1

मराठी भाषा दिन २०१९- शतशब्दकथा स्पर्धा : निकाल आणि स्पर्धकांची ओळख

Primary tabs

साहित्य संपादक's picture
साहित्य संपादक in जनातलं, मनातलं
27 Feb 2019 - 7:16 pm

नमस्कार मिपाकरहो,

मराठी भाषा दिन २०१९ च्या निमित्ताने मिपावर आयोजित केलेल्या
'शतशब्दकथा' या मिपावरील लोकप्रिय संकल्पनेवर आधारित स्पर्धेचं हे निकालपत्रक. अनेक उत्कृष्ठ कथा या निमित्ताने मिपावर वाचायला मिळाल्या. लेखक, वाचक दोघांचाही भरघोस प्रतिसाद या स्पर्धेला लाभला. आकडेवारीतच वर्णन करायचं म्हटलं तर एकूण ६३ कथा आणि १५००+ प्रतिसाद असं करता येईल.
पण आकड्यांच्या पलीकडे पाहिलं तर इतके विविध विषय लेखकांनी हाताळले, की वाचकांसाठी ही एक मेजवानीच होती. विज्ञानकथा, विनोदी, कौटुंबिक, सामाजिक, फँटसी असे चौफेर विषय शंभर शब्दांच्या मर्यादेत लेखकांनी बसवले, याबद्दल त्यांचं विशेष कौतुक.

यावर्षीच्या शशक स्पर्धेला अतिशय उत्साहवर्धक प्रतिसाद तुम्ही सगळ्यांनी दिलात, त्याबद्दल तुम्हाला मनापासून धन्यवाद.

कथा पाठवण्यासाठी दिनांक ५ फेब्रुवारी ते २० फेब्रुवारी अशी मुदत होती, तर मतदान पहिल्या दिवसापासून ते २५ फेब्रुवारीपर्यंत करता येणार होतं. आधीच जाहीर केल्याप्रमाणे २५ तारखेला भारतीय प्रमाण वेळेनुसार २३:५९:५९ वाजेपर्यंत आलेले मतदान ग्राह्य धरले आहे.

(+१च्या नियमानुसार) प्रथम आलेल्या पाच कथा खालीलप्रमाणे आहेत.

पहिल्या दोन्ही कथांनी मिळवलेल्या समान गुणांमुळे प्रथम क्रमांक विभागून देत आहोत.
अनुक्रमांक धाग्याचे
नाव
लेखकाचे
नाव
प्रथम
क्रमांक
गळ mayu4u
प्रथम
क्रमांक
गॅस चेंबर वकील
साहेब
तृतीय
क्रमांक
ग्लास समीरसूर
चतुर्थ
क्रमांक
तिकीट चिनार
पाचवा
क्रमांक
दखल शब्दसखी


सर्वच कथा दर्जेदार होत्या. स्पर्धा खूप अटीतटीची झाली. पहिल्या दोन कथांना समान गुण आहेत तसेच इतर कथांच्या गुणातही फारसे अंतर नाही.

