पासवर्ड

अविनाशकुलकर्णी's picture
अविनाशकुलकर्णी in जनातलं, मनातलं
9 Jul 2019 - 3:52 pm

हर्षद हताशपणे आपल्या केबीन बसला होता...
त्याचा कोंपिटीटर चिन्मय जोशी अत्यंत बुद्धिमान होता...
चिन्मय ने त्याची साईट हॅक करुन पासवर्ड क्र्याक केला होता अन महत्वाची माहिति पळवली होति..
हर्षद चिन्मय चा पासवर्ड काढण्याचा प्रयत्न करत होता पण त्याला जमत नव्हते..
*
चिन्मय च्या बुद्धिमत्तेस तोडीस तोड असलेली एकच व्यक्ति ऑफिस मधे होति...
मानसी पटवर्धन....मागे पण चिन्मय ने असा प्रकार केला असता मानसी ने तो हाणुन पाडला होता...
*
अचानक त्याच्या गळ्यात नाजुक बाहुंचा विळखा पडला..
ए.सी च्या थंड वातावरणात ही तो शहारला..
त्याच्या गालाचे नाजुक पणे चुंबन घेत मानसी म्हणाली...
"का काळजी करतोस? मी आहे ना?" तु अडचणीत असताताना मी कशी शांत असेल??/
*
मानसी ने बाजुची चेअर ओढली.व संगणकावर काम करु लागली..काहि मिनिटाच्या आत तिने हर्षद ला पासवर्ड काढुन दिला..
हर्षद ने पासवर्ड टाकुन फाईल्स उघडल्या..तो चकित झाला होता पासवर्ड बरोबर होता...
*
मानसी शी बोलायला तो चेअर कडे वळाला...
मानसी नव्हती...
हर्षद च्या डोळ्याला अश्रुंची धार लागली..
मानसिचा मृत्यु १० महिन्या पुर्वीच झालेला होता..
*
तुमच्या वर निस्सिम प्रेम करणारी माणसे तुम्हाला अडचणीच्या वेळे कधीच एकटे पडु देत नाहित...

नाट्यलेख

प्रतिक्रिया

खिलजि's picture

9 Jul 2019 - 3:55 pm | खिलजि

गुरुदेव मीपण तुम्हाला कधीच एकटे पडू देणार नाही .. कामधंदे सोडून सदैव प्रतिसाद देण्यासाठी या मिसळपाववर येताच राहणार .. जय गुरुदेव

Rajesh188's picture

9 Jul 2019 - 4:02 pm | Rajesh188

दुसरी कथा आली सुद्धा

गुरुदेव एक रिक्वेस्ट हाय .. बघा जमतेय तर .. पुढच्या वागताला मसाला जरा दुपटीनं वाढून , मी तर म्हणतो चारपाच कथा एकत्र जुळवून पार आय माय , कोणाची कोण इथली जोडी तिथ/, तिथली इथं असं काहीतरी ऍंगल वेगळं करून टाका .. म्हणजे काय वाचकराजा त्यामधून सहजासहजी बाहेरच पडू शकला नाही पाहिजे .. माला वाटत हे तुम्ही आरामात कार्य शकाल पण टंकायचं सोडू नका .. आमहाला पाहिजे राव तुम्ही .. आम्ही मनापासून पिरेम करतो तुमच्यावर ..

गुरुदेव हे आम्हाला फळ भोगायला लावतायत .. त्यांना अजून चारपाच फळे व्यनि करून टाका हि नम्र विनंती .. त्यांनी तुमच्या परमशिष्याना नाराज केलेले आहे .. गुरुदेव अजून दहाबारा बाराच्या भावात टंकूनच टाका .. मी म्हणतो होऊन जाऊन देत एकदाच महायुद्ध .. तिकडे पाऊस आणि इकडे आमच्या गुरुदेवांच्या कथा .. येऊन जाऊन देत पूर ,, वाहून देत सर्व वाचक मंडळी ..भरडून जाऊन देत त्यांच्या माझ्या सर्वांच्याच भांवना .. अश्रुंचे नाले , ओढे , वाहिले तरी चालतील पण हा अश्रुपात झाल्याशिवाय आता हे शमणार नाही .. गुरुदेव ,, उचला ती लेखणी पुन्हा एकदा ,, तोपर्यंन्त मी आई भवानीला , बारा नारळाचं तोरण बांधून येतो .. ते तोरण बांधून येईपर्यँत इथे किमान बारा कथा तरी पडल्याचं पाहिजेत .. जाई भवानी .. जाई शिवाजी

तेजस आठवले's picture

9 Jul 2019 - 4:14 pm | तेजस आठवले

तुमच्यामुळे मिपाचे दुरावलेले वाचक मिपावर परत यायला लागलेत. हे तुमचं यश आहे.
बाकी तुमच्या कथेत एखाद्याचा मुडदा जरी पडलेला असला तरी तो काहीतरी चावटपणा केल्याशिवाय राहत नाही असं दिसतंय. भुतं जिवंत माणसांच्या बाहूंना विळखा घालून चुंबनं घेतात हे माहित नव्हतं.
एवढा अचानक तुमच्या प्रतिभेला कस्काय बहर आला म्हणतो मी. ऑ ?

