हे असे का असावं?

तमराज किल्विष's picture
तमराज किल्विष in जनातलं, मनातलं
5 Aug 2019 - 11:05 am

लहान असल्यापासून मी जरा एकलकोंडा मनुष्य आहे. फक्त नातेवाईक, शेजारपाजारच्या लोकांशी मनमोकळेपणाने मिसळू शकतो पण नवीन लोकांशी बोलायला, कुणाच्या घरी जायला मन तयार होत नाही. शाळेत, कॉलेजमध्ये एवढी अडचण आली नाही. ठराविक मित्रांबरोबर सुट झालो. नोकरी मध्ये सुद्धा आपण भलं आणि आपलं काम भलं.
जास्त संबंध कुठे वाढविले नाही, सासरच्या लोकांशी संबंध आलेल्यांचे स्वागत, चाललेल्यांचे आभार असे ठेवले.
बालपणापासून वाचनाची खूप आवड लागली, मिळेल ते वाचून काढले. बऱ्याचदा पुस्तकांमध्ये इतका गढून जायचो की आजूबाजूला कोण काय करतं, बोलतंय हे कळायचं नाही. कुणी किती हाका मारल्या तरी ऐकू यायच्या नाही. यामुळे मला कल्पना रंजन करत राहण्याची सवय झाली. कोणत्याही देव, संत, खेळाडू, देशभक्त, राजे, ग्रंथ यांचं नाव कानावर पडताच मनात लगेच विचारचक्र सुरू होतं, ते लवकर थांबतच नाही. सिनेमा पाहिला तर किमान आठवडाभर त्याचं विश्लेषण मनात सुरू राहतं. प्रयत्न करूनही विचार थांबत नाहीत.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे आजकाल बॅकग्राऊंड ला जसं संगीत चालू असते. तसे सारखे दोन किंवा जास्त व्यक्ती संभाषण करत आहेत हे जाणवत राहते. अनेकदा अतर्क्य जे कधीच ऐकले, वाचले नाही असे संभाषण पाहून मीच आश्र्चर्यचकित होतो. रात्री हा प्रकार खूपच ठळक ऐकू येतो. खूप प्रयत्न करुन या संवादातील एखादं वाक्य नीट लक्षात घेऊन हे काय आहे हे पाहिले तर संदर्भहीन, असंबद्ध वाक्य असल्याचं ध्यानात येते. मुन्नाभाई एमबीबीएस मधील केमिकल लोच्या सारखा हा प्रकार आहे का असे वाटते.
आजपर्यंत कुणा डॉक्टरला मी याविषयी विचारले नाही. पण आता मनाची शक्ती फारच ड्रेन झाल्यासारखी वाटते.
कृपया हा मानसिक आजार आहे, की आणखी काय आहे आणि याला उपाय काय हे सहानुभूतीने समजावून सांगावे ही विनंती.
प्रश्नोत्तरे विभागात जाता न आल्याने इथे लिहीलं आहे.

आरोग्यसल्ला

प्रतिक्रिया

तमराज किल्विष's picture

5 Aug 2019 - 4:54 pm | तमराज किल्विष

अरे व्वा. एकशे चाळीस लोकांनी वाचले. धन्यवाद.

हस्तर's picture

5 Aug 2019 - 5:07 pm | हस्तर

मला पन असेच वतते
मि सादर चित्रपत म्हनुन धागे तक्ले
ननतेर अचनक गायब
एक अकु कका अमवस पुर्निमा झालि कि येतत

जॉनविक्क's picture

5 Aug 2019 - 5:45 pm | जॉनविक्क

सर्वात महत्त्वाचे म्हणजे आजकाल बॅकग्राऊंड ला जसं संगीत चालू असते. तसे सारखे दोन किंवा जास्त व्यक्ती संभाषण करत आहेत हे जाणवत राहते. अनेकदा अतर्क्य जे कधीच ऐकले, वाचले नाही असे संभाषण पाहून मीच आश्र्चर्यचकित होतो. रात्री हा प्रकार खूपच ठळक ऐकू येतो.

एखादे उदा. देता येईल का ऐकू येणाऱ्या संभाषणाचे ?

