सावज (भाग १)

अनाहूत's picture
अनाहूत in जनातलं, मनातलं
12 Aug 2019 - 4:59 pm

काही लोकांच्या नजरेतच ती गोष्ट असते जिने त्यांना एखादी गोष्ट करायला फारसे कष्ट करावे लागत नाहीत .
तिला काय झालं होत काय माहीत पण तिने आपोआप त्याच्या मागे चालायला सुरुवात केली . ते आलिशान हॉटेल होत . त्याने दरवाजा उघडला आणि त्याच्या नजरेच्या इशाऱ्याने ती आत गेली . त्याने एकवार बाहेर नजर टाकली आणि दरवाजा बंद करून घेतला.
==================================================

" करायला सगळं काही करता येत पण त्यासाठी मोबदला मोजावा लागतो आणि मोबदला नेहमी पैशात असत नाही तो कधीकधी वेळ , समर्पण , आणि कधीकधी ... "
" स्वतःचा जीवही " त्याचा हात काहीतरी शोधात होता .
==================================================

" Excuse me . " तिने वळून पाहिलं .
" माझी गाडी बंद पडली आहे . आणि फोनची बॅटरीसुद्धा संपली आहे . मला एक फोन करायचा होता . "
" Sure " असं म्हणत तिने त्याला घरात बोलावलं . चांगलाच प्रशस्त हॉल होता तो . खानदानी श्रीमंती जाणवत होती त्या सगळ्या वास्तूत . "
त्याचा फोन झाला आणि तो आभार मानून जाऊ लागला .
" बाहेर अजूनही पाऊस आहे , गाडीही बंद आहे . कुठ जाणार आहे ? "
" नाही मित्राला फोन केला . तो म्हणाला येतो म्हणून . "
" तो नाही येणार . " त्याने चमकून तिच्याकडे पाहिलं
" का ? "
तिने त्याच्याकडं एकदा पाहिलं आणि त्याच्या प्रश्नाच उत्तर न देता त्यालाच विचारलं
" कधी बाहेर पडला आहेस ? "
" दुपारी निघालो होतो . जरा जंगलाच्या बाजूने जाऊन यावं म्हणून तिकडे गेलो आणि मग त्या तिकडच्या नेहमी गर्दी नसते त्या रस्त्याने इकडे यायला निघालो मधे थोडी वाटही चुकलो त्यामुळ तासाभरात पोहोचायचं ते आता पोहोचतोय इथे . इथून पुढे काय अर्धा तासात पोहोचलो असतो सिटीमधे पण गाडी बंद पडली . जवळपास कुठल दुकान पण नव्हतं . मग थोडा इकडे तिकडे फिरलो तेव्हा तुमचा बंगला दिसला . "
" तुझी गाडी बंद जरी नसती पडली तरी सिटी मधे नसता जाऊ शकला असतास तू . "
ती स्पष्ट असं काही सांगत नव्हती . तिचं वागणं आणि बोलणं फार रहस्यमय वाटत होत त्याला .
" का ? " त्याने प्रश्न केला .
" ब्रिजवर पाणी आल आहे आणि वाहतूक बंद झाली आहे . "
" Oh Shit ! "
" काही इशू नाही तू थांब इथेच . सकाळपर्यंत पाणीही ओसरेल मग तू जाऊ शकतोस . "
" Oh, Thank you . " त्याच टेन्शन बरच कमी झालं होत .
" बर तू काही घेणार का ? " तिने त्याची विचारपूस केली .
" हा असा मौसम आणि या मधे... " त्याने मधेच थांबत मनातली गोष्ट टाळली .
" काय ? "
" एक कप चहा "
" तू चहा पिणार आहेस ? "
" हो , म्हणजे ... "
" ठीक आहे . बस तू . be confortable . मी आलेच . " असं म्हणून ती गेली . आणि थोड्याच वेळात ती वाईन घेऊन आली आणि तिने तो ट्रे त्याच्यासमोर ठेवला .
" हे काय तुम्ही वाईन घेऊन आलात ? "
" हेच योग्य आहे ना या वातावरणात ? "
" Actually हो . पण तुम्हाला कस बोलू म्हणून ... "
" But I get that "
" हे कोण घेतं ? "
" माझे मिस्टर ..."
" I must say he is a lucky guy "
" He was . He is no more now . "
त्याला एकदम धक्काच बसला . त्याने हातातला ग्लास खाली ठेवला आणि विचारलं
" काय झालं ? "
" He was murdered "
" Oh Sorry . मी तुम्हाला दुखावलं . "
" असू दे "
" पण मग तुम्ही इथे एकट्या राहता या अशा आडबाजूच्या बंगल्यामधे ? "
" हो . का ? "
" काही नाही जस्ट विचारलं . "
" आणि हे कधी झालं ? "
" महिना झाला "
" तुम्ही पुढे काय विचार केला आहे ? "
" कशाचा ? "
" स्वतःच्या फ्यूचरचा . "
" अजून नाही केला . "
" तुला काय वाटतय मी काय करावं ? "
" तुम्ही दुसरा जोडीदार शोधा . आयुष्य असच कस काढाल ? "
ती हसली " कोण करेल माझ्याशी लग्न ? "
" तुम्ही दिसायला सुंदर आहात कोणीही करेल "
" कोणीही ? "
" हो कोणीही "
" तू करशील ? "
" मी ? "
" का ? "
तिच्या या प्रश्नाने त्याला काही क्षण काही सुचलंच नाही पण लगेच त्याने स्वतःला सावरल
" I would love to . पण काय आहे अजून मी सेटल झालो नाही . मला तुझी जवाबदारी घ्यावी लागेल ना . "
" काय गरज आहे त्याची ? हा बंगला, आणि हि पाठीमागे पसरलेली सगळी प्रॉपर्टी माझी आहे . "
" so... "
" so don't think much and just enjoy this moment "

