Skip to main content

पासवर्ड

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी मंगळवार, 09/07/2019 15:52 या दिवशी प्रकाशित केले.
हर्षद हताशपणे आपल्या केबीन बसला होता... त्याचा कोंपिटीटर चिन्मय जोशी अत्यंत बुद्धिमान होता... चिन्मय ने त्याची साईट हॅक करुन पासवर्ड क्र्याक केला होता अन महत्वाची माहिति पळवली होति.. हर्षद चिन्मय चा पासवर्ड काढण्याचा प्रयत्न करत होता पण त्याला जमत नव्हते.. * चिन्मय च्या बुद्धिमत्तेस तोडीस तोड असलेली एकच व्यक्ति ऑफिस मधे होति... मानसी पटवर्धन....मागे पण चिन्मय ने असा प्रकार केला असता मानसी ने तो हाणुन पाडला होता... * अचानक त्याच्या गळ्यात नाजुक बाहुंचा विळखा पडला.. ए.सी च्या थंड वातावरणात ही तो शहारला.. त्याच्या गालाचे नाजुक पणे चुंबन घेत मानसी म्हणाली... "का काळजी करतोस? मी आहे ना?" तु अडचणीत असताताना मी कशी शांत असेल??/ * मानसी ने बाजुची चेअर ओढली.व संगणकावर काम करु लागली..काहि मिनिटाच्या आत तिने हर्षद ला पासवर्ड काढुन दिला.. हर्षद ने पासवर्ड टाकुन फाईल्स उघडल्या..तो चकित झाला होता पासवर्ड बरोबर होता... * मानसी शी बोलायला तो चेअर कडे वळाला... मानसी नव्हती... हर्षद च्या डोळ्याला अश्रुंची धार लागली.. मानसिचा मृत्यु १० महिन्या पुर्वीच झालेला होता.. * तुमच्या वर निस्सिम प्रेम करणारी माणसे तुम्हाला अडचणीच्या वेळे कधीच एकटे पडु देत नाहित...
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 18924
प्रतिक्रिया 41

प्रतिक्रिया

गुरुदेव मीपण तुम्हाला कधीच एकटे पडू देणार नाही .. कामधंदे सोडून सदैव प्रतिसाद देण्यासाठी या मिसळपाववर येताच राहणार .. जय गुरुदेव

गुरुदेव एक रिक्वेस्ट हाय .. बघा जमतेय तर .. पुढच्या वागताला मसाला जरा दुपटीनं वाढून , मी तर म्हणतो चारपाच कथा एकत्र जुळवून पार आय माय , कोणाची कोण इथली जोडी तिथ/, तिथली इथं असं काहीतरी ऍंगल वेगळं करून टाका .. म्हणजे काय वाचकराजा त्यामधून सहजासहजी बाहेरच पडू शकला नाही पाहिजे .. माला वाटत हे तुम्ही आरामात कार्य शकाल पण टंकायचं सोडू नका .. आमहाला पाहिजे राव तुम्ही .. आम्ही मनापासून पिरेम करतो तुमच्यावर ..

गुरुदेव हे आम्हाला फळ भोगायला लावतायत .. त्यांना अजून चारपाच फळे व्यनि करून टाका हि नम्र विनंती .. त्यांनी तुमच्या परमशिष्याना नाराज केलेले आहे .. गुरुदेव अजून दहाबारा बाराच्या भावात टंकूनच टाका .. मी म्हणतो होऊन जाऊन देत एकदाच महायुद्ध .. तिकडे पाऊस आणि इकडे आमच्या गुरुदेवांच्या कथा .. येऊन जाऊन देत पूर ,, वाहून देत सर्व वाचक मंडळी ..भरडून जाऊन देत त्यांच्या माझ्या सर्वांच्याच भांवना .. अश्रुंचे नाले , ओढे , वाहिले तरी चालतील पण हा अश्रुपात झाल्याशिवाय आता हे शमणार नाही .. गुरुदेव ,, उचला ती लेखणी पुन्हा एकदा ,, तोपर्यंन्त मी आई भवानीला , बारा नारळाचं तोरण बांधून येतो .. ते तोरण बांधून येईपर्यँत इथे किमान बारा कथा तरी पडल्याचं पाहिजेत .. जाई भवानी .. जाई शिवाजी

तुमच्यामुळे मिपाचे दुरावलेले वाचक मिपावर परत यायला लागलेत. हे तुमचं यश आहे. बाकी तुमच्या कथेत एखाद्याचा मुडदा जरी पडलेला असला तरी तो काहीतरी चावटपणा केल्याशिवाय राहत नाही असं दिसतंय. भुतं जिवंत माणसांच्या बाहूंना विळखा घालून चुंबनं घेतात हे माहित नव्हतं. एवढा अचानक तुमच्या प्रतिभेला कस्काय बहर आला म्हणतो मी. ऑ ?

In reply to by तेजस आठवले

भुतांनी मानेला विळखा घालायचा नाही तर मग कुणी. आणि दुसरे म्हणजे भुतांना ही भावना असतात की एक शंका "भूत; ओठ नसताना नुसत्या कवटीने आणि दातांच्या कवळीने चुंबन कसे घेतील ?" ईमेजीन करून पहातोय , पण काही जमत नाहिय्ये

In reply to by विजुभाऊ

एक शंका "भूत; ओठ नसताना नुसत्या कवटीने आणि दातांच्या कवळीने चुंबन कसे घेतील ?" -- 'डरना मना है' या चित्रपटात विवेक ऑबेरॉय, नाना पाटेकरला "भुत गायब होते है" याचे प्रात्यक्षिक दाखवतो, तसेच प्रात्यक्षिक धागा लेखकाने तुम्हाला दाखवावे, अशी तुमची इच्छा आहे का ?