तमराज किल्विष's picture

5 Aug 2019 - 5:52 pm | तमराज किल्विष

धन्यवाद जॉन विक्क जी . हा प्रकार चालूच राहतो. अतिशय सजगतेने पकडायला गेले तरी एखादं वाक्य हाती लागतं. जास्त कॉन्सन्ट्रेट केले की संभाषण थांबते.
हे वाक्य काहीही असतं. जसं एखाद्या हॉटेलात चाललेला कोलाहल. बस स्थानक, रेल्वे स्थानकावरील गोंगाट यासारखं.

अतिशय सजगतेने पकडायला जाताना मात्र बरेचदा आपण आपलेच वाक्य/विचार ऐकू येणाऱ्या गोंगाटात लादण्याची शक्यता नाकारता येत नाही

तमराज किल्विष's picture

5 Aug 2019 - 5:52 pm | तमराज किल्विष

जी लावला! क्षमस्व!

तमराज किल्विष's picture

5 Aug 2019 - 7:46 pm | तमराज किल्विष

नाही.

ते वापरून खात्री करा की आवाज येत नाहीत ते.

सुबोध खरे's picture

5 Aug 2019 - 8:19 pm | सुबोध खरे

कान बंद केल्यावर आवाज येत नाही असे असेल तर कानाच्या डॉक्टरला दाखवून घ्या आपल्या अन्तर कर्णात (INNER EAR) गडबड झाली तर असे होऊ शकते

तमराज किल्विष's picture

5 Aug 2019 - 8:24 pm | तमराज किल्विष

डॉक्टर साहेब मला संभाषणं चालली असे भास होतात. शिट्टीसारखे आवाज येत नाहीत. मला तरी हा प्रकार अति जलद विचार करण्यामुळे होत असावा असे वाटते.

विशेषतः आशा आवाजाने झोपमोड होणे वगैरे ?

तमराज किल्विष's picture

5 Aug 2019 - 9:06 pm | तमराज किल्विष

सतत दिवसाही सुरू राहतो. पण इतका लक्षात येत नाही. रात्री शांततेत त्रासदायक वाटतो.

जॉनविक्क's picture

5 Aug 2019 - 9:21 pm | जॉनविक्क

कान बंद केल्यावर जर आवाज ऐकू येत नसतील तर काळजीचे कारण वाटत नाही.

मात्र तरीही आवाज येत असतील तर टीनिटस, फ़ंगस साठी ENT तज्ञ गाठा जर कान निर्दोष असतील तर मग मानसोपचार तज्ञ गाठावा लागेल.

नुसता विचार करून शरीरास लागलेल्या काही चुकीच्या सवयींमुळे जर रक्त वाहिन्यांवर ताण येत नसेल तर असे आवाज ऐकू येणं हा मनोव्यापाराचाच प्रांत असू शकतो.

मी माझी निरीक्षणे गांभीर्यानेच देत आहे, विकेट घ्यायला मला आधी खेळाडू तंदुरुस्त हवे असतात :)

सुबोध खरे's picture

6 Aug 2019 - 6:38 pm | सुबोध खरे

जर कान निर्दोष असतील तर मग मानसोपचार तज्ञ गाठावा लागेल.

हेच लिहिणार होतो

परंतु मानसोपचार तज्ञ म्हटले कि लोक लगेच घुमजाव करतात म्हणून अगोदर कानाच्या तज्ज्ञाकडे

डॉ सुहास म्हात्रे's picture

10 Aug 2019 - 6:57 pm | डॉ सुहास म्हात्रे

विकेट घ्यायला मला आधी खेळाडू तंदुरुस्त हवे असतात =))

तमराज किल्विष's picture

5 Aug 2019 - 9:08 pm | तमराज किल्विष

जॉन भाऊ सिरियसनेसनेच विचारत आहे का विकेट घेणे चाललं आहे. तिकडे मायबोलीवर एकजण उगाचच मागं लागला या विषयावर.

तमराज किल्विष's picture

6 Aug 2019 - 7:40 am | तमराज किल्विष

धन्यवाद.

जास्त कॉन्सन्ट्रेट केले की संभाषण थांबते.

