पासवर्ड
लेखनप्रकार
हर्षद हताशपणे आपल्या केबीन बसला होता...
त्याचा कोंपिटीटर चिन्मय जोशी अत्यंत बुद्धिमान होता...
चिन्मय ने त्याची साईट हॅक करुन पासवर्ड क्र्याक केला होता अन महत्वाची माहिति पळवली होति..
हर्षद चिन्मय चा पासवर्ड काढण्याचा प्रयत्न करत होता पण त्याला जमत नव्हते..
*
चिन्मय च्या बुद्धिमत्तेस तोडीस तोड असलेली एकच व्यक्ति ऑफिस मधे होति...
मानसी पटवर्धन....मागे पण चिन्मय ने असा प्रकार केला असता मानसी ने तो हाणुन पाडला होता...
*
अचानक त्याच्या गळ्यात नाजुक बाहुंचा विळखा पडला..
ए.सी च्या थंड वातावरणात ही तो शहारला..
त्याच्या गालाचे नाजुक पणे चुंबन घेत मानसी म्हणाली...
"का काळजी करतोस? मी आहे ना?" तु अडचणीत असताताना मी कशी शांत असेल??/
*
मानसी ने बाजुची चेअर ओढली.व संगणकावर काम करु लागली..काहि मिनिटाच्या आत तिने हर्षद ला पासवर्ड काढुन दिला..
हर्षद ने पासवर्ड टाकुन फाईल्स उघडल्या..तो चकित झाला होता पासवर्ड बरोबर होता...
*
मानसी शी बोलायला तो चेअर कडे वळाला...
मानसी नव्हती...
हर्षद च्या डोळ्याला अश्रुंची धार लागली..
मानसिचा मृत्यु १० महिन्या पुर्वीच झालेला होता..
*
तुमच्या वर निस्सिम प्रेम करणारी माणसे तुम्हाला अडचणीच्या वेळे कधीच एकटे पडु देत नाहित...
वाचन
18908
प्रतिक्रिया
41