जननि कर्मभूमिश्च....

सुनील's picture
सुनील in जनातलं, मनातलं
17 Mar 2009 - 1:31 pm

आई आणि मातृभुमी ह्या स्वर्गापेक्षाही श्रेष्ठ आहेत, अशा अर्थाचे सुवचन आपल्याला ठाऊक आहेच. पण मनात एक विचार येतो, जगात असेही काही लोक नक्कीच होऊन गेले असतील की ज्यांनी आपले तन आणि मन स्वतःच्या जन्मभुमीपेक्षाही वेगळ्या अशा कर्मभुमीसाठी वेचले असेल. हरगोविंद खुरानांपासून ते स्वाती दांडेकरांपर्यंत आणि मनमोहन सिंग-अडवाणींपासून ते मुशर्रफ यांच्यापर्यंत अनेक नावे डोळ्यापुढे तरळून गेली. अशी भारंभार नावे जमा होऊ लागली तेव्हा काही चाळण्या लावून नावे गाळून घ्यायची, असे ठरवले.

एकूण तीन निकष लावले -
१) सदर व्यक्तीने आपल्या कर्मभुमीसाठी काही तरी भरीव, ठाशीव असे योगदान दिलेले असावे. कर्मभुमीच्या उत्कर्षाचा ध्यास धरलेला असावा. आणि त्यांच्या ह्या योगदानाची त्यांच्या कर्मभुमीतील तत्कालीन समाजाला जाणिवही असावी. केवळ कर्मभुमीत जाऊन पैसा, नावलौकिक आणि मानमरातब मिळवला, असे नको.

२) सदर व्यक्तीची जन्मभुमी आणि कर्मभुमी हे स्वतंत्र देश असावेत (निदान त्या व्यक्तीच्या जन्मवेळेस तरी), एकाच देशातील दोन प्रांत, असे नको.

३) सदर व्यक्ती आता हयात नसावी.

वरील चाळण्यातून बाहेर पडलेली ही चार "गाळीव" रत्ने -

नेपोलियन बोनापार्ट (१७६९-१८२१)
फ्रान्सला साम्राज्य बहाल करणारा हा पहिला सम्राट. एकेक देश पादाक्रांत करीत ह्याने फ्रेन्च ध्वज दूरवर पोचवला. फ्रान्सला वैभवाच्या शिखरावर नेले. असा हा लढवय्या अस्सल फ्रेन्च असेल असा कोणाचाही समज होईल. पण गमतीची गोष्ट अशी की त्याचा जन्म फ्रान्सचा तर नव्हताच पण त्याची मातृभाषादेखिल फ्रेन्च नव्हती!

इटली आणि फ्रान्स यांच्या दरम्यान असलेले कॉर्सिका हे चिमुकले बेट. आज हे रुढार्थाने फ्रान्सच्या ताब्यात असले तरी पूर्वी ते तसे नव्हते. इटलीच्या जिनोवा राज्याच्या ताब्यातील हे बेट फ्रान्सने पुढे पैसे देऊन विकत घेतले असले तरी कॉर्सिकन माणूस हा मनाचे कधिच फ्रेन्चमन झाला नाही. इतालियन आणि फ्रेन्चची सरमिसळ असलेली कॉर्सिकन ही भाषा खरेतर फ्रेन्चपेक्षाही इटालियनला जास्त जवळची. कॉर्सिका ही नेपोलियनची जन्मभुमी आणि इटालियन ही त्याची मातृभाषा. तरीही नेपोलियनने आपले आयुष्य बहाल केले ते फ्रान्ससाठी!

लॉर्ड बायरन (१७८७-१८२४)
तलवारीपेक्षाही लेखणी ही अधिक धारदार असते, असे म्हणतात. परंतु याचे जळजळीत प्रत्यंतर बायरनचे चरित्र वाचल्याशिवाय येत नाही. इंग्लंडमध्ये जन्मलेला, वाढलेला बायरन ग्रीसमध्ये येतो काय, तुर्की राजवटीखाली पिचत पडलेला एकेकाळचा वैभवशाली ग्रीस पाहतो काय आणि आपल्या लेखणीद्वारे ग्रीकांमध्ये स्वातंत्र्यज्योत पेटवतो काय. सगळेच चमत्कारीक! अगदी - "गीत माझे माझिया हातातली तलवार आहे" असे सुरेश भटांना, बायरनची कथा वाचूनच स्फुरले असावे अशी शंका येण्याइतपत चमत्कारीक!