हे लक्षण चांगले आहे. युट्यूबवर ‘गायडेड मेडीटेशन‘चे व्हिडीयो बघून ध्यान करा किंवा चांगल्या ध्यानकेंद्रात जाऊन ध्यान करणए शिकून घ्या.

- (ध्यानयोगी) सोकाजी

तमराज किल्विष's picture

6 Aug 2019 - 2:44 pm | तमराज किल्विष

धन्यवाद सोत्रि भाऊ.

काॅलिंग शक्तिमान व सूर्यांशी

तमराज किल्विष's picture

7 Aug 2019 - 8:39 am | तमराज किल्विष

हॅलो बोला.

तमराज किल्विष's picture

7 Aug 2019 - 3:06 pm | तमराज किल्विष

गीता मला फार आवडायची. खूप इनोसंट होती.

जॉनविक्क's picture

7 Aug 2019 - 3:44 pm | जॉनविक्क

तमराज किल्विष's picture

7 Aug 2019 - 7:11 pm | तमराज किल्विष

उज्वल यांना उद्देशून लिहिले होते.

डॉ सुहास म्हात्रे's picture

10 Aug 2019 - 7:07 pm | डॉ सुहास म्हात्रे

गीता मला फार आवडायची. खूप इनोसंट होती. हे जॉन भाऊ सिरियसनेसनेच विचारत आहे याच्याशी अजिबात जुळत नाही.*

ती दोन विधाने वाचून कोणी, "हा लेख म्हणजे तुम्ही फावल्या वेळेचा उद्योग चालवला आहे", असे म्हटले तर वाईट वाटून घेऊ नका... आणि आजारपणाचे निमित्त काढून गळा तर अजिबात काढू नका.

मात्र, वरची दोन्ही वाक्ये गंभीरपणे लिहिली असली तर, वेळ न घालवता मानसोपचार तज्ज्ञाला गाठा. कारण, ती अवस्था, "फ्लाईट ऑफ थॉट्स" असू शकते, जी फार गंभीर गोष्ट आहे. हे मत एका मिपाकराच्याबद्दलच्या (तुमच्याबद्दलच्या) काळजीमुळे गंभीरपणे लिहिलेले आहे.

++++++++++++++++++

* जबानीतले असे निसटते क्षण चोरी पकडायला पोलिस वापरतात, असे म्हणतात. ;) :)

जॉनविक्क's picture

10 Aug 2019 - 7:28 pm | जॉनविक्क

गीता मला फार आवडायची. खूप इनोसंट होती. असे मी केंव्हा म्हटले ?

डॉ सुहास म्हात्रे's picture

11 Aug 2019 - 12:03 pm | डॉ सुहास म्हात्रे

प्रतिसादांची हायरार्की पाहिली तर माझा प्रतिसाद धागा लेखकाला (तमराज किल्विष) आहे असे दिसेल. :)

जॉनविक्क's picture

11 Aug 2019 - 12:12 pm | जॉनविक्क

माझीच प्रतिसाद समजून घेण्यात चूक झाली. क्षमस्व.

डॉ सुहास म्हात्रे's picture

11 Aug 2019 - 1:03 pm | डॉ सुहास म्हात्रे

क्षमा मागण्याची अजिबात गरज नाही. प्रतिसादांच्या हायरार्कीच्या प्रणालीमुळे असा गैरसमज होऊ शकतो.

तमराज किल्विष's picture

10 Aug 2019 - 8:00 pm | तमराज किल्विष

:-)) कृपया शेवटचा प्रतिसाद पहावा.

प्रकाश घाटपांडे's picture

7 Aug 2019 - 3:16 pm | प्रकाश घाटपांडे

तुम्ही हे गांभीर्याने लिहित असाल तर मानसोपचारतज्ञाचा सल्ला घेणे हे उत्तम. हल्ली तर तरुण पोर देखील मूड मॅनेजमेंटसाठी सायकियाट्रिस्ट कडे जातात.