तिने त्याचा हात पकडला आणि त्याला स्वतः सोबत घेऊन निघाली . wine ची मादकता तिच्या डोळ्यात उतरली होती . त्यालाही तिच्या डोळ्यात उतरून ती मादकता अनुभवायची होती . तिने दरवाजा उघडला . त्याच लक्ष आत गेलं . रोमँटिक मूड ला आणखीनच रोमँटिक करणार वातावरण होत ते . ते मंद जळणारे दिवे तो , प्रशस्त बेड , त्या रेशमी बेडशीट्स . ती त्याला आत घेऊन आली . त्याच्यासाठी हे सारं स्वप्नवतच होत . तिने त्याला बेडवर बसवल . काहीही झाल तरी तो तिच्यासमोर नवखाच होता . त्या वातावरणाची मोहिनी त्याच्यावर पडली होती . तो तिला मुग्ध होऊन पाहत होता . आता तिला कवेत घ्यावं या भावनेनं त्यानं तिचा हात पकडण्याचा प्रयत्न केला . तशी ती हळूच त्याच्यापासून दूर झाली आणि " मी आलेच " म्हणत ती कुठेतरी गेली . त्याने सभोवार नजर फिरवली . ते वातावरण खरच त्याच्यावर मोहिनी घालत होत . तो आसपास पाहत होता तेव्हड्यात ती आली . फार वेळ न लावता ती छान तयार होऊन आली होती . तिने हलकासा शॉवर घेतला होता , मोहक आणि मंद असा परफ्युम तिने मारला होता आणि जो ड्रेस परिधान केला होता तो त्याला तिच्याकडे आकर्षित करत होता . त्याने तिचा हात हातात घेतला व तिला स्वतःकडे ओढलं . ती जवळ येताच त्याने तिला कवेत घेतल . तिचा गंध त्याच्या रोमारोमात संचारत होता . तो क्षणभर तिला दूर करून न्याहाळू लागला . तिच्या डोळ्यात धुंद होऊन त्याने त्याचे ओठ तिच्या ओठावर टेकले आणि त्यांचा रस तो प्राशन करू लागला . त्याला समजतच नव्हत जास्त धुंदी कशात आहे , तिच्या डोळ्यात कि तिच्या ओठात . तो कितीतरी वेळ त्यांच प्राशन करतच होता .
================================================