खुद्द इंग्लंडमध्ये बायरनचा पुतळा असेल की नाही याची शंका आहे पण ग्रीसने मात्र बायरनचे पुतळे उभारले आहेत!
(जगातील पहिली प्रोग्रॅमर म्हणून जिचे नाव घेतले जाते ती ऍडा, ही बायरनची कन्या)

अडॉल्फ हिटलर (१८८९-१९४५)
जर्मनीला जगातील सर्वात बलाढ्य राष्ट्र बनविण्याची इच्छा बाळगणार्‍या हिटलरबद्दल आणखी फार काही लिहावे असे नाही. पण जर्मनीला आपला आत्मसन्मान मिळवून देण्यासाठी झटलेला हिटलर होता ऑस्ट्रीयन!

ऑस्ट्रीया, भाषा जर्मनच पण स्वतःचे वेगळेपण कायमच जपलेला देश. पूर्व आणि पश्चिम जर्मनी एक झाले पण ऑस्ट्रीया त्यांच्यात गेला नाही. वेगळाच राहिला. सर्वसामान्य ऑस्ट्रीयन माणसालाही जर्मन माणसाबद्दल किंचित तिटकाराच. पण त्यांच्यातलाच एक ऑस्ट्रीयन आपले आयुष्य देतो ते जर्मनीसाठी!

अर्नेस्टो "चे" गवारा (१९२८-१९६७)
एक सोडून दोन-दोन कर्मभुमी असणार्‍या चे गवाराचे आयुष्यच सनसनाटी. जन्माने अर्जेंटीनाचा पण लढला क्युबाच्या स्वातंत्र्यासाठी, फिडेल कॅस्ट्रोच्या खांद्याला खांदा लावून. क्युबा स्वतंत्र झाल्यावर, कॅस्ट्रो सरकारात मंत्री! पुढे मंत्रीपद आणि क्युबा दोन्ही सोडून बोलिवियाच्या स्वांतंत्र्य लढ्यात उडी आणि शेवटी बोलिवियातच सी आय ए कडून हत्या!

असा हा माणूस विरळाच!

डिस्क्लेमर - येथे सदर व्यक्तीची वैयक्तिक, राजकीय, सामाजिक मते. त्यांच्या कृत्याची योग्यायोग्यता यांचा विचार केलेला नाही. थोडक्यात, सदर व्यक्ती ह्या सर्वार्थाने "आदर्श" असतीलच असे नाही.

इतिहासमाहिती

प्रतिक्रिया

छोटा डॉन's picture

17 Mar 2009 - 1:38 pm | छोटा डॉन

सुनीलभौ, नेहमीप्रमाणेच अभ्यासपुर्ण आणि उत्तम भाष्य ...
लेख आवडला.

खरं आहे, माणसाचे नशिब आणि कर्तुत्व कुठे फळाला येईल हे सांगता येत नाही.
कोण कुठचा असतो आणि कुठे आपले ॠण फेडुन जातो ह्याला काय नियम अथवा संकेत नाहीत.
थोडक्यात परिचय आवडला ...

बाकीच्यांनीसुद्धा असेच काहितरी उत्तम येऊद्यात ...

अवांतर : लालकॄष्ण आडवाणी हे जन्माने पाकीस्तानचे ना ? आणि बॅ. जीना हे हिंदुस्तानी ...
अजब खेळ आहे नियतीचा ...

------
छोटा डॉन
एखाद्याला देव म्हटलं की देवाच्या चुका दाखवता येत नाहीत, चुका दाखवल्या की भक्तांना त्रास होतो.
त्यात अजुन देवाला "स्वेटर" घालणे ही तर अजुनच मजेशीर गोष्ट. असो. ;)

दत्ता काळे's picture

17 Mar 2009 - 1:50 pm | दत्ता काळे

'चे गव्हेरा' ह्याने फार वेगळा आदर्श जगापुढे मांडला. क्युबा स्वतंत्र झाल्यावर, राजसत्तेच्या मोहाला बळी न पडता बोलेव्हीयाच्या स्वातंत्र्यलढ्यासाठी क्युबातून बाहेर पडला.

रशियातल्या झारच्या जुलूमी राजवटीला उलथवून लावण्यासाठी बोल्शेव्हीकांमध्ये सहभागी असणार्‍या लेनिनचे आणि चे गव्हेराचे व्यक्तिमत्व सारखेच वाटते, परंतु राजसत्तेचा मोह लेनिनला सुटला नाही.