तमराज किल्विष's picture

7 Aug 2019 - 7:10 pm | तमराज किल्विष

शक्तिमान सिरियल मधली गीता.
प्रकाश जी सायकियाट्रिटकडे जावे की सायकॉलॉजीस्ट कडे जावे. एकदा सायकियाट्रीटच्या गोळ्या घेतल्या आहेत. फार भयंकर दुष्टचक्रात अडकल्यासारखे झाले होते. सतत गुंगी व शरीरक्रिया इतकी संथ झाली की बस. गोळ्या बंद केल्या तर वेड लागल्यासारखे होत होते. कसेतरी बाहेर पडलो.

प्रकाश घाटपांडे's picture

7 Aug 2019 - 7:17 pm | प्रकाश घाटपांडे

मेडिकेशन व थेरपि असे ढोबळ्मानाने दोन पन्थ आहेत ते प्राधान्यक्रमानुसार ,थेरपि वाले अग्रक्रमाने थेरपि ला मह्त्व देतात

मग हे काय होते ?

आजपर्यंत कुणा डॉक्टरला मी याविषयी विचारले नाही. पण आता मनाची शक्ती फारच ड्रेन झाल्यासारखी वाटते.
कृपया हा मानसिक आजार आहे, की आणखी काय आहे आणि याला उपाय काय हे सहानुभूतीने समजावून सांगावे ही विनंती.

डॉ सुहास म्हात्रे's picture

11 Aug 2019 - 12:05 pm | डॉ सुहास म्हात्रे

त्यांना त्यांच्या भरोशावर सोडा... ते इतरांच्या मनाची शक्ती ड्रेन करण्याचा प्रयत्न करत आहेत. =))

जॉनविक्क's picture

11 Aug 2019 - 12:15 pm | जॉनविक्क

इतरांना ड्रेन करण्यात ते फार ट्रेन वाटतात खरे :) पण... मन मानत नाही हो ;(

डॉ सुहास म्हात्रे's picture

11 Aug 2019 - 1:04 pm | डॉ सुहास म्हात्रे

:)

तमराज किल्विष's picture

8 Aug 2019 - 8:48 am | तमराज किल्विष

जॉन भाऊ मला मागे अचानक कोणत्याही कारणाशिवाय डिप्रेशन आलं होतं तेव्हा ती ट्रिटमेंट घेतली होती. ती घेऊन पंधरा सोळा वर्षे झाली आहेत. आताचा प्रॉब्लेम वेगळा आहे.

राघव's picture

9 Aug 2019 - 3:17 pm | राघव

नमस्कार,
तुम्ही हे सर्व फार गांभीर्यानं लिहिलं आहे आणि हा प्रॉब्लेम अजूनही तुम्हांस त्रास देतोय असं गृहित धरतो.

हा प्रॉब्लेम मला होऊन गेला आहे. आणि मला तरी निदान कोणा डॉक्टरकडे जायची गरज पडली नाही. त्या अनुषंगानं काही प्रश्न खाली लिहिलेत. त्यांची उत्तरं इथे दिली नाहीत तरी चालेल, पण तुमच्या जवळ असू द्यात. जर कान बरोबर असेल आणि प्रॉब्लेम अजूनही असेल तर, या प्रश्नांचा तुम्हाला उपयोग होईल.

- तुम्ही शांत अशी साधारण ६-७ तास सलग झोप शेवटची कधी घेतली होतीत?
- सलग झोप लागत नसल्यास रात्रीत कितीवेळा तुम्हाला जाग येते? कारण काय?
- ऑफिस कामाव्यतिरीक्त, खूप डोकं लावावं लागेल अथवा विचार करावं लागेल अशा किती बाबींमधे तुमचा [ कृतीशील्/सुप्त ] सहभाग आहे? त्यात तुमचा दिवसाचा किती वेळ जातो?
- आपण जो विचार करतो तो दुसर्‍याला सांगतांना तुमच्या कधी असं लक्षात आलंय का, की समोरच्याला ते खूप हळू आकलन होतंय?
- १ ते ५ च्या पट्टीवर, भावनिक दृष्ट्या कणखरतेबद्दल तुम्ही स्वतःला कुठे बघाल?
- एखादी गोष्ट सलग खूप तास बिना ब्रेक घेता तुम्ही केली आहे काय? खासकरून जेथे खूप विचार करावा लागेल अशी? असेल तर किती वेळा?
- एखादी जुनी आणि तुम्हाला न आवडणारी आठवण, तुम्ही घोळवत ठेवलीये का? असल्यास अगदी हसत हसत कुणाला सांगून पाहिली आहे का? तसे करून बघाल का?
- तुम्ही डोकेदुखी, अंगदुखी किंवा तत्सम पीडेवर गोळ्या घेताय का? असल्यास महिन्यातून कितीवेळा?

