मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मराठी भाषा दिन २०१९- शतशब्दकथा स्पर्धा : निकाल आणि स्पर्धकांची ओळख

साहित्य संपादक · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
नमस्कार मिपाकरहो, मराठी भाषा दिन २०१९ च्या निमित्ताने मिपावर आयोजित केलेल्या 'शतशब्दकथा' या मिपावरील लोकप्रिय संकल्पनेवर आधारित स्पर्धेचं हे निकालपत्रक. अनेक उत्कृष्ठ कथा या निमित्ताने मिपावर वाचायला मिळाल्या. लेखक, वाचक दोघांचाही भरघोस प्रतिसाद या स्पर्धेला लाभला. आकडेवारीतच वर्णन करायचं म्हटलं तर एकूण ६३ कथा आणि १५००+ प्रतिसाद असं करता येईल. पण आकड्यांच्या पलीकडे पाहिलं तर इतके विविध विषय लेखकांनी हाताळले, की वाचकांसाठी ही एक मेजवानीच होती. विज्ञानकथा, विनोदी, कौटुंबिक, सामाजिक, फँटसी असे चौफेर विषय शंभर शब्दांच्या मर्यादेत लेखकांनी बसवले, याबद्दल त्यांचं विशेष कौतुक. यावर्षीच्या शशक स्पर्धेला अतिशय उत्साहवर्धक प्रतिसाद तुम्ही सगळ्यांनी दिलात, त्याबद्दल तुम्हाला मनापासून धन्यवाद. कथा पाठवण्यासाठी दिनांक ५ फेब्रुवारी ते २० फेब्रुवारी अशी मुदत होती, तर मतदान पहिल्या दिवसापासून ते २५ फेब्रुवारीपर्यंत करता येणार होतं. आधीच जाहीर केल्याप्रमाणे २५ तारखेला भारतीय प्रमाण वेळेनुसार २३:५९:५९ वाजेपर्यंत आलेले मतदान ग्राह्य धरले आहे. (+१च्या नियमानुसार) प्रथम आलेल्या पाच कथा खालीलप्रमाणे आहेत. पहिल्या दोन्ही कथांनी मिळवलेल्या समान गुणांमुळे प्रथम क्रमांक विभागून देत आहोत.
अनुक्रमांक धाग्याचे नाव लेखकाचे नाव
प्रथम क्रमांक गळ mayu4u
प्रथम क्रमांक गॅस चेंबर वकील साहेब
तृतीय क्रमांक ग्लास समीरसूर
चतुर्थ क्रमांक तिकीट चिनार
पाचवा क्रमांक दखल शब्दसखी
सर्वच कथा दर्जेदार होत्या. स्पर्धा खूप अटीतटीची झाली. पहिल्या दोन कथांना समान गुण आहेत तसेच इतर कथांच्या गुणातही फारसे अंतर नाही. स्पर्धेत आलेल्या सर्व शशक आणि स्पर्धकांची ओळख खालीलप्रमाणे :
SR धाग्याचे नाव लेखकाचे नाव
1 असेही होते कधीकधी खिलजि
2 ग्लास समीरसूर
3 आई......' नावाची हाक ज्योति अळवणी
4 कोंडमारा प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
5 गळ mayu4u
6 नियती किसन शिंदे
7 कदाचित सिरुसेरि
8 मारुतीला घाम फुटतो बबन ताम्बे
9 भूक अनिंद्य
10 कल्याण पलाश
11 क्रॉस कनेक्शन लौंगी मिरची
12 गुरु जव्हेरगंज
13 ऑर्डर निशाचर
14 गॅस चेंबर वकील साहेब
15 निरागस श्वेता२४
16 संघर्ष Prajakta Yogira...
17 दैव 2 बाप्पू
18 मासा योगी९००
19 बाळ शब्दानुज
20 सत्य कटू ते जहर वाटते ज्ञानोबाचे पैजार
21 ढवळाढवळ टर्मीनेटर
22 दोघी आंबट गोड
23 खजील उपेक्षित
24 रेडिओ, गाणी आणि संध्याकाळ चांदणे संदीप
25 हकालपट्टी किल्ली
26 दोन ध्रुवावर दोघे आपण माझीही शॅम्पेन
27 स्वप्न अमेयसा
28 वस्तरा समीरमणियार
29 PhD kool.amol
30 शिक्षा विजुभाऊ
31 उफराटा न्याय माम्लेदारचा पन्खा
32 क्लिन बोल्ड नूतन
33 परप्रांतातून पुष्कर
34 निर्णय मोहन
35 आरसा स्मिताके
36 पूर्ण-अपूर्ण मराठी कथालेखक
37 ड्रॅक्युला प्रचेतस
38 गिनी पिग अनन्त्_यात्री
39 ज्योतिष नेत्रेश
40 ते दोघे विअर्ड विक्स
41 टर्मिनेशन लेटर राजाभाउ
42 गलका गणपा
43 भेट मनुष्य
44 तिकीट चिनार
45 गैरसमज स्मिता श्रीपाद
46 लोणचं स्वधर्म
47 वेंधळा अंतु बर्वा
48 सोंग निओ
49 प्रतीक्षा संपली लाल गेंडा
50 निरोप बोरु
51 प्राक्तन प्रमोद देर्देकर
52 वारसदार अभ्या..
53 गारेगार चॅट्सवूड
54 संधी सतिश पाटील
55 व्हॅलेंटाईन इव्हिनिंग बोलघेवडा
56 स्ट्रेट ? सावि
57 पैशाचा धूर अर्धवटराव
58 दखल शब्दसखी
59 सौंदर्य मृणाली कारवटकर
60 आठवणीतली ती गणेश.१०
61 आज्जा उगा काहितरीच
62 मराठी मधुलिका
63 एकतीस चहाबाज
मिपातर्फे विजेत्यांचं दणदणीत अभिनंदन आणि सर्वच स्पर्धकांचं मनापासून कौतुक. सर्व स्पर्धकांचे, वाचक-मतदात्यांचे, संमं+सासंमं सदस्यांचे आभार मानणं औपचारिक आणि कृत्रिम वाटेल, पण मनात असणारी कृतज्ञता व्यक्त करून इथे थांबतो.

वाचन 31423 प्रतिक्रिया 0