विनायक प्रभू's picture

17 Mar 2009 - 1:53 pm | विनायक प्रभू

एकाहुन एक बाप माणसे सुनिल्भौ

सहज's picture

17 Mar 2009 - 2:39 pm | सहज

बघु काय भर घालता येते.

स्वाती दिनेश's picture

17 Mar 2009 - 2:42 pm | स्वाती दिनेश

लेख आवडला, सहजराव म्हणतात त्याप्रमाणे काही भर घालता येते का पाहते.
स्वाती

परिकथेतील राजकुमार's picture

17 Mar 2009 - 2:43 pm | परिकथेतील राजकुमार

मस्त माहितीपुर्ण लेख आवडला.

©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी
एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य

घाशीराम कोतवाल १.२'s picture

17 Mar 2009 - 3:04 pm | घाशीराम कोतवाल १.२

आपल्याला तर भौ हिटलरचा प्रखर राष्ट्रवाद भावतो नेहमी साला पहिल्या महायुद्यात साधा शिपुर्डा होता
पण प्रखर राष्ट्रवादाच्या जोरावर तो जर्मनीचा चान्सलर बनला आणी जर्मनीला जगाच्या नकाशावर एक
प्रगत राष्ट्र बनविले

**************************************************************
कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे ,
कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे ,
स्वताच्या पैशाने प्यायला मी काय मुर्ख आहे ??

अवलिया's picture

17 Mar 2009 - 3:05 pm | अवलिया

मस्त लेख...

--अवलिया

मदनबाण's picture

17 Mar 2009 - 3:32 pm | मदनबाण

असेच म्हणतो... :)
मदनबाण.....

"If debugging is the process of removing software bugs, then programming must be the process of putting them in." --- Unknown.

नरेश_'s picture

17 Mar 2009 - 4:50 pm | नरेश_

सुनीलभाऊ , मदर तेरेसांना कसे काय विसरलात ?

सही /-

आगरी बोली - आगरी बाना.

llपुण्याचे पेशवेll's picture

17 Mar 2009 - 4:52 pm | llपुण्याचे पेशवेll

डॉ पांडुरंग सदाशिव खानखोजे.. जन्म वर्ध्याचा. कर्मभूमि मेक्सिको.. कर्मः मेक्सिकोचे मक्याचे उत्पन्न अनेक पटींनी वाढविले. मेक्सिकोतिल हरितक्रांतीचे प्रणेते मानले जातात.
पुण्याचे पेशवे
एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते.
Since 1984

विसुनाना's picture

17 Mar 2009 - 5:07 pm | विसुनाना

सोलापुरच्या डॉ. द्वारकानाथ कोटणीस यांची अमर कहाणी - चीनमध्ये घडली.

स्वाती२'s picture

17 Mar 2009 - 6:37 pm | स्वाती२

छान लेख सुनिल. अजुन एक नाव. नोबेल पारीतोषिक विजेते एस. चंद्रशेखर. ब्रिटीश इंडियात जन्म. कर्मभूमी अमेरीका.

अमेरिकन त्रिशंकू's picture

17 Mar 2009 - 7:31 pm | अमेरिकन त्रिशंकू

अल्बर्ट आईन्स्टाईन.

जर्मन राजवटीला कंटाळून दुसर्‍या देशात पळून गेलेले खूप शास्त्रज्ञ/गणिती या प्रकारात मोडतात.

लिखाळ's picture

17 Mar 2009 - 8:04 pm | लिखाळ

चांगला लेख सुनील. गवारा आणि बायरन या दोघांबाबत प्रथमच काही समजले.

जगात असेही काही लोक नक्कीच होऊन गेले असतील की ज्यांनी आपले तन आणि मन स्वतःच्या जन्मभुमीपेक्षाही वेगळ्या अशा कर्मभुमीसाठी वेचले असेल.

या निकषावर हिटलर बसतो का याची फारशी कल्पना नाही. तसेच त्याची कृष्णकृत्य पाहता, जन्मभूमी वेगळी असताना दुसर्‍या भूमीत जाऊन आपला ठसा उमटवलेले असा निकष असता तर हिटलरचे नाव वाचून जे वाटले ते मला वाटले नसते. आज पन्नास वर्षांनंतरसुद्धा त्याचे नाव घेताच जर्मन नागरिकाचा चेहरा पडतो, हेच हिटलरचे योगदान असावे.
-- लिखाळ.

चारही रत्नांचे काही पैलू अज्ञात होते!