वैचारिक अतिरेकाच्या एका क्षणी असा अनुभव येतो, हा निदान माझा तरी अनुभव आहे. जर तुम्हाला आपण वैचारिक अतिरेक करत असल्याचे जाणवले तर खालील उपाय मदत करतील.
- सकाळी उठल्यावर, कुत्रा/मांजर जेवढे स्ट्रेच करतात व जेवढावेळ करतात, तेवढा तरी व्यायाम करावा.
- जर मैदानी खेळ खेळायला आवडत असेल तर जसे जमेल तसे, थोडे का होईना, जरूर खेळावे.
- ज्या गोष्टीत, मी आत्ता स्वतः काहीही करू शकत नाही, त्यांना मी आत्ता तरी सोडतोय असं मनाला नीट समजवावं. या गोष्टीला थोडा वेळ लागतो, पण एखाद्या लहान अन् द्वाड मुलाला आपण कसं जवळ घेऊन नीट सांगायचा प्रयत्न करू.. तसं हे मनाला समजवावं लागतं. असे एकेक विषय नीट समजावून हातावेगळे करावेत. विचारांचा अतिरेक यामुळे नक्की कमी होतो.
- शक्यतो घरच्यांच्या सोबत बसून, सगळ्यांनी मिळून एकत्र जेवावं.
- रात्री झोपण्याच्या आधी शांत, संथ पण आनंदमधुर असं संगीत ऐकावं [दु:खी नको]. जमल्यास गुणगुणावं.

टीपः हे सर्व मी माझ्या अनुभवावरून लिहिलेलं आहे. सगळ्यांनाच ते तसंच लागू पडेल असं नाही. पण मदत होईल असं वाटतं. जर नाही झाली तर सोडून द्यावं.

राघव

तमराज किल्विष's picture

10 Aug 2019 - 7:45 am | तमराज किल्विष

खूप धन्यवाद राघवजी. मला झोप कधीकधी दहा ते बारा तास लागते, तर कधी रात्रभर जागा राहतो. मला माझ्या हातून घडलेल्या चूका ज्या समोरच्यांच्या लक्षातही राहिल्या नाहीत, किंवा त्यांनी ते सोडून दिले आहे अशा क्षुल्लक देखील चुकांची खूप बोचणी लागते, मनात त्या चुका मनाविरुद्ध आठवतात त्यावेळी खूप वैफल्याची भावना येते. सेल्फ इमेज बिल्डिंग मध्ये गडबड आहे, स्वत:ला दोष देण्याचा स्वभाव आहे.
पण मला जी संभाषणं ऐकू येतात त्याचा नि याचा संबंध नसावा असे वाटते. मी कोणतेही औषध घेत नाही. वेदनाशामक औषधांचे दुष्परिणाम माहीत असल्यामुळे घेतच नाही.

ठीक आहे. तसंच काहिसं असेल असं वाटलं होतं.

स्वतःच्या लहान लहान चुकांकडे त्रयस्थपणे बघून त्यांना हसण्यावारी नेणे..
अशा बहुतांश चुका आपल्या जवळच्या व्यक्तींच्या पुढे मांडून त्यावर स्वतःच विनोद करणे..

यामुळे मनावरचा ताण कमी होतो, त्या चुकांची आठवण कमी त्रासदायक होते हा स्वानुभव आहे.
अर्थात् सगळ्याच गोष्टींबद्दल असं आपण करू शकत नाही, हे मान्य. असो.
--
वर नमूद केलेले प्रयोग आपणांस वाटलेत तर जरूर करून पहावेत.
बाकी चांगल्या मानसोपचारतज्ञाकडे जाण्याचा श्रेयस्कर मार्ग आहेच, जो कधीही उत्तम. शुभेच्छा.