स्पर्धेत आलेल्या सर्व शशक आणि स्पर्धकांची ओळख खालीलप्रमाणे :SR धाग्याचे
नाव
लेखकाचे
नाव
1 असेही
होते कधीकधी
खिलजि
2 ग्लास समीरसूर
3 आई......'
नावाची हाक
ज्योति
अळवणी
4 कोंडमारा प्रा.डॉ.दिलीप
बिरुटे
5 गळ mayu4u
6 नियती किसन
शिंदे
7 कदाचित सिरुसेरि
8 मारुतीला
घाम फुटतो
बबन
ताम्बे
9 भूक अनिंद्य
10 कल्याण पलाश
11 क्रॉस
कनेक्शन
लौंगी
मिरची
12 गुरु जव्हेरगंज
13 ऑर्डर निशाचर
14 गॅस चेंबर वकील
साहेब
15 निरागस श्वेता२४
16 संघर्ष Prajakta
Yogira...
17 दैव 2 बाप्पू
18 मासा योगी९००
19 बाळ शब्दानुज
20 सत्य कटू
ते जहर वाटते
ज्ञानोबाचे
पैजार
21 ढवळाढवळ टर्मीनेटर
22 दोघी आंबट गोड
23 खजील उपेक्षित
24 रेडिओ,
गाणी आणि
संध्याकाळ
चांदणे
संदीप
25 हकालपट्टी किल्ली
26 दोन
ध्रुवावर
दोघे आपण
माझीही
शॅम्पेन
27 स्वप्न अमेयसा
28 वस्तरा समीरमणियार
29 PhD kool.amol
30 शिक्षा विजुभाऊ
31 उफराटा
न्याय
माम्लेदारचा
पन्खा
32 क्लिन
बोल्ड
नूतन
33 परप्रांतातून पुष्कर
34 निर्णय मोहन
35 आरसा स्मिताके
36 पूर्ण-अपूर्ण मराठी
कथालेखक
37 ड्रॅक्युला प्रचेतस
38 गिनी पिग अनन्त्_यात्री
39 ज्योतिष नेत्रेश
40 ते दोघे विअर्ड
विक्स
41 टर्मिनेशन
लेटर
राजाभाउ
42 गलका गणपा
43 भेट मनुष्य
44 तिकीट चिनार
45 गैरसमज स्मिता
श्रीपाद
46 लोणचं स्वधर्म
47 वेंधळा अंतु
बर्वा
48 सोंग निओ
49 प्रतीक्षा
संपली
लाल गेंडा
50 निरोप बोरु
51 प्राक्तन प्रमोद
देर्देकर
52 वारसदार अभ्या..
53 गारेगार चॅट्सवूड
54 संधी सतिश
पाटील
55 व्हॅलेंटाईन
इव्हिनिंग
बोलघेवडा
56 स्ट्रेट ? सावि
57 पैशाचा
धूर
अर्धवटराव
58 दखल शब्दसखी
59 सौंदर्य मृणाली
कारवटकर
60 आठवणीतली
ती
गणेश.१०
61 आज्जा उगा
काहितरीच
62 मराठी मधुलिका
63 एकतीस चहाबाज


मिपातर्फे विजेत्यांचं दणदणीत अभिनंदन आणि सर्वच स्पर्धकांचं मनापासून कौतुक.

सर्व स्पर्धकांचे, वाचक-मतदात्यांचे, संमं+सासंमं सदस्यांचे आभार मानणं औपचारिक आणि कृत्रिम वाटेल, पण मनात असणारी कृतज्ञता व्यक्त करून इथे थांबतो.

कथाशुभेच्छाअभिनंदन

प्रतिक्रिया

कुमार१'s picture

27 Feb 2019 - 7:22 pm | कुमार१

सर्वांचे अभिनंदन !!

प्रमोद देर्देकर's picture

27 Feb 2019 - 7:32 pm | प्रमोद देर्देकर

विजेत्यांचं अभिनंदन आणि सर्वच स्पर्धकांचं कौतुक -
काही आयडी फक्त शशक लिहण्यासाठी मिपावर आले असं वाटलं कारण त्यांना कधी इथं वावरताना पहिलं नाही.

स्पर्धकांचे अभिनंदन! आणि वाचक/ मतदात्यांचे आभार!
छान झाली स्पर्धा, आणि मराठी दिनाचे औचित्य साधत अशी स्पर्धा आयोजण्यासाठी संपादक मंडळाचे विशेष आभार!

तुषार काळभोर's picture

27 Feb 2019 - 7:55 pm | तुषार काळभोर

पाचपैकी तीन आयडी नवीन आहेत हे विशेष!!

बरेचसे स्पर्धक (आयडी) नवीन दिस्ताहेत .
त्यांनी आता लिहिते राहावे. मिपा आपलंच आहे.

स्पर्धा छान झाली. बरोबर शंभर शब्दात पूर्ण गोष्ट सांगण्याचं आव्हान मिपाकरांनी उत्तम प्रकारे स्वीकारलं.
नानाविध शैलींमधतल्या आणि बहुविध विषयांवरच्या कथांमुळे वाचताना उत्सुकता टिकून राहिली हे विशेष नोंद करावे वाटते.
सर्व स्पर्धकांचे सहभागाबद्दल अभिनंदन.
सर्व विजेत्यांचे या स्पर्धेतील पारितोषिकविजेत्या कथा लिहिण्यासाठी खास अभिनंदन.