माहितगार's picture

10 Jul 2019 - 8:12 am | माहितगार

:)

भुतांनी मानेला विळखा घालायचा नाही तर मग कुणी.
आणि दुसरे म्हणजे भुतांना ही भावना असतात की
एक शंका "भूत; ओठ नसताना नुसत्या कवटीने आणि दातांच्या कवळीने चुंबन कसे घेतील ?"
ईमेजीन करून पहातोय , पण काही जमत नाहिय्ये

प्रसाद_१९८२'s picture

12 Jul 2019 - 6:13 pm | प्रसाद_१९८२

एक शंका "भूत; ओठ नसताना नुसत्या कवटीने आणि दातांच्या कवळीने चुंबन कसे घेतील ?"
--

'डरना मना है' या चित्रपटात विवेक ऑबेरॉय,
नाना पाटेकरला "भुत गायब होते है" याचे प्रात्यक्षिक दाखवतो, तसेच प्रात्यक्षिक धागा लेखकाने तुम्हाला दाखवावे, अशी तुमची इच्छा आहे का ?

उद्या चुंबनाचा वर्षाव असा शब्द दिसला tar.....तयाचे पण प्रात्यक्षिक?

सूड दुर्गे सूड ,, आबा जेवायला जेवायला ,, असं काहीतरी आता कानावर पडू लागलंय .. हळूहळू मलापण कुणीतरी दूर दिसू लागलंय ..

@ तेजस आठवले ,, मी पूर्णतः सहमत आहे .. अक्कुकाकांचा मी तर पंखा आहेच पण त्यांच्या या प्रतिसाद ना देण्याच्या भूमिकेचं विशेष कौतुक वाटतं. फार छान वाटतं , इतकं कि कुठेही बाहेर जाऊन फ्रेश व्हायची गरजच नाही .. तुम्हाला माहित आहे , तुम्ही एखाद्याला भरपूर ट्रॉल करताय आणि तरीही तो तुम्हाला काहीच उलटून बोलत नाही , तेव्हा हळूच कुठेतरी तो तुम्हाला जवळच वाटू लागतो .. गुरुदेवांच्या बाबतीत मला हेच वाटते .. ते आता आपले एकदम खास आहेत ..

तेजस आठवले's picture

9 Jul 2019 - 4:28 pm | तेजस आठवले

अग्रीड.

गड्डा झब्बू's picture

9 Jul 2019 - 4:28 pm | गड्डा झब्बू

और आनेदो....

ज्ञानोबाचे पैजार's picture

9 Jul 2019 - 4:38 pm | ज्ञानोबाचे पैजार

साला आज सकाळी उठल्यावर कोणाचे थोबाड पाहिले होते?
आठवलं की त्या माणसाचे थोबाड फोडणार.... घरी गेल्यावर.
काळतोंड्या परत सकाळी सकाळी समोर आला नाही पाहिजे
पैजारबुवा,

खिलजि's picture

9 Jul 2019 - 4:43 pm | खिलजि

ह्हि ह्हि ह्हि

प्रलयनाथ गेंडास्वामीं's picture

9 Jul 2019 - 4:45 pm | प्रलयनाथ गेंडास...

मुतपीठ वरील दर्जेदार लिखाणाची आठवण करून देणारी लेखनमालिका, अकु नी सुरु केल्याबद्दल ...
त्यांना
"मुतपीठाचार्य" हा खिताब देण्यात यावा ...

सन्मानार्थ एक लुना , एक मांजराचे पिल्लु , व एक पातळ शाल ... आणि हाम्रिका वारीचे एक तिकीट देण्यात यावे ....

जॉनविक्क's picture

9 Jul 2019 - 6:06 pm | जॉनविक्क

वर्षाव करायला पाहिजे होता वर्षाव.

अकुसेठ आता तुमच्यावर दर्जा राखायची फाट मोती जबाबदारी आहे, असे आपल्या चाहत्यांना निराश करू नका. पुढचा लोकात हि उणीव भरून कांदा.

खिलजि's picture

9 Jul 2019 - 6:49 pm | खिलजि

मला वाटतं , गुरुदेवांची कार्यशाळा हे नवीन सदर दाखल करायला काहीच हरकत नसावी ..

रिम झिम's picture

9 Jul 2019 - 6:58 pm | रिम झिम

प्रत्येक जण त्याची महत्वाची माहिती साईट वर ठेवतो हे माहित नव्हते.

तुमची साईट सांगा ना, मी पण हॅक करून तुमच्या कथा पळवतो. कशी वाटली आयडिया ?

प्रसाद_१९८२'s picture

9 Jul 2019 - 7:45 pm | प्रसाद_१९८२

छान आहे कथा.
लांबी-रुंदीला थोडी कमी आहे, विस्तार करता आला तर पाहा कथेचा.
---
'पासवर्ड २' च्या प्रतिक्षेत.

प्रमोद पानसे's picture

9 Jul 2019 - 7:53 pm | प्रमोद पानसे

मिपा ज्ञानपिठ पुरस्कार चालू करा .