तमराज किल्विष's picture

10 Aug 2019 - 10:54 am | तमराज किल्विष

धन्यवाद सर

जॉनविक्क's picture

10 Aug 2019 - 11:31 am | जॉनविक्क

मनात त्या चुका मनाविरुद्ध आठवतात त्यावेळी खूप वैफल्याची भावना येते. सेल्फ इमेज बिल्डिंग मध्ये गडबड आहे, स्वत:ला दोष देण्याचा स्वभाव आहे

तुम्ही प्रचंड तणवग्रस्त आहात. म्हणून निगेटिव इमोशन जास्त तीव्र अनुभवाला येत आहेत. आधी फक्त आवाजाचा त्रास होता असे वाटले, पण आता आपली परिस्थिती कठिण भासत आहे. आपण त्वरित समूपदेशन आणि औषधे दोन्ही घेणे श्रेयस्कर.

तमराज किल्विष's picture

10 Aug 2019 - 4:35 pm | तमराज किल्विष

जॉन भाऊ मी तणावग्रस्त नसुन माझा स्वभाव अतिसंवेदनशील आहे. कुणाला दुखावलं तर नाही ना ही भावना फक्त छळते.

जॉनविक्क's picture

10 Aug 2019 - 5:32 pm | जॉनविक्क

असा तणाव फार लहानपणा पासून असेल तर संवेदनशील स्वभाव अशी आपण समजूत करून घेतो. गिल्ट फिलिंग सुद्धा त्याचाच भाग.

डॉ सुहास म्हात्रे's picture

10 Aug 2019 - 7:14 pm | डॉ सुहास म्हात्रे

अशी स्वतःच्या आजाराबद्दल निदान स्वतःच करणे नंतर फार महागात पडू शकते. ते टाळावे. त्रास जास्त झाला की त्याबाबतीतल्या तज्ज्ञाचा सल्ला घेणे केव्हाही चांगले.

https://www.misalpav.com/comment/1042463#comment-1042463

तमराज किल्विष's picture

10 Aug 2019 - 7:56 pm | तमराज किल्विष

इथे प्रतिसादांची सरमिसळ होते आणि त्यामुळे गैरसमज होतो. माझ्या दुसऱ्या लेखावरही असेच झाले.
माझ्या तमराज किल्विष या आयडीला उद्देशून उज्वल यांनी शक्तिमान, सुर्यांशी या शक्तिमान सिरियल मधली पात्रांची आठवण करून दिली. तेव्हा मी त्यांना मला गीता ( सिरियल मधली) फार आवडायची असा गंमतीशीर प्रतिसाद दिला. इकडे प्रतिसाद शेवटी जात नाही. मध्येच जातो. व मलाही क्रोम मध्ये नवीन प्रतिसाद कोणते आहेत हे लवकर लक्षात येवू नाही राहीले. ब्राऊजरचा प्रॉब्लेम असावा.

जॉनविक्क's picture

11 Aug 2019 - 8:08 am | जॉनविक्क

मिपा सन्यास घ्यावा असा एक त्वरित उपायहि सूचवतो कारण मिपाकरांच्या वैचारिक चर्चा वाचून तुमचा त्रास 200% वाढू शकतो.

तमराज किल्विष's picture

11 Aug 2019 - 9:15 am | तमराज किल्विष

समजा उलट झाले तर?

जॉनविक्क's picture

11 Aug 2019 - 9:56 am | जॉनविक्क

हवं तर तुम्हाला डॉनल्ड ट्रम्प सुधा समजू...

जॉनविक्क's picture

11 Aug 2019 - 11:22 am | जॉनविक्क

तमराज किल्विष's picture

12 Aug 2019 - 7:43 am | तमराज किल्विष

जॉन विक्क भाऊ एवढे विक होऊ नका. माझ्या लेखणाचा त्रास करून घेण्यापेक्षा तुम्ही संन्यास घ्या. तूमचा तणाव ३०० टक्के वाढलाय असं दिसतं.

तुम्ही काय करावे हे सांगायचा मला अधिकार नाही परंतु आपला त्रास कमी व्हावा असे मनापासून वाटत असल्याने मी फक्त आपलं निरीक्षण नोंदवले.

