दिसतो फडताळ शोधताना..
चैतन्य जागवाया, उदरात ढकल काही!

पेटावयास वणवा फक्की जरा पुरेशी..
बोकाणण्यास चिवडा पुरतात क्षणच काही!

घे वाडगा पुढे तू खाण्यावयास जगणे
श्रीखंड केशराचे उरले अजून काही!

काट्यास मोडण्याचा घे ध्यास अंतरी तू!
भातात फोडणीच्या, दाणे मिळोत काही!

न्याहरीतल्या शिर्‍याचे अस्तित्व संपताना..
पुढच्याच जेवणाला रंगा यथेच्च खाई!!

चतुरंग

कविताविडंबनप्रतिभाविरंगुळा

प्रतिक्रिया

बिपिन कार्यकर्ते's picture

23 Mar 2009 - 10:14 pm | बिपिन कार्यकर्ते

रंगामास्तर!!!!!!!!! लंबर वन.....

बाकी तिथे तुमच्या ऐवजी माझे नाव पण घालू शकता... भूक आमची अतिशय जवळची मैत्रिण आहे. कध्धी कध्धी सोडून जात नाही आम्हाला.

अवांतर: इतक्या पटकन रंगाशेठची विडंबनं येतात की आज काल मला अशी शंका यायला लागली आहे की रंगाशेठनी सगळ्या रेग्युलर कवींबरोबर काहीतरी सेटिंग केले आहे. आधी विडंबन तयार होते आणि मग कवी कविता करतात की काय?!!! ;)

बिपिन कार्यकर्ते

लिखाळ's picture

23 Mar 2009 - 10:16 pm | लिखाळ

मलाही अशीच शंका येते..
विडंबनयोग्य कवितांना प्रकाशनपुर्व अनुमती लागते काय? ;)
-- लिखाळ.

चतुरंग's picture

23 Mar 2009 - 10:24 pm | चतुरंग

पाहिजे तर तुम्ही एखादी कविता टाका आणि पहा लगेच काय होतं तिचं! ;)

चतुरंग

लिखाळ's picture

23 Mar 2009 - 10:14 pm | लिखाळ

वा .. चांगल्या कवितेचे चांगले विडंबन !
बाई-बाटली-चकणा मुक्त विडंबन पाहून आनंद द्विगुणित झाला.
वाडगा, श्रीखंड, केशर हे शब्द आणि ओठांचा उल्लेख येऊनही त्याचा संदर्भ खाणे-उपवास याच्याशी पाहून सात्विक विडंबन वाचल्यासारखे वाटले :)

-- लिखाळ.

बिपिन कार्यकर्ते's picture

23 Mar 2009 - 10:18 pm | बिपिन कार्यकर्ते

उपासाला चालणार्‍या विडंबनाला उडंबन म्हणावे का? :?

बिपिन कार्यकर्ते

चतुरंग's picture

23 Mar 2009 - 10:22 pm | चतुरंग

शब्द छान आहे! ;)

चतुरंग

बेसनलाडू's picture

23 Mar 2009 - 10:19 pm | बेसनलाडू

(सहमत)बेसनलाडू

सहज's picture

24 Mar 2009 - 12:18 pm | सहज

>वाडगा, श्रीखंड, केशर हे शब्द आणि ओठांचा उल्लेख येऊनही त्याचा संदर्भ खाणे-उपवास याच्याशी पाहून सात्विक विडंबन वाचल्यासारखे वाटले

सहमत. आवडले उडंबन :-)

राघव's picture

24 Mar 2009 - 1:54 pm | राघव

बाई-बाटली-चकणा मुक्त विडंबन पाहून आनंद द्विगुणित झाला.
वाडगा, श्रीखंड, केशर हे शब्द आणि ओठांचा उल्लेख येऊनही त्याचा संदर्भ खाणे-उपवास याच्याशी पाहून सात्विक विडंबन वाचल्यासारखे वाटले

असेच म्हणतो!
नेहमीप्रमाणेच मस्त!! :)

राघव

मदनबाण's picture

23 Mar 2009 - 10:20 pm | मदनबाण

व्वा.. रंगाराव... इडंबन वाचुन भूक चाळवली आमची !!! :)
घे वाडगा पुढे तू खाण्यावयास जगणे
श्रीखंड केशराचे उरले अजून काही!

व्वा.

(आम्रखंड प्रेमी)
मदनबाण.....

"If debugging is the process of removing software bugs, then programming must be the process of putting them in." --- Unknown.

अवलिया's picture

23 Mar 2009 - 10:16 pm | अवलिया

वा! मस्तच !!

--अवलिया

प्राजु's picture

23 Mar 2009 - 10:27 pm | प्राजु

अजून कट्ट्याची तारीख नीटशी पक्की नाही झाली तर रंगा शेट.. खाण्याची स्वप्न पाहू लागले. (ह घ्या.)
सह्हीच विडंबन. मस्त मस्त!!
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

श्रावण मोडक's picture

23 Mar 2009 - 10:35 pm | श्रावण मोडक

सकाळी कविता वाचली तेव्हाच तोंडून अहा असे निघाले होते, त्याचवेळी संध्याकाळी रात्री केव्हातरी वावा म्हणावे लागणार असे वाटले होतेच. तसेच झाले. त्याबद्दल चतुरंगांचे आभार.
अवांतर : बोकाणण्यास चिवडा पुरतात क्षणच काही या ओळीत क्षण अवांतर वाटतो. बोकाकणण्यास चिवडा पुरतात क्षण काही हे पुरे वाटते. अर्थात, छंद, वृत्त, लय, ताल, मात्रा, गण, ते लगागागा वगैरेचा माझा दूरान्वयानेही संबंध नाही. तेव्हा तुमचे तुम्हीच पहा.

चतुरंग's picture

23 Mar 2009 - 10:37 pm | चतुरंग

पण तिथे मात्रा पूर्ती आवश्यक होती अन्यथा एकदम पायरी सटकल्यासारखे वाटते!
(अजून वेगळे शक्य असेलही पण फार विचार केला नाही!;) )

चतुरंग

क्रान्ति's picture

23 Mar 2009 - 10:41 pm | क्रान्ति

खूप खास विडम्बन! [मध्ये मध्ये पाकृमधले फोटू पण टाकायला हवे होते! मेजवानीच झाली अस्ती!]
क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}

जयवी's picture

24 Mar 2009 - 11:56 am | जयवी

चतुरंगा...... एकदम सही बॉस :)