विजेत्यांचे अभिनंदन!
स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व लेखकांचे कौतुक!!
आणि स्पर्धा आयोजनात काम करणाऱ्या सर्वांचे आभार!!!

माझे विजेत्या लेखकाबद्दलचे तिन्ही अंदाज चुकले, पण दोन बाबतीत मी बरोबर होते.
• क्रॉस कनेक्शन ही कथा स्त्रीआयडीने लिहली आहे
• आणि गारेगार कथालेखक चॅट्सवूड (चैतन्य रासकर) आहे

नावातकायआहे's picture

27 Feb 2019 - 8:23 pm | नावातकायआहे

सर्वांचे अभिनंदन!
छान झाली स्पर्धा...

विजेत्यांचे अभिनंदन!
स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व लेखकांचे कौतुक!!
आणि स्पर्धा आयोजनात काम करणाऱ्या सर्वांचे आभार!!!

माझे विजेत्या लेखकाबद्दलचे तिन्ही अंदाज चुकले, पण दोन बाबतीत मी बरोबर होते.
• क्रॉस कनेक्शन ही कथा स्त्रीआयडीने लिहली आहे
• आणि गारेगार कथालेखक चॅट्सवूड (चैतन्य रासकर) आहे

चॅट्सवूड's picture

27 Feb 2019 - 11:27 pm | चॅट्सवूड

मी जेव्हा तुमची प्रतिक्रिया बघितली तेव्हाच शॉक झालो होतो, तुम्ही कसं काय ओळखलं?

अंदाज होता तो. बरोबर निघाला :D

चौथा कोनाडा's picture

27 Feb 2019 - 8:48 pm | चौथा कोनाडा

विजेत्यांचं अभिनंदन आणि सर्वच स्पर्धकांचं आभार इतक्या व्हराययटीच्या सुंदर कथा वाचकांपुढे सादर केल्या !

वकील साहेब's picture

27 Feb 2019 - 9:57 pm | वकील साहेब

वाचणाऱ्याला लिहितं अन लिहिणाऱ्याला उत्तरोत्तर अधिक चांगलं लिहितं करणाऱ्या साहित्य संपादकांच्या उपक्रमांचे कौतुक करावे तितके थोडे आहे.
विजेत्या स्पर्धकांचे अभिनंदन.
आणि बहुमूल्य मतदाता मिपाकरांचे विशेष आभार.

डॉ सुहास म्हात्रे's picture

27 Feb 2019 - 10:13 pm | डॉ सुहास म्हात्रे

सर्व प्रतिस्पर्ध्यांचे अभिनंदन !

विजेत्यांचे दणकून अभिनंदन !!

समर्पक's picture

27 Feb 2019 - 10:46 pm | समर्पक

विजेत्यांचे अभिनंदन!

आणि मिपा आयोजनकर्त्यानच माझ्यासारख्या नवश्यागवश्याला व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याबद्दल आभार. व सर्व प्रतिसादकर्त्यांचे आभार

सर्व विजेत्यांचे अभिनंदन. आयोजनकर्त्यांचे आभार.

स्पर्धा मस्त झाली, सगळ्याच कथा वाचायला मजा आली, अशा स्पर्धा नियमित आयोजित करायला हव्यात

अंतु बर्वा's picture

28 Feb 2019 - 12:02 am | अंतु बर्वा

सर्व विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन!!

पद्मावति's picture

28 Feb 2019 - 12:26 am | पद्मावति

सुंदर झाली स्पर्धा. उत्तम, दर्जेदार कथा या निमित्ताने वाचायला मिळाल्या. विजेत्या स्पर्धकांचे आणि सर्वच स्पर्धकांचे मन:पूर्वक अभिनंदन.

स्पर्धेच्या नियोजनासाठी सा.सं.चे आणि भाग घेणार्‍या सर्वांचे आभार.

खरंच खूप छान कथा वाचायला मिळाल्या या निमित्ताने.