मिपावर तुम्ही आम्हाला हवेच आहात. पण त्यासाठी तुम्ही तुमच्यामानसिक आरोग्याचा बळी द्यावा हे पटत नाही हो :(

मराठी कथालेखक's picture

12 Aug 2019 - 1:03 pm | मराठी कथालेखक

तमराजजी,
तुम्ही हे गांभीर्याने लिहिलं आहे असं गृहीत धरुन मी प्रतिसाद देत आहे.
एक शक्यता म्हणून हे विचारात घ्या
तुम्ही जिथे राहता तिथे जवळपास वा काही दूर खरेच काही कोलाहल असू शकतो.. तो आवाज क्षीण असेल आणि इतरांना ऐकू येत नसेल पण तुम्हाला ऐकू येतो. याचा अर्थ तुमच्या कानांची क्षमता प्रचंड वाढलेली आहे असे असू शकते. दिवसा संभाषणांच्या आवाजाखेरीज असे अनेक आवाज तुम्हाला ऐकू येत असतील आणि त्यामुळे संभाषणाच्या आवाजाचा त्रास होत नसेल वा ते फारसे जाणवत नसतील. पण रात्री इतर आवाज कमी झाल्याने संभाषणांचे आवाज तुम्हाला जास्त जाणवत असतील.. तुम्ही ही शक्यता तपासून बघण्याकरिता खालील गोष्टी करु शकता
१) संभाषणांच्या आवाजाव्यतिरिक्त इतर काही दूरचे आवाज (जसे बस, ट्रेनचे, भांड्यांचे ई ई) ऐकू येतात का ते बघा
२) जिथे दूरदूर पर्यंत खरंच खूप शांतता आहे अशा एखाद्या ठिकाणी रात्री संभाषणांचे आवाज ऐकू येतात का ते बघा.. एखाद्या साउंडप्रुफ खोलीत हे तपासा
जर ही शक्यता खरी निघाली तर या गोष्टीकडे समस्या म्हणून बघू नका.. ही एक निसर्गाची देणगी आहे. (मी दैवी वगैरे म्हणत नाही... हे फक्त व्हेरिएशन आहे) .
जमिनीत एखाद्या ठिकाणी विहीर(वा बोअरवेल) खणली तर पाणी लागेल की नाही हे सांगू शकणारे काही विशिष्ट लोक असतात त्याबद्दल तुम्ही ऐकले आहे का ? त्यात अंधश्रद्धा वगैरे नाहीये तर त्या लोकांची श्रवणक्षमता इतर सामान्य माणसांच्या तुलनेत खूप जास्त असते.
जसं कुत्र्याची त्यातही श्वानपथकात असतात त्या जातीच्या कुत्र्यांची गंध समजण्याची क्षमता अतिप्रचंड असते आणि माणसांच्या दृष्टीने तर तो केवळ एक चमत्कारच.. तसंच काहीस काही माणसांच्या श्रवणक्षमतेबाबत असावं...

राजेंद्र मेहेंदळे's picture

13 Aug 2019 - 5:47 pm | राजेंद्र मेहेंदळे

बराच वेळ प्रतिक्रिया वाचत होतो, पण हा मुद्दा म.क.नी नवीनच काढला.

१. रात्री झोपताना कानात पोहताना घालायचे रबराचे स्टॉपर घालुन झोपा.
२. झोपायच्या आधी ध्यान किवा जप करायची सवय असेल तर उत्तमच, नसल्यास लावुन घ्या
३. सकाळी किवा संध्याकाळी, जेव्हा वेळ असेल तेव्हा जॉगिंग करा, जॉगिंग करताना शरीराला पळवत ठेवुन आणि मन वेगळे विचार करत राहते असे मला जाणवते. कधी कधी काही समस्यांची उत्तरेही सापडतात तेव्हाच.