डॉ सुहास म्हात्रे's picture

9 Jul 2019 - 8:40 pm | डॉ सुहास म्हात्रे

अरे, यांचा पासवर्ड हॅक करा रे कोणीतरी !
=)) =)) =))

अभ्या..'s picture

9 Jul 2019 - 8:46 pm | अभ्या..

त्यापेक्षा तुम्हीच तुमच्यावर निस्सिम प्रेम करणारं कुणीतरी हुडका. ;)
जरा खुर्चीवर चिंताग्रस्त वगैरे टाईपमध्ये बसा. एका बाहुपाशाच्या विळख्यासोबत मिळेल पासवर्ड.

हस्तर's picture

10 Jul 2019 - 1:34 pm | हस्तर

शकयतो भिन्न लिंगी शोधा

ट्रम्प's picture

9 Jul 2019 - 9:30 pm | ट्रम्प

जबरदस्त विनोदी लेखक आहेत अक्कू आणि तेव्हडेच निगरगट्ट .
धागाकर्ता कुलकर्णी नाव वापरतोय !!!
सगळ्या कथा मध्ये जोशी , सोमण , तेंडुलकर , प्रभुणे फक्त हिच नावे वापरली जात आहेत आणि मध्येच एक आंतरजातीय विवाह !!!!
हे सगळे योगायोग समजायचे ? का कुठली तरी नस दुखवल्या मुळे !!!!!!!
आणि एका ही प्रतिसादाला उत्तर न देण्याची हातोटी वाखाणण्या जोगी :)
:)

इरामयी's picture

9 Jul 2019 - 10:03 pm | इरामयी

कहर आहे.

प्रियाभि..'s picture

10 Jul 2019 - 1:25 am | प्रियाभि..
प्रियाभि..'s picture

10 Jul 2019 - 1:52 am | प्रियाभि..

चोरी झालेली माहिती हर्षदने चिन्मयची साईट हॅक करून त्याच्या कॉम्प्युटरमधून पुन्हा चोरली व आपल्या कॉम्प्युटरमध्ये आणून ठेवली असच ना आकुकाका? प्रकाश टाकावा

प्रियाभि..'s picture

10 Jul 2019 - 1:26 am | प्रियाभि..
प्रियाभि..'s picture

10 Jul 2019 - 1:27 am | प्रियाभि..
प्रियाभि..'s picture

10 Jul 2019 - 1:28 am | प्रियाभि..

अकुकाका,

अहो काय हे! शोभतं का तुम्हांस! एव्हढी सुवर्णसंधी चक्क फुकट घालवलीत.

मानसीचा मृत्यू दहा महिन्यांपूर्वी झाला होता ना. मग ती आल्यावर लगेच वर्षश्राद्ध उरकून घ्यायचं होतं की. जेवायला वेगळे ब्राह्मण बोलवायला नकोत. डायरेक्ट मयतालाच जेवायला घालायची नामी संधी आली होती. वाया दवडलीत.

आ.न.,
-गा.पै.

गामा पैलवान's picture

10 Jul 2019 - 12:40 pm | गामा पैलवान

नाय म्हंजे त्याचं असंय की, पहिल्या वेळेस मानसीने ह्याकिंगचा प्रयत्न हाणून पाडल्यावर हर्षदने तिला पौर्णिमेच्या चांदण्या राती क्यांडल्लायटीच्या डिनरास नेलं असेल ना? मग या खेपेस थेट भूतबंगल्यात तिच्याच श्राद्धाच्या भोजनास नेल्याचं दाखवता आलं असतं. फुल्टू मस्तपैकी काण्टराष्ट जमून आला असता.

-गा.पै.

थोड्यावेळाने चिन्मय ला आठवले कि तो पण जिवंत नाही ,हर्षद चा खून केल्या प्रकरणी फाशी दिली होती

नंतर आठवले कि ते मुन्सिपालटी मध्ये काम करतात ,तिकडे कॉम्प्टर पण नाही

शेवटी लक्षात आले कि अकु काका ना मिसळपाव वरून बॅन करून १० वर्षे झाली

सर्वसाक्षी's picture

10 Jul 2019 - 2:15 pm | सर्वसाक्षी

<<तुमच्या वर निस्सिम प्रेम करणारी माणसे तुम्हाला अडचणीच्या वेळे कधीच एकटे पडु देत नाहित>>

मग जाताना मानसी हर्षदला बरोबर घेऊन का नाही गेली?

हस्तर's picture

10 Jul 2019 - 2:28 pm | हस्तर

चुंबन करून पॉट भरले

सर्वसाक्षी's picture

10 Jul 2019 - 2:16 pm | सर्वसाक्षी

कालच्या लेखनास ५० प्रतिसाद होते, आता हा धरून ३६ झाले.

चिगो's picture

12 Jul 2019 - 2:43 pm | चिगो

काका, अहो तुमच्या 'चिन्मय'प्रेमापोटी मला नाव बदलायची वेळ येईल आता.. ह्या चिन्मयवर दया करा थोडी..

हस्तर's picture

12 Jul 2019 - 5:49 pm | हस्तर

नाव बदलून हर्षद करा