१०० शब्दांत पूर्ण कथा बसवूनही काही कथांमध्ये जबरी कलाटणी होती, तर काहींमध्ये खूप छान संदेश दिलेले होते. विनोदी कथा त्यामानाने कमी होत्या (आणि ते साहजिकही आहे), तरीही प्रथम क्रमांक मिळालेली एक कथा विनोदी आहे, हे विशेष!

सा.सं.नी एवढी मेहनत घेऊन सगळ्या कथा आणि लेखकांच्या आयडीचे दुवे दिल्याबद्दल धन्यवाद!
आता स्पर्धा संपली आहे, तर कथांच्या लेखकाच्या जागी साहित्य संपादक ऐवजी मूळ लेखकाचे नाव द्यावे असे सुचवते.

> आता स्पर्धा संपली आहे, तर कथांच्या लेखकाच्या जागी साहित्य संपादक ऐवजी मूळ लेखकाचे नाव द्यावे असे सुचवते. > +१

सर्व लेखकांचे हार्दिक अभिनंदन!! ६३ कथा पाठवल्याबद्दल.

शब्दसखी's picture

28 Feb 2019 - 7:53 am | शब्दसखी

माझा हा लिखाणाचा पहिलाच प्रयत्न होता. लिहितं करण्यासाठी साहित्य संपादकांचे आणि प्रतिसाद देऊन हुरूप वाढवणाऱ्या सर्व मिपाकरांचे मनापासून आभार!!

मोहन's picture

28 Feb 2019 - 9:22 am | मोहन

सर्व विजेत्यांचे अभिनंदन आणि स्पर्धकांचे कौतुक.

विजुभाऊ's picture

28 Feb 2019 - 9:22 am | विजुभाऊ

धन्यवाद
वाचकांना , संपादक मंडळाला
_/\_

सर्व विजेत्यांचे अभिनंदन !
माझ्या कथेला भरभरून प्रतिसाद दिल्याबद्दल आभार !!

राजाभाउ's picture

28 Feb 2019 - 9:38 am | राजाभाउ

सर्व विजेत्यांचे अभिनंदन. स्पर्धेच्या नियोजनासाठी सा.सं.चे आभार. __/\__

सर्व विजेत्यांचे अभिनंदन. आयोजनकर्त्यांचे आभार.

नूतन's picture

28 Feb 2019 - 10:08 am | नूतन

विजेत्या स्पर्धकांचे आणि सर्वच स्पर्धकांचे मन:पूर्वक अभिनंदन.

ज्ञानोबाचे पैजार's picture

28 Feb 2019 - 10:09 am | ज्ञानोबाचे पैजार

सर्व विजेत्या आणि सहभागी स्पर्धकांचे मनःपुर्वक अभिनंदन. सासं आणि इतर सदस्य ज्यांनी ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी जे अपार कष्ट घेतले त्यांचे आभार. त्यांच्या मुळेच आम्हाला ६३ अतिशय सकस कथा वाचायला मिळाल्या.

स्पर्धकांच्या यादीत इथे नेहमीच दंगा करणारे लोक आहेतच पण त्यांच्या पेक्षा जास्त नविन नावे आहेत. त्या सर्वांचेही कळपात स्वागत. आता लेखणी उचलली आहे तर थांबू नका लिहित रहा.

स्पर्धेत सहभागी झालेली प्रत्येक कथा काहीतरी वेगळे सांगायचा प्रयत्न करत होती आणि त्या मुळेच स्पर्धा एवढी दर्जेदार झाली.

सर्वात शेवटी मिपाला शशकचा नाद लावणार्‍या अतिवास ताईंचे ही आभार. त्यांच्या आयडियाच्या कल्पने मुळेच शशक या नव्या कथाप्रकाराची निर्मिती झाली.

पैजारबुवा,

विअर्ड विक्स's picture

28 Feb 2019 - 10:38 am | विअर्ड विक्स

स्पर्धा चांगली झाली ... विजेत्यांचे मन:पूर्वक अभिनंदन .... हि स्पर्धा मागल्या वेळे पेक्षा अधिक रंगली ....