तमराज किल्विष's picture

13 Aug 2019 - 2:11 pm | तमराज किल्विष

मराठी कथालेखक जी असा मी विचार केलेला नाही. पण बऱ्याचदा ओळखीच्या लोक प्रत्यक्ष बोलल्या प्रमाणे त्यांचं एखादं वाक्य गपकन कानावर येते. तसेच समोरासमोर बोलताना समोरच्या माणसाच्या मनात असलेला प्रश्नाला मी उत्तर देतो तर तो आपण याला विचारले नाही तरी याने हा विषय कसा काय काढला हे पाहून आश्र्चर्यचकित होतो हे मी नेहमी पाहतोय. थोडीफार इंट्युशनची देणगी मला आहे. काही साधना मी केल्या आहेत. पण हे संभाषणं निरूपद्रवी असली तरी हे काय चाललंय ते न कळल्याने अस्वस्थता वाटते.

जॉनविक्क's picture

13 Aug 2019 - 2:45 pm | जॉनविक्क

समोरच्या माणसाच्या मनात असलेला प्रश्नाला मी उत्तर देतो तर तो आपण याला विचारले नाही तरी याने हा विषय कसा काय काढला हे पाहून आश्र्चर्यचकित होतो हे मी नेहमी पाहतोय.

ओह माय गॉड, तुम्हाला इतरांच्या मनातले विचार आवाज स्वरुपात ऐकू येतात होय... हे तर एकदम अगोबाई अरेच्चा सारखे प्रकरण वाटत आहे.

डॉ सुहास म्हात्रे's picture

13 Aug 2019 - 7:31 pm | डॉ सुहास म्हात्रे

वैधानिक इशारा : त्यांना तुमच्या मनातली सगळी गुपितं दिसण्या-ऐकू येण्याअगोदर, थांबा ! ;) =))

जॉनविक्क's picture

13 Aug 2019 - 10:31 pm | जॉनविक्क

थोडीफार इंट्युशनची देणगी मला आहे.

तकी सेठ आपल्याकडे अक्यूमनची दैवी देणगी असेल तर बोला ;)

तमराज किल्विष's picture

14 Aug 2019 - 9:23 am | तमराज किल्विष

आपल्या मनात खौचट उकळ्या फुटत आहे हे कळलं मला इंट्यूशननं. _/\_

तमराज किल्विष's picture

16 Aug 2019 - 4:48 pm | तमराज किल्विष

We lose a touch with reality and start living in fantasy if we overdo the reading.
>> हा संदेश मला श्री उन्मेष दिक्षीत सरांनी पाठवला आहे व मला तो सर्वात जास्त आवडला आहे. त्यांचे जाहीर आभार मानतो. धन्यवाद.

जॉनविक्क's picture

16 Aug 2019 - 5:00 pm | जॉनविक्क

We lose a touch with reality and start living in fantasy if we overdo the reading.

आवडले.

तमराज किल्विष's picture

16 Aug 2019 - 9:06 pm | तमराज किल्विष

धन्यवाद.

उन्मेष दिक्षीत's picture

16 Aug 2019 - 9:43 pm | उन्मेष दिक्षीत

किल्विष , विक्क.

सर म्हणु नका हो एवढा मोठा (वयाने) नाही मी :)

जॉनविक्क's picture

16 Aug 2019 - 10:00 pm | जॉनविक्क

पण वाचनाची गोडी पाहिजे, वाचनाची गोडी पाहिजे चे तूणतूणे लावणाऱ्याना तुम्ही वास्तवाची जी खणखणीत चपराक दिली त्यामुळे खरोखर मजा आ गया :)

तयासाठी सर हा बहुमान आपणास द्यायलाच हवा.

उन्मेष दिक्षीत's picture

17 Aug 2019 - 9:55 am | उन्मेष दिक्षीत

वाचनाची गोडी मात्र पाहिजेच हं ;)

जॉनविक्क's picture

17 Aug 2019 - 11:30 am | जॉनविक्क

फक्त इडियट बॉक्स प्रमाणे वाचनाच्या अतिरेकाचेही दुष्परिणाम असतात हे देखील अधोरेखित होणे महत्वाचे आहे आणि आपण त्याची सुरूवात केलीत :)

तमराज किल्विष's picture

17 Aug 2019 - 7:30 am | तमराज किल्विष

ह्या ह्या कोणाचं काय तर कोणाचं काय? आपल्या मतलबाप्रमाणे अर्थ काढायचा दुसरं काय.