हिटलरचा समावेश पटला नाही. जर्मनीला त्याने चेहरा देण्याचा प्रयत्न नक्कीच केला परंतु त्यासाठी जी किंमत मोजावी लागली ती संपूर्ण मानवजातीने मोजली. अत्यंत कर्तृत्ववान आणि जबर महत्वाकांक्षी माणूस परंतु मानवासाठी कलंक ठरावा हा केवढा दैवदुर्विलास!

चतुरंग

क्रान्ति's picture

17 Mar 2009 - 9:04 pm | क्रान्ति

छानच आहे लेख. माहितीपूर्ण आणि वेगळ्या विषयावरचा!
क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}

विकास's picture

17 Mar 2009 - 9:30 pm | विकास

चांगला लेख आणि विषय.

वर पुण्याच्या पेशव्यांनी सांगितलेले "पांडूरंग सदाशीव खानखोजे" हेच नाव एकदम डोक्यात आले. टिळकांच्या प्रेरणेने त्यांनी तरूण भारत सोडला आणि कालांतराने अमेरिकेत जाऊन लाला हरदयाळ यांच्याबरोबर काम केले तसेच आताच्या ओरेगॉन नॅशनल विद्यापिठाची पदवी घेतली आणि नंतर मेक्सिकोत स्थायीक होवून शेती उत्पन्न वाढवण्यासंदर्भात काम केले.

त्यांच्या बाबतीतील एक विचित्र क्षण असा की, १९४७ साली भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर ते "मातृभूमीच्या सेवेसाठी" म्हणून भारतात परतणार होते ... पण ब्रिटीशांच्या "वॉन्टेड" लिस्ट मधे असल्याने त्यांना येण्यापासून मज्जाव केला. :-( अर्थात नंतर चूक सुधारली... :-)

तसेच इतर अनेक आहेत - हयात नसलेल्यांपैकी - नोबेल पारीतोषिक विजेते सुब्रम्हण्यम चंद्रशेखर आणि हयात असलेले अमर्त्य सेन.

अडवाणी, मनमोहनसिंग मुशारफ हे सगळे एकाच देशात जन्माला आले होते. त्यांच्या जन्मानंतर त्याचे विभाजन झाले, हा फरक आहे.

बाकी एक महान व्यक्ती (हयात असलेली) विसरलोच की.... सोनीया गांधी! ;) विचार करा त्या नसत्या तर आज काँग्रेसचे काय झाले असते? :-)

भाग्यश्री's picture

17 Mar 2009 - 11:05 pm | भाग्यश्री

ओह.. ऍडा ही बायरनची मुलगी आहे? वाचून मजा वाटली..

या लिस्टमधे चार्ली चॅप्लीन येईल का? मला नक्की त्याचा जन्म कुठला आठवत नाहीए.. पण एका आत्मचरित्रात तो अमेरिकेचा सिटीझन नाहीए म्हणून त्याला हाकललं होतं, आणि मग तो स्वित्झर्लंडला स्थायिक झाला असं वाचलं..

हिटलरबद्दल मीही साशंक.. पण लॉजिकली त्याची कर्मभूमी, जन्मभूमीपेक्षा वेगळी होती हे पटलं..

प्राजु's picture

18 Mar 2009 - 1:01 am | प्राजु

नक्कीच येईल. तो लंडन चा होता. ब्रिटिश.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

नंदन's picture

17 Mar 2009 - 11:19 pm | नंदन

लेख, अतिशय आवडला. शीर्षकही कल्पक आहे. खानखोजे, कोटणीस, चॅप्लीन ही उदाहरणेही समर्पकच. थोडे निर्बंध सैल केले तर पारशी जमातीच्या (सामूहिक) योगदानाचाही यात समावेश होऊ शकेल.

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

मुक्तसुनीत's picture

18 Mar 2009 - 12:37 am | मुक्तसुनीत

लेख आवडला !
अवांतर : "कर्मभूमी"बद्दल बोलायचे तर कधी दैवदुर्विलासाने उलटेही होते. मला नक्की संदर्भ आठवत नाहीत ; पण शिरीष कणेकरांच्या पुस्तकात चाळीसच्या दशकातल्या एका नटाचा उल्लेख आहे. चित्रपटांच्या धंद्यात आयुष्यभर अपेशाचा धनी झालेला हा मुसलमान माणूस फाळणीनंतर पाकिस्तानात पळून गेला. आणि इथे त्याने जाण्यापूर्वी काढलेल्या सिनेमाने धो धो पैसा मिळवला. (मला कणेकरांचे शेवटचे वाक्य आठवते : "वाह रे किस्मत !" )

धनंजय's picture

18 Mar 2009 - 12:45 am | धनंजय

करणारा लेख!