अभ्या..'s picture

28 Feb 2019 - 11:10 am | अभ्या..

मस्त स्पर्धा झाली.
छान छान कथा वाचायला मिळाल्या (मिळालेले ज्ञानः शशक वाटतो तेवढा सोपा प्रकार नाही, मला तर बिल्कुल झेपत नाही)
सर्व विजेत्यांचे अभिनंदन, सुरेख होत्या कथा.
सर्व सहभागी लेखकांचे अभिनंदन, उत्साही लेखनाबद्दल
सासं मंडळाचे अभिनंदन. सुरेख नियोजनासाठी.
प्रतिसाद देणार्‍या वाचकांचे विषेष अभिनंदन.

शब्दानुज's picture

28 Feb 2019 - 11:13 am | शब्दानुज

विजेते , सहभाग नोंदवणारे आणि नेटाने प्रतिसाद देणारे सर्वच अभिनंदनास पात्र आहेत.

पुढच्या वेळी शशकच्या जागी दुसरे काही करू शकतो का हेही पहायला हरकत नाही. शशकस्पर्धा बहुतांश वेळा झालेली आहे

उदा अनुवाद स्पर्धा. एखादे प्रसिद्ध हिंदी गाणे, गोष्टी यांचा अनुवाद कोण उत्तम करू शकेल असे काहीतरी.
सर्वांना एकच लेख/कविता देवून एकदाच सगळ्यांचा अनुवाद प्रसिद्ध करता येईल. जो अनुवाद सगळ्यांना मूळ लेखाला जवळचा वाटेल तो जिंकला.

कथेपेक्षा कवितेत यात जास्त वाव आहे. एकदा प्रयोग म्हणून करायला हरकत नसावी. केवळ काही नाविन्य असावे म्हणून हे उदाहरण आहे.

नाही पटले तर शतशब्दकथा आहेच.

श्वेता२४'s picture

28 Feb 2019 - 11:31 am | श्वेता२४

वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धा व्हाव्यात. न जाणो यातून कुणाला आपलीच प्रतिभा समजून येईल व त्यातून पुढे मोठे काम घडेल. मी याआधी कधीही कथा लिहीली नव्हती पण शशक लिहीली (ती काही फार छान जमलीय असं नव्हे) आणि वाटलं की आपण अजून काही छान करु व लिहू शकतो. नवीन नवीन कल्पना सुचु लागल्या. स्पर्धा नाही झाली तरी जमेल तसे माझे हे साहित्य मिपावर प्रकाशित करायचे ठरविले आहे. मिपावर आधिच कसलेले लेखक, कवी व अनुवादक आहेत. यानिमित्ताने त्यांच्याकडूनही बरेच शिकता येईल

अनिंद्य's picture

28 Feb 2019 - 11:16 am | अनिंद्य

आयोजकांचे आभार आणि १०० शब्दांचे कठीण आव्हान पेलणाऱ्या शब्दप्रभूंचे अभिनंदन !

समीरसूर's picture

28 Feb 2019 - 11:35 am | समीरसूर

सगळ्या विजेत्यांचे आणि स्पर्धकांचे मनापासून अभिनंदन! आणि सगळ्या मिपाकरांना धन्यवाद! त्यांच्या उत्साही सहभागामुळेच ही स्पर्धा रंगली.

संपादक मंडळीचे विशेष आभार! अशी स्पर्धा आयोजित केल्याबद्दल आणि यशस्वी करून दाखवल्याबद्दल त्यांचे कौतुक करावे तेवढे थोडे आहे.

धन्यवाद!

माझा हा शशक लिखाणाचा पहिलाच प्रयत्न होता.लिहितं करण्यासाठी साहित्य संपादकांचे आणि प्रतिसाद देऊन हुरूप वाढवणाऱ्या सर्व मिपाकरांचे मनापासून आभार!!सर्व विजेत्यांचे अभिनंदन.

चिगो's picture

28 Feb 2019 - 1:10 pm | चिगो

सर्व विजेत्यांचे मनःपुर्वक अभिनंदन..
स्पर्धेत भाग घेतलेल्या सर्व लेखकांचेपण पण अभिनंदन.. पुढेही लिहीते रहा, ही विनंती..
साहीत्य संपादक मंडळाला धन्यवाद. त्यांच्या प्रोत्साहनामुळे आणि मेहनतीमुळे इतक्या सुंदर शतशब्दकथा आम्हाला वाचायला मिळाल्या. हार्दिक अभिनंदन!

