दे दे दे दे दे दे

पाषाणभेद's picture
पाषाणभेद in जे न देखे रवी...
18 Jun 2019 - 5:46 pm

दे दे दे दे दे दे दे
अगं दे दे दे दे दे दे
जास्त वेळ नाही पण एकदा तरी दे
जास्त वेळ नाही पण थोडा वेळ तरी दे

किती वेळ झाला सारखा हातात घेते
तु जशी मालकीण मी पण मालक आहे
माझ्याच घरात मला चोरी झाली
मालकपणाची शान थोडी तरी दाखवू दे

दे दे दे दे दे दे दे

सारखं सारखं नवर्याला घालून पाडून बोलते

(चाल सोडून:-
भाजी आणा, दळण आणा, इस्त्री करा, डबा भरा)

महत्वाचे ते काम सोडून इतर कामे करवते
वैतागलो मी आता मला विरंगुळा हवा थोडा
सारखा रिमोट हातात ठेवते थोडा मला पण दे
सगळी क्रिकेट मॅच नाही पण हायलाईट्स तरी पाहूदे

दे दे दे दे दे दे दे
अगं दे दे दे दे दे दे
जास्त वेळ नाही पण एकदा तरी दे
जास्त वेळ नाही पण थोडा वेळ तरी दे
अगं दे ना गं

- पाषाणभेद
१८/०६/२०१९

माझी कवितामुक्त कवितारतीबाच्या कवितामुक्तकविनोदमौजमजा

प्रतिक्रिया

सगळी क्रिकेट मॅच नाही पण हायलाईट्स तरी पाहूदे

हायलाईट पाहून चालला हात चोळीत
अन मोका पाहुन त्यान गाठलं की बोळीत

पैजारबुवा,

जॉनविक्क's picture

19 Jun 2019 - 10:52 am | जॉनविक्क

हणमंतअण्णा शंकराप्पा रावळगुंडवाडीकर's picture

19 Jun 2019 - 11:06 am | हणमंतअण्णा शंकर...

जास्त वेळ नाही पण थोडा वेळ तरी दे

अपेक्षाच असली दोन तीन मिनिटांची ठेवायची. मग कशाला ती देईल? तुझं तू हायलाईट इमॅजिन कर म्हणत आक्खी मॅचच खेळायला एखाद्या पंजाब्याकडे जाईल ती.

धर्मराजमुटके's picture

19 Jun 2019 - 12:16 pm | धर्मराजमुटके

"नवर्‍याचे बायकोस अनावृत्त पत्र" हे दरवेळी क्रिकेट मॅच अगोदर व्हाटस अपवर प्रकाशित होणारे पत्र अगोदरच बायकोला दाखवले असते तर ही कारुण्यपुर्ण कविता लिहायची वेळ आली असती काय ?

प्रतिसादाच्या पहिल्या वाक्यानेच शब्दांचा क्रम किती महत्वाचा असतो ते जाणवलं.

धर्मराजमुटके's picture

19 Jun 2019 - 2:48 pm | धर्मराजमुटके

तुमच्या प्रतिसादानंतर जनता नक्कीच मनातल्या मनात "व्याकरण चालवा" प्रमाणे "शब्द" चालवत असेल :)

डॉ सुहास म्हात्रे's picture

19 Jun 2019 - 4:14 pm | डॉ सुहास म्हात्रे

त्या प्रतिसादात एकुलते एकच वाक्य आहे. ;) :)

जालिम लोशन's picture

19 Jun 2019 - 2:41 pm | जालिम लोशन

आणी ?

दुर्गविहारी's picture

23 Jun 2019 - 1:04 pm | दुर्गविहारी

:-))))