रात्र किती सरली होती काय माहित ? तो खिडकीतून बाहेर बघत बसला होता . ती हळुवारपणे त्याच्यापाशी आली . तिने नाजूकपणे पाठीमागूनच त्याला मिठी मारली . आणि त्याच्या कानापाशी ओठ नेऊन त्याच्या कानात बोलली
" मला अशी अधुरी नको ना सोडूस . चल ना . " म्हणत ती आर्जव करत होती .
=================================================

काही लोकांच्या नजरेतच ती जि गोष्ट असते जिने त्यांना एखादी गोष्ट करायला फारसे कष्ट करावे लागत नाहीत . तिला काय झालं होत काय माहीत पण तिने आपोआप त्याच्या मागे चालायला सुरुवात केली . ते आलिशान हॉटेल होत . त्याने दरवाजा उघडला आणि त्याच्या नजरेच्या इशाऱ्याने ती आत गेली . त्याने एकवार बाहेर नजर टाकली आणि दरवाजा बंद करून घेतला.
" हे पहा मी आले " म्हणत तिने धावत जाऊन त्याला मिठी मारली आणि अधाशीपणे त्याची चुंबनं घेऊ लागली . तो मात्र शांत स्थिर होता . ती मात्र अधीर होत होती . तिने त्याला घट्ट मिठी मारली होती . तिला ते असह्य झालं होत त्यामुळे तिने दोन्ही पाय उचलून त्यांनी त्याच्या कमरेला वेढा दिला होता . ती त्याला परत परत बेड कडे घेऊन जाण्याची आर्जव करत होती .
....क्रमशः

कथासाहित्यिकलेखविरंगुळा

प्रतिक्रिया

चौथा कोनाडा's picture

12 Aug 2019 - 5:59 pm | चौथा कोनाडा

ज ब र द स्त ..... ! व्हेरी रो च क .... !

पुढील भागाच्या प्रतिक्षेत !

मराठी कथालेखक's picture

12 Aug 2019 - 6:23 pm | मराठी कथालेखक

तुम्ही लिहिता छान .. पण शृंगार अर्धवट सोडली होती .. ही पुर्ण कराल ना नक्की ?

ज्योति अळवणी's picture

13 Aug 2019 - 9:22 am | ज्योति अळवणी

सुरवात मस्त आहे. पुढचा भाग लवकर येऊ दे

जॉनविक्क's picture

13 Aug 2019 - 12:19 pm | जॉनविक्क

आत्ता तरी बाईच डेंजर वाटली होती म्हणजे बहुतेक...

जेम्स वांड's picture

14 Aug 2019 - 9:59 am | जेम्स वांड

शृंगार हिडीस किंवा मिसोजिनिस्ट न करता लिहिणे एक कला आहे आणि तुम्हाला ती साधली आहे असे दिसते. मला तर पावसाळी रात्र अन आडवळणाचा बंगला वगैरे वाचून ती भूत असावी असे वाटले होते, पुभाप्र.

आपल्या सर्वांच्या प्रतिक्रियांसाठी खूप खूप आभारी आहे

किसन शिंदे's picture

19 Aug 2019 - 6:24 pm | किसन शिंदे

मस्त लिहिलंय !!

Namokar's picture

19 Aug 2019 - 6:44 pm | Namokar

छान केली सुरुवात

मस्त सुरुवात! पुढील भागाच्या प्रतिक्षेत!

अनाहूत's picture

24 Aug 2019 - 12:04 pm | अनाहूत