बबन ताम्बे's picture

28 Feb 2019 - 2:59 pm | बबन ताम्बे

विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन !
माझ्या " मारुतीला घाम फुटतो " या शशकला प्रतिसाद देणार्‍या वाचकांचेही आभार.

विनिता००२'s picture

28 Feb 2019 - 4:58 pm | विनिता००२

सर्व विजेत्यांचे अभिनंदन. :)

पहिल्या तीन कथा माझ्या मनातल्या नुसार विजेत्या ठरल्या. :)

स्मिता.'s picture

28 Feb 2019 - 6:22 pm | स्मिता.

सर्व विजेत्यांचे आणि स्पर्धकांचेही हार्दिक अभिनंदन!

नाखु's picture

28 Feb 2019 - 8:35 pm | नाखु

अभिनंदन.

नीलमोहर's picture

28 Feb 2019 - 8:37 pm | नीलमोहर

सर्व विजेत्यांचे आणि स्पर्धकांचे अभिनंदन..
शशक उपक्रमाला लेखक, वाचकांकडून उत्तम प्रतिसाद लाभला, तसेच कथांमध्येही भरपूर वैविध्य पहायला मिळाले.

नि३सोलपुरकर's picture

28 Feb 2019 - 9:22 pm | नि३सोलपुरकर

सर्व विजेत्यांचे मनःपुर्वक अभिनंदन..

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

28 Feb 2019 - 10:29 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सर्व विजेत्या स्पर्धकांचे अभिनंदन. पहिली कथा कोणती येईल याचा अंदाज बरोबर निघाला.
या निमित्ताने चांगल्या कथा वाचता आल्या. आमच्या काही जिवाभावांच्याही कथा होत्या हे सोबत राहुनही आज कळलं.

बाकी, साहित्य संपादक आपले मनापासून आभार. आपण धक्का दिल्यामुळेच आम्ही पहिल्यांदा
शतशब्दकथेच्या नादी लागलो. तहेदिलसे शुक्रीया. साहित्य संपादकांची ज्यांनी भूमिका केली त्यांचं लै कौतुक आहे.

आता ते कोण होतं हेही जाहीर करुन टाकावे ही लम्र विनंती.

-दिलीप बिरुटे

मित्रहो's picture

1 Mar 2019 - 9:13 am | मित्रहो

विजैत्यांचे अभिनंदन. कथा छान होत्या. स्पर्धा मस्त झाली. गळचा शॉक जबरदस्त होता. गारेगार मला आवडली जिंकली नाही तरीही.
एक विचार आला. शेवटी शॉक असा विचार करून कथा जास्त होत्या. अतिवास ताईंच्या शशक मधील आंजीचा निरागसपणा फारसा जाणवला नाही.

चांदणे संदीप's picture

1 Mar 2019 - 3:59 pm | चांदणे संदीप

अतिवास ताईंच्या शशक मधील आंजीचा निरागसपणा फारसा जाणवला नाही.

कसा जाणवणार? ह्या सगळ्या शशक अंडे घालून केलेल्या होत्या. =))

Sandy

मित्रहो's picture

1 Mar 2019 - 7:58 pm | मित्रहो

मला वाटतं स्पर्धा असल्याने जास्तीत जास्त धक्का देऊन कथा संपवायचा विचार असावा.

संजय पाटिल's picture

1 Mar 2019 - 1:28 pm | संजय पाटिल

विजेत्यांचे अभिनंदन!!

सर्व विजेत्यांचे अभिनंदन आणि सहभागी लेखकांचेही.

अभिजीत अवलिया's picture

1 Mar 2019 - 8:15 pm | अभिजीत अवलिया

सर्व विजेत्यांचे अभिनंदन आणि स्पर्धकांचे आभार.

सर्व विजेत्यांचे अभिनंदन आणि स्पर्धकांचे कौतुक.

चौकटराजा's picture

10 Mar 2019 - 9:15 am | चौकटराजा

तोद्क्यात्थोद्क्यात्थोद्क्यात्थोद्क्यत्थोद्क्ययात्थोद्कक्यात्थोद्क्यात्थोद्क्यात्थद्क्यात्त???????????????