फार पूर्वीच्या काळी मराठी मुलुखातून अनेक विद्वान काशी क्षेत्री गेले, तर उत्तरेकडील गागाभट्ट महाराष्ट्रात आला.

मयुरा गुप्ते's picture

18 Mar 2009 - 2:36 am | मयुरा गुप्ते

चार्ली चॅप्लीन चा जन्म लंडनचा असला तरी सर्व जगावर हास्य-अधिराज्य केले. त्यांना अमेरीके मधुन केवळ 'कम्युनिस्ट' असल्याच्या (कदाचित खोट्या) आरोपावरुन हाकलुन दिले होते.
अजुन एक नाव : अमर्त्य सेन- जन्मस्थान -शांतिनिकेतन

भाग्यश्री's picture

18 Mar 2009 - 3:46 am | भाग्यश्री

होय तेही एक कारण.. कम्युनिस्ट असल्याच्या (बहुतेक खोट्या) आरोपावरून तसेच तो सिटीझन नसल्याने , अमेरिकाद्वेष्टा वाटल्याने हाकलले त्याला..

http://bhagyashreee.blogspot.com/

सुनील's picture

18 Mar 2009 - 12:23 pm | सुनील

नेहेमीप्रमाणेच प्रतिसादातूनही नव-नवी माहिती मिळाली. धन्यवाद!

यादी बनविताना डॉ कोटणिस आणि मदर तेरेसा ही नावे डोळ्यापुढे होतीच. परंतु, त्यांचे कार्यक्षेत्र हे त्यांच्या कर्मभुमीपुरतेच (अनुक्रमे चीन आणि भारत) मर्यादित नव्हते तर वैचारीकदॄष्ट्या अखिल मानवजात ही त्यांच्या कार्यक्षेत्रात येत होती, हे नजरेआड करता येत नव्हते. साहजिकच पहिल्या निकषाला ते (त्यांच्या कार्याच्या मोठेपणामुळे) उतरत नव्हते. म्हणून कठोरपणे त्यांची नावे मला यादीतून वगळावी लागली.

हेच थोड्याफार फरकाने आइनस्टाइन, चंद्रशेखर इ. बाबत म्हणता येईल. मात्र खानखोजे यांचा समावेश कदाचित करता येईल किंवा कसे, याबाबत मी साशंक आहे.

चार्ली चॅप्लिनला अमेरिकेतून जावे लागले असले तरी तोवर त्याचे कार्य बर्‍यापैकी संपले होते. आणि मूळात तो इंग्लंडहून अमेरिकेला गेला तोच मुळी नशिब काढायला. त्यामुळेच पहिल्या निकषाच्या आधारे तो बाद होतो. (जे चॅप्लिनबाबत घडले तसेच काहिसे वूडहाउसबद्दल घडले!).

हिटलरबद्दल अनेकांचा आक्षेप आहे असे दिसते. ते तसे योग्यच आहे पण कृपया माझे डिस्क्लेमर वाचावे. मी त्याची कुठल्याही अर्थाने भलावण केलेली नाही, करू शकत नाही. निर्धारित केलेल्या निकषांमध्ये मात्र तो बरोबर फिट्ट बसतो, हे मात्र खरे!

मुक्तसुनित यांनी वर्णन केलेला निर्माता कोण हा प्रश्न मात्र बरेच काळ सतावत राहणार, हे नक्की!

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

घाटावरचे भट's picture

18 Mar 2009 - 12:37 pm | घाटावरचे भट

वर नंदनने म्हटल्याप्रमाणे पारशीबावाजींबद्दल बोलायचं झालं तर डोळ्यासमोर येणारं मुख्य नाव म्हणजे जेहांगीर रतनजी दादाभाय टाटा.

जन्म - २९ जुलै १९०४, पॅरिस (फ्रान्स) येथे.
मृत्यू - २९ नोव्हेंबर १९९३, जीनीव्हा (स्वित्झर्लंड) येथे.
मातृभाषा - अर्थातच फ्रेंच

त्यांनी फ्रेंच सैन्यात काही काळ सेवादेखील केली. पण भारतात आल्यानंतर त्यांनी भारतीय उद्योग क्षेत्रात जे काही काम करून ठेवलंय त्याला आज तरी तोड नाही.

यन्ना _रास्कला's picture

18 Mar 2009 - 5:41 pm | यन्ना _रास्कला

भगिनी निवेदिता