सूड दुर्गे सूड ,, आबा जेवायला जेवायला ,, असं काहीतरी आता कानावर पडू लागलंय .. हळूहळू मलापण कुणीतरी दूर दिसू लागलंय ..

@ तेजस आठवले ,, मी पूर्णतः सहमत आहे .. अक्कुकाकांचा मी तर पंखा आहेच पण त्यांच्या या प्रतिसाद ना देण्याच्या भूमिकेचं विशेष कौतुक वाटतं. फार छान वाटतं , इतकं कि कुठेही बाहेर जाऊन फ्रेश व्हायची गरजच नाही .. तुम्हाला माहित आहे , तुम्ही एखाद्याला भरपूर ट्रॉल करताय आणि तरीही तो तुम्हाला काहीच उलटून बोलत नाही , तेव्हा हळूच कुठेतरी तो तुम्हाला जवळच वाटू लागतो .. गुरुदेवांच्या बाबतीत मला हेच वाटते .. ते आता आपले एकदम खास आहेत ..

साला आज सकाळी उठल्यावर कोणाचे थोबाड पाहिले होते? आठवलं की त्या माणसाचे थोबाड फोडणार.... घरी गेल्यावर. काळतोंड्या परत सकाळी सकाळी समोर आला नाही पाहिजे पैजारबुवा,

ह्हि ह्हि ह्हि

मुतपीठ वरील दर्जेदार लिखाणाची आठवण करून देणारी लेखनमालिका, अकु नी सुरु केल्याबद्दल ... त्यांना "मुतपीठाचार्य" हा खिताब देण्यात यावा ... सन्मानार्थ एक लुना , एक मांजराचे पिल्लु , व एक पातळ शाल ... आणि हाम्रिका वारीचे एक तिकीट देण्यात यावे ....

वर्षाव करायला पाहिजे होता वर्षाव. अकुसेठ आता तुमच्यावर दर्जा राखायची फाट मोती जबाबदारी आहे, असे आपल्या चाहत्यांना निराश करू नका. पुढचा लोकात हि उणीव भरून कांदा.

प्रत्येक जण त्याची महत्वाची माहिती साईट वर ठेवतो हे माहित नव्हते. तुमची साईट सांगा ना, मी पण हॅक करून तुमच्या कथा पळवतो. कशी वाटली आयडिया ?

छान आहे कथा. लांबी-रुंदीला थोडी कमी आहे, विस्तार करता आला तर पाहा कथेचा. --- 'पासवर्ड २' च्या प्रतिक्षेत.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

त्यापेक्षा तुम्हीच तुमच्यावर निस्सिम प्रेम करणारं कुणीतरी हुडका. ;) जरा खुर्चीवर चिंताग्रस्त वगैरे टाईपमध्ये बसा. एका बाहुपाशाच्या विळख्यासोबत मिळेल पासवर्ड.

जबरदस्त विनोदी लेखक आहेत अक्कू आणि तेव्हडेच निगरगट्ट . धागाकर्ता कुलकर्णी नाव वापरतोय !!! सगळ्या कथा मध्ये जोशी , सोमण , तेंडुलकर , प्रभुणे फक्त हिच नावे वापरली जात आहेत आणि मध्येच एक आंतरजातीय विवाह !!!! हे सगळे योगायोग समजायचे ? का कुठली तरी नस दुखवल्या मुळे !!!!!!! आणि एका ही प्रतिसादाला उत्तर न देण्याची हातोटी वाखाणण्या जोगी :) :)

In reply to by प्रियाभि..

चोरी झालेली माहिती हर्षदने चिन्मयची साईट हॅक करून त्याच्या कॉम्प्युटरमधून पुन्हा चोरली व आपल्या कॉम्प्युटरमध्ये आणून ठेवली असच ना आकुकाका? प्रकाश टाकावा

अकुकाका, अहो काय हे! शोभतं का तुम्हांस! एव्हढी सुवर्णसंधी चक्क फुकट घालवलीत. मानसीचा मृत्यू दहा महिन्यांपूर्वी झाला होता ना. मग ती आल्यावर लगेच वर्षश्राद्ध उरकून घ्यायचं होतं की. जेवायला वेगळे ब्राह्मण बोलवायला नकोत. डायरेक्ट मयतालाच जेवायला घालायची नामी संधी आली होती. वाया दवडलीत. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

नाय म्हंजे त्याचं असंय की, पहिल्या वेळेस मानसीने ह्याकिंगचा प्रयत्न हाणून पाडल्यावर हर्षदने तिला पौर्णिमेच्या चांदण्या राती क्यांडल्लायटीच्या डिनरास नेलं असेल ना? मग या खेपेस थेट भूतबंगल्यात तिच्याच श्राद्धाच्या भोजनास नेल्याचं दाखवता आलं असतं. फुल्टू मस्तपैकी काण्टराष्ट जमून आला असता. -गा.पै.

तुमच्या वर निस्सिम प्रेम करणारी माणसे तुम्हाला अडचणीच्या वेळे कधीच एकटे पडु देत नाहित>> मग जाताना मानसी हर्षदला बरोबर घेऊन का नाही गेली?

कालच्या लेखनास ५० प्रतिसाद होते, आता हा धरून ३६ झाले.

काका, अहो तुमच्या 'चिन्मय'प्रेमापोटी मला नाव बदलायची वेळ येईल आता.. ह्या चिन्मयवर दया करा थोडी..